२०२५ सालाचे स्वागत धडाक्यात झाले.
जानेवारी महिना तर आता संपत आलाय. या नवीन वर्षात अनेकांनी नवनवीन संकल्प केले असतील. त्या संकल्पाचा सिद्धीकडे प्रवास चालूदेखील झाला असेल. या संकल्पाइतकीच आणखी एका गोष्टीची उत्सुकता वाचनवेड्या लोकांना असते. वाचन संस्कृतीत पुस्तके जेवढी महत्त्वाची त्याहून अधिक महत्त्वाची म्हणजे वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके.
वर्तमानपत्रे तर आजूबाजूची किंबहुना जगभरातील चालू घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळण्याचे हमखास विश्वासू माध्यम. राजकारण, खेळ, समाजकारण, अर्थकारण हे मुख्य विषय असले तरी इतर अनेक विषयांवर देखील वृत्तपत्रात, मासिकात माहितीपूर्ण लेख, सदरे येत असतात. ही सदरे किंवा लेख आठवड्यात रोज किंवा ठराविक वारी येतात. आपल्याला माहिती असणाऱ्या वृत्तपत्र, साप्ताहिक, पाक्षिक, मासिकातील रोचक माहितीपूर्ण सदरांची ओळख करून देण्यासाठी हा धागा.
यात वृत्तपत्र, साप्ताहिक, पाक्षिक, मासिकाचे नाव, लेखाचे नाव, लेखक, लेखाबद्दल/ विषयाबद्दल थोडक्यात माहिती द्यावी.
नवे वर्ष, नवे सदर
Submitted by ऋतुराज. on 20 January, 2025 - 12:22
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोकसत्ता
लोकसत्ता
चतुरंग
फापटपसारा
गिरिजा ओक
आपल्या मनात कायमच ढीगभर विचारांचा गुंता असतो. कितीही प्रयत्न केला तरी न संपणारे, न आवरता येणारे हे विचार. दहा कामं, शंभर जबाबदाऱ्या, हजारो मतं, आणि लाखो विचार. हे आपल्या मनात सतत असतात. पण तरीही आपल्या मनाला नेमकं माहीत असतं की, कुठला विचार कुठल्या कप्प्यात ठेवला आहे. या हजारो, लाखो विचारांमधून वाट काढत काढत किंवा या लाखो विचारांचा पसारा आवरत योग्य त्या कप्प्यांमध्ये विचार ठेवत आपण आयुष्य जगत असतो, या जगण्यातले किंवा या प्रवासातले काही अनुभव मांडण्याचा हा प्रयत्न, दर पंधरवड्याने.
लोकसत्ता
लोकसत्ता
चतुरंग
गुप्त तिची सावली
अपर्णा देशपांडे
शत्रूच्या भविष्यातील योजना, त्याची कमकुवत आणि बलाढय़ बाजू, त्याच्यापासून नेमका धोका कधी आणि कुठे होऊ शकतो.. ही सर्व इत्थंभूत माहिती काढण्यासाठी प्राचीन काळापासून हेरांचा वापर केला जातो. हेरगिरीच्या विश्वात कोणताही सत्कार, समारंभ आणि जगासमोर मिरवण्याची आस न ठेवता फक्त पुरुषांनीच नाही, तर जगभरात अनेक स्त्रियांनीही अविश्वसनीय साहस करून शत्रूंच्या गोपनीय गोष्टींचा शोध घेतला आहे. अशा तडफदार स्त्रियांचं आयुष्य, साहस, बुद्धिमत्ता, प्रसंगावधान, चपळता आणि पराकोटीचा त्याग याची वाचकांना ओळख करून देणारं हे सदर दर पंधरवडय़ाने.
रोचक दिसते आहे सदर.
रोचक दिसते आहे सदर.
नव्या जाणिवेचे प्रकाशक
नव्या जाणिवेचे प्रकाशक
लोकसत्ता - लोकरंग
पुस्तकांची विक्री होत नाही... लोक वाचत नाहीत... आवृत्त्या संपायला कित्येक वर्षे लागतात... या पारंपरिक समस्या अलीकडे विक्रीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन यंत्रणेद्वारे ग्रंथनिर्मितीत उतरलेल्या प्रकाशकांच्या नव्या पिढीला बिलकूल भेडसावत नाहीत. या नव्या जाणिवेच्या प्रकाशकांची दखल घेणारे सदर... दर पंधरवड्याने
Pages