
नमस्कार मित्रांनो
व्यावसायिक कामानिमित्ताने मी मुंबईमध्ये भायखळा येथे आलेलो आहे.
फक्त उद्या संध्याकाळच - सहा तारीख माझ्यासाठी मोकळी आहे. म्हणून
सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक माबो गटग करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबून कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना आहे. घाईत कळवल्याबद्दल क्षमस्व !
परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी माबोकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मूळ उद्देश आहे.
संजय भावे त्यांच्या एका मित्रासह इथे येत आहेत.
भेटण्याचे ठिकाण
HOTEL HERITAGE,
Sant Sawata Marg,
Next to Gloria Church,
Byculla (E), Mumbai - 400027
Tel No : 022-69374891
.......
शक्य असल्यास संपर्कातून जरूर कळवा. वाट पाहत आहे.
धन्यवाद ! 
दुसर्या पानावरील
दुसर्या पानावरील प्रतिसादांमध्ये ऋतुराज यांच्या फोटोंकडे पाहून ते तरुणपणीचे मुकेश अंबानींसारखे दिसत आहेत. असे इतर सदस्यांना देखील जाणवते का? की गुप्तहेर व्यवसायामुळे फक्त मलाच एका व्यक्तिच्या चेहर्यात दुसर्या व्यक्तिचा चेहरा भासत आहे?
आज पाहिले हे.
आज पाहिले हे.
गटग वर्धापनदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
तेव्हा यातल्या तिघांना प्रथम भेटलो होतो त्याचा आनंद काही औरच होता.
मला थोडी आधी कल्पना दिली असती
मला थोडी आधी कल्पना दिली असती तर मी भायखळा स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्यांना केक किंवा मिठाई वाटायची व्यवस्था केली असती
Pages