मभागौदि २०२५ शशक – औषध - तुष्की

Submitted by तुष्कीनागपुरी on 24 February, 2025 - 03:29

मी बिछान्याला खिळून होतो. तिन वर्षाचा भाचा, सकाळपासून अनेकदा बिछान्याजवळ येऊन गेलेला होता. आपल्याबरोबर रोज खेळणारा मामा, आज असा काय करतोय हा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर होता.

न राहवून तो म्हणालाच, ‘तू माझ्याशी का खेळत नाहीस? दिवसा झोपायचं नसतं नं?’,
जवळच उभी आई त्याला समजावून सांगू लागली,
‘मामाला बरं नाही. त्याचे हात पाय दुखताहेत, तो औषध खाऊन झोपला आहे, काही दिवसांनी बरा होईल.’

त्यानंतर अनेकदा तो येऊन गेला. त्याच्या चेहऱ्यावरची गहन चिंता त्याला शब्दात व्यक्त करता येत नसावी. शेवटी त्याने मला हात लावून हलवले. हातात त्याची प्राणप्रिय कार होती.

‘मामा हे घे रे. हवे तेवढे खेळ. परत नाही केली तरी चालेल’.

Group content visibility: 
Use group defaults

> शशक छान आहे पण षड्रिपु नाही आहेत यात.
.
माझे मत विचाराल तर यात मोह आणि लोभ यांच्यावर निरागस वयातही विजय दाखवणारा निरागस मुलगा आहे, पण हे माझे मत झाले. माबो च्या प्रशासकांचे मत जे असेल ते मान्य असेल.

हातात त्याची प्राणप्रिय कार होती.

‘मामा हे घे रे. हवे तेवढे खेळ. परत नाही केली तरी चालेल. >> मुलं त्यांच्या निरागसता की काय त्या गुणाने कधी काळजाचा नेम घेतील.. Happy

मोह आणि लोभ यांच्यावर निरागस वयातही विजय दाखवणारा निरागस मुलगा आहे>> पटलं आणि आवडलं.

षड्रिपु वर विजय मिळवणारी शशक ही कल्पना जास्त आवडली.

@साधना, @मामी, @छन्दिफन्दि, @ऋतुराज, @ऋन्मेष, @मानव, @मृणाली, @कविन, @आर्किड,
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार