एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Securities and Exchange Board of India (SEBI) chairperson Madhabi Puri Buch on Thursday (October 24, 2024) skipped the meeting of the Public Accounts Committee (PAC) citing personal reasons.
लोकलेखा समितीचे सदस्य असलेल्या भाजप खासदारांनी सेबी प्रमुखांची चौकशी करायला विरोध केला होता.

विकसित भारताच्या आणि २५ कोटी नोकरी निर्माण केल्या अशा गप्पा मारणार्‍यांसाठी...

अमेरिकेत बेकायदेशीररित्या प्रवेश करणार्‍यांच्या संख्येत मेक्सिको, एल साल्वाडोर सोबत भारत पण आघाडीवर आहे. CNN च्या बातमीत तिसरा क्रमांक म्हटला आहे. घुसखोरांच्या संख्येत ८,००० ( २०१८-१९) वरुन ९६,००० ( २०२२ -२३) अशी लक्षणीय वाढ झालेली आहे. $ ५०,००० असा दर मोजतात.
https://www.cnn.com/2024/10/22/india/young-indians-chase-american-dream-...

सर्वांनाच यश मिळते असे नाही. काही वर्षांपूर्वी कॅनडामधून अमेरिकेत प्रवेश करणार्‍या एका गुजराती कुटुंबातील चार व्यक्तींचा थंडीने गारठून मृत्यू झाला होता.

हे एकच अपवादात्मक उदाहरण नाही आहे. फ्रान्समधे ३०० अधिक प्रवाशांना नेणारे भारतीय विमान अडकविले होते. हे चौथे विमान होते म्हणजे आधी तिन वेळा यश मिळाले होते. पुन्हा गुजरात कनेक्शन. ३० ते ६० लाख रुपये मोजून, वर गैर मार्गाने भारतातून बाहेर पडावे असे या महाविकसीत राज्यातील लोकांना का वाटते ? दोन दशके तिथे राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले सरकार आहे. हे अपयश कुणाचे आहे?

https://www.france24.com/en/europe/20231224-indian-plane-passengers-held...

उदय
मागे तुम्हीच एक लीस्ट दिली होती ना कि काही महामाहीन लोकाची मुले अमेरिकेत नोकरी तरी करत आहेत किंवा शिकत तरी आहेत. मग आम्हा गरीब लोकांनी मागे का राहावे?

केशवकूल - यादी मी दिलेली नव्हती Happy पण वाचलेली आहे.

आपले आदरणीय उपराष्ट्रपती, जगदीप धनखड, यांनी एका उद्घाटन समारंभात बाहेर देशांत मोठ्या संख्येने शिक्षण घेणार्‍या भारतीयांबद्दल वक्तव्य केले होते. २०२४ मधे, १३ लाख भारतीय विद्यार्थी बाहेर देशांत शिक्षण घेतील असा अंदाज आहे. त्यांच्या शिक्षणासाठी $ ६ अब्ज ( $ ६ billion) परकीय चलन खर्च होते अशी चिंता त्यांनी व्यक्त केली होती. शिक्षणाच्या दर्जा याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे जो अगदीच योग्य आहे.

https://www.hindustantimes.com/india-news/new-disease-among-children-v-p...

देशामधे गेली दहा वर्षे भाजपाची सत्ता आहे, गुजरात मधे २० वर्षे त्यांचेच सरकार आहे. किती शैक्षणिक संस्था निर्माण केल्या? शिक्षणाची दयनीय परिस्थिती बदलण्यासाठी काय करायला हवे?

( विज्ञानक्षेत्रात) २०१४ मधे भारत जिथे होता त्यापेक्षा अनेक पावले मागे गेला आहे. आवर्तसारणी, डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत यांचे महत्व कधी असायला हवे? हे केवळ एक उदाहरण आहे. विज्ञान कमी करुन आणि छद्म विज्ञान घुसविणे सुरु आहे.
https://www.nature.com/articles/d41586-023-01770-y

दादरी - अखलाक मॉब लिंचिग केस बाबत शेवटची बातमी सप्टेंबर २०२२ ची दिसते.
https://www.newsclick.in/Akhlaq-Lynching-7-Years-Only-1-25-Witnesses-Tes...
या केसांचा तपास इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंग यांनी केला होता, आणि यांनाच पुढे गोरक्षकांनी मारून टाकलं.

https://x.com/SachinGuptaUP/status/1849816778265829871

बहराइच हिंसा का नया Video सामने आया –

डंडेधारी दंगाई और पुलिस साथ–साथ चल रहे हैं। वो रास्ते में खड़ी एक कार तोड़ देते हैं, फिर उसमें आग लगा देते हैं।

किती निरागस दिसताहेत हे दंगेखोर.

राम गोपाल मिश्राला गोळ्या घातल्याचा आरोप असलेल्या दोघांच्या पायांवर पोलिसांनी गोळ्या घातल्या. पोलिस या व्हिडियोत दिसणार्‍या लोकांच्या हातांची बोटे फ्रॅक्चर करतील का?

गंदा केला म्हणून मुस्लिमांची घर पाडायचे आदेश प्रशासनाने दिले. या निरागस लोकांचं काय?

युद्धाची कुठलिही प्रत्यक्ष झळ पोहचत नसलेल्या लोकांनाच युद्धाची जास्त खुमखुमी असते. ३ दिवसांत सेना उभी करु हे बोलायला ठिक आहे, प्रत्यक्षांत असे काही होत नाही. बाळ्याची झेप गावांतल्या मशिदीसमोर जोरदार नारे देण्यापुरती किंवा एखाद्या नागरिकाच्या घरावर लावलेला झेंडा जबरदस्तीने काढण्यापुरतीच मर्यादित असते.

युद्धाची कुठलिही प्रत्यक्ष झळ पोहचत नसलेल्या लोकांनाच युद्धाची जास्त खुमखुमी असते.
अस काहीही नाही लोक धर्मा साठी स्वतःच्या जीवाबरोबर दुसऱ्यांचा पण घ्यायला मघे पुढे बघत नाहीत. २-३ दिवसांपूर्वची बातमी आहे काश्मीरातील. लष्करी ताफ्यावर हल्ल्याची. तरी नशीब NIA सारखे छापे घालून होणारे हल्ले थांबवतेय.

उदय, शाखेत कवायत करणारे, बजरंग दल आणि गोरक्षक यांना PoK ताब्यात घ्यायला पाठवलं तर कसं होईल?

२०१९ निवडणूकीच्या आधी योजनाबद्ध रितीने पुलवामा घडविण्यात आला होता. हल्ला कुणी घडविला ? ३०० किलो स्फोटकांचे उगमस्थान अजूनही माहित नाही.

सैनिकां च्या ने -आण करण्यासाठी ३ -४ विमाने माहितली होती पण गृहमंत्रालयाने नाकारली. शेवटी जवानांना बसने जाणे भाग पाडले. एव्हढा मोठा जवानांचा ताफा, कुठल्या मार्गाने आणि कुठल्या वेळेस जाणार आहे हे स्फोटके पेरणार्‍याला बरोब्बर माहित होते.

जैशने तत्काळ जबाबदारी स्विकारली आणि आपण जैशचे म्हणणे मान्य केले. निवडणूका पार पडल्या, सत्ता टिकली आणि पुलवामाचा विसर पडला.

२७ ऑगस्ट हरयाणा - चरखी दादरी - गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून साबिर मलिक नावाच्या प.बंगालहून आलेल्या स्थलित मजुराची जमावाकडून मारहाणीत हत्या.
इथे मारहाणीचा रोमहर्षक व्हिडियो पाहता येईल.
हरयाणाचे निरागस मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणतात t is not right to say things like mob lynching, because a strict law has been made in the Assembly for cow protection and there is no compromise on it,
Villagers have so much respect for cows that if they are informed about such things, then who can stop them? I want to say that such incidents should not happen and these incidents are unfortunate,

आता फोरेन्सिक चाचण्यां नंतर कळलं की "ते" गोमांस नव्हतं.

गोहत्येविरुद्ध कायदे आहेत, तसे मॉब लिंचिंग विरोधातही झालेत. म्हणूनच निरागस मुख्यमंत्र्यांनी याला मॉब लिंचिंग म्हणू नका असं तत्परतेने सांगितलं असावं.

आपल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक कर्तबगार अर्थमंत्री विचारताहेत - गुंतवणुकदार - विदेशी गुंतवणुकदार भारतात गुंतवणूक का करत नाहीत.

बाई, तुम्ही हा प्रश्न विचारायला हवा की त्याचं उत्तर द्यायला हवं?

ही बया अर्थमंत्री कशी झाली हे एक कोडेच आहे. अर्थविषयक कोणतेही प्रश्न विचारले, तर त्याचे उत्तर प्रतिप्रश्न करून दिले जाते. आणि असंबंधित वाह्यात उदाहरणे देऊन आपला राग व्यक्त करून समोरच्याला गप्प केले जाते.

काश्मीर मध्ये अजून २ स्थलांतरित मजुरांची हत्या. अत्ता आर्मी/पोलीस आतंकवाद्यांना मारणार. काही वर्षांनी परत काही लोक ओरडणार बघा काश्मीरमध्ये किती मुस्लिम मेलेत. खरे विक्टिम तेच आहेत.

हरयाणात स्थलांतरित मजुराला गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी लोखंडी रॉडने बडवून मारले, त्याचा सूड म्हणून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तिथल्या स्थलांतरित मजुरांना मारले असेल का?

पोलिस अशा मॉब लिंचिंग करणार्‍या गोरक्षकांना कधी का मारत नाहीत? अखलाखला मारणार्‍या जमावातला एक तुरुंगात आजारी पडून मेला तर भाजपायींनी त्याचा मृतदेह तिरंग्यात गुंडाळला. किती छान!

मग कलम ३७० काढून काय साधले?
३७० कलमाच्या निमित्ताने का होईना काश्मीरातील सुमारे २ लाख लोकांनां ह्या वर्षी पहिल्यांदा मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. गेली ७० वर्ष त्यांना विधानसभेत मतदान करता येत नव्हते. मतदानच नव्हते तर बाकी आरक्षण इतर सवलती ह्या लांबच्या गोष्टी होत्या.
त्याचा सूड म्हणून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तिथल्या स्थलांतरित मजुरांना मारले असेल का?
नाही, त्यांना लोक मारायला कारण लागत नाही. जिथं १००% मुस्लिम लोकसंख्या आहे तिथेही हेच करत असतात. Mob lynching विरोधात नवीन कायदा आलेला आहे कडक. कमी होईल अशी आशा आहे. एखद्या गुन्हेगाराला तिरंग्यात गुंडाळणे वाईटच. टायगर मेनन च्य्या आंत्विधीलही लाखोंची गर्दी जमली होती.

ती भाजपनेच जमू दिली. त्याला फाशी कधी देणार हे आधी जाहीर केले. त्याचा मृतदेह कुटुंबाला दिला. काँग्रेसने अफजल गुरू च्या फाशीचा गाजावाजा केला नव्हता. मृतदेह कुठे पुरला हेही गुप्त ठेवले.

अखलाखच्या मारेकर्‍याचा मृतदेह तिरंग्यात गुंडाळणार्‍या टोळक्याचा प्रमुख भाजप आमदार. मॉब लिंचिंगचे आरोपी जामिनावर बाहेर आले, की त्यांचे स्वागत करायला केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा.
अखलाख हे पहिले मॉब लिंचिंग प्रकरण, त्याच्या कोर्ट केसचं काय झालं ते काही दिवसांपूर्वी इथेच लिहिलं होतं.

निरागसपणाचे कौतुक.

<त्यांना लोक मारायला कारण लागत नाही. > हो. हिंदुत्ववाद्यांना मुस्लिमाला मारायला आता कारण लागत नाही. अगदीच नाइलाज झाला तर गोमांस खा ल्ल्याचा संशय घेतात. बोरिवली जवळ चालत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये मुस्लिमांना वेचून गोळ्या घालणार्‍या रेल्वे पोलिस कॉन्स्टेबलला काय कारण लागले का? मुस्लिम आहे, हे पुरेसे आहे.
-----------

मागच्या वेळी अजित दोभालनी अमेरिकेत जाणं टाळलं होतं. यापुढे अमित शहा सुद्धा टाळतील का?

३७० काढल्याने दहशतवाद संपला का? निष्पाप लोकांच्या हत्या होणे थांबले का? स्थलांतरित सुरक्षित आहेत का? ह्याचसाठी केला होता ना अट्टाहास?

मागच्या वेळी अजित दोभालनी अमेरिकेत जाणं टाळलं होतं. यापुढे अमित शहा सुद्धा टाळतील का?

नक्कीच टाळतील.

सगळे हिंदूही काही चांगले नाहीत पण तुलना करता येणे शक्यच नाही.
एखाद्या दहशतवाद्याच्या अंत्यविधीला जायचं का नाही हा चॉईस होता. केवळ माझ्या समाजाचा आहे म्हणून मी तरी अशा कोणाच्या अंत्यविधीला जाणार नाही.

३७० काढल्याने दहशतवाद संपला का?
ते भजपला विचारा. बाकी काश्मीरातील प्रती वर्षी होणारे हल्ले याचा data भेटला तर काहीतरी निष्कर्ष काढता येईल.

लोल. नथुरामाला पुजणारे आहेत की भरपूर. आणि तो मेमन दहशतवादी नाही, त्याला फसवून अडकवलं आणि पुरावे नसताना फाशी दिली असं कित्येक मुस्लिम नसलेल्या लोकांनाही वाटतंच की.

<सगळे हिंदूही काही चांगले नाहीत पण तुलना करता येणे शक्यच नाही.> निरागसपणाचं पुन्हा कौतुक.

Pages