लेखन उपक्रमः मला भेटलेला देवमाणूस.

Submitted by संयोजक on 14 August, 2025 - 05:25

"आजकाल कोणाला माणुसकी राहिलेली नाही"
"आता काय, पैसा हाच देव झाला आहे"
"कलियुग आहे, हे असेच चालायचे"

आजकाल सगळ्याच थोरामोठ्यांच्या तोंडी येणारी ही वाक्ये. प्रत्येकाला आयुष्यात असे अनुभव आले नसतील असेही नाही. पण तसेच आपल्याला असेही अनुभव आलेले असतात की माणुसकी अजून जिवंत आहे. थोर समाजसेवक, संत यांची तर गोष्टच निराळी ते स्वतःचे पूर्ण आयुष्य समाजाच्या भल्यासाठी वेचतात. माणुसकीने भारलेली असामान्य व्यक्तिमत्वच ती. पण त्याच बरोबर कधी कधी सामान्यातली सामान्य माणसे सुद्धा कित्येकदा असामान्य माणुसकी दाखवून देतात, आपल्यात रुजलेल्या मूल्यांचे दर्शन घडवतात. माणसाच्या चांगुलपणावर श्रद्धा अटळ ठेवायला मदत करतात.

या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील अशा प्रसंगांची आणि अनुभवांची आठवण काढू या, सर्वांसोबत ते वाटून घेऊ या. भविष्यात जर कधी या जगातील वाईट अनुभवांनी मन व्यथित झाले तर या धाग्यावर, या विषयावर काढलेल्या धाग्यांवर परत येऊ, प्रसन्न मनाने परत जगासोबत आनंद वाटून घ्यायला सज्ज होऊ.

तुम्हाला हवे असेल तर वेगळा धागा काढून तुमचे असे क्षण लिहू शकता किंवा याच धाग्यावर प्रतिसादात लिहू शकता.

हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.

वेगळा धागा काढायचा असेल तर कृपया खालील नियमावली पहा.

१) लेखनासाठी शब्द मर्यादा नाही.
२) धाग्याचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"मला भेटलेला देवमाणूस- {तुमचे नाव / मायबोली आयडी}"
३) प्रत्येक धाग्याला "मायबोली गणेशोत्सव २०२५" अशी शब्दखूण द्यावी
४) लेखन पूर्वप्रकाशित नसावे.
५)प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार सप्टेंबर ७, २०२५ वेळ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
६) प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २७ ऑगस्ट ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
७) ‘मायबोली गणेशोत्सव २०२५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
८)याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२५ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरू नये).

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक!
एका उपक्रमात आपले कौतुक आणि स्वतःबद्दलचा अभिमान तर दुसऱ्या उपक्रमात आपल्याला भेटलेल्या देवमाणसाचे गुणगान Happy

पहिल्या विषयावर लिहिण्यात आयुष्य गेले..
यावर लिहायला जास्त आवडेल Happy

संयोजक सर्वच उपक्रम छान आहेत. हे अनुभव इंटरेस्टिंग असतील.
मला कोणी देवमाणूस भेटले नाही कारण मी लंकेत राहते. पण हे मीम खास संयोजकांसाठी Proud -F72UlexWYAA6JYU.jpg

मला भावलेली व्यक्ती बरं. मग ती का , कशी ते लिहिणारे सांगतील.

कारण देव माणसाची व्याख्या काय पासून सुरुवात करतील काही टवळी (सॉरी टकळी ).

मला भेटलेल्या देवबाई असं कुणीच म्हणत नाही. म्हणूनच कंटाळून मृणाल देव कुलकर्णी झाल्या. >> Lol

"बाई माणूस" च असते>> Happy
ह्याची आठवण करून द्यावी लागते Happy

सामान्य माणसे सुद्धा कित्येकदा असामान्य माणुसकी दाखवून देतात, आपल्यात रुजलेल्या मूल्यांचे दर्शन घडवतात. माणसाच्या चांगुलपणावर श्रद्धा अटळ ठेवायला मदत करतात. >>>

असे अनेक लोकं आतापर्यंत भेटलेतं. वेळोवेळी त्यांच्याविषयी लिहिल होतं.
अलीकडेच २६ जुलैच्या पुरा संदर्भात काढलेल्या मुंबई स्पिरिट मध्येच अनेकांनी त्यांना अनोळखी लोकांकडून अनपेक्षितपणे किती / कशी मदत मिळाली ते लिहिलंय.
त्या वेळी ती सर्व मंडळी देवासारखीच धावून आली असे त्या प्रसंगातून जाणाऱ्या व्यक्तीला वाटत राहते.
देव माणूस - देवासारखा परिपुर्ण / सर्वगुणसंपन्न असं क्वचितच कोणी असतं, पण माणसातील देवपण ( चांगुलपणा, गैरसोय झाली तरी doing right over wrong करणारं ) तुरळक का असेना अनुभवायला मिळालं की भारी वाटतं, हे निश्चित.

-उपक्रम वाचून डोक्यात आलेले विचार!

ह्या उपक्रमानिमित्ताने अनेक माणसांच्या चांगल्या गोष्टी / किंवा चांगल्या माणसांच्या गोष्टी वाचायला मिळतील. Positivity/ सकारात्मकता वाढविणारा उपक्रम !

हे उगाच चर्चा करायची म्हणून. असामान्य माणुसकी, माणुसकीवर विश्वास मग त्याला किंवा तिला थेट देवमाणूस म्हणणं यावरून इतरांशी काही परतफेडीची आशा - शक्यता - गरज नसताना चांगलं वागणं हा माणसाचा गुण नाही का असा प्रश्न पडला आणि वाईट वाटलं.

आणि कृपा करून कोणीही
भेटलेला देव माणूस हा शाकाहारी आहे का मांसाहारी
असा भेद करू नये.

' लिमीटेड माणुसकी' चे दिवस आहेत.
त्यामुळे कुणी माणुसकी दाखवली की त्याला सुपरलेटीव degree बहाल करून देव माणूस गटात मोडले जाणे आपसुकच होत असावे.

अर्थात स्वतःला देव समजणारे ( देवमाणसे ) ह्या देवमाणूस गटापासून अतिशय वेगळे !

भेटलेला देव माणूस हा शाकाहारी आहे का मांसाहारी
असा भेद करू नये. >>> गल्ली चुकली का?
ते दुसऱ्या गल्लीत (धाग्यावर) चालू आहे.

उप्क्रम रिपिट होतायेत.
हरकत नाही. नव्या रन्गात नव्या ढंगात एण्त्री येउ देत
>>>>>

शुद्धलेखन आणि टायपो सांभाळ
शेजारच्या गल्लीत त्यावरून सुद्धा राडे होताहेत Proud

असे कोणी भेटल्याचे स्मरत नाही. माबुदो. खूप प्रेम करणारी एक मैत्रिण आहे पण ती नुसतीच प्रेमळ आहे, ती टिकाच करत नाही. अगदी खरे सांगायचे तर विवेक विसरुन, चूकीच्या रस्त्यावरुन जातेवेळी परखड टिका करणारे , डोळ्यात अंजन घालणारे लोक मला जास्त देवमाणसे वाटतात. आणि ती माबोवरही भेटू शकतात, अगदी कुठेही भेटू शकतात.
.
>>>>>माणसाच्या चांगुलपणावर श्रद्धा अटळ ठेवायला मदत करतात.
अश्या माणसांच्या करवी, देव चपराक लावत असतो - हे माझे मत झाले. कोणाला नाइव्ह वाटेल कोणाला प्रांजळ तर कोणाला लेम. पण माझ्यापुरता हेच खरे.

हाहाहा Happy होय जर तुमचा विवेक व भान सुटलेले असेल तर Happy ......................... जस्ट किडिंग. विनोद पोचला. तुमच्या विनोदातील, चितीचे स्फुरण हृदयात झाले Wink

थोडक्यात मी सुद्धा माझ्यामते कित्येक जणांसाठी देवमाणूस बनायचे काम करतो.
स्वतःबद्दलचा अभिमान वाटावी अशी गोष्ट क्रमांक सदुसष्ट हजार तीनशे बहात्तर... कधी होणार इतके लिहून

थोडक्यात मी सुद्धा माझ्यामते कित्येक जणांसाठी देवमाणूस बनायचे काम करतो.>> 'इतरांना भेटलेला देवमाणूस ' ह्या विषयावर लिहिता येईल.

सर, मी आधी डाकू होतो पण ,मग तुमच्या कृपेमुळेच देव माणूस बनलो. हा घ्या माझा दंडवत.
अश्रू आवरता आवरत नाहीत.

सिरीयसली धाग्याच्या विषयावर लिहावं तर चटकन कुणीच आठवेना Proud

बाहेर शोधल्यावर असं वाटतं. मग जवळ शोधल्यावर देवमाणसांची मांदियाळीच दिसली.
आजी आजोबा, बाबा, आई, भावंडं, प्रेम करणारे काका काकू, गुरूजन... यांनी आपलं बालपण सावरलं.
शेजारी पाजारी ज्यांनी घराच्या बाहेर अनेकदा मदत केली, अनेक गोष्टी शिकवल्या.
मित्रमैत्रिणी, जीवघेण्या आजारातून वाचवणारे डॉक्टर्स.

ही देवमाणसं या सदरात मोडत नसतील तर मग देवंमाणूस कुणाला म्हणायचं ?

>>>>>आजी आजोबा, बाबा, आई, भावंडं
हे लोक बाय डिफॉल्ट आपलेच असतात पण...
>>>>>असामान्य माणुसकी दाखवून देतात, आपल्यात रुजलेल्या मूल्यांचे दर्शन घडवतात. माणसाच्या चांगुलपणावर श्रद्धा अटळ ठेवायला मदत करतात.
या निकषात ते बसतात का?

Pages