Submitted by फारएण्ड on 19 August, 2024 - 14:40
कभी खुशी कभी गम या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा "माझा" धागा नाही. सर्वांनी लिहा. "तुम्ही जर या काळात हे विकत घेतले असेल तर या क्लास अॅक्शन सूट मधे तुम्हाला सामील होता येईल" अशी आवाहने असलेली मेल येते तसे समजा. ज्यांनी हा पिक्चर कधी पाहिलेला आहे त्यांना त्यांचा वैताग चॅनेल करायला चांगली संधी आहे. गेल्या २-३ दिवसांत चित्रपट बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.
इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पर्णीका
पर्णीका
हो ना ! पुतण्याने पाठांतरात
हो ना ! पुतण्याने पाठांतरात माती खाल्ली तर सगळच मुसळ केरात !
बरं जायदाद से बेदखल करून कुठे हाकलतात तर लंडन ला ! आमच्यात अक्कलकोट, फार तर शेगाव ला जा तिथे फुकट जेवण असते इतकेच सांगतील.
सगळ्यांचेच पंचेस जबरदस्त आहेत हे वे सां न ! या लेखाने शायद अनेकांच्या पुराने जख्मोंको ताजा कर दिया !
माझेमन, आचार्य : खतरनाक
माझेमन, आचार्य : खतरनाक ऍडीशन्स!
पर्णीका :
खूप मस्त लिहिलंय
पर्णीका, र आ>>>
पर्णीका, र आ>>>
आमच्यात अक्कलकोट, फार तर शेगाव ला जा तिथे फुकट जेवण असते इतकेच सांगतील >>>
शाखा हेलिकॉप्टरमधून बाहेर
शाखा हेलिकॉप्टरमधून बाहेर येतो तेव्हां जया भागदौडी घराच्या बाहेर स्कुटीचा आवाज व्हावा अशा शांतपणे चमकून बाहेर बघते. >>> र.आ
आणि ते काटकोनातून आत येण्याचे वर्णनही परफेक्ट आहे 
पर्णिका तिन्ही "अगम्य लॉजिक"
र.आं.नी दिलेली लिंक परत पाहिली
ते घर बाहेरून दाखवले आहे ते शॉट्स, शाखा पळतो तो सीन आणि घरातील पूजा की थाली वाले इन्डोअर सीन्स हे वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीत केलेले दिसतात. तीन चार वेगवेगळी लोकेशन्स आहेत. उदा: शाखा घराजवळ पळत येत असतो तेव्हा साइड अँगल आहे तेथे मागे मोठ्या बुंध्याची झाडे आहेत. पण त्या आधी लाँग शॉट मधे वरून तो दाखवला आहे तेथे तशी झाडेच नाहीत. तेथे लाँग शॉट मधे दिसणारे बाजूचे रस्ते/वॉकवे सुद्धा साइड अँगलने दिसत नाहीत. आणि भारतात असे मध्ययुगीन आर्किटेक्चरचे घर कोण बांधतात? तेथून चांदणी चौकात हे लोक कसे ये-जा करतात? तेथील आम जनतेला यांच्या घरी येउन कामे करायला व नाचायला शटल्स असतात का? हे हेलिकॉप्टर सोडले तर इतर कोणतीही गाडी तेथे दिसत नाही.
यातही तरूण लोकांचे केस ते "मोहब्बतें" सारखे वार्याने सतत उडत असतात एरव्ही. फक्त हेलिकॉप्टरचे पंखे फिरत डोक्यावर फिरत असताना ते उडत नाहीत
कामे करायला व नाचायला शटल्स
कामे करायला व नाचायला शटल्स असतात का >>> नक्कीच नसतात. काजोल आणि रूखसार मिठाईची ताटं नाचवत धावत येताना दाखवलं आहे. म्हणजे चांदनी चौक वॉकिंग डिस्टन्स असणार. ( ती मिठाई पार्टीतल्या सगळ्यांना कशी पुरणार असते ते जयाच जाणे!
)
ती मिठाई पार्टीतल्या
ती मिठाई पार्टीतल्या सगळ्यांना कशी पुरणार असते ते जयाच जाणे! >>>>
फक्त दाखवून परत नेणार असतील. येथे 'आजच्या मेन्यू' वर नाही का, फोटो दाखवतात तसे. आजची मिठाई 
म्हणजे चांदनी चौक वॉकिंग
म्हणजे चांदनी चौक वॉकिंग डिस्टन्स असणार >> अगदी.
चांदनी चौक च्या समोर लाल किल्ला, मागे खारी बावलीचा बाजार, किल्ल्यात मीना बाजार, लालकिल्ल्या मागे हिमालय, त्याच्या बाजूला सह्याद्री आणि याच्या मधल्या डोंगरावर अमिताभचे घर, खारी बावली संपली कि अरबी समुद्र, तो होडीतून ओलांडला कि संसद, राजपथ,इंडीया गेट...
करन जोहर भूगोल.
हा ऑटाफे धागा असणार आहे
सगळ्यांनी झकास लिहिलंय. हा ऑटाफे धागा असणार आहे लोकांचा. ज्यांनी ज्यांनी पाहिलाय त्यांना सगळी मळमळ बाहेर काढता येईल. काजोल पूर्ण पिक्चरभर इतकी किंचाळते आणि overacting करते की अमिताभला तिचा आणि तिच्याशी लग्न केल्यामुळे शाहरुखचा राग आलाय तो योग्यच आहे !
बाकी ते आ आ आ आ कभी ख़ुशी कभी गअअअम डोक्यातून काढून टाकायचे असल्यास कसे करावे याचा कोणाला उपाय माहित असेल तर सांगा. लताबाई गेल्यावर आणि आधीसुद्धा अनेक कार्यक्रमांत त्यांच्या entry ला ती tune वाजवलेली ऐकली आहे, हे ज्या कोणाचे डोके आहे त्याला खलबत्यात कुटला पाहिजे. म्हणजे ४० च्या दशकापासून बाईने इतकी अजरामर गाणी गायली ती सगळी फुकट, यांना हेच ते आ आ आ आ आठवते !
सगळ्यात भारी सिन मेरा बाबा,
सगळ्यात भारी सिन मेरा बाबा, मेरा बच्चा (च)
overacting की दुकान. इतर वेळी बरी असते जलाल पण ह्या सीन मध्ये अगागा..
सगळे जबरदस्त लिहतायत!
सगळे जबरदस्त लिहतायत!
काजोल पूर्ण पिक्चरभर इतकी किंचाळते आणि overacting करते की अमिताभला तिचा आणि तिच्याशी लग्न केल्यामुळे शाहरुखचा राग आलाय तो योग्यच आहे !>> अगदी अगदी
खरतर सगळेच इतकी ओव्हर आणी बालिश अॅक्तिन्ग करतात की काहि विचारु नका.
लंपन
करणचा एक सिनियर लेडीजचा सेट आहे. तो त्याना पत्ते पिसल्यासारखे कधी हिरोकडून कधी हिरोईनकडून झालेच तर शेजारच्या कुचाळक्या करणाऱ्या आजीच्या मैत्रिणीच्या रूपात घालतो. (कल हो ना हो). त्यातली एक अतीच ज्येष्ठ असते , बिजी टाईप. ही बिजी 'बिझी' नसून रिकामटेकडी असते. त्यामुळे येता जाता टाळ कुटते , 'पुत्तर पुत्तर' करते, सर्वेलन्स कॅमेऱ्याच्या वरताण लक्ष ठेवून असते. टीनेज मुलींसारखी कायम मैत्रिणींच्या घोळक्यात वावरते. शिवाय वरचेवर मोठ्या पूजाअर्चा मांडून मुलांना खर्चात टाकते. वानप्रस्थाची ॲक्टिंग करत हरिद्वारला जाते, तेथेही मैत्रिणींना घेऊन जाऊन पार्टी करते.
पाऊण पिक्चर झाल्यावर मरणाच्या दारात- तोंडात तुळशीचे पान असताना सुद्धा इमोशनल ब्लॅकमेल करते. पण ही खपल्याशिवाय काही कथेचा टर्निंग पॉइंट येत नाही, त्यामुळे वाट बघत बसावे लागते. मधेच आजारी पडते तेव्हा आपल्याला आशा वाटते पण नाही, 'इस रात की सुबह नही' वाटावी इतका अंत बघते. एकदाची मरते आणि शेकडो लोक पांढरे कपडे घालून लाईनीत बसतात आणि आसवं गाळतात.. हिच्यासाठी.
सगळेच सुटलेत.
या चित्रपटात एक मळकट सिनेमॅटोग्राफी आहे.त्या जया च्या मरून साड्या वगैरे.
जया ह्या करन च्या सगळ्या
जया ह्या करन च्या सगळ्या सिनेमात कायम कावलेलीच असते.
कु का त कु का.
पण ही खपल्याशिवाय काही कथेचा टर्निंग पॉइंट येत नाही, त्यामुळे वाट बघत बसावे लागते >>
गाणी गायली ती सगळी फुकट, यांना हेच ते आ आ आ आ आठवते ! >> Lol हे अगदी खरे आहे. तो अभद्र आलाप आठवतोच. आणि त्यानंतर लताचे कभी खुशी कभी गम.. त्यातले गम तर लता अगदी शेजारी बसून कानात म्हणते इतके चांगले फीट बसले आहे. गम
आधीसुद्धा अनेक कार्यक्रमांत
आधीसुद्धा अनेक कार्यक्रमांत त्यांच्या entry ला ती tune वाजवलेली ऐकली आहे, हे ज्या कोणाचे डोके आहे त्याला खलबत्यात कुटला पाहिजे.
अगदी अगदी ! लताजींचे अगदी अप्रसिद्ध असे जुने रॅंडम गाणे घेतले तरीही ते यापेक्षा चांगले आहे. किशोर कुमार च्या एंट्री ला तोहफा तोहफा सारखे आहे हे.
हा धागा खूप आवडला.
फक्त दाखवून परत नेणार असतील
फक्त दाखवून परत नेणार असतील
बिजी 'बिझी' नसून रिकामटेकडी
इस रात की सुबह नही
>>>> अस्मिता
यांना हेच ते आ आ आ आ आठवते >>> खरंय
करन जोहर भूगोल >>>
हे वाचून उगाच 'राजवाड्याच्या बाल्कनीत राधा-कृष्ण, समोरून जाणारी आगबोट, वरून विमानातून हात करणारा पायलट' वगैरेची आठवण येते आहे.
तुफान प्रतिसाद आणि परीक्षण...
तुफान प्रतिसाद आणि परीक्षण... आजकाल वीकेंडला दुपारी TV लावला की हा चित्रपट कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर दिसतोच आणि मस्तकशूळ उठतो. हे सगळं वाचून तो शूळ शांत झाला. एकूण एक सर्वांची प्रेक्षकाच्या डोक्यात जाण्यासाठी चढाओढ लागली होती की काय असं वाटतं मला.
या सिनेमात म्हणे अभिषेक बच्चन
या सिनेमात म्हणे अभिषेक बच्चन चा ही रोल होता, राणी मुखर्जीचा बॉयफ्रेंड वगैरे... पण बहुतेक नंतर त्यात चेंजेस केले अन् लहानपणी त्या भल्या मोठ्या घरात लपाछपी खेळताना बिछडलेला भाऊ जो कधी कुणाला सापडलाच नाही असा रोल दिला. नीट बघितलं तर जयाबाईंची आणखी रडारड नको म्हणून बाकी कुणी (अगदी आज्जी पण) त्याचा कधी उल्लेख ही करत नाहीत.
मला आवडतो हा सिनेमा ,
मला आवडतो हा सिनेमा , कम्फर्ट फूड सारखा आहे .. कधीमधी एखादा सीन बघायला छान वाटतो , आवडता पदार्थ थोडासाच वाटीत घेऊन खाल्ल्यासारखा . जया बच्चन याच सिनेमा मुळे मला कितीतरी वर्षं आवडत होत्या , अगदी अलीकडे पर्यंत , खूप गोड वाटल्या त्या या सिनेमात .
ते टायटल साँग खरंच डोक्यात
ते टायटल साँग खरंच डोक्यात जातं....!! लताच्या काही फ्लॉप गाण्यांपैकी एक !!
शाहरुख ची एंट्री धमाल वर्णिली आहे.
अभद्र आलाप, ज्या कोणाचे डोके
अभद्र आलाप, ज्या कोणाचे डोके आहे त्याला खलबत्यात कुटला पाहिजे.>>> अगदी अगदी. लता मंगेशकरांचा आवाज ठार डोक्यात जाण्याचे हे एकमेव उदाहरण.
बाय द वे, बिजी मरण्याचे व जया भादुरीने रिबेल करण्याचा काही संबंध आहे का? रायचंदांच्या सुना पण ‘अपना टाईम आयेगा’ म्हणून खुश होतात का? मुळात ही बिजी एवढी महत्वाची फिगर असेल तर सणकी मुलाचे कान धरून ‘मुर्खपणा बास कर नी आता मुलाला बोलवून घे’ का नाही सांगत?
त्या भेटीच्या सीनमध्ये हृतिक-करीना रडतात ते किती कृत्रिम आणि फनी आहे. मुळात एका भावाने प्रेमविवाह केल्यामुळे त्याला वडीलांनी हाकलले असेल तर त्याच्या बायकोला भेटवण्याच्या प्रसंगात आपलं घोडं (प्रेयसी) घुसडण्याचं काय कारण?
त्या जया च्या मरून साड्या वगैरे>>> जया भादुरी इरिटेटिंग वाटण्यात तिच्या वेशभुषेचा मोठा हात आहे. ते हेवी जरदोजी वर्क केलेले ब्लाऊज/ साडीवर उगीचच घेतलेल्या शाली वगैरेमुळे ती अजून बोजड दिसते.
या पिक्चरमधली एकमेव आवडणारी गोष्ट म्हणजे ‘सुरज हुआ मध्धम’, त्याची सिनेमॅटोग्राफी, त्यातला काजोलचा लूक, मायनस ओढणीचे/साबुदाण्याचे शर्ट घातलेला शाखा. (आणि करण जोहरच्याच पिक्चरमधले त्याचे स्पूफ). शाखाला सी थ्रु शर्टमधे पाहणे नक्की कुणाची फॅंटसी होती कोण जाणे.
मला आवडतो हा सिनेमा , कम्फर्ट
मला आवडतो हा सिनेमा , कम्फर्ट फूड सारखा आहे >>
बाबौ ! कम्फर्ट फूड ? तुम्हाला ट्रोल का करू नये राधानिशा ? ( कृपया हलके घ्यावे, नाहीतर धागा राहिला बाजूला, वेगळाच गोंधळ होईल. )
2 विदेशी हे (किंवा सेम
2 विदेशी हे (किंवा सेम दिलवाले चे आहे ते) रिव्ह्यू करत होते ते सारखे शाखा चे निपल दिसले की ओरडत होते.ते तसेही 'स्टुपीड' आहेत.
एंटरटेनमेंट हवी असेल तर लॉजिक
एंटरटेनमेंट हवी असेल तर लॉजिक बाजूला ठेवून बघता येतील अशा काही गोष्टी तरी असणं गरजेचं आहे , त्या प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात . पिसं काढण्याला माझा काही विरोध नाही , मलाही आवडतं ते वाचायला . हॉरर सिनेमात घर हॉंटेड आहे असं एकदा समजल्यावर निर्धार वगैरे केल्यासारखे तिथेच का राहतात किंवा घर हॉंटेड आहे हे नक्की झाल्यावरही लहान मुलांना वेगळ्या खोलीत निजवण्याचा अट्टाहास का , मुळात अशरीरी अस्तित्वांचा आजपर्यंत विज्ञानाला काहीही पुरावा मिळाला नसताना वाट्टेल ते सिनेमे कसे बनवतात , असे लॉजिकल प्रश्न पडायला लागले तर हॉरर पिक्चर घटकाभर मजेने बघता येणार नाही . किंवा सखे तुझ्या केसात तारे माळलेले वगैरे गाणी ऐकवणार नाहीत कारण तारे हे प्रचंड अग्निगोल , ते केसात कसे माळता येतील असं लॉजिक वापरायला गेलं तर ...
एकमेकांवर जेन्यूईन प्रेम करणारी गुडी गुडी फॅमिली बघाविशी वाटू शकते , हॅपी एन्डिंग ची खात्री असणारी स्टोरी.... वेगवेगळी कारणं असू शकतात . सूर्यवंशम लॉजिक पासून कितीतरी लांब असून भारतीय जनतेत बऱ्यापैकी लोकप्रिय आहे याचा अर्थ त्यात त्यांना अपील होणाऱ्या काहीतरी गोष्टी असल्या पाहिजेत , कदाचित ओळखीच्या ऍक्टर्सचे चेहरे नवीन चेहऱ्यांपेक्षा जास्त क्लोज वाटतात , कदाचित काही आदर्श जपले जाणं हे मनाला आवडत असू शकतं , बापाचा फार मान राखणारा मुलगा वगैरे वगैरे ...
काल्पनिक गोष्टी, इल्लॉजिकल
काल्पनिक गोष्टी, इल्लॉजिकल गोष्टी वेगळं आणि गोष्ट सांगण्याची पद्धत वेगळी. सिनेमा म्हणजे गोष्ट सांगणे. ती जर प्रभावी असेल तर लॉजिक वगैरे प्रेक्षक बघत नाही. सिनेमा आवडल्यावर सुद्धा त्यात आपण (जाणतेपणी) सोडून दिलेलं लॉजिक कुणी पिसं काढताना पुढे आणते तेव्हां "अरेच्चा ! आपण हे कसं मिस केलं, किंवा आपण झापडं लावली होती, याने काय नोटीस केलंय" हा आनंद असतो. सिनेमा आवडलेला आहे याचा आनंद तसूभरही कमी न होता पिसं काढण्याच्या कलेला पण दाद दिली जाते.
पण जेव्हां गोष्ट सांगण्याची पद्धत तद्दन बाजारू, भंपक असते आणि भावनांचा बाजार मांडून त्याचं बेगडी प्रदर्शन केलेलं असतं , निव्वळ मार्केटिंग करून हाईप क्रिएट करून सिनेमा अक्षरशः फसवून गळ्यात मारलेला असतो तेव्हां त्याचा सूड असा निघतो. अर्थात काहींना आवडलेला आहे याबद्दल कुणाला आक्षेप नसतो. त्यावर दोन्ही गटांनी वादावादी न करणं छान असतं.
राधानिशा +१११
राधानिशा +१११
र आ +१
र आ +१
शाळेत एक धडा होता, 'पाडवा गोड झाला', तो गिल्टी प्लीझर मध्ये मोडू शकेल. जुना एल व्ही प्रसाद यांचा सिनेमा आहे, 'बेटी बेटे' तीन भावा बहिणींची ताटातूट होते व नंतर शेवट सुखांत होतो. हाही गिल्टी प्लीझर मध्ये मोडू शकेल. असे इतरही अनेक फील गूड सिनेमे असतील, अगदी 'प्यार इंपॉसिबल' ही.
> पण जेव्हां गोष्ट सांगण्याची पद्धत तद्दन बाजारू, भंपक असते
अगदी अगदी ! लंडन च्या शाळेत जन गन मन !
जया भादुरी इरिटेटिंग वाटण्यात
जया भादुरी इरिटेटिंग वाटण्यात तिच्या वेशभुषेचा मोठा हात आहे >>. टोटली. लंडनला प्रायव्हेट जेटमधून उतरते ते कोठेतरी संक्रांतीला हलव्याचे दागिने घालून आल्यासारखी वाटते. इथे पाहा. आणि पुढे मागे विजय मल्ल्यावर पिक्चर निघाला तर तो लंडनला पळून गेल्याचा सीन दाखवताना यात त्या जेटमधून उतरणारा अमिताभ चालून जाईल
ते लंडन मधे राष्ट्रगीत म्हणजे टोटल भंपकपणा आहे. एकतर राष्ट्र्गीत असे लोकांवर नकळत थोपवत नाहीत. त्याचा मान ठेवायचा असेल तर योग्य प्रसंगी लोकांना आधी कल्पना देऊन मग सादर करतात. वेगळेच काहीतरी करायला जमलेल्या लोकांवर उगाच ही जबरदस्तीची राष्ट्रभक्ती मुळात कोठेही चुकीची आहे. परदेशात तर अगदीच. त्यातही कोणालाही आधी न सांगता. हे अचानक चालू करणार. मग तेथील पब्लिकला हळुहळू हे राष्ट्रगीत आहे हे लक्षात आल्यावर ते इकडेतिकडे बघत एक एक करत उभे राहणार असला भंपकपणा आहे. इतकीच हौस आहे तर "सारे जहाँ से अच्छा होते" - जे अॅपरंटली त्या मुलाला ऑलरेडी माहीत होते. नाहीतर परदेस सारखे "आय लव्ह माय इण्डिया" वगैरे मुखड्यात टोटल कल्पनादारिद्र्य असलेले का होईना पण स्वतंत्र गाणे होते
नेसले गं बाई चंद्रकला
नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची...
Pages