"आजकाल कोणाला माणुसकी राहिलेली नाही"
"आता काय, पैसा हाच देव झाला आहे"
"कलियुग आहे, हे असेच चालायचे"
आजकाल सगळ्याच थोरामोठ्यांच्या तोंडी येणारी ही वाक्ये. प्रत्येकाला आयुष्यात असे अनुभव आले नसतील असेही नाही. पण तसेच आपल्याला असेही अनुभव आलेले असतात की माणुसकी अजून जिवंत आहे. थोर समाजसेवक, संत यांची तर गोष्टच निराळी ते स्वतःचे पूर्ण आयुष्य समाजाच्या भल्यासाठी वेचतात. माणुसकीने भारलेली असामान्य व्यक्तिमत्वच ती. पण त्याच बरोबर कधी कधी सामान्यातली सामान्य माणसे सुद्धा कित्येकदा असामान्य माणुसकी दाखवून देतात, आपल्यात रुजलेल्या मूल्यांचे दर्शन घडवतात. माणसाच्या चांगुलपणावर श्रद्धा अटळ ठेवायला मदत करतात.
या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील अशा प्रसंगांची आणि अनुभवांची आठवण काढू या, सर्वांसोबत ते वाटून घेऊ या. भविष्यात जर कधी या जगातील वाईट अनुभवांनी मन व्यथित झाले तर या धाग्यावर, या विषयावर काढलेल्या धाग्यांवर परत येऊ, प्रसन्न मनाने परत जगासोबत आनंद वाटून घ्यायला सज्ज होऊ.
तुम्हाला हवे असेल तर वेगळा धागा काढून तुमचे असे क्षण लिहू शकता किंवा याच धाग्यावर प्रतिसादात लिहू शकता.
हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.
वेगळा धागा काढायचा असेल तर कृपया खालील नियमावली पहा.
१) लेखनासाठी शब्द मर्यादा नाही.
२) धाग्याचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"मला भेटलेला देवमाणूस- {तुमचे नाव / मायबोली आयडी}"
३) प्रत्येक धाग्याला "मायबोली गणेशोत्सव २०२५" अशी शब्दखूण द्यावी
४) लेखन पूर्वप्रकाशित नसावे.
५)प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार सप्टेंबर ७, २०२५ वेळ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
६) प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २७ ऑगस्ट ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
७) ‘मायबोली गणेशोत्सव २०२५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
८)याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२५ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरू नये).
तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
नाही बसत सामो ?
नाही बसत सामो ?
मला सांगता येइलसे वाटत नाही
मला सांगता येइलसे वाटत नाही पण असे म्हणायचे आहे की ही सारी माणसे ज्यांनी आपलयला घडवले, त्यांचा वाटा अमूल्यच आहे पण त्यांचे आपल्याशी खूप घट्ट नाते असल्याने, एक थर्ड पर्सन म्हणुन त्यांचे मूल्यमापन करता येणार नाही. माणुसकीवर श्रद्धा बसण्याकरता वगैरे तिर्हाईत व्यक्तीचा अनुभव महत्वाचा असतो. हां आता आपल्याच आईने किंवा वडीलांनी वगैरे वगैरे काही एक्सेप्शनल अन्य कोणाकरता केले असेल तर ते धरता येइल.
माणुसकीवर श्रद्धा बसण्याकरता
माणुसकीवर श्रद्धा बसण्याकरता वगैरे तिर्हाईत व्यक्तीचा अनुभव महत्वाचा असतो. >> क्या बात. आवडले हे.
एक थर्ड पर्सन म्हणुन त्यांचे मूल्यमापन करता येणार नाही. >> सहमत आणि नाहीही.
थर्ड पर्सन ने जे केलं असतं त्यामुळे आपण त्याला देवमाणूस मानू, ते या लोकांनी केलं नाही का ?
या लोकांचा परीघच वेगळा,
या लोकांचा परीघच वेगळा, त्यांच्याकडुनच्या आपल्या अपेक्षा वेगळ्या आहेत गं. त्यांनी काही गोष्टी करणं हे अक्षरक्षः अध्याहृत (
)च असते. ते केले नाही तर आपण दूषणे देतो.
थर्ड पर्सनकडुन शून्य अपेक्षा असताना, माणुसकीचे, जे सुंदर दर्शन अवचित घडुन जाते, त्याने आपल्याला हुरुप येतो.
थर्ड पर्सनकडुन शून्य अपेक्षा
थर्ड पर्सनकडुन शून्य अपेक्षा असताना, माणुसकीचे, जे सुंदर दर्शन अवचित घडुन जाते, त्याने आपल्याला हुरुप येतो. >> हे अगदीच पटलं.
आता आठवतील उदाहरणं. नाहीतर भेटलेला देवमाणूस अवघड होतं.
छान पोस्ट सामो आणि मुद्दे
छान पोस्ट सामो आणि मुद्दे पटले.
फक्त आपला नवरा आपल्यासाठी काही चांगले करत असेल तर त्याला देवमाणूस मानायला कोणी बिलकुल मागेपुढे बघू नका. आणि जावई चांगला वागला तर त्यांच्यातही देवमाणूस शोधा
शुभरात्री
मला आजवर रिक्षात विसरलेल्या
मला आजवर रिक्षात विसरलेल्या वस्तू परत मिळाल्या आहेत. पण एक अनुभव कायमचा लक्षात राहणारा आहे.
दिल्लीत वस्तू हरवली तर आपण गेली असेच समजतो. पण एकदा हॉटेल ते निजामुद्दीन प्रवासात एक पाऊच सीटवरच राहिला. त्यात एक चांदीचा दागिना (फार महाग नाही), दीड हजार रूपये आणि ऑगस्ट क्रांतीचं कन्फर्म रेल्वे तिकीट होतं. निजामुद्दीनला कॅब आत येऊ देत नाहीत. सर्कलला थांबावं लागतं..
एण्ट्रसला टीसी नसल्याने सरळ तीन नंबर प्लॅटफॉर्म वर गेले. ट्रेन आलेली होती पण दरवाजे उघडलेले नव्हते. पाच दहा मिनिटानंतर ते उघडलेच असते. अजून मला तिकीट माझ्याकडे नाही हेच लक्षात आलेलं नव्हतं तोच मागून तो कॅबचालक घामाघूम होऊन पळत आला. त्याने तो पाऊच हातात दिला.
"आप का टिकट है इसमे " एव्हढंच बोलला.
काय बोलावं हेच समजेना. थँक्यू म्हणून दोनशे रूपये देऊ केले तर नम्रपणे नाकारून निघून पण गेला.
त्याला देवमाणूस म्हणता येईल का ? देवासारखा आला म्हणून.
रंगपंचमीला मुंबईत विद्याविहार
रंगपंचमीला मुंबईत विद्याविहार स्टेशनला उभी होते. अगदी रिकामी ट्रेन होती देव जाणे कशी? दुपार असावी. पण मी एकटी दरवाज्यात उभी होते डब्यात दुसरे कुणीही नव्हते. एक फाटका माणूस डब्यात शिरला. मला स्त्रीसुलभ इन्स्टिंक्टने तिथून उतरुन जाण्याची बुद्धी व्हायला हवी होती ती झाली नाही.
अगदी जवळ जवळ ट्रेन सुटायच्या वेळी एक रेल्वे पोलिस आला आणि त्याच्या बखोटीस धरुन त्याला प्लॅटफॉर्मवरती नेउन, काहीतरी विचारु लागला.
.
मला असे वाटते की मी वाचले. त्या कर्तव्यदक्ष पोलिसाने तो डबाच कसा पाहीला? तो एक प्रसंग मला देवा वरची श्रद्धा बळकट करणारा वाटतो. मी त्या पोलिसाला देवमाणूसच म्हणेन.
बाका प्रसंग !
बाका प्रसंग !
राभु तुझ्या अनुभवाशी समांतर -
राभु तुझ्या अनुभवाशी समांतर -
अर्थात मी अकाऊंट बंद करुन टाकलेले होते. पण कोणीतरी स्वखर्चाने, स्टँप लावुन परत केले. अगदी गेल्या महीन्यात.
गेल्या महीन्यात माझे बँकेचे डेबिट कार्ड हरवले जे की पोस्टाने आले
गुगल करुन, पत्ता मिळवला असणार नक्की.
वा! देवमाणसावर चर्चा रंगू
वा! देवमाणसावर चर्चा रंगू लागली आहे तर! मी ही प्रयत्न करेन म्हणते.
निकु नक्की लिही.
निकु नक्की लिही.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/83383#comment-5129347
वाचनाच्या धाग्यावर टाकले आहे.
फक्त उपक्रमाचा भाग म्हणून नाही तर वाचनाच्या संधी उपलब्ध करून देणारे म्हणूनही ह्यांच्या विषयी कधीतरी नोंद करायची होती.. हे निमित्त!
Pages