वाड्यावर खूपच आग्रह झाल्यामुळे या मालिकेसाठी शेप्रेट धागा काढत आहे 
राजश्रीच्या सगळ्या पिक्चरांचा काला करून त्यातल्या हाताला लागतील त्या गोष्टी उचलून बनवलेली ही मालिका वाटते आहे. सुरूवातीलाच एक लहान मुलाच्या आवाजात बोलणारा हरी नावाचा इरिटेटिंग पोपट आहे. हा सग्ग्ळं सग्ग्ळं बोलतो. तळी नावाच्या गावाची ओळख करून देतो. तळी मधे तळीराम आहेत की नाही ते कळलं नाही अजून. पण तळी मधे एक देवीआई आहे. या गावांमधे साधी देवी नसतेच का? देवीआईच कशी असते कंपल्सरी?
कोणी मीरा म्हणून मुलगी दाखवली आहे. ती म्हणे कशामुळे तरी गावच्या देवीचं तोंड बघत नसते पण तिची सेवा मात्र करत असते. म्हणजे डोळे बांधून गाभार्यात जाऊन वस्तू देणे वगैरे गोष्टी करत असते. तिची बहीण हयात नाहीये असा एक उल्लेख आलाय. ती कशी मेली आहे ते समजलं नाहीये. पण त्याचा दोष मीरा 'देवीआई' ला देत असते.
दुसरीकडे एक 'रामपुरे' नावाचं घराणं दाखवलं आहे. दोन भाऊ, त्यांच्या दोन बायका, एक आगाऊ टीनेजर मुलगी असा सरंजाम दिसला. भिंतीवरी ( कालनिर्णय नव्हते. हे ममव घर नव्हे. ) मोठ्या भावाच्या सुनेचा अर्धी भिंत झाकणारा फोटो. मोठी जाऊ धूपपात्र घेऊन घरभर फिरवत येते ( मधेच भन्साळी पण आठवला असावा ) मग या सुनेच्या फोटोसमोर तिच्या चांगुलपणाचं गुणगान होतं. बरीच बडबड झाल्यावर समजतं की मोठ्या भावाच्या मोठ्या मुलाची ही बायको आहे - अंबिका, कशाने तरी मेली आहे आणि तिच्या मृत्युला एक वर्ष होत आलं आहे. मोठ्या मुलाला एक मुलगी आहे आणि बापलेक अजूनही दु:खात आहेत. तरीही घरच्यांना आता त्याचं पुन्हा लग्न लावून द्यायचं आहे.
कट टू मोठा मुलगा - अथर्व. याचं मराठी फार कष्टाने उच्चारलेलं आहे. त्याची कसलीशी फॅक्टरी/कंपनी आहे. अर्थातच! राजश्री फॉर्म्युला असल्यामुळे फॅक्टरी वगैरे हवीच. त्याचं नाव प्रेम नाही हे आपलं नशीब. तो दु:खी दिसण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यासोबत असलेले कोणी केशवकाका त्याला दुसरं लग्न करायचा आगंतुक सल्ला देतात.
फॅक्टरीमधे काम करणार्या एका बाईला तिथला सुपरवाइजर ती बाळाला फीड करत असताना पाहतो आणि बाळ हिसकावून घ्यायला लागतो. मुळात ती तिथे बाळ घेऊन कशी आलेली असते? आणि हा बाळ हिसकावून काय करणार असतो? एंटर अथर्व - तो सुपरवाइजरला फडाफडा मुस्काटात मारतो आणि बाईची माफी मागतो. वर फीडींगसाठी रूम बनवण्याचे आदेश देतो.
सुपरवाइजरला हाकलून दिल्यावर अथर्व त्या बाईच्या बाळाला उचलून वगैरे घेतो. सगळ्या उपस्थित कामगारांच्या चेहर्यावर कौतुकाचे भाव. मागून एक माणूस मान वाकडी करून तिरका चालत येतो. हा अथर्वचा भाऊ - अजित. यालाच ती फीडिंग रूम तयार करायला सांगितलेलं असतं म्हणे. पण आता अथर्व ते काम केशवकाकांना देतो. हे ऐकून अजितची मान अजून वाकडी होते आणि तो केशवकाकांना म्हणतो की अंबिका इथली चीफ सुपरवाइजिंग ऑफिसर (!) होती पण आता ती नाहीये. या कंपनीत माझा वाटा पण आहे आणि ती सीएसओ ची जागा मला हवी आहे.
पुन्हा आपण ममव नसलेल्या रामपुरेंकडे येतो. मंजिरी उर्फ मोठी जाऊ सगळ्यांना थालिपीठं वाढतेय. प्रत्येकी एक. वर घरच्या लोण्याचा गोळा. यू कॅन टेक म आऊट ऑफ मव बट यू कॅन नॉट टेक मव आऊट ऑफ म.
पुन्हा एकदा अथर्व आणि त्याची मुलगी वेदा कसे बिचारे झाले आहेत आणि अथर्वचं लग्न यावर चर्चा. धाकटी जाऊ कोण्या मायाची शिफारस करते. आता माया नावाची बाई आपल्याला दाखवतात. ती एकाच वेळी लोभी, हावरट आणि वेडसर दिसते. तिने एका चित्रकाराकडून तिचं अथर्वसोबत असल्याचे पेंटिंग करून घेतलेलं असतं. ते बघून ती एकदम चिडते आणि चित्रकाराच्या हातात त्याचंच एक शस्त्र खुपसते. का तर म्हणे त्याने चित्रात तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दाखवलेलं. अरे मग ते दाखव असं सांगायचं की सरळ! पण तसं नाही.
ही माया कोणाची कोण ते कळलं नाही. ती अनाथ आहे इतकं कळलं. तिला ती अंबिकाच घरात घेऊन आलेली असते म्हणे. असो. आता उद्याच्या वर्षश्राद्धाची तयारी चालू आहे. अंबिकाच्या फोटोला सोनचाफ्याचा हार आहे. माया रामपुरे मॅन्शन मधे येते. मग अथर्व येतो. मग वेदा येते. तिच्यासोबत टफीचा दूरचा भाऊ शोभेल असा एक गोल्डन रिट्रीव्हर येतो. वेदा कोणाशीच काही बोलत नाही. आईच्या गाण्यांच्या कॅसेट्स ऐकत राहते. शाळेत पण वॉकमन घेऊन जाते. त्यात फक्त एकच गाणं असतं - तुला जपणार आहे...! माया संधी मिळेल तेव्हा आणि संधी मिळेल तिथे अथर्वला चिकटून घेते. बाहेरून माळी असावा असा दिसणारा माणूस येतो. त्याच्याकडे पाहून माया चपापते. तिला कुठलंतरी आगीत जळणारं घर आठवतं. माळी तिला 'I know what you did last summer' वालं लूक देतो आणि त्याचवेळी अंबिकाच्या आवडीचं म्हणून सोनचाफ्याचं फूल अथर्वला देतो. बहुतेक गावातल्या सगळ्या सोनचाफ्याच्या फुलांचे वाटे यांच्या घरीच येत असावेत.
आता स्टोरी पुन्हा मीराकडे येते. हिच्याशी तो सुरूवातीचा इरिटेटिंग पोपट बोलतो आहे. तो पाहून मला 'मैं प्रेम की दिवानी हूँ' आठवला. त्या सुडो-टफीचं सीजीआयकरण का नाही केलं बरं? मीरा विवाहमधल्या अमृताच्या सीन मधे. काकाच्या घरी वाढणारी. काकू जिचा उठताबसता छळ करते अशी. काकाला विवाहमधल्यासारखीच एक मुलगी. ही बरीच छोटी आहे तरीपण काकूला तिचं लवकरच लग्न करायचंय. पण त्या आधी मीराला उजवून टाकायचंय. काकूच्या अंगात सीमा बिस्वास संचारते. मीराचे बाबा हयात आहेत. पण वेडे झालेत. स्मशानात राहतात. अपशकुनी पण असतात म्हणे असं गावकरी म्हणत असतात. मीरा बाबांसाठी भाकरी घेऊन जाते.
रामपुरी, सॉरी, रामपुर्यांच्या घरी माया उत्साहात. श्राद्धासाठी सगळी तयारी करते आहे. सोनचाफ्याचा हार ऑर्डर केलाय. धाकट्या जावेला मायात म्हणे अंबिका दिसते. असं म्हटल्यावर अंबिकाच्या फोटोचा हार हालायला लागतो. माया पुन्हा पुन्हा गदगदल्याची अॅक्टिंग करत अंबिकाचे गोडवे गात राहते. अथर्व कंटाळलेला आणि कन्फ्युज्ड चेहरा करून बघत राहतो. घरचे गहिवरतात. अंबिकाच्या पुढचा दिवा विझतो. मधेच ओम शांती ओम लागला की काय? अथर्वची आई दिवा लावायला जाते अंबिकाची फ्रेम वरून खाली येते आणि टेबलावर टेकते. तिथून बाजूला न होता आई फ्रेम कशी पडतेय ते पहात राहते. अथर्व मधे येतो आणि फ्रेम त्याच्या खांद्यावरून घसरत खाली पडते. तरीही मोठ्ठा स्फोट झाल्यासारख्या काचा छतापर्यंत उडतात.
पुढे काय? अंबिका कशी मेलेली असते? का तिला कोणी मारलेलं असतं? मीराचा काय संबंध? हे कळण्यासाठी देखते रहिये 'तुला जपणार आहे' झी मराठी वर 
मी ही मालिका यूट्यूबवर पाहाते आहे.
माया खूप मार खाते , काल बोलली
माया खूप मार खाते , काल बोलली पण काय चाललय काय जो तो येतो मला मारतो .
"कहीं आग लगने से पहले, उठता
"कहीं आग लगने से पहले, उठता है ऐसा धुआँ"! >>> यावर हसायचं राहिलं होतं. ते हसून घेते.
आईच्या श्राद्धाला तिच्या लहान
आईच्या श्राद्धाला तिच्या लहान मुलांना नमस्कार करायला नेतात, त्यामुळे मला गैर वाटलं नाही ते आणि वेदा इतकं काही कुक्कुलं बाळ नाहीये.
सगळे पटापट उड्या मारत या बघू
सगळे पटापट उड्या मारत या बघू लेटेस्ट एपिसोडसवर. >> +१ देतो आहे खरा पण भारताबाहेर बघायला बराच जुगाड आहे हे खरं आहे. पण मंजिरी/मार्जारी/माया/मीराला आपण नाही बघणार तर आणखी कोण बघणार?
इथली चर्चा पाहून एक रिपीट बिंज रन करायचा मोह होतो आहे पण इतर वॉचलिस्टीतून वेळ काढणं अवघड आहे.
बाय द वे या लोकांनी मंजिरी/मार्जारी/माया/मीरा या चार मकारांच्या जोडीला आणखी दोघी आणल्या की सहा मकार होऊन या सीरियलमध्ये षड्रिपु असून ही परिपूर्ण बंडल आहे असे म्हणू शकू.
आख्खा एपिसोड आंबिका अथर्वची
आख्खा एपिसोड आंबिका अथर्वची अनिव्हर्सरी साजरी करायची का नाही याबर घालवला, ती आयडिया मंजिरी आणि मीराच्या मनात एकत्र येते, वेगवेगळ्या कारणासाठी, पण मीरा बाजी मारते म्हणून मंजिरी एकदम विरुद्ध बोलते. वेदाही मीराच्या विरोधात बोलते.
हल्ली दादासाहेब नुसते बसून रहातात, मत मांडत नाहीत त्यापेक्षा मीराच्या बाबांना म्हणजे त्या साधूला जाऊन भेटा की.
मंजिरी मायावर डाफरते परत एकदा, कान पिळते.
ही सिरीयल बघायचा मला आता
ही सिरीयल बघायचा मला आता कंटाळा आलाय. तोचतोचपणा वाटतोय. ती आगाऊ मीरा, दातओठ खाऊन खाऊ की गिळू करणारी मंजिरी, मानतिरपी करुन वाकडातिकडा उभा रहाणारा अजित, वेडसर झाक आणि सतत माती खाऊन ह्याला मार त्याला मार मंजिरीच्या सांगण्यावरुन करणारी आणि सतत मार खाऊन तेच तेच तसंच वागणारी माया.
या सगळ्यात वेदापेक्षा मला आता तिच्या बाबांचीच काळजी वाटायला लागलीय.
एपिसोड ५, ६
एपिसोड ५, ६
माया डॉक्टरला कॉल करून अपघातात जगलेल्या ड्रायव्हरला जाब विचारते वेदाबद्दल. तो तिला काय झालं ते सांगणार तोवर त्याला मायाच्या मागे भुतांबिका दिसते. त्याचा हार्ट्फेल होतो. पण मायाला ती दिसत नाही. ड्रायव्हर पुण्यात्मा असावा. भुतांबिका मायाला मारायला बघते पण आता तिचा हात आरपार जातो.
भुतांबिकाला फॉर अ चेंज पांढरी नसून काळी साडी दिली आहे. त्यावरून सतत आगीचे फलकारे जात असल्याचा इफेक्ट आहे. ही घरातल्या वेगवेगळ्या खिडक्यांमधून आत पहायचं काम करते आहे. त्यातून तिला समजतं की अजित, त्याचे आई-बाबा ( म्हणजे अथर्वचे आत्या-आतोबा), दोन्ही नोकर, आणि माया वेदाच्या जीवावर उठलेत. पाचव्याच एपिसोड मधे तिला हे समजलं म्हणजे काळाच्या पुढची मालिका दिसतेय. इथे सीझन्सच्या सीझन्स उलटले तरी लोकांना पत्ता लागत नाही कशाचा. गोलमेज परिषदेसारखीच एक विदाऊट मेज परिषद चालू आहे. पण माया सांगते वेदाच्या अंगाला हात लावायचा नाही.
वारंवार दिसणार्या जळक्या घरांपैकी एक घर - आख्खं घर हं - या रामपुर्यांच्याच आवारात आहे बहुतेक. मंजिरी घराबाहेर पडते तेव्हा तिला ते समोरच दिसतं. तिथे अंबिकाने लावलेल्या आणि आता जळालेल्या झाडाला डायरेक्ट कळी आली आहे.
आत्या आतोबाचा वेदाला खालच्या हॉलमधे झुंबर डोक्यात पाडून मारायचा प्लॅन आहे. त्यासाठी बेट म्हणून ते तिची बाहुली झुंबराखाली नेऊन ठेवतात. ती काय उंदिर आहे का? इकडे भुतांबिकाचं चॅनेल बदलल्यासारखं खिडक्या बदलणं चालू आहे. वेदा झुंबराखाली बसेपर्यंत त्या येड्या भुतांबिकेला त्यांचा प्लॅन समजत नाही. हे असलं कसलं भूत? आता Triangulation साठी मीराचे बाबा देवीआईला हाका मारायला लागतात आणि सुचतील ती योगासनं करायला लागतात, मीरा एका अनोळखी आंधळ्या बाईला नेमकी याच वेळी देवीच्या गाभार्यात सोडायला चालली आहे आणि दिक्बंधनामुळे अंबिका नुसतीच काय करू काय करू म्हणत खिडकीतून पाहते आहे. ती बाई देवीच आहे असा मला संशय आहे. गाभार्यावर पडदा आहे. ती बाई मीराला देवीचं वर्णन करून सांगायला सांगते. सीन प्रचंड स्लोमोमधे पुढे सरकत राहतो. झुंबर हळुवारपणे खाली येत राहतं. या स्पीडमधे तर वेदा पण त्याचं पडणं थांबवू शकेल. मीरा देवीकडे न पाहताच तिचं वर्णन करायला लागते आणि पडदा रंगदेवतेला अभिवादन इ.इ. केल्यागत हलके हलके वर उचलला जाऊ लागतो. सीन की नजाकत को समझिये
तितक्यात कुठून अथर्वचे बाबा दारामधून येतात
झुंबराखालचा काही भाग टकलाखाली घेतात
नर्मदाआत्या घाबरी होऊन सैरावैरा पळत जाते
झुंबरपाड्या नोकराचं लक्ष अलगद वेधून घेते
खाली येणार्या झुंबराचा सुरू होतो उलटा खेळ
पुन्हा एकदा वेदाची पुढे जाते मरणवेळ
पण त्याचा काही उपयोग होत नाही. ते बावळटासारखी नुसती चौकशी करून निघून जातात. झुंबर बॅक इन अॅक्शन. वेदाला डिंक लावून चिकटवल्यागत ती बरोब्बर त्या स्पॉटवर बसून बाहुलीशी खेळते आहे. आता अंबिका देवीआईला साकडं घालते की तू मदत नाही केलीस तर माझा विश्वास उडेल. देवीआई विल बी लाईक - जाऊदे तू तशीही भूत आहेस
पण असं होऊन कसं चालेल? Triangulation चालूच. ती आंधळी बाई तिकडे मीराला मदत केल्याबद्दल तुला काय हवंय असं विचारते. पण मीरा पडली सुडोराजश्री हिरवीण! ती म्हणते माझ्या ताईच्या मनासारखं होईल असा आशिर्वाद द्या. झालं! बाई तथास्तु म्हणते. विजा, वादळं चालू होतात. शंखध्वनी सुरू होतो. दारात लावलेल्या समईच्या ज्योतीने दिक्बंधनं जळायला लागतात आणि अंबिकाचा फायनली रामपुरी प्रवेश होतो. ती हातातून पिवळे उजेड काढते आणि झुंबर उलटं फिरवते. म्हणजे अंबिकाने हाक मारली म्हणून नाही तर मीराने मागितलं म्हणून मदत केली देवीआईने. याला काय अर्थ आहे? आणि मदत करण्यासाठी एवढा घाट कशाला घालायचा?
इकडे आंधळी बाई गायब. बंगाली दुर्गापुजेत जसं कलकल ओरडतात तसा आवाज करत, कुंकू/गुलाल उधळत काही माणसं देवळासमोरून जातात. स्टोरी नक्की कुठे घडते आहे? यावेळी मालिकावाल्यांना भन्साळीचा देवदास आठवलेला दिसतो. उधळलेल्या गुलालाने हवेत देवीचं चित्र तयार होतं.
दिक्बंधनं जळल्याचं कोणाला काही पडलं नाहीये. अंबिका सीलिंग फॅन वर खाली करण्याचा खेळ करून झुंबरपाड्याला टेंगूळ आणते. माया संधी मिळेल तेव्हा अथर्वला कुरवाळत राहते. तेव्हा मात्र भुतांबिकाला काही करता येत नाही. सिलेक्टिव्ह पॉवर्स.
आत्या आणि मदन नावाचा नोकर वेदाला त्रास द्यायचं ठरवतात. त्यासाठी तिला ग्लासमधून उकळतं दूध द्यायचा प्लॅन करतात. तो ग्लास जादूचा असणार. कारण मदन दूध भरल्यावरही ग्लास सहज हातात धरतो आणि आत्याकडे देतो. आत्याच्या हाती ग्लास जाईतो त्यातलं दूध कमी झालेलं असतं. आत्या वेदासमोर ग्लास धरते. वेदा तो ढकलून देते. निदान या केसमधे तरी भुतांबिकाला ग्लासातून हात आरपार गेल्याचा सीन करावा लागत नाही.
ये सिलेक्टिव्ह भूतगिरी खतम कब होगी? जानने के लिए देखते रहिए ...
बाय द वे या लोकांनी मंजिरी
बाय द वे या लोकांनी मंजिरी/मार्जारी/माया/मीरा या चार मकारांच्या जोडीला आणखी दोघी आणल्या की सहा मकार होऊन या सीरियलमध्ये षड्रिपु असून ही परिपूर्ण बंडल आहे असे म्हणू शकू. >>>
त्यांच्या जोडीला ते दोन मक्कार नोकर आहेत की!
अन्जू
सुरूवातीच्या एपिसोड्स मधे माया मार खात नाहीये. अजूनतरी नाही निदान. मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
भुतांबिकाला फॉर अ चेंज पांढरी
भुतांबिकाला फॉर अ चेंज पांढरी नसून काळी साडी दिली आहे. त्यावरून सतत आगीचे फलकारे जात असल्याचा इफेक्ट आहे.
<<<<<<
तिला काहीतरी आगीत जाळून खतम केले होते ना? त्यामुळे असेल.
तितक्यात कुठून अथर्वचे बाबा
तितक्यात कुठून अथर्वचे बाबा दारामधून येतात
झुंबराखालचा काही भाग टकलाखाली घेतात
नर्मदाआत्या घाबरी होऊन सैरावैरा पळत जाते
झुंबरपाड्या नोकराचं लक्ष अलगद वेधून घेते
खाली येणार्या झुंबराचा सुरू होतो उलटा खेळ
पुन्हा एकदा वेदाची पुढे जाते मरणवेळ
>>>>>>>>>

चक्क डोळ्यांसमोर भुतांबिका (गोष्टींमधून) आरपार जाते...
एरवी गोष्टी हलवायला तिला कुठून शक्ती येते?
चक्क डोळ्यांसमोर भुतांबिका
चक्क डोळ्यांसमोर भुतांबिका (गोष्टींमधून) आरपार जाते...
एरवी गोष्टी हलवायला तिला कुठून शक्ती येते? >>> जबराट
तिला काहीतरी आगीत जाळून खतम केले होते ना? त्यामुळे असेल. >>> हो हो, म्हणूनच आहे
एकदम नावीन्यपूर्ण!
तितक्यात कुठून अथर्वचे बाबा
तितक्यात कुठून अथर्वचे बाबा दारामधून येतात

झुंबराखालचा काही भाग टकलाखाली घेतात
नर्मदाआत्या घाबरी होऊन सैरावैरा पळत जाते
झुंबरपाड्या नोकराचं लक्ष अलगद वेधून घेते
खाली येणार्या झुंबराचा सुरू होतो उलटा खेळ
पुन्हा एकदा वेदाची पुढे जाते मरणवेळ
>> _/\_
भूतांबिका कमकुवत भूत आहे म्हणून हवेत गोठवणार्या थंडी ऐवजी गारवा!
तितक्यात कुठून अथर्वचे बाबा
तितक्यात कुठून अथर्वचे बाबा दारामधून येतात
धमाल. मी हे कळावं म्हणूनच तर बिंजून काढली मालिका.
झुंबराखालचा काही भाग टकलाखाली घेतात
नर्मदाआत्या घाबरी होऊन सैरावैरा पळत जाते
झुंबरपाड्या नोकराचं लक्ष अलगद वेधून घेते
खाली येणार्या झुंबराचा सुरू होतो उलटा खेळ
पुन्हा एकदा वेदाची पुढे जाते मरणवेळ
>>
भूतांबिका कमकुवत भूत आहे
भूतांबिका कमकुवत भूत आहे म्हणून हवेत गोठवणार्या थंडी ऐवजी गारवा >>>
मी २ पान वाचली आणी काय व्यासग
मी २ पान वाचली आणी काय व्यासग आहे तुम्हा लोकाचा अस म्हणून तुम्हाला शाबासकी द्यायला आली आहे..
ध मा ल लिहताय...मला वाचुनच इतकी मज्जा आली.
आज ५,७ आणि ८भाग बघून झाले.
आज ५,७ आणि ८भाग बघून झाले. मी असेच Random बघतो आहे. कथानक असे समजत नाही, पण बघायला मजा येते. कुणी मला सांगा डोळे पांढरे का व केव्हा होतात? तसेच त्या भूताम्बिकेचे कोणी ऐकत नसते तरीही ती बक बक का करत रहाते? भुते एव्हढी डंब असतात ?
कुणी मला सांगा डोळे पांढरे का
कुणी मला सांगा डोळे पांढरे का व केव्हा होतात?>>> मी अजून खूप एपिसोड पाहिले नाहीयेत. पण सो फार असं वाटतंय की मंजिरी मधे समोरच्याचे डोळे पांढरे करण्याची शक्ती आहे
रामपुरे यांच्या घरात प्रथाच
रामपुरे यांच्या घरात खरंतर घराण्यात प्रथाच प्रथा. ही प्रथा, ती प्रथा, उठसुठ प्रथा.
एक ग्लास पाणी उकळवणे एक
एक ग्लास पाणी उकळवणे एक वेळ समजू शकेल पण आख्खा स्विमिंग पूल ? हे नवव्या एपी मध्ये आहे. भूताम्बिका अत्यंत विनोदी आहे. आमच्या कोकणात अशी छोटी मोठी खोड्या करणारी व्रात्य भुते असतात. त्यांना एक नाव आहे. आठवले तर लिहीन
देवीच्या रुपातली म्हातारी आजी
देवीच्या रुपातली म्हातारी आजी घरी आली रामपुरेंच्या. तिने मीरा, अंबिकाला एकत्र रहा सांगितलं. आता तिला हेही सांगता येत होतं की नाही की तुमच्या लाडक्या सासुबाई चेटकीण आहेत किंवा तिला मदत करणारी आहे, ते सांगितलं नाही. ती आजी घरात आली आणि माया आणि महामाया (मंजिरी) दोघींना त्रास व्हायला लागला.
माझा चांगलाच बॅकलॉग झालाय. आज
माझा चांगलाच बॅकलॉग झालाय. आज पुढे बघते जमलं तर.
मी आधीचं स्कीपच केलं ना.
मी आधीचं स्कीपच केलं ना. त्यातही छोटे प्रोमोज आणि आठवड्यातून एकदा बघत होते. इथे धागा निघाल्यामुळे आता रोज बघतेय, हाहाहा.
ती आजी घरात आली आणि माया आणि
ती आजी घरात आली आणि माया आणि महामाया (मंजिरी) दोघींना त्रास व्हायला लागला. >>
महामायाने पवित्र वस्तुंना स्पर्श करुन हात जाळून घेणे हाही एक ट्रोप व्हायला लागला आहे. ही आजी म्हणजे एपिसोड ५/६ मधली rmd ने नमूद केलेली आंधळी बाई आहे.
या सीरियलचा वन लायनर प्लॉट असाही सांगता येईल की लोकांच्या आयुष्यात राम राहत नाही तर रामपुरेंच्या घरात इतका राम झाला की ते म्हटले आता राम पुरे आणि संकटे यायला लागली
सध्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन आर्क चालली आहे. अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन निमित्त देवळात जाऊन होम हवन करत आहेत. अथर्व-मीरा-वेदाने सेलिब्रेट करु नये म्हणून अडथळे आणण्याचे सर्व प्रयत्न फसले. मग मायाने महामायाला "तुम्ही लूजर आहात" हिणवलं आणि विषात भिजवलेले बर्बन बिस्कीट खाऊन कायमचं रिलॅक्स होण्याचा सल्ला दिला. महामायाने तो सल्ला मानला नाही कारण चॅनेलने अजून शटर बंद करायला सांगितलेलं नाही. आता माया सेलिब्रेशनच्या ठिकाणी वेदाला चिथावून काही होतंय का बघते आहे.
आणखी एक इंटरेस्टिंग बाब अशी की सुरुवातीच्या एपिसोड्समध्ये वेदा अंबिका/मायाप्रमाणे केस मोकळे सोडून वावरते. आता ती मीराच्या हेअरस्टाईल मध्ये फिरते (मीराला तिने आई मानले दाखवायला).
बरं ती महामाया एरवी देवघरात
बरं ती महामाया एरवी देवघरात जात असते, दिवा लावत असते, तुळशी पुजा करत असते तेव्हा देवी काहीच करत नाही तिला, हे देवीला असं तसं बोलल्याने, हार तोडायला सांगितल्याने आणि मायाने तोडल्याने दिलेली शिक्षा असावी. ही तात्पुरतीच दोन चार एपिसोडपुरती असणार, कारण देवी म्हणाली आहे पुढे अनेक संकटांना तोंड द्यायला लागणार, तेव्हा एकत्र रहा.
रामपुरेंच्या घरात इतका राम
रामपुरेंच्या घरात इतका राम झाला की ते म्हटले आता राम पुरे आणि संकटे यायला लागली >>>
कहर!!
आता ती मीराच्या हेअरस्टाईल मध्ये फिरते >>> एवढा विचार करतायत? ऐ ते न
बरं ती महामाया एरवी देवघरात
बरं ती महामाया एरवी देवघरात जात असते, दिवा लावत असते, तुळशी पुजा करत असते तेव्हा देवी काहीच करत नाही तिला >> हो ना

महामाया शाचिनी/पिशाचिनी स्कूलमधली चेटकीण असावी. ती शाचिनीही वेळ आली की अशीच हात/पाय/चेहरा भाजून घेते पण एरवी देवघरात मिरवताना दिसली आहे आणि दिव्यादृष्टीच्या गणपती स्पेशल एपिसोडमध्ये तिने स्वत:च्या हाताने नैवेद्यही बनवलेला
एवढा विचार करतायत? ऐ ते न >> ते करत आहेत का माहित नाही पण सध्या शिरेलीत विशेष काही घडत नसल्याने असे बॅकग्राऊंड एलिमेंट्स बघितले जात आहेत
सतराशे साठ वेळा तोंडावर पडून
सतराशे साठ वेळा तोंडावर पडून मायाचा कॉन्फिडन्स मात्र हाय लेव्हलला असतो, मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी सर्व व्यवस्था केलीय, वेदा आणि अथर्व जवळ येणार नाहीत, अनिव्हर्सरी पूजा होणार नाही आणि महामाया विश्वास ठेवते, मार्जारी मात्र सावध करते तिला.
ती देवी घरात येते, आशीर्वाद
ती देवी घरात येते, आशीर्वाद देते, मंजिरीला देवळात पाऊल ठेऊ देत नाही तरी बाकीचे व्हिलन देवळात सरस ठरतात आणि मीरा बिचारी तोंडघशी पडते. वेदा मायाचे ऐकून तिच्या बाबांवर आरोप करते, पूजा अर्धवट रहाते, भूत ताई काहीच करू शकत नाही. घरीही मिराला घा पा बोलतात सगळे.
देवी आणि भूत दोघांपेक्षा व्हिलनची सरशी होते.
माया तोंडघशी पडेल वाटलेलं म्हणून आधीची पोस्ट लिहिली पण ती जिंकते.
रामपुरे घराण्याची अजून एक रीत
रामपुरे घराण्याची अजून एक रीत समजली. जिरं, मोहरी सांडलं तर केरसुणीने उचलायची नाही, त्यावर पाय पडता कामा नये, एकेक दाणा उचलायचा. जिरं मोहरी रीत सॉलीड आहे, त्यातील शह काटशह आवडला. मायाने मीराला किचनमधे धक्का दिला, जिरं सांडलं. नर्मदाआत्या आणि मायाने तेव्हा ही रीत सांगितली आणि ते जिरं इमाने इतबारे गोळा करुन, सर्वांसमोर मोहरी मायाहस्ते सांडायला लाऊन तो डाव मीराने मस्त उलटवला. जिरं तसं थोडं होतं, मोहरी जास्त आणि मोहरी तशी एकेक दाणा गोळा करायलाही कठीण.
बाय द वे आधीच्या भागात, देवळात वेदा असं म्हणू शकली असती की मायाने मला सांगितलं बाबा तू आईला मारलंस आणि मीरा आईलाही मारणार आहेस, देवी इतकंही तिच्याकडून वदवून घेऊ शकली नाही.
सॉरी टू से, माया आता मला जास्तीतजास्त कृत्रिम आणि वेडसर वाटू लागली आहे.
सर्वांसमोर मोहरी मायाहस्ते
सर्वांसमोर मोहरी मायाहस्ते सांडायला लाऊन तो डाव मीराने मस्त उलटवला >> हो हा पार्ट भारी होता.
अंबिकाने इतके दिवस मीराला तिचा खूनी कोण (माया) हे सांगितेललंच नसल्याने सगळा सावळा गोंधळ. झी वाल्यांनी मारे पोल घेतलेला की "अंबिका मीराला कोणतं महासत्य सांगणार?"
पण महासत्याच्या महारविवार शेवटी जिरं/मोहरी गोळा करण्यात गेला.
सेलिब्रेशन आर्क संपल्यानंतर सांडवासांडवी आर्क दिसते आहे. मीराला preview मध्ये अगदी कोरडा फडफडीत केळाचा शिरा करताना दाखवलं आहे जो नर्मदाआत्या सांडते. आता रामपुरे शिरासुद्धा कणाकणाने उचलायला लावतात का ते बघायचं
Pages