Submitted by ---पुलकित--- on 30 October, 2024 - 12:34
तेजोमय आकाशदीप हा
प्राचीवर लाविला कुणी
किरणांची आरासही पहा
रंगावली जणु नभांगणी
भल्या पहाटे गात भूपाळी
विहग विहरती वनोवनी
वृक्ष लेवुनी तिलक कपाळी
कृतार्थ होती मनोमनी
दाही दिशांना गुलाल उधळुनी
लीन मेघ शरदाच्या स्तवनी
पाही कौतुके दीप उजळुनी
सरिता ती जलदांची जननी
इच्छा धरिते एक इथेची
दिपावली ही सृष्टीची
कथा सरावी दुष्काळाची
व्यथा नको अतिवृष्टीची
शाश्वत करण्या मार्ग आपुला
साथ हवी ऋतुमानाची
तिमिर भेदण्या अज्ञानाचे
ज्योत हवी विज्ञानाची
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.
छान आहे
छान आहे
सुंदर कविता ..!
सुंदर कविता ..!
छान
छान
फार सुंदर.
फार सुंदर.
@Ni३, @पालवजी, @रुपालीजी,
@नि३, @पालवजी, @रुपालीजी, @अमितव, @सामोजी,
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!