बीरकाया पचडी अर्थात दोडक्याची चटणी

Submitted by अश्विनीमामी on 15 May, 2024 - 09:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक दोडका मध्यम आकाराचा, शक्यतो कोवळा बघून घ्या. एक मध्यम कांदा , एक टोमाटो, पाच सहा हिरव्या मिरच्या, एक मूठ शेंगदाणे, एक टे स्पून प्रत्येकी धणे जिरे, लिंबा एवढी चिंच, मीठ चवीनुसार, कढिपत्ता, एक चमचा प्रत्येकी उडिद डाळ, हरबरा डाळ, व फोडणीचे साहित्य,
कोथिंबीर १०० ग्राम फ्रेश चिरून घेउन. लाल मिरच्या तीन चार फोडणी साठी. सहा सात लसुण पाकळ्या सोलून.

क्रमवार पाककृती: 

सर्व प्रथम दोडक्याच्या शिरा काढून मध्यम आकाराचे तुक डे करुन घ्या. कांदा व टोमाटो पण चिरून घ्या. बाजूला ठेवा.
तव्यावर एक चमचा तेल घालुन त्यात धणे जिरे चांगले परतुन घ्या. छान वास येइपरेन्त. मग त्यात मूठ भर शेंगदाणे घाला व परता, आणि आता तुम्हाला चटणी जितकी तिखट हवी तितक्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या. हे सर्व गार करुन मिक्सर मधून काढून घ्या. बाजूस ठेवा.

आता त्याच तव्यात एक चमचा तेल घालून दो डके, कांदा, टोमाटो , कोथिंबीर परतून घ्या. व झाकण ठेवा, पाच सात मिनिटानी त्यात चिंच घालून परत झाकण ठेवा, मिश्रण कोरडे वाटल्यास दोन चमचे पाणी घाला. वाफेवर सर्व भाज्या शिजून येतात तो परेन्त वाट बघा. चवी पुरते मीठ घाला.

हे पण गार होउद्या, मग मिक्सर मधून काढा, पहिले वाटप व हे एकत्र चांगले मिसळून एकजीव करुन घ्या.

आता फायनल फोडणी: तेलात मोहरी , जिरे, उडीद डाळ चणा डा ळ, लाल मिरच्या सुक्या तीन चार, कढिपत्ता हिंग घालून फोडणी चरचरीत बनवा व गॅस बंद करुन दोडक्याचे वा टपाचे मिश्रण त्यात घालून मिसळून घ्या. बीर काया पचडी तयार आहे. बीरकाया म्हण जे तेलुगुत दोडका.

आंध्रा पद्धती नुसार गरम गरम पहिल्या वाफेच्या सोना मसुरी तांदळाच्या भाता बरोबर ; एका भागात कंदी पोडी व वरून तूप त्यानंतर बीरकाया पचडी बरोबर खा. अजून थोडा भात घेउन मस्त टोमॅटो/ पेपर रसम , अप्पलम कव डी दही ह्या बरोबर भाताला ही पच डी लावुन खा. स्वर्गच तो ताटात. मग पडी टाका.

साखर घालायची नाही. आंबट तिखटच चव हवी.

वाढणी/प्रमाण: 
चार लोकां साठी फ्रिज मध्ये ठेवुन दोन तीन दिवस .
अधिक टिपा: 

मराठी जेवणात नाविन्य पूर्ण डावी बाजू म्हणून करता येइल. गरम वाफेच्या पोळी बरोबर पण छान लागते. भाजी करायची कटकट नाही. भात, पचडी, दोन पोळ्या, एक आंब्याची लोणच्याची फोड अडी नडीला डब्यात नेता येइल. रीजनल टेस्ट आहे.

अश्या पद्धतीने इतर भाज्यांची पण पचडी बनवतात, कोबी, वांगे, तों डली इत्यादि.

माहितीचा स्रोत: 
विस्मयी फूड यु ट्युब चॅनेल, बीर काया पच् डी असे सर्च केल्यास दुसरी का तिसरी रेसीपी आहे तीबघा, तेलुगुत आहे. बाप्याचा आवाज आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्टरेस्टिंग आहे.
एका दोडक्याला लिंबाएवढी चिंच आणि शिवाय टोमॅटो, म्हणजे फार आंबट होत नाही? आणि बॅलन्स करायला साखरेची चिमूटही नाही?
मी बहुधा आंबट घाबरत घाबरत घालेन, आणि कोथिंबीर परतून न घेता पहिल्या वाटणातच अ‍ॅड करेन.
पण करून बघेन नक्की. Happy

मस्त रेसिपी.. करून बघेन..
मला दोडक्याची सुकी/रस्सा भाजी जमत नाही अजूनही.. हे करून बघेन नक्की.

सहीच्चे रेसिपी. वाचत असताना वाटलं अमा बहुदा दोडका कांदा टोमॅटो चिरून ठेवलाय तो फोडणीत घालायला विसरली की काय? मग वाचत वाचत खाली आले तर दिसलं, पूर्ण रेस्पी वाचली. आणि करून बघितलीच पाहिजे असं आतून वाटतंय. करते आणि सांगते.

आंबट जास्त होतंय असं मलाही वाटलं.टोंमॅटो आणि चिंच दोन्ही घालायचं आणि जराही गूळ्/साखर नाही हे काही झेपेना. कदाचित मी गूळ घालेन थोडा.!

बेकरीत 'तिरुपती भीमा' मध्ये असं आंबट आणि तिखट काळपट रंगांचं काहीतरी वाटीत होतं. ते खाल्लं होतं आणि भाताबरोबर फारच आवडलं होतं. ते काय होतं माहित नाही.
रेसिपी सोपी आहे. करुन बघेन, तशी झाली तर लॉटरीच!