दरवर्षी येणारी शाळेची पिकनिक. जिची वर्षभर आतुरतेने वाट बघितली जाते. कारण माहोलच तसा असतो. त्या दिवशी सुद्धा तसाच होता. गप्पा टप्पा धमाल मस्ती करत सारे जण स्विमिंग पूलच्या पाण्यात डुंबत होते. मी मात्र डोक्यावर कसलेसे टेन्शन घेऊन, त्यातून बाहेर पडायला हातात मद्याचा प्याला घेऊन, एकटाच कुठेतरी आपल्याच विश्वात रममाण होतो.
ईतर सारे जण पाण्यात तर मी विचारात बुडालेलो होतो. आजारपण यंदा लांबले होते. त्यामुळे मनात उत्साह तर फार होता पण शरीर तितके साथ देत नव्हते. हाडाची काडे आणि छातीच्या बरगड्या झाल्या होत्या. वजन म्हणून जे काही शिल्लक होते त्यात केसांचाच सिंहाच्या आयाळीचा वाटा होता. एका मर्यादेनंतर असह्य झाले आणि जिच्यापासून दूर राहा असा लोकांना आजवर सल्ला देत आलो होतो तिलाच अखेर कवटाळले. भले ती अनंतकाळाची वैरीणी का असेना, त्या क्षणी ती माझी मैत्रीण होती, प्रेयसी होती, फक्त आणि फक्त माझीच होती. तितक्याच हळूवारपणे मी तिला कवेत घेतले होते. आणि त्या बेसावध क्षणी कोणीतरी फोटो क्लिक केला.
मित्रच ते. अशी संधी सोडणार नाहीच. पण त्यानंतर मी देखील 'जे आत तेच बाहेर' या तत्वाला जागून तो फोटो व्हॉटसॲप स्टेटसवर शेअर केला. सोबत एक टॅगलाईन टाकली.. "कौन कंबख्त बरदाश्त करने के लिए पिता है.. हम तो ईस लिये पिते है क्यो की माय लाईफ माय चॉईस!"
मग काय, धडाधडा लोकांच्या मेसेजची मालिका सुरू झाली.
" अरे वेडा आहेस का? मागच्याच आठवड्यात तुझे ऑपरेशन झाले होते ना..'
' दोन मुले आहे तुला.. त्यांचा तरी विचार कर.."
' कसले फोटो शेअर करतो रे.. कौतुक वाटते का दारू पितोस याचे. .'
...तर काही नुसत्याच ईमोजी होत्या.
काही रडवेल्या, काही रागाच्या, काही भयचकित झालेल्या.. तर काही नुसतेच डोळे विस्फारलेल्या..
अगदी काल परवापर्यंत मी निर्व्यसनी होतो. दारू सिगारेट गुटखा तंबाखू दूरच, साधे पान सुपारीचे व्यसन नव्हते. याला मी माझा गुण समजत होतो. पण ते आपले माझे मीच समजत होतो. जगाला याचे शून्य कौतुक होते. अर्थात त्याने मला फरक पडत नव्हता. पण तेच जग आता दारू पिणे याला दुर्गुण समजून मला उपदेश द्यायला पुढे सरसावले होते.
ते हितचिंतकच आहेत याबाबत मनात जराही शंका नाही. कारण गेले कित्येक वर्षे हेच काम मी स्वतः इमानइतबारे करत आलोय. आणि त्या नादात कित्येक जवळच्या लोकांचा रोष ओढावला आहे.
शनिवार संध्याकाळ झाली की शाळेच्या व्हाट्सअप ग्रूपवर धडाधड दारूच्या भरलेल्या ग्लासांचे फोटो पडत एकमेकांना चिअर्स म्हणायला सुरुवात व्हायची. सर्वप्रथम मी याला विरोध केला. आणि सर्वात शेवटी विरोध करणारा सुद्धा मी एकटाच होतो. ग्रूपमध्ये पॉलिटिक्स चर्चा नको, कारण त्याने मित्रांच्या ग्रूपमध्ये फूट पडते असे सर्वांचेच मत होते. पण तेच आपापले दारू पितानाचे फोटो शेअर केल्यास ग्रूपमधील एकजूट कायम राहते यावर देखील सर्वांचे एकमत होते.
माझ्या स्टेटसवरचा फोटो बघून एका नात्यातल्या व्यक्तीचा मेसेज आला. तू दारू पितोस ते ठिक आहे. आम्हीही पितो कधीतरी. पण त्याची अशी जाहिरात करू नये. अजून चार लोकांना उद्युक्त करू नये.
काल परवा पर्यंत मी हाच मुद्दा घेऊन मायबोलीवर कित्येकांसोबत वाद घातला होता. दारू कशी प्यावी हा धागा देखील नेमके याच कारणासाठी मला खटकत होता. त्यामुळे तिथे जाऊन वेळोवेळी लोकांच्या दारूच्या ग्लासात मिठाचा खडा टाकायचे काम करत होतो. तेथील चर्चा वाचून न पिणाऱ्यांना प्यावेसे वाटू नये किंवा क्वचित पिणाऱ्यांचे प्रमाण वाढू नये याची काळजी घेत होतो. त्या नादात व्हीलन ठरत होतो. पण आज स्वतः दारूच्या आहारी गेलो तेव्हाही काही हिरो झालो नाही.
अर्थात माझी ही ढवळाढवळ करायची सवय मद्यपानाची आवड असणाऱ्यांच्या डोक्यातच जात असणार हे उघड होते. पण दारू पासून दूर राहणारे सुद्धा याला काय पडलीय लोकांच्या वैयक्तिक भानगडीत नाक खुपसायची असेच मला सूनावायचे. शाळेच्या ग्रुप वर सुद्धा इतर न पिणार्याना दारूच्या उदात्तीकरणावर नाही तर माझ्या विरोधावर आक्षेप होता. अनोळखी लोकांना ढवळा ढवळ आवडत नसेल हे समजू शकतो, पण मित्र आणि ओळखीचे लोकं दारूच्या आहारी जात आहेत हे दिसत असताना त्यांना परावृत्त करायला सल्ला देऊ नये हे जमवणे अवघडच होते.
असो,
त्यामुळे आज त्याच व्यक्तीला दारू पिताना बघून सारेच तुटून पडले होते.
त्या लोकांच्या मते मी डबल स्टँडर्ड वागलो.
तर माझ्या मते मला त्यांचे वागणे डबल स्टँडर्ड वाटत आहे.
माहीत नाही कोण आपल्या जागी बरोबर आहे आणि कोण चूक..
जितकी मित्रांची चिंता वाटते तितकीच समाजाची वाटते. रात्रीचे मुलांसोबत फिरताना जितकी भीती कुत्र्यांची वाटत नाही तितकी झिंगलेल्या लोकांची वाटते. कामांध लोकांइतकेच डेंजरस मद्यांध लोकं वाटतात. कारण त्यांनी आपली सारासार विचारशक्ती आणि मेंदूवरचा कंट्रोल गमावला असतो. मुलांना नेहमी सांगतो की रात्रीचे रस्ता मोकळा आहे समजून बिनधास्त रस्त्याकडेने चालू नका, त्याच वेळी धोका जास्त असतो. कोण कसा दारू पिऊन गाडी चालवत असेल आणि तो कुठल्या वळणावर भेटेल याची खात्री नसते.
चल छोड उसको पियेला है, कल बात करते है.. असे वाक्य आपण सर्रास ऐकतो. म्हणजे माणसे सारी चांगलीच असतात. पण मद्याच्या अंमलाखाली चांगलीच वागतील बोलतील याची खात्री नसते.
दारूच्या उपस्थितीशिवाय मित्रांचे गेटटूगेदर, पार्ट्या, पिकनिक आणि त्यातून आनंद मिळवणे खरेच इतके अवघड आहे का... की आपणच आपल्या मेंदूला तसे ट्रेन केले आहे.
लिहावे तितके कमी. पण हे सारे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. जे वारेमाप पितात त्यांना सुद्धा कुठेतरी कळत असतेच. फक्त आरसा दाखवलेला कोणालाच आवडत नसावे.
कदाचित माझीच पद्धत काहीतरी चुकत असेल. ती बदलायची गरज असेल. कदाचित माझ्या सल्यातून कळकळ न जाणवता ते उपदेशाचे डोस वाटत असतील जे कोणालाच आवडत नाहीत. शेवटी आपला इगो महत्त्वाचा नसतो तर महत्त्वाचा असतो एंड रिझल्ट, म्हणजेच आपले प्रियजन या व्यसनापासून शक्य तितके दूर राहणे..
त्यामुळे आज मैत्रीदिनादिवशी तरी सर्वांच्या माय लाईफ माय चॉईसचा आदर करत सर्वानाच चिअर्स करायचे ठरवले आहे.. तसेही आज योगायोगाने मैत्रीदिवस आणि गटारी एकाच दिवशी आली आहे.. चिअर्स!!
(तांत्रिक कारणामुळे फोटो इथे शेअर करायला अडचण येत आहे)
मी एका फोन मधून लॉग आउट झालोय
मी एका फोन मधून लॉग आउट झालोय. ॲप किल करून अपडेट करावं म्हटलं तर ॲप च गायाबलं आहे प्ले स्टोअरवरून. अन् ब्राऊझर वरून लॉग इन होत नाहीये
ॲप च गायाबलं आहे प्ले
ॲप च गायाबलं आहे प्ले स्टोअरवरून >> माझं ॲप तर मोबाईलमधून गायब झालं
मी मद्यप्राशन केल्याने
मी मद्यप्राशन केल्याने मायबोलीवर मदिरादेवीचा प्रकोप झाला का

सर,
सर,
मला पण गेले चार दिवस मेसेज येत होता. मी स्वतःशी विचार केला कि किती वेळा पासवर्डची कसरत करायची. नाही तर नाही. पण आता पासवर्ड मागवणार नाही. जो होनेका है वो मंजुरे खुदा होगा. दिवसातून एकदा ट्राय करून बघतो. आज तुक्का लागला. उद्या काय होईल? काय माहित.
जाता जाता,
दारू प्यालावर माणूस खरे बोलायला लागतो. मनात दडपलेल्या भावनांना मोकळी वाट देतो. हा स्वानुभव असल्याने मी मित्रांबरोबर पीत नाही. तुमच्या लिखाणावरून तुम्ही "हाय कंबख्त, तूने तो पीही नही." अशी जाणीव झाली.
<< दारू प्यालावर माणूस खरे
<< दारू प्यालावर माणूस खरे बोलायला लागतो. >>
आमचे सर नेहमीच खरे बोलतात.
<< दारू प्यालावर माणूस खरे
<< दारू प्यालावर माणूस खरे बोलायला लागतो. >>
सर्व राजकारण्यांना दारू पिऊनच प्रचार करण्याची सक्ती केली पाहिजे.
मला खरे बोलण्यासाठी दारूच्या
मला खरे बोलण्यासाठी दारूच्या कुबड्या लागत नाही. खरे बोलायला जी हिंमत लागते ती माझ्याकडे जन्मजात आहे.
फक्त देवाने खोटे बोलायची कला सुद्धा अंगी दिली आहे. ती सुद्धा अधूनमधून वापरतो
कौन कंबख्त बरदाश्त करने के
कौन कंबख्त बरदाश्त करने के लिये लॉगिन करता है? हम तो इस लिये लॉगिन करते हैं क्यूंकी मायबोली हमें लॉगौट् करती है.
लॉगिन इश्यू तूर्तास नसल्याने
लॉगिन इश्यू तूर्तास नसल्याने इथे सुद्धा फोटो अपलोड करू शकतो असा विचार मनात आला.
पण मग नंतर त्या विचारावर विचार केला, खरेच गरज आहे का?
कारण फोटो बघून सुद्धा ज्याला अविश्वास दाखवायचा तो दाखवणारच.. आणि माझ्याकडे व्हिडिओ नाहीये.
तसे तर लोकं इथे व्हिडिओ वर सुद्धा अविश्वास दाखवतात.
मागच्या वेळी मुलगी क्रिकेट सामन्यात टीव्हीवर झळकली त्या धाग्यात ज्यांनी व्हिडिओ एडीट असल्याची शंका व्यक्त केली होती. इथेही तेच शंका उपस्थित करत आहेत. त्यामुळे त्यांचे समाधान होणार नाहीच.
बरे त्यानंतर मी जिओ टीव्ही प्रक्षेपणाची लिंकच दिली आणि दूध का दूध तसेच पाणी का पाणी केले तर ते त्याची पोच पावती द्यायला धाग्यावर पुन्हा आलेच नाहीत.
मग का उगाच अश्यांना खरे खोटे करत बसण्यात आपली वेळ शक्ती पैसा खर्च करा असा विचार करून मी फोटो शेअर करायचा प्लान रद्द केला आहे याची नोंद घ्यावी.
तसेही त्या फोटोत मी स्विमिंग पूलमध्ये आणि उघडा होतो. त्यामुळे मायबोली धोरणात असे फोटो शेअर करणे बसते का याचीही कल्पना नाही
Pages