दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ohhhh अमा! फारच वाईट बातमी. मायबोलीवरचे एक उत्तुंग आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व हरपले.
ओम शांती

तुमची खूप आठवण येईल अमा. तुमची खास शैली आणि उत्साह वातावरणच बदलून टाकायचा. वाहत्या धाग्यांवर किती धमाल केलेली आपण. गटगमधल्या भेटी सुद्धा चैतन्याने रसरसलेल्या असायच्या. फायटर होतात तुम्ही. लढण्याची स्फूर्ती देणार्‍यांपैकी एक होतात तुम्ही. अलविदा..

खूपच वाईट बातमी ... श्रद्धांजली ... आपला हा जीवघेणा शेवटचा आजार ही किती धीराने घेतला होता त्यांनी... कमाल वाटायची मला नेहमीच...

खूप वाईट बातमी. आजारातून बर्‍या होत आहेत असंच वाटत होतं त्यांच्या पोस्ट वाचून.
नेहेमी उत्साही आणि आनंदी वावर होता त्यांचा इथे. श्रद्धांजली.

अमा Sad

अमा Sad

न भेटता देखील काहीजण जवळचे असतात त्यापैकी एक व्यक्ती.
आमची शाळा आणि लहानपण जिथे गेले तो परिसर एकच असल्यामुळे असेल पण खूपच आपलेपणा / आपुलकी होती.

आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना

खूप वाईट बातमी. आजारातून बर्‍या होत आहेत असंच वाटत होतं त्यांच्या पोस्ट वाचून.
नेहेमी उत्साही आणि आनंदी वावर होता त्यांचा इथे. >> + 1

अमा, भावपूर्ण श्रद्धांजली!

फारच वाईट बातमी! अमांना श्रद्धांजली! अतिशय प्रेरणादायी व्यक्तीमत्व!
अमांच्या लेकीसाठी, पुन्नीसाठी वाईट वाटतयं! आत्ता कुठे तिचे करीयर सुरु झालेय. इतक्या लहान वयात छत्र हरपले! पुन्नीला बळ मिळो.

ओह नो! अमा Sad फार वाईट बातमी! रीसेन्ट पोस्ट्स वाचून काळजी वाटली होती. पण एवढ्यात श्रद्धांजली देण्याची वेळ येऊ नये असेच वाटत होते. अमा हे असं व्यक्तिमत्त्व होतं की आपण वर्षानुवर्षे त्यांना ओळखतो असेच वाटायचे! त्यांच्या पोस्ट्स नेहमी आवर्जून वाचल्या जायच्या, नाव न वाचताच त्यांची पोस्ट आहे हे कळणार. मोस्टली पॉझिटिव, प्रॅक्टिकल सल्ले, थोड्या विनोदी, कधी एकदम सार्कॅस्टिक ह्यूमर. आयुष्य अवघड आले त्यांच्या वाट्याला, पण शी वॉज अ फायटर! अ टफ वन! त्यातूनच आलेले बर्‍याचदा साध्यासरळ आयुष्य पाहिलेल्या जनतेला न झेपणारे तत्त्वज्ञानही दिसायचे त्यांच्या लिहिण्यात. एकदम युनिक पर्स्पेक्टिव असायचा.
अमा, यू विल बी मिस्ड!! श्रद्धांजली!! पुन्नी आणि विनी ( विनीच नाव आहे ना त्यांच्या सिनियर डॉगचं? ) ला यातून सावरण्याचे बळ मिळो!

Pages