संस्मरणीय भायखळा, मुंबई गटग

Submitted by हेमंतकुमार on 5 January, 2025 - 12:32

नमस्कार मित्रांनो

व्यावसायिक कामानिमित्ताने मी मुंबईमध्ये भायखळा येथे आलेलो आहे.
फक्त उद्या संध्याकाळच - सहा तारीख माझ्यासाठी मोकळी आहे. म्हणून
सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक माबो गटग करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबून कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना आहे. घाईत कळवल्याबद्दल क्षमस्व !

परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी माबोकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मूळ उद्देश आहे.

संजय भावे त्यांच्या एका मित्रासह इथे येत आहेत.
भेटण्याचे ठिकाण
HOTEL HERITAGE,
Sant Sawata Marg,
Next to Gloria Church,
Byculla (E), Mumbai - 400027
Tel No : 022-69374891
.......
शक्य असल्यास संपर्कातून जरूर कळवा. वाट पाहत आहे.
धन्यवाद ! Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋतुराज
अप्रतिम वृत्तांत !!!
आता तुमच्या पोतडीतील फोटोही लवकर चढवा
यानंतरचा वृत्तांत लिहिण्याचा अधिकार अर्थातच संजय यांचा आहे .

माझा सर्वात शेवटी आणि तेही पुण्याला पोहोचल्यानंतर सावकाश येईल ...
तर एकाच शब्दात सांगतो की हे गटग म्हणजे ....

धमाल .. धमाल आणि धमाल....

Happy Happy Happy

मस्त वृत्तांत, ऋतुराज.

कुमार सर पुणे गटगला भेटतील असं वाटलं होतं. पण बहुधा त्यांच्यापर्यंत गटगची माहिती पोहोचवण्यात मी कमी पडले. पुढच्या वेळी भेटायला निश्चितच आवडेल.

rmd
पुढच्या वेळी भेटायला निश्चितच आवडेल.+११२
Happy

खरंतर ऋतुराज ह्यांनी इतका छान वृत्तांत लिहिल्यावर मी अजून काय वेगळे लिहिणार म्हणा... पण गटग चे दोन फोटोज आणि त्यांच्या जोडीला दोन-चार वाक्ये लिहून माझ्या भावना व्यक्त करतो...

आपले अनेक आजार/विकार 'छूमंतर' करणारे 'डॉक्टर' जादूगारच असतात, पण डॉ. महेश ह्यांनी हा फोटो काढताना कुठला जादुई इफेक्ट दिला काय माहित पण माझी 'रुंदी' आश्चर्यकारकरित्या दुपटीने तरी वाढवून दाखवली आहे 😀

वरील फोटोत डावीकडून 'ऋतुराज', 'कुमार सर', 'संजय' आणि 'डॉ. महेश'.
दोन पूर्ण आणि एक 'पाऊण' डॉक्टर असलेल्या दिग्गज माबोकरांचा सत्संग कालच्या भायखळा गटगच्या निमित्ताने मला लाभला. ना धड नाश्त्याची आणि ना धड जेवणाची, अशी भलतीच वेळ असल्याने ग्रीन सलाड, स्वीट कॉर्न सूप आणि फ्लॉवर-सोयाबीन चिली अशा भलत्याच पदार्थांचा आस्वाद घेत झकास गप्पा रंगल्या. विषय अमर्याद होते पण वेळ मात्र मर्यादित असल्याने नाईलाजाने साडेनऊच्या सुमारास एकमेकांचा निरोप घेऊन गटगचा समारोप झाला.

कुमार सरांना भेटण्याची हि तिसरी वेळ होती आणि ऋतुराज ह्यांना पूर्वी भेटलो नसलो तरी माबोवरील त्यांचे लेखन आणि प्रतिसादांमुळे ते 'आयडी'ने तरी परिचयाचे होते, परंतु लातूर हि जन्मभूमी आणि गुजरात हि कर्मभूमी असलेल्या डॉ. महेश ह्या वाचनमात्र माबोकरांनी कालचे गटग बहारदार करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली, त्यासाठी त्यांचे विशेष आभार!

ऋतुराज, कुमार१ आणि डॉ. महेश, काल आपणा सर्वांना भेटून खूप आनंद झाला. ह्यावेळी वेळ कमी पडल्याने पुढच्या वेळी आधीपासून नियोजन करून भरपूर वेळ हाताशी ठेऊन आणखीन धमाल करू... धन्यवाद!

छान वृत्तांत !
प्रत्यक्ष भेटींची मजा काही औरच असते हे परत एकदा जाणवले.

छान वृत्तान्त आणि फोटो.

महेश हे १०० % वाचनमात्र दिसतात. कधी त्यांचं काही वाचल्याचं आठवत नाही. या धाग्यावर तरी प्रतिसाद दिलाय का त्यांनी?
मायबोलीवर गुप्त(चराची) नजर ठेवून आहेत की काय? Lol

संजय छान वृत्तांत...
आपण वाचत असलेले लेखक फोटोतून वाचले आणि लिखाण समृध्द कसे होते हे पटलं.

>> जब मिल बैठेगे चार यार>>
तब सेवन करें...
ग्रीन सलाड, स्वीट कॉर्न सूप
और फ्लॉवर-सोयाबीन चिली
जैसा 'सात्विक' आहार... 😀

बाकी,
Byculla Katta.jpg
हा फोटो पाहून आमच्या सौभाग्यवतींना काय वाटले बघा...
"आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देऊन सरकारस्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर गेलेले युतीचे दोन नेते"
😂
आम्ही दोघे कुठल्याही अँगलने नेते वगैरे आजिबात वाटत नसलो तरी कुमार सर मात्र 'राज्यपाल' वाटत आहेत खरे 😎

संजय छान वृत्तांत...
नव्हे,
काय तोडलय तुम्ही .झक्कास !!

*राज्यपाल.... काय राव गंमत गरीबाची....

छान वृत्तांत.
शर्टचे रंग डार्क असावेत असं ठरलं होतं का?

संजय, खरंच की तुमची रुंदी चांगलीच वाढलेली दिसतेय फोटोत. Biggrin
"आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देऊन सरकारस्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर गेलेले युतीचे दोन नेते">>> Lol
कुमार सर, आता तुमचा वृत्तांत येऊ दे..

छान सचित्र वृत्तांत
ऋतुराजला भेटलोय.
संजय ह्यांचे लेखन खूप आधीपासून वाचतोय
कुमार सर तर आवडीचे.
गटग होत आहेत, वृत्तांत येत आहेत हे फार छान सुरू झालं.

मुंबईकर आणि समस्त मायबोलीकरांनो,
पुण्याला पोहोचलो आहे आणि दमलोही आहे. उद्या ताजातवाना झाल्यावर आधी एक छानशी बातमी देणार आहे आणि मग यथावकाश मनोगत
लिहीनच !
Happy

बातमी : Happy
6/1 च्या गटगत डॉ महेश हे आम्हासंगे बसले ते माबोचे ‘गुप्त-वाचक’ अर्थात बिगर-सभासद या नात्याने ! नंतरच्या 3 तासांतील आम्हा तिघांचे ‘मंथन’ पाहून ते असे काही प्रभावित झाले की त्याच राती त्यांनी माबो-सभासदत्वासाठी गुपचुप नोंदणी करुन पण टाकली !

आता ‘पक्षश्रेष्ठी’ लवकरात लवकर त्यांना माबोकर करून टाकतील अशी आशा.
अशा तऱ्हेने एक नवे हसरे आणि उमदे व्यक्तिमत्व आपल्याला लाभणार आहे.
महेश,
स्वागत आणि स्वागतच !!

बातमी २ :
डॉ. महेश या नव्याने होऊ घातलेल्या आपल्या माबोकरांच्या कुटुंबातील एका सांस्कृतिक बाबीविषयी त्यांची परवानगी न घेताच लिहून टाकत आहे. त्याबद्दल ते क्षमा करतील याची खात्री आहे . . Happy

जन्माने मराठी असले तरी ते आता कामानिमित्त भारतातील सध्याच्या सर्वाधिक 'लाडक्या' राज्यातील सर्वाधिक 'लाडक्या' शहरात स्थिरावलेले आहेत. त्यांच्या घरात पाच भाषांचा एक प्रकारे पंचगंगा-संगम झालेला आहे. त्या अनुक्रमे अशा :

  1. कन्नड
  2. गुजराती
  3. मराठी
  4. इंग्लिश आणि
  5. हिंदी

आता या पाचमध्ये कन्नड पहिल्या क्रमांकावर का आहे हे चाणक्ष वाचक ओळखतीलच !!

परंतु जन्माने मराठी असलेल्या महेश यांना आपली मातृभाषा आपल्याच घरात तिसऱ्या स्थानावर गेल्याचे पाहून काय वाटत असेल ते मी जाणू शकतो. अरेरे, बिचारे ! म्हणून ते जेव्हा केव्हा महाराष्ट्रात कामानिमित्ताने येतात तेव्हा ते मराठी वाचायला, ऐकायला आणि बोलायला अत्यंत उत्सुक असतात.

त्यांनी मायबोलीच्या प्रथमदर्शनीच प्रेमात पडावे यात नवल ते काय ?
Happy

Pages