कॉलेज मधे असताना एका मित्राच्या शेअर मार्केट च्या फर्म मधे बसलो होतो. गर्दी वगैरे नव्हती. तेवढ्यात काळी टोपी, धोतर व कोट घातलेला एक भटका ज्योतिषी तिथे आला. त्याने अल्पावधीतच तिथल्या लोकांवर गारुड घातले. कुंडली पाहून तो ज्योतिष सांगे. मित्राने, त्याच्या भावाने आपापली पत्रिका दाखवून स्वत:ची करमणूक कम उत्सुकता शमवून घेतली. मी तेव्हा नुकतेच व.दा.भटांचे कुंडली तंत्र आणि मंत्र हे पुस्तक वाचून ज्योतिष शिकलो होतो.मला ही वाटले गंमत म्हणुन याला आपली पत्रिका दाखवावी. मी दाखवल्या नंतर त्याने स्वत:शी मिश्किल हसत माझ्याकडे पाहून तर्जनी नाकाकडे नेउन दोन्ही हाताचे पंजे एकमेकांशी जुळवून स्वत:च्या पोटाकडे नेउन अर्थवर्तुळाकार दिशेने फिरवत माझ्याकडे सूचक पाहिले. मला त्याचा अर्थ समजला. मी त्याला म्हणले की तसे काहीच नाही. तो हॅ हॅ करुन हसला. मी म्हटले खरेच तसे काही नाहीये. मला मुलींशी दोन शब्द बोलता येत नव्हते. इतका मी मुलींना घाबरायचो. आज देखील घाबरतो .त्याविषयी एक स्वतंत्र पोस्ट मी पुर्वी इथे केली आहे.
"कशाला खोट बोलताय राव! आपल ज्योतिष खोट जात नसतय." अशा वल्गना करुन झाल्या. मी ही माझ्या ज्योतिष अभ्यासाची झलक त्याला दाखवली. पण तो ही त्याच्या अभ्यासावर ठाम होता.
" शक्यच नाही. फार तर अजून तसे घडल नसेल ही पण मी खात्रीने सांगतो की तुमची पत्रिकाच सांगतिये की शुक्र मंगळ नवपंचम त्यातून शुक्र नेपच्चून ही तूळ राशीत भाग्यात. तुमच्यावर स्त्रीया फिदा आहेत."
"अहो पण मला साधी मैत्रिण देखील नाही."
"ते मला माहित नाही पण आज जरी तुम्ही म्हणता ते खरे असेल तरी भविष्यात माझे भाकित खोटे ठरणार नाही. माझी आठवण तुम्हाला तेव्हा येईल."
कशाच्या आधारे एवढे ठाम सांगताय? मलाही जाणून घ्यायचे आहे. कुठली पुस्तके तुमच्याकडे आहेत? तुम्ही पुण्यात कुठे उतरला आहात?
मग त्याने मला एक पत्त्त्ता दिला. तो होता वडारवाडीचा. मलाही कंड होताच कुठ्ल्या ग्रंथाच्य आधा्रे एवढे तो ठाम सांगतोय. शिवाय माझे भाकित हे भविष्यात कधी ना कधी खरेच ठरेल अशी खात्री तो कशाच्या आधारे सांगतोय. अजून पर्यंत तरी त्याने अंतस्फूर्ती हा शब्द उच्चारला नव्हता. मला तो बंडल माणूस वाटला तरी उत्सुकता होतीच. मग मी त्याने सांगितलेल्या वडारवाडीच्या पत्त्यावर गेलो. तिथल्या बाईने मला सांगितले की असा कुणी ज्योतिषी आमच्या माहितीत नाही. मग मी आजूबाजूला कुणी आहे का? असे विचारले. तिने सांगितले की आजूबाजूला पण कुणी असा नाहीये. थोडक्यात त्याने मला चूत्या बनवले होते.
मी नंतर मित्राला विचारले तेव्हा त्याने मला सांगितले की राहू केतू एकग्र लिहून एक कुंडली त्याला दिली तर त्याने ती बोगस असल्याने सांगितले. यावरुन त्याचा अभ्यास होता हा निष्कर्ष त्याने मला सांगितले. मग मी मित्राला म्हणले की पुणे आणि मुंबई नकाशात एकाच ठिकाणी दाखवले तर तुला ते बोगस आहे हे समजेल की नाही? तसेच पत्रिकेत असते. राहू केतू हे नेहमी 180 डिग्री अपोजिट असतात. ज्योतिषाने सगळ्यांकडून यथाशक्ती दक्षिणा वसूल केली होतीच. अगदी माझ्याकडून सुद्धा 21 रुपये वसूल केले होते.
अजून तरी ज्योतिषाचे भाकित खरे झाले नाही. इथून पुढे शक्यता जवळ जवळ नाहीच. वैज्ञानिक भाषेत बोलताना शक्यतेच विचार असाच मांडावा लागतो. शून्य शक्यता असे म्हणता येत नाही. पुढचे आयुष्य किती ? त्यातून त्या ज्योतिषाचे भाकित खरे ठरण्याची शक्यता किती? जवळ जवळ नाहीच. पण विज्ञानाच्या भाषेत बोलायचे झाले की आज मी बाप होउ शकतो का? तर त्याचे उत्तर हो असे आहे.
एका भटक्या ज्योतिष्याचे भाकित
Submitted by प्रकाश घाटपांडे on 13 May, 2025 - 09:27
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्योतिष ही चांगली करमणूक आहे.
ज्योतिष ही चांगली करमणूक आहे.
+ १११११
बोकलत, तुमच्या कुंडलीत रवि
बोकलत, तुमच्या कुंडलीत रवि गुरू प्रथम स्थानात ( यास केंद्र ,कोण स्थानाचे स्वामी केंद्रात )हा योग बघून चांगले भविष्य सांगतात.
नोकरीत administrative work, legal documentatiion, fire insurance, sefty वगैरेंच्या काही certification कडे वळावे. किंवा परीक्षा द्याव्यात. परदेशात जाण्याची संधी अचानक येऊ शकते.
Pages