एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाषेला अभिजातचा दर्जा यावर थोडे गुगल केले.

कुठल्या classical / अभिजांत भाषेला किती आर्थिक मदत मिळाली याबाबतचे राज्यसभेतल्या उत्तरांत मंत्र्यांनी दिलेले आकडे.
आकडेवारी लाखांत आहे म्हणजे २०१९-२० ते २०२३-२४ या काळांत तमिळ भाषेला दरवर्षी साधारणत: ७ ते १४ कोटी रुपये मिळाले. इतर भाषांना फार कमी मिळाले. संस्कृत पण अभिजांत भाषा आहे पण आकडे दिले नाहीत. का? Happy

https://sansad.in/getFile/annex/260/AU1722.pdf?source=pqars

इतर सर्व भाषांना एकत्रित मदत मिळाली नाही त्यापेक्षा जास्त मदत संस्कृत भाषेला मिळाली आहे. २०१७ - २०२२ या काळांत दरवर्षी साधारणत: दोनशे कोटी प्रत्येक वर्षाला, म्हणजे १०७४ कोटी रुपये.

https://www.newindianexpress.com/states/tamil-nadu/2023/Apr/30/promotion...

वा. माझ्या अनुभवाप्रमाणे संस्कृतचे शालेय पुस्तक सुद्धा खूप सहजपणे मिळाले नाही .
पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात सुद्धा सीबीएससी ची पुस्तकें मिळत नाहीत दोन तीन दुकानाचे हेलपाटे घातल्यानंतर सेट पूर्ण होतो. संस्कृत रुचिरा शेवटी वरच्या वर्गातील
विद्यार्थ्यांचे सेकंड हॅन्ड वापरायला घेतलं.

Universal Basic Income म्हणजे वेल्फेअर सिस्टीम, फुकटची मदत. जगात कुठलाही देश पूर्णतः: universal basic income देत नाही, मंगोलिया आणि इराण थोडीफार देतात.

(माझा प्रतिसाद येईपर्यंत प्रतिसाद बदलला? असो, चालायचंच.)

हरयाणात पुन्हा भाजप. >> सकाळी ट्रेण्डस काही वेगळेच होते. अचानक पारडं फिरलं. भाजपाने हॅट्रिक केली.

जम्मु-काश्मीरमधे भाजप येईल असे वाटले होते खरं तर. पण तसे झाले नाही.नियुक्त ५ आमदार धरुन त्यांची संख्या वाढेल म्हणा!

सगळे उंदीर बिळातून बाहेर येऊन कॉंग्रेसला कुरतडायला लागले आहेत.
मला एक समजत नाही. कॉंग्रेसपण आपली "लाडका दाजी" योजना दर महा १०,००० रुपये का जाहीर करत नाही?

महायुती सरकार जाहिराती आणि प्रसिद्धीवर जेवढा खर्च करतंय त्यात किती विकास होऊ शकला असता?
नुसत्या माध्यमांतल्या जाहिराती नाहीत , तर स रकारचं काम लोकांपर्यंत पोचवायला पैसे देऊन माणसं सुद्धा. आता ही माणसं कोण असतील ते सांगायला नकोच.
तसंच इवल्या इवल्या प्रकल्पांच्या किंवा प्रकल्पांच्या इवल्या इवल्या टप्प्यांच्या भूमीपूजन ते उद्घाटनाला आदर्णीय मोदीच लागतात. त्यामुळे त्या कार्यक्रमांचा खर्च किती वाढतो? आता पुण्यातला त्यांचा कार्यक्रम पावसामुळे रद्द झाला तेव्हा किती पैसे पाण्यात गेले? त्यात किती विकास कामे होतील?
शिवाय या सरकारी कार्यक्रमांत ते भाषण करतात ते भाजप नेता म्हणून असतं, विरोधी पक्षांवर टीका आणि थापा असतात. सरकारी खर्चाने पक्षाचा प्रचार.
इंदिरा गांधींची निवडणूक याच आरोपावरून रद्द झाली होती ना?
(आचारसंहिता लागू नाही, हे माहीत आहे, पण पदाची म्हणून काही रीत असते. हे तर परदेशात जाऊन सुद्धा भारतात आधी किती वाईट होतं, आधी भारतात जन्माला आलो म्हणून लोक नशिबाला दोष द्यायचे असं सांगतात. तसं सांगितल्याने देशद्रोह होत नाही. राहुलने परदेशात जाऊन सरकारवर टीका केली तर तो देशद्रोह.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांना धमक्या आल्या होत्या, वाय दर्जाची सुरक्षा व्यावस्था पुरविली होती. असे असतांनाही त्यांची हत्या झाली. राज्याच्या एका माजी मंत्र्यांना धमक्या मिळत होत्या आणि नंतर त्यांची हत्या झाली आहे हे चित्र धक्कादायक, चिंता करण्यासारखे तसेच कायदा - सुव्यावस्थेवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण करणारे आहे.

प्रकरणांतही दिशाभूल करणारी विधाने वाचायला मिळत आहेत. हत्येचा कट रचणारे मास्टर माईंड नेहेमीप्रमाणे बाहेर मोकळे रहातील.

जयपूर डायलॉग्ज ने ममता बॅनर्जींचा सलमानसोबतचा फोटो टाकून याही सलमानच्या फ्रेंड आहेत, असं संबंधितांना सुचवलंय.

लॉरेन्स बिश्नोई अहमदाबादच्या साबरमती केल मधे आहे असे वाचले. आणि तिथुन तो सगळी सुत्रं हलवत असेल तर मग साबरमती जेल आणि गुजरात पोलिस ह्याण्ची चौकशी होउ शकत नाही का?

गुजरात मध्ये ५००० हजार कोटीचे अंमली पदार्थ पकडले, एक राज्य किती आघाडीवर आहे अंमली पदार्थ बनवण्यामध्ये, पण आम्ही दुसऱ्या राज्याकडे बोट दाखवणार की बघा ते किती अंमली पदार्थ वापरत आहेत ते.

दुर्गा पूजेच्या निमित्ताने मशिदींसमोर जाऊन नाचण्याची नवी परंपरा सुरू झालेली आहे. आता तर मातृशक्ती चे प्रतीक असणर्‍या या उत्सवात 'उनकी मा का $%$%डा' अशी गाणीही डीजेवर वाजत आहेत. - विकु

ती गाणीhttps://x.com/kunalpurohit/status/1846232472423383205

हिंदू धर्माचं हे नवं रूप हिंदुत्ववाद्यांना खूप आवडतं.

तिरंगा फडकतो आहे आणि हे गाणे/ आव्हान किती विरोधाभास ? Angry

उद्देश दुसर्‍या समाजाला उचकाविणे हाच आहे. ते किती शांत राहू शकतात याची परिक्षाच आहे.

https://youtu.be/FweQfgV0chU?si=O12Ir3ULFnrpyO1Q
दुसरी बाजू, गाण्यावरून वाद झाला. वादातून एकाचा जीव गेलाय. लाखों रुपयांचे नुकसान

https://www.hindustantimes.com/india-news/man-shot-dead-over-music-durin...

अरे काय चाललय. जीवन इतके शुल्लक झालंय का?

दोन्ही घटना आणि कृती अतिशय चुकीच्या आणि निंदनीय. शिवीगाळ असलेले गाणे कोणी अश्या उत्सवात वाजवतात का? सारासार विचार करण्याची वृत्ती नष्ट झाली का?

https://x.com/SachinGuptaUP/status/1846792398568898919

बहराइच, यूपी में गोपाल मिश्रा की हत्या का Video –

छत से गिराए गए हरे झंडे को जब गोपाल मिश्रा लपेट रहा था, तभी उसे किसी दंगाई ने गोली मार दी। वो तुरंत गिर पड़ा और मौत हो गई। हत्यारोपी कौन है, किस हथियार से फायरिंग हुई...पुलिस इसकी जांच में जुटी है

https://x.com/SachinGuptaUP/status/1846624263513547081
बहराइच, यूपी पुलिस ने रामगोपाल मिश्रा की पोस्टमार्टम रिपोर्ट में करंट लगाना, तलवार से काटना, नाखून उखाड़ने जैसी बातों का खंडन किया है। पुलिस ने कहा है कि इन बातों में कोई सच्चाई नहीं है

https://x.com/SachinGuptaUP/status/1845732422777794671
बहराइच, यूपी में हजारों युवकों की भीड़ हाथों में लाठी-डंडे लेकर गोपाल मिश्रा के अंतिम संस्कार में शामिल होने जा रही थी। पुलिस तैनात जरूर थी, लेकिन इन्हें रोकने की कोशिश नहीं हुई। नतीजा, ये भीड़ हिंसक हो गई।

https://x.com/SachinGuptaUP/status/1846052699147534398
यूपी के जिला बाराबंकी में कल दुर्गा मूर्ति विसर्जन शोभायात्रा निकाली गई। यात्रा को मस्जिद के बाहर रोककर DJ पर आपत्तिजनक गाने चलाए गए। आरोप है कि इस दौरान मस्जिद पर गुलाल फेंका गया। मामले में DJ संचालक रवि, अभिषेक सहित 3 गिरफ्तार। 40 से ज्यादा अज्ञात लोगों पर FIR हुई।

गोपाल मिश्राच्या कुटुंबीयांना आज लखनौ इथे नेऊन त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून देण्यात आली. त्याने एका घरावर चढून तिथला हिरवा झेंडा काढून भगवा झेंडा लावला. त्यानंतर काही क्षणात त्याच्यावर गोळी झाडली गेली व तो तिथेच मरण पावला. त्याच्या मृत्यूबद्दल अफवा पसरवल्या गेल्या की त्याला जमावाने खेचून घरात नेले, टॉर्चर केले व मारले. अर्थात दंगे झालेच. दंगे कोणाला हवे असतात हे सांगायला नकोच.

यूपी मध्ये बाय इलेक्श आहेत. आपल्या इथे आहेत. अजून एका राज्यात आहेत. नाव आठवत नाही. फायदा सगळीकडे मिळेल.

हाच इथला प्रॉब्लेम आहे, आपल्या मनाचे लिहितात, आपले समज लिहितात, शब्द फिरवतात.

केवळ दोन राज्यात निवडणूक असताना सगळीकडे निवडणूक आहेत असे लिहिणे हे ठार चूक. मग मुद्दा सावरायला उप निवडणूक आहेत म्हणणे हे म्हणजे कहर.

कर्नाटकात निवडणूक नसतानाही गणपती मिरवणुकीत दगडफेक झाली. हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्ये न भरून निघणारी दरी आहे. आत्ताच नाही तर स्वतंत्रपूर्व काळापासून.

Repeat
दुर्गा पूजेच्या निमित्ताने मशिदींसमोर जाऊन नाचण्याची नवी परंपरा सुरू झालेली आहे. आता तर मातृशक्ती चे प्रतीक असणर्‍या या उत्सवात 'उनकी मा का $%$%डा' अशी गाणीही डीजेवर वाजत आहेत. - विकु

ती गाणी https://x.com/kunalpurohit/status/1846232472423383205

हिंदू धर्माचं हे नवं रूप हिंदुत्ववाद्यांना खूप आवडतं.

Al
तस नाही हो. हा एक शैक्षणिक डेमो आहे. म्हणजे इतर ठिकाणच्या लोकांना उत्साह येतो. यूपीवाले कर सकते है तो हम क्या काम है? आणि तुम्ही जर म्हणत असाल कि की ही लोकांची उत्स्फूर्त भावना होती. सामने वालेही इसके लिये जिम्मेदार है तो ...

<< यूपीवाले कर सकते है तो हम क्या काम है? आणि तुम्ही जर म्हणत असाल कि की ही लोकांची उत्स्फूर्त भावना होती. सामने वालेही इसके लिये जिम्मेदार है तो ... >>

------ जनतेच्या भावना भडकावणे सोपे आहे. वातावरण शांत असतांनाही जनतेला रस्त्यावर आणायचे कसब भाजपाकडे चांगले आहे. बिफ खाल्ल्याचा संशय आला , बिफ शिजविल्याचा संशय आला... अशा घटनांत पुढे काय होत असते?

उत्तर प्रदेश मधे बुलंदशहरातल्या रस्त्यात मांस सापडते.... ते गोमांस आहे म्हणून दंगा होतो, शेकडो " संतप्त " लोक पोलिस ठाण्यावर चाल करुन जातात. दगडफेक, दंगा करतात. आणि पोलिस अधिकार्‍याची अत्यंत निर्दयी पणे हत्या होते.

भारत मातेच्या एका कर्तव्यदक्ष पुत्राची हत्या होते, पुढे यथावकाश आरोपींना जामिन मिळतो. आरोपीची जामिनावर सुटका झाल्यावर बाहेर जंगी स्वागत होते.
https://www.youtube.com/watch?v=YCnvV7sYTjo

Pages