पॅरिस ऑलिंपिक्स २०२४

Submitted by Adm on 10 June, 2024 - 13:28

दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा तीन वर्षांनीच होणार आहे. कोव्हिडमुळे २०२०च्या स्पर्धा २०२१ साली झाल्या होत्या. नसलेले प्रेक्षक आणि बरीच बंधनं ह्यामुळे गेली स्पर्धा "गाजली" होती. पण यंदा पँडेमिक संपलेलं असल्याने ह्या वर्षी पॅरिसमध्ये भरणार्‍या स्पर्धांमध्ये नेहमीचा उत्साह दिसेल. स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत म्हणजे स्पर्धेला आता पन्नासपेक्षाही कमी दिवस उरले आहेत.

रिओने अपेक्षेपेक्षा खूपच चांगलं आयोजन केलं, नंतर टोक्योने कोव्हिडच्या काळातही स्पर्धा यशस्वी करून दाखवल्या. त्यामुळे आता पॅरिसकडूनही नेत्रदिपक उद्घाटन सोहळा तसेच चोख व्यवस्थापनाची अपेक्षा आहे.

हा धागा वातावरण तापवण्यासाठी. स्पर्धा अजून जवळ आली/सुरू झाली की उत्साहं असेल त्याप्रमाणे अ‍ॅडमिनांना वेगवेगळा ग्रुप काढण्याची विनंती करता येईल.

ह्याही वर्षी भारताला चांगली पदके मिळतील अशी अपेक्षा करूया आणि त्याकरता खेळाडूंना शुभेच्छा. ह्यावर्षी बहुदा नीरज चोप्रा ध्वजधारक असेल.

ही वेबसाईटः https://olympics.com/en/paris-2024

अजून लिंक सापडतील तश्या मी अपडेट करेन.

Group content visibility: 
Use group defaults

विनेशने कुस्ती तून निवृत्ती जाहीर केली.
५३ किलो वजनी गटात अंतिम पंघल पहिल्या फेरीत ०-१० अशी पराभूत झाली.
तिने आपल्या कार्डावर बहिणीला ऑलिंपिक व्हिलेजमध्ये आणण्याचा प्रयत्न केला.आता ती डिपोर्ट होईल.
अविनाश साबळे फायनलमध्ये अकरावा आला.
त्याने पात्रता फेरी पेक्षा एकाच सेकंदाने कामगिरी सुधारली.

विनेशने सिल्व्हर मेडल मिळावे म्हणून अपील केले आहे.
मीराबाई चौथ्या क्रमांकावर.

एकंदर कालचा दिवस फारच वाईट होता.

५० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलेली अमेरिकन मल्लही याआधी ५३ की ५५ किलो वजनी गटात खेळायची. पण तिने २०२२ पासून वजन कमी करायला सुरुवात केली.
दिनेशदा ५३ किलो वजनी गटात ऑलिंपिक बर्थ मिळाली नाही. ती जागा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत अंतिमने पटकावली होती. म्हणून विनेश ५० किलो गटात उतरली. हे काही महिन्यांपूर्वी झालं.

विनेशची वजन वाढू देण्याची चूक असेल किंवा ती कमी वजनाच्या गटात उतरली असेल. पण मला वाटते सपोर्ट स्टाफ युक्तिवाद करण्यात कमी पडला . तिला जखमी कसे दाखवता येईल हे तरी पाहायला हवे होते किंवा वजन जास्त आहे हे कळल्यावर काही तरी मार्ग काढायला त्यांनी कितपत प्रयत्न केले कोणास ठाऊक ! पण एकूण फार वाईट वाटले .

नियम स्पष्ट होते. सामन्यादरम्यान. जखमी नसल्याने ते कारण दाखवून माघार शक्य नव्हती.
वजन कमी करायचे भरपूर प्रयत्न केले.
५२.७०० वरून ५०.१०० पर्यंत आणले. रात्रभर सायकलिंग, दोरी वरच्या उड्या तेही भरपूर कपडे घालून ,असं काय काय केलं. केस कापले. रक्त काढायची तयारी होती. Sad weighing नंतर डिहायड्रेशनमुळे hospital मध्ये admit व्हावं लागलं.

भारतीय हॉकी संघाने स्पेनचा पराभव करुन ब्रॉझ पदकावर नाव कोरले. भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन .

श्रीजेशच्या कारकिर्दीचा शेवट गोड झाला .

५७ किलो वजनी गटात अमन शेरावत उपांत्य सामन्यात पराभूत झाला. उद्या तो ब्रॉंझ मेडल साठी खेळेल.
त्याच्या तीनही कुस्त्यांत पराभूत मल्लाचे गुण शून्य होते. ( पहिल्या दोन तो जिंकला, तर तिसरा हरला)

Not the first time Vinesh was disqualified because of weight. It happened in 2016 Asian qualifiers just before Rio Olympics.
याचा अर्थ हे नियम आधीपासून सगळ्यांना माहीत आहेत. पण तरीही तिचे कष्ट, तिचा परफॉर्मन्स कमी होत नाही. शेवटी नशीबाने साथ दिली नाही, असे म्हणावे लागेल.

बाप रे त्या नदीमचा थ्रो आहे का काय! इतका फरक १ल्या अन दुसर्या नंबरात! चला पण आजचा दिवस छान झाला, १ ब्राँझ आणि एक रौप्य!

सोशल मिडियामुळे सगळ्यात स्वस्त जर काही झालं असलं तर ‘एक्स्पर्ट’. पैशाला पासरी झाले आहेत.

विनेश फोगाट च्या बाबतीत जे झालं ते दुर्दैवी आहे. पण तिनं काय करायला हवं होतं हे सांगणार्यांची संख्या अफाट आहे. माझ्या ओळखीतल्या अश्या एक्स्पर्ट्समधल्या (जवळ जवळ) सगळ्यांचा प्रोफेशनल कुस्तीशी संबंध फक्त ‘दंगल’ पुरताच आहे. बाकी कॉन्स्पिरसी थियरीज रचणारे अ‍ॅमॅच्युअरिश राजकीय समर्थक तर मुंडी कापलेल्या कोंबडीसारखे थैमान घालतायत.

3 सुवर्ण
8 रौप्य
10 कांस्य
खरे तर हे विजेते जास्त कौतुकास्पद आहेत.

Pages