एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुजरात दंगली वर आधारलेला माहितीपट BBC ने दाखविल्यानंतर त्यांच्या कार्यालयांवर IT ने धाडी टाकल्या होत्या याची आज आठवण झाली.

आता ( IC841 निमीत्ताने) नेटफ्लिक्सला दरडावले आहे. काश्मीर फाइल्स, केरला स्टोरी, मनमोहन सिंग यांच्यावरचा किंवा माफीवीराच्या प्रचारपटांमधे अचूक माहिती दाखविली होती ? ३ घटना घडल्या असतांना ३२००० दाखविणारा केरला स्टोरी.

https://news.rediff.com/commentary/2024/sep/03/taking-it-very-seriously-...

अपहरणकर्त्यांची नावं हिंदू दाखवली असा आक्षेप आहे. ते अपहरणकर्ते ज्या नावांनी एकमेकांना संबोधत होते, ती नावे वापरली आहेत. ही नावे भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर आहेत.
To the passengers of the hijacked place these hijackers came to be known respectively as (1) Chief, (2) Doctor, (3) Burger, (4) Bhola and (5) Shankar, the names by which the hijackers invariably addressed one another.
https://www.mea.gov.in/Speeches-Statements.htm?dtl/5481/

दुर्गविहारी, तुम्ही सगळे मुद्दे कव्हर केलेत. अजून प्रकरण थांबलेले नाही. आता फडणवीस म्हणताहेत, महाराजांनी सूरत लुटली हे आम्हांला खोटेच शिकवले.

IC814 मालीका मी पाहिली. त्यात अपहरणकर्त्यांना हिंदु दाखवण्याचा कुठेही प्रयत्न केला असे वाटले नाही. सुरवातीपासुनच चीफ नावाचा अपहरणकर्ता मन्सुरचा भाऊ इब्राहिम आहे, दुसरा अहमद इत्यादि असे दाखवले आहे. त्यांची भाषा, टोन तसेच अपहरण झाले असताना काढण्यात येणारी माहिती यातुन अपहरण कर्ते कोण हे अगदी स्पष्ट आहे. त्यांची खरे नावे त्यात उघड होतात. त्यांना त्यांच्या धर्माचा म्हणजे इस्लामचा वास्ता देऊन काही ठिकाणी अतिरेक थांबवण्याची विनंती आहे.
फक्त जी टोपण नावे त्यांनी वापरली होती ती तशीच दाखवली. एवढ्यावरुन गदारोळ.

गेल्या काही दिवसांत गो राक्षसांनी केलेला हिंसाचार, हत्या अशा घटना वाचायला मिळत आहे. ' बिफ खाल्ल्याचा संशय ', 'बिफ नेत असल्याचा संशय' . भवरलाल जैन सारख्या घटना घडल्यावरही आपले डोळे उघडत नाही. धार्मिक कट्टरतेने आपल्याला ठार आंधळे बनविले आहे.

बातमी खरी असेल तर गो राक्षसांना आवरायला हवे. निव्वळ संशय आला , कशाची खातरजमा न करता अशा हत्या करणे याला कायद्याचे राज्य म्हणता येत नाही. एका निरपराध १२ वीच्या मुलाचा नाहक बळी गेला आहे Sad

https://www.ndtv.com/india-news/class-12-student-mistaken-for-cow-smuggl...

दोन तीनच दिवसांपूर्वी अन्य राज्यातून आलेल्या मुस्लिम मजुराला बीफ खाल्ल्याच्या संशयावरून जमावाने मारले तेव्हा तिथले मुख्यमंत्री म्हणाले, यात कोणी काय करू शकतं?

इतक्या मुसलमानांचे मॉब लिंचिंग झाले. तेव्हा गप्प असलेले काही जण आता मिश्रा जी का बेटा मारला गेला म्हणून हळहळताना दिसताहेत .

मुळात भाजपने सत्तेत येताच पहिले कायदे आणले ते गोरक्षणाचे. ते मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठीच. वाहनांचा पाठलाग करून , अडवून आतल्या लोकांना मारहाण करणे किंवा ठार करणे , आता गाई नसून म्हशी असल्या तरी त्या सोडून देणे हा पॅटर्न ठरला आहे. यांना पोलिसांचे संरक्षण असते.

आर्यन मिश्राचे रक्त इथल्या सर्व भाजप समर्थकांच्या हातावर आहे असे लिहिणार होतो, पण 'ते तर आमचे भूषण' असे उत्तर येइल म्हनून गप्प बसलो. आता बहुदा आर्यन मिश्रावरच एफ आय आर होईल, संशयित गोमांस म्हणून !

धार्मिक विद्वेषाने वेडापिसा झालेला गो राक्षस आपल्यालाही गिळू शकतो हे भवरलाल जैन किंवा १२वीचा चिमुरडा मुलगा यांच्या हत्या झाल्यावर तरी कळायला हवे.

रेल्वे स्टेशनवर एक वयस्कर स्मृतीभ्रंशाने ग्रासलेली व्यक्ती आपले नाव सांगण्यास असमर्थ होती, त्याला महंमद आहे समजून ठेचले होते. या राक्षसांना रस्त्यावरच्या कुणालाही आधार कार्ड किंवा ओळखपत्र मागण्याचा अधिकार कुणी दिला? एखाद्या व्यक्ती बद्दल संशय आला होता तर पोलीसांना कळवायचे होते.

भक्त अशा प्रकारच्या गैरसमजातून झालेल्या हत्यांना कोलॅटरल डॅमेज समजतो. सुक्या सोबत ओले जळते अशा प्रकारचे युक्तीवाद. Sad
कुठे आणि कसा थांबेल हा विद्वेष ?

उदय
मला ती प्रसिद्ध कविता आठवली.
प्रथम ते कम्युनिस्टांसाठी आले
मी कम्युनिस्ट नव्हतो...
.
.
.

शेवटी ते माझ्यासाठी आले.
तेव्हा मला वाचवणारे कोणी नव्हते.

हे सगळे सोहळे सगळे तामिळनाडू साठी केलेले पण तिथून मोठा भोपळा मिळाला Lol

>>>> अयोद्धेतील आख्खं राममंदिर केवळ आणि केवळ दक्षिण भारतात शिरकाव मिळावा म्हणूनच उभारण्याचा घाट घातलाय का काय? शंका यावी इतपत प्रभू रामचंद्राची वेशभूषा आणि एकूण सजावट करण्यात आलेली आहे !

परमात्मा परमेश्वर इथून तिथून एकच आहे !
मला तर त्या रामप्रभूंच्यात साक्षात तिरुपती बालाजी दिसतात ( हात जोडलेली ईमोजी ) !
.
.

दारु पिली, लँड क्रूझर LC300 गाडी रस्त्यावर आणली, गाडीचा तोल गेला आणि पदपथावर गेली. पदपथावर चालणार्‍या दोन निरपराध पादचारी दगावले. आता पोलीस सदोष मनुष्य हत्येचा गुन्हा दाखल करतील का केवळ मदिरा प्राशन करुन गाडी चालविल्याचा? कुठली कलमे लावायची हे कोण ठरवितो? न्यायालय का पोलीस?

प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप मधे अडकवला गेला होता ( असे थोडावेळ मानू या). या मोहाच्या नशे मधे त्याच्याकडून meteor , ब्रह्मोस, अस्त्र, अग्नी ६, आकाश, राफेल या संबंधातली देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती दिल्या गेली, त्यावर दिर्घ चर्चा झाली. नोकरी पण देणार होता त्या संस्थेत, एका विभागाचा डायरेक्टरच होता तो.

अशी माहिती बाहेर देणे हा फार मोठा गुन्हा आहे, देशद्रोह आहे.

कुरुलकर पकडल्या गेल्यावर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा आहे का मिळमिळीत officials secrets Act चे उल्लंघन केल्याचा गुन्हा ? तपासाचे काम NIA कडे का दिले गेले नाही?
https://www.esakal.com/mumbai/why-no-sedition-case-against-drdo-scientis...

छोट्या मोठ्या खासगी कंपनीत काम करणार्‍यांना बाहेर काय सांगावे, सांगू नये याचे प्रशिक्षण दिले जाते. कुठली माहिती कोण हाताळत आहे यानुसार गोपनियतेच्या प्रशिक्षणाचे टप्पे ( level A, B, C असे म्हणू) असतात.

DRDO मधे डायरेक्टर सारख्या वरिष्ठ पदावर काम करणार्‍याला गोपनियते बाबत सर्वात उच्च दर्जाचे प्रशिक्षण असायला हवे. कुणी ऑफिसची टाचणी जरी मागितली तरी सतर्क व्हायला हवे होते. इथे तर drawings, design, planing, काहीच मागे ठेवले नाही.

कमतरता कुठे आहे? प्रशिक्षणांत का vetting process?

कुरुळकर सारख्या देशद्रोह्याला संघाचा आहे म्हणूण अभय देणे हा सुद्ध देशद्रोह आहे. वर राघू आचार्य ह्या कुरुळकरचा उल्लेख सन्मान देऊन करताहेत. वा रे परिवार नी वारे देशप्रेम.

ज्या जेलरने राम - रहिमला सहा वेळा पॅरोल दिला होता त्याने नोकरीचा राजिनामा दिला आहे. एव्हढ्यातच ३ आठवड्याचा पॅरोल का फार्लो मिळाला होता.

जेलरने राजकारणांत प्रवेश केला आहे आणि आता थेट निवडणूकच लढवणार आहे.
https://www.ndtv.com/india-news/haryana-assembly-election-bjp-1st-list-s...

conflict of interest कशाला म्हणायचे?

प्रदीप कुरुलकर साठी आदराने उल्लेख केला तरी चालेल पण त्याच्या देशद्रोही कृत्याचा खर्‍या देशभक्तांनी निषेध करायला हवा. आपल्या परिवारांतला आहे म्हणून त्याचा देशविघातक कृत्यांवर पांघरुण घालायला नको.

तपास NIA कडे का दिला नाही? मोठे आर्थिक व्यावहार झाले असल्यास ED, CBI यांनी कारवाई केली का?

प्रदीप कुरुलकर साठी आदराने उल्लेख केला तरी चालेल मग ह्याच लोकानी लादेन, कसाब ह्यांचा उल्लेखही श्री. लादेन, श्री. कसाब असा करायला हवा. एका अतिरेक्याला एक न्याय नी दुसरा परिवारातला म्हणून वेगळा न्याय अस का?

भाजप प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ह्यांच्या चिरंजीवांच्या नावावर असलेल्या “audi” गाडीने नागपुरात ३ गाड्यांना धडक
दिली. त्यावेळी गाडीत संकेत बावनकुळे देखील होते. गाडीतील इतर दोघांची अल्कोहोल टेस्ट करण्यात आली पण बावनकुलेंच्या चिरंजीवाला वगळण्यात आले, fir मध्येही गाडीचा नंबर नोंदवलेला नाहीये. अपघाताची गाडी गॅरेजमध्ये पाठवून रिपियर का करण्यात आली? तसेच गाडी पोलीस स्टेशनला पार्क असताना गाडीच्या नंबर प्लेटही काढून का ठेवण्यात आल्या असे अनेक प्रश्न शिवसेना नेत्या सुषमा अंधारे ह्यानी पोलिसाना विचारलेत.
गाडी मध्ये बीफ कटलेट तसेच दारूचं बिल देखील आढळून आलंय असा आरोप संजय राऊतांनी केलाय. बीफ कटलेट ऑर्डर करणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा प्रश्न राऊतांनी विचारलाय.
ज्या प्रकारे प्रकरण हाताळले जातेय त्यावरून पोलिसांवर प्रचंड राजकीय दबाव दिसतोय. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था रसातळाला गेलेली दिसतेय. भाजप नेत्याच्या मुलाला वेगळा न्याय आणी सामान्य जनतेला वेगळा न्याय का?? आता जनतेनेच भाजपविरुद्ध उतरून भाजपला धडा शिकवायला हवा.

संकेतच्या गाडीचा अपघांत झाला, नंतर तो पळाला, दारु पिलेला असेल पण योग्य वेळी तपासणी झालीच नाही, रजिस्ट्रेशन प्लेटचा घोटाळा करतील... देवेंद्रकाका आहेत तोपर्यंत संकेत बाळाला कायदा काही करु करणार नाही एव्हढा तर काकांच्या कर्तबगारीवर विश्वास आहे.

पण बीफ कटलेट हे थोडे जास्त होत असावे. नागपूर शहरांत, एखाद्या हॉटेल - बार मधे बीफ कटलेट राजरोसपणे मिळते का ? मेनूकार्ड वर खाण्याचा हा पर्याय लिहीलेला असतो का?

बीफ खाण्याला माझा विरोध नाही आहे. कुणी काय खावे हा वैयक्तिक प्रश्न आहे.

समजा बीफ लपुन छपुन विकणारे असतीलही. पण ते स्पष्टपणे मेनुकार्डवर, बिलावर कोणी छापेल का?
एका बिल्डरच्या पोराला वाचवायला केलेले प्रताप बघता, या केस मध्ये काय करतील ते उघड आहे.

जेल के ताले टूट गये. Happy

केजरीवाल यांचा जामिन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. दिलासा मिळाला आहे, अनेक अटी आहेत.
https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/arvind-kejriwal-bail-hear...

विरोधकनांना उगाचच त्रास देण्यासाठी हे प्रकार केले आहेत. पुरावा काहीच नसतो.

Delhi Excise policy case LIVE: CBI should work to shed ‘caged parrot’ image in Kejriwal’s case, says Justice Bhuyan

एनडीए सरकार आणि विनोद
बन नो जीएसटी.
मस्का नो जीएसटी.
बन-मस्का १८% जीएसटी
आणि मिनिस्टरला मस्का लावला तर?
देवा हे एनडीए सरकार असेच राहू दे रे. आम्हाला निदान हहपुवा तरी मिळेल. Rofl

जामिन देण्यासाठी कोर्ट इतका वेळ का घेते? सगळंच संशयास्पद.>> लोकं उगाच बोल लावत आहेत प्रधानसेवकांनी मुख्य न्यायाधीशांच्या घरी जाऊन गणपती दर्शन घेतले म्हणून, बघा कशी २ दिवसात गणपतीने इच्छा पूर्ण केली.

Pages