पॅरिस ऑलिंपिक्स २०२४

Submitted by Adm on 10 June, 2024 - 13:28

दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा तीन वर्षांनीच होणार आहे. कोव्हिडमुळे २०२०च्या स्पर्धा २०२१ साली झाल्या होत्या. नसलेले प्रेक्षक आणि बरीच बंधनं ह्यामुळे गेली स्पर्धा "गाजली" होती. पण यंदा पँडेमिक संपलेलं असल्याने ह्या वर्षी पॅरिसमध्ये भरणार्‍या स्पर्धांमध्ये नेहमीचा उत्साह दिसेल. स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत म्हणजे स्पर्धेला आता पन्नासपेक्षाही कमी दिवस उरले आहेत.

रिओने अपेक्षेपेक्षा खूपच चांगलं आयोजन केलं, नंतर टोक्योने कोव्हिडच्या काळातही स्पर्धा यशस्वी करून दाखवल्या. त्यामुळे आता पॅरिसकडूनही नेत्रदिपक उद्घाटन सोहळा तसेच चोख व्यवस्थापनाची अपेक्षा आहे.

हा धागा वातावरण तापवण्यासाठी. स्पर्धा अजून जवळ आली/सुरू झाली की उत्साहं असेल त्याप्रमाणे अ‍ॅडमिनांना वेगवेगळा ग्रुप काढण्याची विनंती करता येईल.

ह्याही वर्षी भारताला चांगली पदके मिळतील अशी अपेक्षा करूया आणि त्याकरता खेळाडूंना शुभेच्छा. ह्यावर्षी बहुदा नीरज चोप्रा ध्वजधारक असेल.

ही वेबसाईटः https://olympics.com/en/paris-2024

अजून लिंक सापडतील तश्या मी अपडेट करेन.

Group content visibility: 
Use group defaults

ग्रेट.. ग्रेट स्वप्नील कुसळे . त्यातला जो पाचव्या पोजिशन वाला hegg अगदी आधीपासून आघाडी वर होता. कमाल एकाग्रता लागत असेल. भारी.

*. to win the silver with one hand in his pocket * - How relaxed he is ! May be, for shooting, that itself outweighs advantages of all sophisticated gear which. Is missing !!!
टेबल टेनिस - अकुला देखील अंतिम 16त येवून हरली. बॅड लक ! दोन भारतीय महिला स्पर्धक अंतिम 16त येणं, हेंही नसे थोडके !!
चीनचा जागतिक क्रमांक १ आज स्वीडन ( क्रमांक26 ) विरुद्ध आश्चर्यकारकरीत्या हरला! काल मिश्र दुहेरीचं सुवर्णपदक जिंकल्यावर चीनच्या या अव्वल खेळाडूची बॅट फोटोग्राफरचा धक्का लागून पडली होती व त्यामुळे तो खूप दुखावला होता.
शूटिंग - 50 m रायफल शूटिंगमध्ये स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक !! जय महाराष्ट्र !!!! Wink

हॉकी - 1-० आघाडी घेवूनही व चांगला खेळ करत भारत गतविजेत्या बेल्जियम विरुद्ध 1-२ गोलने हरला. पण आपला बाद फेरीत प्रवेश जवळ जवळ निश्चित आहे. उद्या गट विभागात भारत विं. ऑस्ट्रेलिया सामनाही रंजक होईल. ग्रेट गोली श्रिजेश हा भारतासाठी मोठ्ठा आधार अहे !!!

बॅडमिंटन पुरुष दुहेरी - चिराग शेट्टी आणि सात्त्विक साईराज रांकिरेड्डी उपान्त्य पूर्व फेरीत मलेशियाच्या जोडी कडून पराभूत.
अटीतटीचा झाला सामना.

खरंय, शेट्टी - रेड्डी जोडी अप्रतिम खेळली. बॅड लक !
आता प्रणोंय वी.लक्ष्य सेन सामना सुरू आहे. सेन फॉर्मवर सामना जिंकेल अशी चिन्हं आहेत.

मनिका ची प्रतिस्पर्धी, हिरानो खूप जबरा फॉर्म मधे आहे. या आधी खेळलेल्या ४/५ मॅचेस मधे मनिका ला केवळ ३ गेम्स जिंकता आल्या होत्या. हिरानो ची उंची तिच्या गेम साठी खूप आयडीयल आहे. त्यात तिचा स्पिन गेम कंट्रोल करायला मनिका पिंपल्स वाली रॅकेट घेऊन खेळली. त्यात तिचा बॅक हॅण्ड गेम रिस्ट्रिक्ट झाला.
श्रीजा त्या मानाने बऱ्यापैकी टफ देत होती. पण नंबर १ च्या अनुभवानी अपर हॅण्ड दिला.
हार्ड लक फॉर बोथ...

सात्विक चिराग ने जिंकायला हवी होती, निर्णायक सेट मध्ये ते दोन वेळा पुढे होते तीन एक पॉईंट फरकाने, नंबर एक ची जोडी आहे त्यांची. ते हरले एकदम वाईट वाटले, जिंकायला हवे होते. मीडिया मध्ये तर गोल्ड मेडल दावेदार ई लिहिले होते त्यांच्या बद्दल.

*सात्विक चिराग ने जिंकायला हवी होती, * - खरंय. सामना बघतानाही सतत तसं वाटत होतं पण शेवटी अचानक ते मागे पडत गेले ! ही जोडी भविष्यातील चॅम्पियन जोडी ठरेल अशी आशा व अपेक्षा. शुभेच्छा !

सिंधू अपेक्षेनुसार छान खेळली पण agility व powar यामध्ये ती प्रतिस्पर्ध्यापेक्षा किंचित कमी पडली, हे ती सुद्धा मान्य करेल ! बॅड लक !!

हॉकी - आजचा ऑसिज विरुद्ध आपला 3-२ असा विजय साखळी सामन्यातला असला तरीही त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. ऑसीज विरुद्ध आपण इतक्या वेळा हरतो की त्याविषयी आपल्याला न्युंगंडच निर्माण झाल्यासारखं होतं. ऑलिम्पिकमध्ये आपण 52 वर्षांनंतर ऑसीज विरुद्ध जिंकलो, हे लक्षात घेतल्यास हा विजय ऐतिहासिक व ह्या भारतीय संघाचं मनोबल कित्येक पटींनी वाढवणाराच म्हणावा लागेल.
भारताने अप्रतिम आक्रमक खेळ करत सुरवातीलाच 2-0 अशी आघाडी घेतली व तरीही आक्रमक खेळ सुरू ठेवून ऑसीजवर दबाव कायम ठेवला. वेल डन इंडिया ! अर्थात, आजही गोलि श्रीजेशची अफलातून गोलकिपिंग भारताला आधारभूत होतीच !
अशा खेळाच्या गुणवत्तेवर भारत हॉकीच्या पदकाचा मानकरी ठरण योग्य व्हावं . शुभेच्छा !

ह़. खरंच! मी ३-१ स्कोअर असताना टीव्ही लावला. बहुतेक वेळ बॉल ऑस्ट्रेलियाच्या हाफमध्येच होता.

आता तीरंदाजीत. मिक्स्ड डबल्स ब्रॉंझ मेडल मॅच आहे.

आज रात्री 9 ला कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या लक्ष्य सेनचा सामनाही पाहणं आलंच ! तिरंदाज व सेन यांना शुभेच्छा !

लक्ष्य सेन - किती मुरब्बी खेळाडूसारखा प्रत्येक पॉइंट चलाखीने खेळला !! चॅम्पियन होण्यासाठी लागणारे सर्व गुण आहेत सेनमध्ये !! अभिनंदन व शुभेच्छा !! भारताला भावी काळात गर्व वाटत राहील असा खेळाडू !!!

अहो, सुवर्ण ऐवजी कांस्य पदक गळ्यात पडणं, याचं दुःख काय असतं तें मला विचारा. !!20190103_224652_2.jpg

Lol Proud

काल एक रिपोर्टर भाकर कुटुंबीयांच्या घरी गेला होता तेव्हा मनूची आई आमच्या मुलीने जे केलंय ते कोणी करू शकणार नाही अशा अर्थाचं काहीतरी बोलली. रिपोर्टरशी तोऱ्यात बोलत होती. डोक्यात हवा गेल्यासारखी वाटली.

>>>काल एक रिपोर्टर भाकर कुटुंबीयांच्या घरी गेला होता तेव्हा मनूची आई आमच्या मुलीने जे केलंय ते कोणी करू शकणार नाही अशा अर्थाचं काहीतरी बोलली. रिपोर्टरशी तोऱ्यात बोलत होती. डोक्यात हवा गेल्यासारखी वाटली.>>>> काय चूक आहे?

हॉकी - ग्रेट ब्रिटनला हरवून भारत सेमी फायनल मध्ये !! सुरवातीलाच भारताच्या एका खेळाडूला रेड कार्ड दाखवून बाहेर घालवण्यात आलं. तरीही, 10 खेळाडू घेवून आक्रमण व बचाव ही कठीण कसरत करत सामना १-१ असा वेळ संपताना ठेवणं हे कौतुकास्पद ! नंतर, श्रिजेशची सरस गोलकिपिंग भारताला अपेक्षेनुसार विजय मिळवून गेलीं !!! भारताचा आजचा खेळ धैर्य, कसब व जबाबदारी याचा सुरेख मिलाफ ! अभिनंदन, शुभेच्छा ! श्रिजेशला त्रिवार सलाम !!
बॅडमिंटन - लक्ष्य सेन गतविजेत्या डेन्मार्कच्या ख
खेळाडूविरुद्ध सेमी मध्ये छान झुंज देतोय ! शुभेच्छा.

Pages