वाड्यावर खूपच आग्रह झाल्यामुळे या मालिकेसाठी शेप्रेट धागा काढत आहे 
राजश्रीच्या सगळ्या पिक्चरांचा काला करून त्यातल्या हाताला लागतील त्या गोष्टी उचलून बनवलेली ही मालिका वाटते आहे. सुरूवातीलाच एक लहान मुलाच्या आवाजात बोलणारा हरी नावाचा इरिटेटिंग पोपट आहे. हा सग्ग्ळं सग्ग्ळं बोलतो. तळी नावाच्या गावाची ओळख करून देतो. तळी मधे तळीराम आहेत की नाही ते कळलं नाही अजून. पण तळी मधे एक देवीआई आहे. या गावांमधे साधी देवी नसतेच का? देवीआईच कशी असते कंपल्सरी?
कोणी मीरा म्हणून मुलगी दाखवली आहे. ती म्हणे कशामुळे तरी गावच्या देवीचं तोंड बघत नसते पण तिची सेवा मात्र करत असते. म्हणजे डोळे बांधून गाभार्यात जाऊन वस्तू देणे वगैरे गोष्टी करत असते. तिची बहीण हयात नाहीये असा एक उल्लेख आलाय. ती कशी मेली आहे ते समजलं नाहीये. पण त्याचा दोष मीरा 'देवीआई' ला देत असते.
दुसरीकडे एक 'रामपुरे' नावाचं घराणं दाखवलं आहे. दोन भाऊ, त्यांच्या दोन बायका, एक आगाऊ टीनेजर मुलगी असा सरंजाम दिसला. भिंतीवरी ( कालनिर्णय नव्हते. हे ममव घर नव्हे. ) मोठ्या भावाच्या सुनेचा अर्धी भिंत झाकणारा फोटो. मोठी जाऊ धूपपात्र घेऊन घरभर फिरवत येते ( मधेच भन्साळी पण आठवला असावा ) मग या सुनेच्या फोटोसमोर तिच्या चांगुलपणाचं गुणगान होतं. बरीच बडबड झाल्यावर समजतं की मोठ्या भावाच्या मोठ्या मुलाची ही बायको आहे - अंबिका, कशाने तरी मेली आहे आणि तिच्या मृत्युला एक वर्ष होत आलं आहे. मोठ्या मुलाला एक मुलगी आहे आणि बापलेक अजूनही दु:खात आहेत. तरीही घरच्यांना आता त्याचं पुन्हा लग्न लावून द्यायचं आहे.
कट टू मोठा मुलगा - अथर्व. याचं मराठी फार कष्टाने उच्चारलेलं आहे. त्याची कसलीशी फॅक्टरी/कंपनी आहे. अर्थातच! राजश्री फॉर्म्युला असल्यामुळे फॅक्टरी वगैरे हवीच. त्याचं नाव प्रेम नाही हे आपलं नशीब. तो दु:खी दिसण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यासोबत असलेले कोणी केशवकाका त्याला दुसरं लग्न करायचा आगंतुक सल्ला देतात.
फॅक्टरीमधे काम करणार्या एका बाईला तिथला सुपरवाइजर ती बाळाला फीड करत असताना पाहतो आणि बाळ हिसकावून घ्यायला लागतो. मुळात ती तिथे बाळ घेऊन कशी आलेली असते? आणि हा बाळ हिसकावून काय करणार असतो? एंटर अथर्व - तो सुपरवाइजरला फडाफडा मुस्काटात मारतो आणि बाईची माफी मागतो. वर फीडींगसाठी रूम बनवण्याचे आदेश देतो.
सुपरवाइजरला हाकलून दिल्यावर अथर्व त्या बाईच्या बाळाला उचलून वगैरे घेतो. सगळ्या उपस्थित कामगारांच्या चेहर्यावर कौतुकाचे भाव. मागून एक माणूस मान वाकडी करून तिरका चालत येतो. हा अथर्वचा भाऊ - अजित. यालाच ती फीडिंग रूम तयार करायला सांगितलेलं असतं म्हणे. पण आता अथर्व ते काम केशवकाकांना देतो. हे ऐकून अजितची मान अजून वाकडी होते आणि तो केशवकाकांना म्हणतो की अंबिका इथली चीफ सुपरवाइजिंग ऑफिसर (!) होती पण आता ती नाहीये. या कंपनीत माझा वाटा पण आहे आणि ती सीएसओ ची जागा मला हवी आहे.
पुन्हा आपण ममव नसलेल्या रामपुरेंकडे येतो. मंजिरी उर्फ मोठी जाऊ सगळ्यांना थालिपीठं वाढतेय. प्रत्येकी एक. वर घरच्या लोण्याचा गोळा. यू कॅन टेक म आऊट ऑफ मव बट यू कॅन नॉट टेक मव आऊट ऑफ म.
पुन्हा एकदा अथर्व आणि त्याची मुलगी वेदा कसे बिचारे झाले आहेत आणि अथर्वचं लग्न यावर चर्चा. धाकटी जाऊ कोण्या मायाची शिफारस करते. आता माया नावाची बाई आपल्याला दाखवतात. ती एकाच वेळी लोभी, हावरट आणि वेडसर दिसते. तिने एका चित्रकाराकडून तिचं अथर्वसोबत असल्याचे पेंटिंग करून घेतलेलं असतं. ते बघून ती एकदम चिडते आणि चित्रकाराच्या हातात त्याचंच एक शस्त्र खुपसते. का तर म्हणे त्याने चित्रात तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दाखवलेलं. अरे मग ते दाखव असं सांगायचं की सरळ! पण तसं नाही.
ही माया कोणाची कोण ते कळलं नाही. ती अनाथ आहे इतकं कळलं. तिला ती अंबिकाच घरात घेऊन आलेली असते म्हणे. असो. आता उद्याच्या वर्षश्राद्धाची तयारी चालू आहे. अंबिकाच्या फोटोला सोनचाफ्याचा हार आहे. माया रामपुरे मॅन्शन मधे येते. मग अथर्व येतो. मग वेदा येते. तिच्यासोबत टफीचा दूरचा भाऊ शोभेल असा एक गोल्डन रिट्रीव्हर येतो. वेदा कोणाशीच काही बोलत नाही. आईच्या गाण्यांच्या कॅसेट्स ऐकत राहते. शाळेत पण वॉकमन घेऊन जाते. त्यात फक्त एकच गाणं असतं - तुला जपणार आहे...! माया संधी मिळेल तेव्हा आणि संधी मिळेल तिथे अथर्वला चिकटून घेते. बाहेरून माळी असावा असा दिसणारा माणूस येतो. त्याच्याकडे पाहून माया चपापते. तिला कुठलंतरी आगीत जळणारं घर आठवतं. माळी तिला 'I know what you did last summer' वालं लूक देतो आणि त्याचवेळी अंबिकाच्या आवडीचं म्हणून सोनचाफ्याचं फूल अथर्वला देतो. बहुतेक गावातल्या सगळ्या सोनचाफ्याच्या फुलांचे वाटे यांच्या घरीच येत असावेत.
आता स्टोरी पुन्हा मीराकडे येते. हिच्याशी तो सुरूवातीचा इरिटेटिंग पोपट बोलतो आहे. तो पाहून मला 'मैं प्रेम की दिवानी हूँ' आठवला. त्या सुडो-टफीचं सीजीआयकरण का नाही केलं बरं? मीरा विवाहमधल्या अमृताच्या सीन मधे. काकाच्या घरी वाढणारी. काकू जिचा उठताबसता छळ करते अशी. काकाला विवाहमधल्यासारखीच एक मुलगी. ही बरीच छोटी आहे तरीपण काकूला तिचं लवकरच लग्न करायचंय. पण त्या आधी मीराला उजवून टाकायचंय. काकूच्या अंगात सीमा बिस्वास संचारते. मीराचे बाबा हयात आहेत. पण वेडे झालेत. स्मशानात राहतात. अपशकुनी पण असतात म्हणे असं गावकरी म्हणत असतात. मीरा बाबांसाठी भाकरी घेऊन जाते.
रामपुरी, सॉरी, रामपुर्यांच्या घरी माया उत्साहात. श्राद्धासाठी सगळी तयारी करते आहे. सोनचाफ्याचा हार ऑर्डर केलाय. धाकट्या जावेला मायात म्हणे अंबिका दिसते. असं म्हटल्यावर अंबिकाच्या फोटोचा हार हालायला लागतो. माया पुन्हा पुन्हा गदगदल्याची अॅक्टिंग करत अंबिकाचे गोडवे गात राहते. अथर्व कंटाळलेला आणि कन्फ्युज्ड चेहरा करून बघत राहतो. घरचे गहिवरतात. अंबिकाच्या पुढचा दिवा विझतो. मधेच ओम शांती ओम लागला की काय? अथर्वची आई दिवा लावायला जाते अंबिकाची फ्रेम वरून खाली येते आणि टेबलावर टेकते. तिथून बाजूला न होता आई फ्रेम कशी पडतेय ते पहात राहते. अथर्व मधे येतो आणि फ्रेम त्याच्या खांद्यावरून घसरत खाली पडते. तरीही मोठ्ठा स्फोट झाल्यासारख्या काचा छतापर्यंत उडतात.
पुढे काय? अंबिका कशी मेलेली असते? का तिला कोणी मारलेलं असतं? मीराचा काय संबंध? हे कळण्यासाठी देखते रहिये 'तुला जपणार आहे' झी मराठी वर 
मी ही मालिका यूट्यूबवर पाहाते आहे.
धमाल चालू आहे
धमाल चालू आहे
आज लिंबू टींबू भुताने माया आणि नर्मदाच्या नवऱ्याने कुस्करलेले मोदक, एका क्षणात चांगले केले. त्यामुळे मीराचा उदो उदो होईल. >>
ती स्वामींकडे असेपर्यंत तिच्या घरच्यांना स्वामी बक्कळ पैसा देतात. हे ऐकून मीराच्या काकूच्या तोंडाला पाणी सुटतं. >> काँटेक्स्ट: हे काकूला सांगणार्या माणसाने मसनजोगी उर्फ मीराच्या वडलांना कर्ज दिले होते जे काका-काकू फेडत आहेत. ते वसूल होण्याच्या दृष्टीने तो काकूला पिन मारतो. #एव्हरीथिंगइजप्लॅन्ड व्हिलनमंडळीचे इतके प्लॅन्स आहेत की writer has weaved a rich tapestry of plans म्हणावे लागेल.
आत्तापर्यंत फक्त व्हिलन बायाच मान वाकडी करून दुष्ट असल्याचा पुरावा देत असल्याचं पाहिलंय. या मालिकेत मात्र पुरूषांनी पण ही कला अवगत करून घेतली आहे. >>
आता एपिसोडवाईज विकी बनवत आहोतच तर युट्युबवर एपिसोड ३, टाईम स्टँप १०:४५. वाकडी मान दर्शनाचा लाभ घ्यावा 
डायनो अंबिका >>
पास्ताचे पेन्ने ओवल्यासारखे दिसते. >>
ते कासवही नंतर वापरण्यासाठी सोडलेला सेटअप असणार. मार्जारीचा फ्लॅशबॅक १७० वर्षांपूर्वीचा आहे म्हणजे कासव फ्लॅशबॅकच्या २० वर्षांनंतरचं आहे. मार्जारीनेच कदाचित कोणाचंतरी कासव करुन तळ्यात सोडलं असेल.
आता त्या कासवाला बघण्यासाठी
आता त्या कासवाला बघण्यासाठी मला पहिला एपिसोड बघावा लागणार.
अंजू, तिसरा एपिसोड बघ
अंजू, तिसरा एपिसोड बघ
चालेल, बरं झालं परफेक्ट
चालेल, बरं झालं परफेक्ट सांगितलंस ते.
इकडे अंबिकाच्या फोटोला खोट्या
इकडे अंबिकाच्या फोटोला खोट्या सोनचाफ्याचा हार आहे. >>>>>>>>>> हा हार सर्वत्र आहे . त्यांच्या देवी आईला पण तो घातला आहे. काल ती मंजिरी देवीच्या फोटोची आरती करताना त्या फोटोतल्या देवीलाही तो वाहिला होता व मंजिरी ज्या फोटोची आरती करत होती त्याला पण तो लावला होता . त्यामुळे ते हारावर हार दिसत होते.
भुतांबिका >>>>>>>>नाव आवडले
भुतांबिका >>>>>>>>नाव आवडले
मला यातला तो पुजार्याचा रोल
मला यातला तो पुजार्याचा रोल करणारा आता सगळीकडे दिसू लागला आहे >>>>>>> आबा नाईक आहे तो कायमचा पिचलेला चेहरा त्यामुले त्याला असेच रोल मिळतात स्पेशली भुताच्या सिरीयल मध्ये नवा गाडी नवे राज्य , रात्रीस खेळ चाले , आणि आता हि .
वन स्टॉप शॉप फॉर ऑल द
वन स्टॉप शॉप फॉर ऑल द स्टुपिडीटी आहे.
>>>
फ्रेडरिक फोरसाइथच्या वरताण प्लॉट आहे इथे. लेखकाला तरी सुधरतंय का की नेक्स्ट एपिसोडमध्ये काय दाखवायचं आहे?
हो ना. असा व्यासंग हवा!
हो ना. असा व्यासंग हवा!
मला तर वाचतानाच गरगरलं. कोण कोणाचं नातेवाईक ते कळलं नाही. भूतं किती आणि कुठल्या कॅटेगरीची (चांगली/ वाईट) काही म्हणता काही कळलं नाही.
तुम्ही सगळे लिहीताय गमतीदार. तेवढं वाचून गब्बसते.
सध्यातरी एकच भूत आहे अनया,
सध्यातरी एकच भूत आहे अनया, अंबिकाचं. तेच लिंबू टिम्बु पॉवरहीन. बाकी तिच्या आईचं वगैरे भूत झालेलं नाहीये. मंजिरीचं ऐकून माया वेदा, मीरा आणि अथर्वला यमसदनाला पाठवायचा प्रयत्न करते पण यश मिळत नाही म्हणून भूत संख्या वाढत नाही. मार्जारी भूत नाहीये बहुतेक.
झाले बाई एकदाचे 151 मोदक,
झाले बाई एकदाचे 151 मोदक, भूतकृपेने. मीरा आली नैवेद्य दाखवायला, वेदासाठी हे करतेय असं महागौरीमातेला सांगितलं आणि मंगळसूत्र वाट्या सुलट करण्याचा विधी पार पडला.
नंतर मंजिरीने मायाला भरपूर मोदक खायला लावले, नवीन शिक्षा.
आजच्या एपिसोडमध्ये
आजच्या एपिसोडमध्ये
मंजिरीने मायाला १५१ मोदक खाण्याचा दिलेला आदेश
१) कुस्करलेले मोदक हॅव बीन अनकुस्कर्ड हे समजल्यावर मंजिरीने मायापुढे मारक्या म्हशीप्रमाणे बघत आरतीचे ताट धरणे आणि मायाने 'घाबरले' दाखविण्याकरता खांद्यावरुन पदर घेऊन कुडकुडत घेतलेली आरती,
२) शिक्षा म्हणून, सॉरी मीराचे यश साजरे करायचे म्हणून
या दोन मस्ट वॉच मोमेंट्स आहेत
ते 151 नव्हते मोदक, मी मोजणार
ते 151 नव्हते मोदक, मी मोजणार होते पण जाऊदे म्हटलं
देवासमोरचे त्यापेक्षा जास्त होते पण तेही 151 असतील का नक्की असं वाटलं.
मला अंबिका आवडली लेटेस्ट
मला अंबिका आवडली लेटेस्ट एपिसोडमध्ये, भूत म्हणून नाही पण आई म्हणून त्या आगाऊ मीराला मस्त निरुत्तर केलं. तू निघून जा, निघून जा सांगत होती मीरा पण तिने नाही ऐकलं, माया जात नाही इथून तोपर्यंत मी राहणार इथे म्हणाली.
आगाऊ मीरा अथर्वला attitude का दाखवते काय माहिती.
मंजिरीने परत दादासाहेबांना संमोहित केले की काय असं वाटलं
माया जेव्हा अथर्वला
माया जेव्हा अथर्वला जिन्यावरून पाडते तेव्हा त्याची भूत बायको कुठे गायब असते, जर तिला माहितेय माया दुष्ट आहे तर सतत मायावर नजर ठेवायला नको का तिने. परत एकदा काहीच उपयोग नसलेली भूत.
खतरनाक लिहिलं आहे! बरेच दिवस
खतरनाक लिहिलं आहे! बरेच दिवस हा वाचायचा राहिला होता.
माया जेव्हा अथर्वला
माया जेव्हा अथर्वला जिन्यावरून पाडते तेव्हा त्याची भूत बायको कुठे गायब असते, >>>>>>>>नेमक्यावेळी ती गायब असते . कुठे कडमडते त्यावेळेत काय माहित. ती मंजिरी जेव्हा त्या मायाला चोप देत असते तेव्हा जर ती तिथे उपस्थित राहील तर अर्धी मालिकाच उलगडेल.
एपिसोड ४ -
एपिसोड ४ -
पुरेसं पाहून झाल्यावर अंबिका ट्रक हातात धरून गदागदा हलवते. क्लीनर बाहेर पडून डोकं फोडून घेतो. अंबिका ट्रक पुलावरून खाली टाकून देते. स्फोट व्हायच्या आधीच धूर सोडत ट्रक पडत राहतो आणि मग एकदाचा स्फोट होतो. इकडे अथर्वला मुलीची आठवण होते. तो विधी तसेच टाकून वेदाला शोधायला जातो. भुतांबिका ( थँक्स अस्मिता!
) वेदाला स्पर्श करू शकत नाहीये. मगाशी ट्रक बरा उचलू शकली? पण आता एकदम तिला जाणीव झालेली दिसते की ती भूत असल्याने सगळ्यातून आरपार जावं लागणार.
घाटावर गुरूजी सिनेमातल्या डॉक्टरांच्या वरताण सिरीअस होऊन सांगतात 'श्राद्ध विधी अपूर्ण राहिला, आता काहीही होऊ शकत नाही'. म्हणजे? या प्रोसेसला काय टाईम लिमीट होतं का? अमुक दिवशी तमुक वेळात नाही केली तर लॉक्ड! पुन्हा करता यायची नाही. आता ती लांबनखी तरंगती चेटकीण मंजिरीला काय शिक्षा करेल बरं?
अथर्व खूप वेळ घालवून वेदा पडली आहे त्या रस्त्यावर येतो आणि बावळटासारखा आधी बाजूच्या डोंगरांकडे वगैरे बघत बसतो. मग एकदाचं त्याचं लक्ष जातं वेदाकडे. मधे अंबिका उभी आहे. पण आता भूतरूल लागू झाल्याने अथर्वला तिच्या आरपार जावं लागतं. तो वेदाला उचलून घरी जातो. मगाशी त्या ट्रकवाल्यांना ती दिसली पण आता अथर्व आणि त्याच्या घरच्यांना नाही दिसत? कंडिशनल डिस्प्ले?
मीराचे बाबा नमस्कार करायचं थांबवतात आणि मीराला म्हणतात 'तू आधी आई होशील आणि मग पत्नी होशील'. अथर्व असा निघेल असं वाटत नाही. शिवाय मालिकेचा बेस राजश्रीचा आहे. त्यांचा इशारा वेदाकडे होता हे आपल्या पुढ्च्या सीनमधे समजतं.
अंबिका घरात शिरू शकत नाही. ते बाहेर भूलभुलैय्याचे दोरे बांधलेत ना. घरातला कुत्रा भुतांबिकाला पाहतो. तो वर अस्मिताने सांगितलेला सीन. भुतांबिका उडत उडत खिडक्यांमधून वेदाला पाहते.
बाकी एपिसोडमधे रंग्याबाबाचा भोंदूपणा, मीराची हावरट काकू असला टाईमपास आहे.काकू तिला चरणसेवेसाठी तयार करते.
या एपिसोडमधला सगळ्यात भारी सीन आहे मंजिरी आणि मायाचा. रात्री मंजिरी मायाला भेटायला जाते आणि मला बोलायचंय सांगून तिला खाडकन मुस्काटात मारते. लगेच त्या उभ्या आहेत तिथे शेजारी एक डॉ. स्ट्रेंजच्या पोर्टल सदृश काहीतरी उघडतं. आता मायाचे डोळे पांढरे होतात. पोर्टलमधे नुसतंच काहीतरी हिरवंनिळं फिरतंय. मंजिरी मायाला झापझाप झापते. एवढं करून तिला पुढची तिथी अव्हेलेबल आहे असं समजतं. मग चेटकीण फालतू धमक्या देत असते की काय? मंजिरी तिला वेदाला हात न लावण्याबद्दल बजावते. पोर्टल निमूटपणे आपलं आपण बंद होतं.
स्फोट व्हायच्या आधीच धूर सोडत
स्फोट व्हायच्या आधीच धूर सोडत ट्रक पडत राहतो आणि मग एकदाचा स्फोट होतो >>> Take that SRK and Subhash Ghai! "परदेस" मधे विचारत होते "कहीं आग लगने से पहले, उठता है ऐसा धुआँ"! पाहा वरती. सिरीज मधे काहीही होऊ शकते.
'तू आधी आई होशील आणि मग पत्नी होशील'. अथर्व असा निघेल असं वाटत नाही. शिवाय मालिकेचा बेस राजश्रीचा आहे. त्यांचा इशारा वेदाकडे होता हे आपल्या पुढ्च्या सीनमधे समजतं. >>>
पण स्त्री ही क्षणकालची पत्नी व अनंतकालची माता वगैरे असली तर या रेटने ही पत्नी कधी होणार!
अथर्व बरा होऊन परत येतो
अथर्व बरा होऊन परत येतो तेव्हा मंजिरी मीराला औक्षण करू देत नाही, तिने पाडले त्याला असं खोटं नाव घेऊन, मायाला करायला सांगते, माया कोण, बहिणीला का नाही सांगत.
अजून एक प्रश्न पडलाय, माया सारखी सारखी अथर्वला हात लावते, जवळ जाते म्हणून अंबिकाने अथर्वच्या शरीरात इलेक्ट्रिक सर्किट टाकलंय, फक्त मायासाठी. मायाने हात लावला की शॉक बसणार तिला, मग औक्षण करताना कुंकुंमतिलक करते (लावते) तेव्हा का नाही बसत शॉक.
समस्त भूतलोक डोक्याला हात लावून बसला असेल तिचं कर्तृत्व बघून.
स्त्री ही क्षणकालची पत्नी व
स्त्री ही क्षणकालची पत्नी व अनंतकालची माता >>>
अशाने लूप मधे जाईल सगळंच.
कहीं आग लगने से पहले, उठता है ऐसा धुआँ >>> परफेक्ट!
तू परदेस खूपच नीट पाहिलेला आहेस हे लगेच लक्षात आलं.
अंबिकाने अथर्वच्या शरीरात इलेक्ट्रिक सर्किट >>> अरे कर्मा!
पण स्त्री ही क्षणकालची पत्नी
पण स्त्री ही क्षणकालची पत्नी व अनंतकालची माता वगैरे असली तर या रेटने ही पत्नी कधी होणार!
>>>>
अंबिकाने अथर्वच्या शरीरात इलेक्ट्रिक सर्किट >>
समोरून ट्रक येत असताना एकटक बघत उभे राहतात. स्कूलबसचे ब्रेक फेल होतात वेदाच्या, त्याकडे एक पोरगं हातात बॉल घेऊन रेनडिअर सारखं बघत बसतं. पळणं सोडा, हालचाल न करता संमोहित होऊन टकामका बघतात. मग भुतांबिका शक्तिमान होऊन धरून ठेवते, सगळे वाचतात. झगे घातलेल्या इंग्लिश बोलणाऱ्या मिशनरी म्याडम हिंदीतून आभार मानतात पण ड्रायव्हरचे. वरून काही पडताना, समोरून काही येताना यांचा रेनडिअर होतो, रिफ्लेक्सेस काम करत नाहीत. लोक भुतांबिकेतून आरपार जाताना ती उगीच धक्का लागल्यासारखे करते, ते पंचवीस वेळा होते आहे. थांबवा आता. घरात पंचवीस लोक आहेत प्रत्येकाच्या रस्त्यात मध्यभागी उभी असते टोलनाका असल्यासारखे. हो, भूतरूल खरेच सेलेक्टिव्ह आहे रमड, मलाही खटकले होते. राग आला की फिजिक्स काम करते, प्रेम वाटले की नाही. फेकून देताना पकडता येते, मिठी मारताना हवा जाते.
या एपिसोडमधला सगळ्यात भारी
या एपिसोडमधला सगळ्यात भारी सीन आहे मंजिरी आणि मायाचा. रात्री मंजिरी मायाला भेटायला जाते आणि मला बोलायचंय सांगून तिला खाडकन मुस्काटात मारते. >>
हे असे सीन खूप वेळा येणार आहेत आणि सगळे आधीच्या सीनला सवाई असे चढत्या क्रमाने भारी. मायाने अथर्वच्या जिवाचे काही बरेवाईट करावे (जेणेकरुन मीरा अपशकुनी सिद्ध होईल) म्हणून तिला मंजिरी धमकावते आणि तिच्या झिंज्या उपटते तो सीनही भयंकर आहे.
पण स्त्री ही क्षणकालची पत्नी व अनंतकालची माता वगैरे असली तर या रेटने ही पत्नी कधी होणार! >>
खास फा स्टाईल पंच!
अंबिकाने अथर्वच्या शरीरात इलेक्ट्रिक सर्किट >> समस्त भूतलोक डोक्याला हात लावून बसला असेल तिचं कर्तृत्व बघून. >> अन्जू
मूळात ती मंजिरी एवढी मोहिनी विद्या एक्सपर्ट असताना तिचा आणि मार्जारीचा प्लॅन सक्सेस व्हायला एवढा वेळ लागायलाच नको आहे. ते पण भारी होतं की मीराच्या बाबांनी दादासाहेबांच्या गळ्यातील माळ मंत्रविली आहे हे कळल्यानंतरही मंजिरी खुशाल ती माळ हाताने ओढून काढू बघते आणि हात भाजल्यानंतर मार्जारी मार्जारी करवादते. मार्जारी या वेडेपणाबद्दल तिला झापडते तर चिडून ही जाऊन मायाचा छळ करत बसते.
अंबिका ट्रक हातात धरून गदागदा
अंबिका ट्रक हातात धरून गदागदा हलवते. क्लीनर बाहेर पडून डोकं फोडून घेतो. अंबिका ट्रक पुलावरून खाली टाकून देते.
>>>
आधी ऑं झालं मग लक्षात आलं की ती भूत आहे.
बरं श्राद्धाला लहान मुलांना कोण घेऊन जातं? सत्यनारायण आहे का सकुसप जायला?
आधी आई, मग पत्नी >> पुन्हा ऑं. पण शुद्ध देसी घी मे बना हुआ राजश्री का प्रॉडक्ट असल्याने टुकार एक्स्प्लनेशन पटतं. एकंदरीत राजश्रीवाल्यांना लेकी दुसरेपणावर द्यायची वाईट खोड असल्याचं मी येथे नम्रपणे नमुद करू इच्छिते.
अनंतकालची माता लूप
श्राद्धाला आंबिकाची मुलगी
श्राद्धाला आंबिकाची मुलगी म्हणून नेलं असेल, नमस्कार करायला घरातील सर्व हजर असतात ना जनरली.
तुम्ही सर्वजण आधीचे लिहिताय बरंच आहे, मी बघितलं नाहीये, मला समजेल, इथे लिहायचं म्हणून मी रोज बघायला लागले ही सिरीयल नाहीतर, प्रोमोज आणि सिरीयल शॉर्टसवर दिवस ढकलत होते. सगळे पटापट उड्या मारत या बघू लेटेस्ट एपिसोडसवर. अजनबी, पायस आणि मी latest बघतोय, बाकी सगळे late बघताय.
Btw मंजिरी मायाला जेव्हा जेव्हा बदड बदड बदडते, ते सिन्स मी एन्जॉय करते, मीराही मायचा हात पिरगळते, कोयता दाखवते तेव्हा मजा येते, तरी ती माया या घराला चिकटून आहे.
मंजिरी आणि मार्जारी ओळखत नाहीत का समोरून कुठली शक्ती आहे, ते ही आश्चर्य वाटतं मला.
अथर्व मठ्ठ आहे, माया पायात पाय घालून त्याला जिन्यावरून ढकलून देते, त्याला कळतच नाही. त्याला अजूनही संशय नाहीये.
बाकी सगळे late बघताय >>> मला
बाकी सगळे late बघताय >>> मला बरंच जुगाड करून बघायला लागतंय. यूट्यूबवरचे एपिसोडस यूएससाठी ब्लॉक केलेत. त्यामुळे स्लो पाहातेय.
लेटेस्ट एपि पाहिले तर ही मजा मिस होईल. पायसचे कदचित आधीचे पाहून झाले असतील 
मला सुरूवातीपासूनच पहायची आहे. बरीच मजा मजा चालू आहे
ओहह, युट्युबवर नाही का दिसत
ओहह, युट्युबवर नाही का दिसत मग झी 5 वर बघ, ते नाही दिसतं का तिथे.
झी 5 नाही दिसतं का तिथे >>>
झी 5 नाही दिसतं का तिथे >>> हो. पण फुकट नाही
ओहह, इथे आहे फ्री.
ओहह, इथे आहे फ्री.
मी लेटेस्ट बघा म्हणतेय कारण तुम्ही सगळे छान खुसखुशीत लिहिता, मला नाही तसं लिहिता येत.
तो तिरक्या मानेने चालणारा आणि तिरपाकडाच असणारा अजित, कन्यादान सिरीयलमध्ये सरळ मानेचा आणि सरळमार्गी होता.
'तू आधी आई होशील आणि मग पत्नी
'तू आधी आई होशील आणि मग पत्नी होशील'. अथर्व असा निघेल असं वाटत नाही. शिवाय मालिकेचा बेस राजश्रीचा आहे. त्यांचा इशारा वेदाकडे होता <<<<<<

Take that SRK and Subhash Ghai! "परदेस" मधे विचारत होते "कहीं आग लगने से पहले, उठता है ऐसा धुआँ"! पाहा वरती.<<<<<<<
घरात पंचवीस लोक आहेत प्रत्येकाच्या रस्त्यात मध्यभागी उभी असते टोलनाका असल्यासारखे.
<<<<<<<
बरं श्राद्धाला लहान मुलांना कोण घेऊन जातं? सत्यनारायण आहे का सकुसप जायला?
<<<<<<<<<
खतरनाक कमेंट्स...
Pages