कभी खुशी कभी गम - एक धावता संयुक्त रिव्यू

Submitted by फारएण्ड on 19 August, 2024 - 14:40

कभी खुशी कभी गम या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा "माझा" धागा नाही. सर्वांनी लिहा. "तुम्ही जर या काळात हे विकत घेतले असेल तर या क्लास अ‍ॅक्शन सूट मधे तुम्हाला सामील होता येईल" अशी आवाहने असलेली मेल येते तसे समजा. ज्यांनी हा पिक्चर कधी पाहिलेला आहे त्यांना त्यांचा वैताग चॅनेल करायला चांगली संधी आहे. गेल्या २-३ दिवसांत चित्रपट बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.

इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे स्मशानात आहात, समूहगीतासाठी उभे नाही आहात. >>> Lol

सिनेमातली फ्रेमन फ्रेम सुंदरच असावी हा केजो चा अट्टाहास कधी कधी असह्य होतो >>> टोटली सहमत.

हॉरर सिनेमात भुतांचा प्रभाव असलेला एरिया असतो असा एक कन्स्पेट असतो ना, म्हणजे एखाद्या रेषेच्या आत पाऊल ठेवले की भुताचा प्रभाव सुरू होतो. जोपर्यंत त्या रेषेच्या बाहेर तुम्ही आहात तोपर्यंत ते काही करू शकत नाही वगैरे. तसे काहीतरी जयाच्या माँ सेन्स चे आहे यात. हेलिकॉप्टर येउन थांबते. तोपर्यंत काही नाही. मग शाखा जमिनीवर उडी मारतो. मॉ सेन्स लगेच ऑन. तसेच लंडनमधे मॉल मधे. मॉलकडे शाखा येत असताना जयाला कल्पना नाही. त्याची पावले मॉलच्या दारातून आत येउन टेकतात. लगेच ही थबकते. सो हा मॉ सेन्स अंतरावर अवलंबून नाही. एक काल्पनिक रेषा ओलांडून शाखाने अमेरिकन फुटबॉल सारखे "टचडाउन" केले की लागू होतो.

आणि ते ही फक्त शाखाने. हृतिकला तो प्रिविलेज नाही. तो त्याच मॉल मधे जवळपास हिंडत असतो. तरी पत्ता नाही.

एरव्ही घराजवळ हेलिकॉप्टर भिरभिरत असेल तरी तिला फिकीर नाही. लोक आपल्या घरातील स्कूटरचा/कारचा सुद्धा आवाज गाडी घराजवळ आली की ओळखतात. इथे तर हेलिकॉप्टर आहे. त्याचा आवाज येतोय म्हणजे आपल्याच घरातील कोणीतरी आले असेल. बाकी सगळे घरातच असल्याने तो शाखाच असू शकतो - असे सोपे लॉजिक सामान्य लोक लावतील. पण हे सामान्य लोक नाहीत.

अहो माझे मन, जरा शर्टाच्या मनाचा सुद्धा विचार करा. त्याला कसे वाटेल की सारखे मलाच मैताला नेता..
आणि लोकांना तेव्हा नाही समजले तरी मागाहून फोटो बघताना रिपीट केलेले कपडे समजतातच.

मयताच्या इथे फोटो कोण काढतं
>>>
असा सीन असेल तर का नाही काढावासा वाटणार? सगळे गेल्यावर काढायचा निवांत.. आणि आता तर आता कुणाला रिक्वेस्ट सुद्धा करायला लागत नाही. आपले आपण सेल्फी घ्यायचा काळ आहे.

IMG_20240823_001630.jpg

तसेही तिथे जमलेल्या सगळ्याच माणसाना गेलेल्या माणसाचे तितकेसे दुःख नसते. फक्त बरे दिसत नाही म्हणून लोकं चिडीचूप असतात. मग कार्य उरकताच कुठल्यातरी हॉटेलात बसून चहा पीत हसत खिदळत त्या निमित्ताने आयतेच झालेले गेट-टुगेदर साजरे करतात. आयुष्य कोणासाठी थांबत नाही...

मुळात चित्रपटाची प्रत्येक फ्रेम सुंदर ठेवण्यात काय वावगे आहे असे वाटत नाही. चित्रपटात पब्लिक वॉशरूम दाखवताना सुद्धा फ्रेम जास्तीत जास्त सुंदर किंबहुना स्वच्छ ठेवायचा प्रयत्न असतो. जसे असते तसे दाखवले तर लोकं पॉपकॉर्न पुन्हा टबात भरतील. किंवा जे रोज आजूबाजूला दिसते ती पैसे मोजून कोण मोठ्या पडद्यावर बघायला जाईल??

मागे एका मुलाखतीत करन जोहर स्वतः म्हणाला होता की माझे चित्रपट लार्जर Than लाईफ असतात. जे सामान्य लोकांना आसपास बघायला मिळत नाही ते मी त्यांना मोठ्या पडद्यावर दाखवतो. त्यामुळे हे स्मशान आहे तर ती जागा कुबटच दाखवायला हवी असे हट्ट सोडले तर त्याचे चित्रपट डोळ्यांना सुखावतात च!

ओढणीचे शर्ट, देखणे आणि नीटनेटके स्मशान ही अफलातून निरिक्षणे भारी. एकुण एक प्रतिक्रिया भारी आहेत. हा पिक्चर खर्च डोक्यात गेला होता तेव्हा. पीळ कॅटेगरी ह्याला तोडिस तोड म्हणून कदाचित 'हम साथ साथ है ' असेल. पण बडजात्या भाऊ लपवाछपवी करत नाहीत. महान भारतीय संस्कृती आणि प्रेमळ कुटुंब दाखवायचे तर त्यांनी सरळ आधुनिक रामायण दाखवले. घरातल्या "लेडिज आणि बेटियांनी' कीचन मध्ये स्वयंपाक करायचा आणि पुरुष आणि टोणग्यांनी तिन्ही त्रिकाळ ते खायचे. असे सोपे आणि सुटसुटीत नियम असतात बडजात्या चे.

रायचंद मात्र 'एकदम ताकाला जाऊन भांडे लपवणारी कॅटेगरी. बाबा रायचंद 'पोराच्या लग्नाबद्दल त्याला काय विचारायचे घरातले सगळे निर्णय तर मोठे घेतात असं ज्ञान पण बिनदिक्कत पाजळतो, पण कुटुंब परत एक व्हायला हवे ह्या आईच्या शेवटच्या इच्छे कडे खुशाल दुर्लक्ष करतो. असा बेसिक मध्ये प्रॉब्लेम आहे रायचंद लॉजिक चा.

सिनेमातली फ्रेमन फ्रेम सुंदरच असावी हा केजो चा अट्टाहास कधी कधी असह्य होतो
फक्त रायचंदच नाही तर चांदणी चौकात मरण पावलेल्या बाबूजींना पहायला पण तिथले सगळेच पांढर्‍या कपड्यात... आहात कुठे? अशी गरीबी व श्रीमंती मधली दरी ह्या प्रसंगांनी दूर केली केजो ने..!! डायरेक्शन डायरेक्शन का काय ते म्हणतात ते हेच. असे बरेचसे संदेश केजो देतो हे कोणी इथे पहात नाही याची खंत वाटली.

शाहरूख मात्र या प्रसंगात पांढर्‍या कपड्यात येत नाही कारण त्याला बाबूजी गेले हे माहित नसते. पण इतरांचे पांढरे कपडे पाहून त्याला कळत नाही याचे आश्चर्य वाटले. कदाचित इथूनच शिकवण घेऊन नंतर तश्या प्रसंगात तो पांढरे कपडे वापरतो. गरीबांकडून श्रीमंत बर्‍याच गोष्टी शिकू शकतात हा दुसरा संदेश.

शाहरूख मात्र या प्रसंगात पांढर्‍या कपड्यात येत नाही कारण त्याला बाबूजी गेले हे माहित नसते. पण इतरांचे पांढरे कपडे पाहून त्याला कळत नाही याचे आश्चर्य वाटले >>>
त्याला तिथे काळ्या छत्र्याच दिसत असतात ना म्हणून Wink
मला एक कळत नाही की भेटायला आलेली माणसे पांढरे कपडे घालून येत असतील पण घरातली माणसे थोडीच कपडे बदलून बसतात? इथे काजोल आणि तिची बहीण पण पांढऱ्या कपड्यात. नंतर प्राथर्नासभेत वगैरे ठीक आहे.

मला एक कळत नाही की भेटायला आलेली माणसे पांढरे कपडे घालून येत असतील पण घरातली माणसे थोडीच कपडे बदलून बसतात?इथे काजोल आणि तिची बहीण पण पांढऱ्या कपड्यात.
हो बरोबर. माझेमन हे तुमचे चांगले निरीक्षण आहे .

अशा सिनेमांमधून आणखी एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे बघा बघा, अमेरिकेत ( वा लंडन मध्ये) असूनही 'आपली' संस्कृती कशी जपत आहेत हे लोक्स ! इथे लंडन च्या प्राथमिक शाळेत काजोल उगीचच obnoxious बनून गोर्‍या शिक्षिकेवर डाफरते, व मग थेट 'जन गण मन' तर 'मुझसे दोस्ती करोगे' मध्ये हृतीक व करीनाचे लग्न लंडन मध्ये (का?) असते तर तिथे गेल्यावर गोरे नोकर चाकर पाहून एक जण म्हणतो, ' वाह तुमने तो गोरे लोगोंको काम पे रखा है !'

मला एक कळत नाही की भेटायला आलेली माणसे पांढरे कपडे घालून येत असतील पण घरातली माणसे थोडीच कपडे बदलून बसतात?

>> हो. अश्या घरांमध्ये (जिथे कोणी गेल्यावर पांढरे कपडे घालतात) कितीही दुःखात असेल तरी तश्याही परिस्थितीत एकेक जण आलटून पालटून आत जाऊन कपडे बदलून घेतो. मी मैत्रिणींच्या घरी पाहिले आहे.

ओह्ह असे असते? मला माहित नव्हते. मला वाटलं की घरातल्यांना असे काही सुचणार नाही. पण मेंटल कंडिशनिंग असेल तसे तर होत असेल. आपल्याकडे नातेवाईक अचानक जावे लागले/कुठून समारंभातून जात असतील तर कपडे बदलून सोबर कपड्यात जातात हे पाहिलेय.

मला वाटलं की घरातल्यांना असे काही सुचणार नाही. पण मेंटल कंडिशनिंग असेल तसे तर होत असेल.

>> हो. माझी आजी वारली तेव्हा मी कॉलेजमधून काहीतरी फंकी कपड्यात घरी आले होते तेव्हा तश्याही अवस्थेत पहिला कढ ओसरल्यानंतर आईने आधी कपडे बदलायला पाठवल्याचे आठवते आहे. मीही निमूट पंजाबी ड्रेस घालून घेतला होता आत जाऊन.

आपल्याकडे निदान ममव फॅमिलीत तरी हे पांढर्‍या कपड्याचं कधी बघितलं नाहीये. धुवट सुती कपडे, फार भडक नसलेले वगैरे घालतात अशा वेळी.

कपडे बदलले नाहीत तर ते खटकून घेणारे लोकं सुद्धा असतात असा अनुभव आहे.

माझ्या एक काकी गेल्या तेव्हा मी ऑफिसमध्ये होतो. फ्रायडे होता. अर्थात फ्रायडे ड्रेसिंग मध्ये होतो. अंगावर सिक्स पॉकेट असलेली जीन्स होती. मी त्याच कपड्यात थेट गेलो अन्यथा बराच उलट सुलट प्रवास झाला असता. तेव्हा बरेच जण मला ऑफिसमधून आलास का? कपडे बदलायला वेळ नाही मिळाला का? याची अश्या टोनमध्ये चौकशी करत होते की मी अश्या कपड्यात यायला नको होते हेच सुचवत होते.
आता त्या काकींची मुले आणि काका हे तर त्या मनस्थितीत सुद्धा नसावेत की कोणी काय कपडे घातले आहेत हे बघावे. पण बाकीच्यांनाच नसती उठाठेव पडली असते.
ते आपण म्हणतो ना अमुक तमुक केले तर चार लोकं काय म्हणतील... ती चार लोकं आपल्याला नेहमी लग्नात आणि मैताला भेटतात.

सगळ्यांच्या कमेंट धमाल आहेत!
मी हा सिनेमा बघितला नाहीये. जेंव्हा आला तेव्हा तिकीट काढून बघावासा वाटला नाही आणि टिव्ही वर दोन - तीन वेळा प्रयत्न करुनही बघवला नाही. त्यातील सोनू निगम चं गाणं आवडलं म्हणून आणि लता बाईंची गाणी त्यावेळी ऐकवली नाहीत म्हणून, हा सिनेमा लक्षात राहिला.
इथल्या कमेंट वाचून मात्र हा सिनेमा म्हणजे - कुणाची खुशी आणि कुणाला गम, असं वाटतंय ))

अशा सिनेमांमधून आणखी एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे बघा बघा, अमेरिकेत ( वा लंडन मध्ये) असूनही 'आपली' संस्कृती कशी जपत आहेत हे लोक्स !
फारएण्ड साहेबांचा परदेस चा रिव्हू आठवला. फार धमाल होता तो...

फारेंड चा परदेस चा रिव्ह्यू म्हणजे आऊट ऑफ द वर्ल्ड आहे ! तोडच नाही! Happy

इथे हम साथ साथ है चा पण आहे ना एक रिव्ह्यू?

Pages