3 Body Problem - वेबसिरीज

Submitted by मामी on 27 March, 2024 - 22:32

3 Body Problem या नेटफ्लिक्सवरील वेबसिरीजवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

पुस्तकाचे परिक्षण इथे वाचता येईल ...

The Three-Body Problem - Cixin Liu : https://www.maayboli.com/node/83492

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, शीर्षकात 'बेवसिरीज' झाले आहे, ते तेवढं 'वेबसिरीज' करा. एलियन्समुळे बोबडी वळली असं वाटायला नको. Wink

बघतेय. आलेच.

माझी अजून पूर्ण बघून झाली नाहीये पण जेवढी बघितली त्यावरून माझी काहीशी निराशा झाली आहे. पुस्तकात अनेक घटनांचं खूपच तपशीलवार वर्णन आहे जे सिरीजमध्ये अगदी म्हणजे अगदीच चटकन आटपलंय.

सुरवातीच्या क्रांतीचं रक्तरंजित वर्णन, जंगलतोडीच्या कामावरचं आणि नंतरचं रेड कोस्टवरचं यंत्रवत जीवन हे खरंतर ये वांगजेच्या व्यक्तीमत्त्वाच्या जडणघडणीसाठी अतिशयच महत्त्वाचे तपशील आहेत. ते डिटेल्समध्ये वाचणं गरजेचं आहे. पुस्तकातून कम्युनिस्ट राजवटीतील हुद्द्यांची hierarchy, व्यक्तीस्वातंत्र्यावरचा घावस, लोकांचे आक्रसलेले जीवन खूप व्यवस्थित मांडलं आहे. वाचताना सतत एक प्रकारचा झाकोळ मनावर तरंगत राहतो आणि त्यामुळे आपण अक्षरशः ती परिस्थिती जगतो.

ये वांगजे जेव्हा तो निर्णायक मेसेज करते त्या घटनेचे वर्णन पुस्तकात खूप उत्कंठावर्धक आहे. तसंच एकदम स्टेप बाय स्टेप वर्णन आहे सैन्याला उभं करून त्यांच्याकरवी कॉम्प्युटर बनवणे. अमेझिंग आहेत ते तपशील. सिरीजमध्ये फारच सपकपणे दाखवलंय. very disappointing.

व्हिआरचा खेळही हळूहळू उलगडला जातो आणि त्यात क्रमशः तपशील भरले जातात. सतत नाश पावणार्‍या सिविलायजेशन्सचे डिटेल्स काहीसे किचकट वाटले तरी एकूण परिणाम साधण्यासाठी पोषक ठरतात. या संथ, एकसुरी वर्णनामुळे आपण अस्वस्थ होत राहतो. एकप्रकारे तो खेळ आपल्याही मनावर परिणाम करतो. तो पुस्तकातच वाचायला हवा. सिरीजमध्ये त्याचा अगदीच पोरखेळ केलाय.

जर ही सिरीज आवडली असेल तर पुस्तकं नक्की नक्की वाचा आणि अजून आनंद मिळवा. सध्या इतकंच.

मामी, शीर्षकात 'बेवसिरीज' झाले आहे, ते तेवढं 'वेबसिरीज' करा. एलियन्समुळे बोबडी वळली असं वाटायला नको. >>>>>>>> Lol

करते दुरुस्त.

पहिले दोन भाग समजायला अवघड गेले. त्यामुळे अगोदर पुस्तक वाचावं, मग बघावी, असा विचार करत होते. वेगळा धागा काढलात ते चांगलं झालं.

पुस्तकं वाचलेली नाहीत. थ्री बॉडी प्रॉब्लेम माहित होता.
पहिले १- २ भाग खूपच आवडले आणि ते शो ला खिळवुन ठेवायला पुरेसे होते. चौथ्या पाचव्या अगदी सहाव्या भागा पर्यत ठीक चालू होती. शेवटचे दोन भाग अगदीच ढेपाळले.
गेम ऑफ थ्रोन्स मध्ये पात्र आणि एकून कथेची व्याप्ती इतकी होती की दर सीझन गणित दोन-पाच प्रोटॅगनिस्ट्सना मारलं तरी मजाच यायची. इथे मी कनेक्ट झालेल्यातला आता फक्त 'डा शी' (तो पोलिस) उरलाय. आणखी विंटरेस्टींग पात्र आणली नाहीत तर काय करतील! मला वाटतं लीप ऑफ टाईम असेल आता पुढच्या भागात.

सूर्याचा वापर रेडिओ वेव्ह्ज परावर्तीत करायला कितपत शक्य आहे मला शंका आहे. त्यात पॉझिटिव्ह इंटरफिअरन्स क्रिएट करुन तो सिग्नल अ‍ॅम्प्लिफाय करणे... मी रिसर्च केलेला नाही पण हे बॅड सायन्स असावं वाटलं.

मामी, संथ-एकसुरी नॅरेशन पुस्तकात छान वाटतं, पण ते सिरीअल मध्ये खिळवुन ठेवायला शक्य नसावं.
'यी' च्या त्या निर्णयामागची मनस्थिती, तिची जडणघडण याबाबत मात्र सहमत. तिला मानव जातीचा उद्धार मानवाला करणं शक्य नाही असं तेव्हा वाटायला त्या स्क्वेअर मधला वडिलांचा निघृण खून हे एक कारण मला तरी पुरेसं वाटलं नाही. नंतर झाडं कापायला कठोर श्रम फारतर. त्या नंतरच तिचं आयुष्य ऐशारामातच गेलं आहे. मग त्या निर्णयाची तिला अजिबात कधीच कुठेच खंत... खंत सोडा किमान द्विधा ही कधी झाली नाही?
ती फिजिक्स मधली संशोधक आहे, इतका एककल्ली विचार तो ही दीर्घकाळ सातत्याने ठामपणे... आपल्या स्वतःच्या संशोधनावर चांगले शास्त्रज्ञ हजारदा शंका घेतात. इकडे हजारो प्रकाशवर्षे दूर उत्क्रांत जमातीला बोलावताना... त्यातही असं करू नकोस.. असा रेडफ्लॅग आल्यावर बोलावणे... बरं त्यावेळी इम्पल्स इ. अ‍ॅक्शन झाली, नंतर मोराल कंपास वगैरे, काही विचार.... माय लॉर्ड म्हणून सपशेल लोटांगण!
तिची परिस्थिती/ तेव्हाचे चीनचे सत्ताकारण इ. इ. जास्त आलं असतं तर कदाचित तिच्याशी जास्त कनेक्ट होता आलं असतं.

सैन्य उभे करुन कम्पुटर बनवणे प्रकार चांगला केलाय वाटलं. पुस्तकात आणखी भारी आहे असं तुम्ही म्हटल्यावर आता काय असेल अशी उत्सुक्ता आहे.
व्हिआर जे इथे दाखवलंय ते ही मला आवडलं आणि परिणामकारक होतं. आणखी पुस्तकात काय आहे उत्सुक्ता आहे.

मी चिकाटीने पुर्ण सिरीज पहिली आणि आता नवऱ्याला पाहायला लावून त्याच्या बरोबर पण पहिली. खूप सारे loopholes आहेत त्यात असं मला तरी वाटलं. म्हणजे बेसिक मध्येच थोडासा प्रॉब्लेम वाटला. आपण (मानव) आपली प्रगती सुरु करू शकलो याच कारण शेतीमुळे आलेली स्थिरता. त्या trisolaris वाले इतके प्रलय सहन करून प्रगती कशी काय करू शकतात जेव्हा त्यांना त्यांच्या survival साठी झगडाव लागतेय?
आणि जर फोटॉन वगरे पाठवण्यात इतपत त्यांची प्रगती झालीये तर त्यांना ३ body problem वर solution काढण्यापेक्षा तिथून पळणं जास्त सोपं आहे? अजून खुप गोष्टी पटल्याच नाहीत. यादी फार मोठी होईल. आणि शेवटचे भाग तर महा बोरिंग वाटले....

पहिले ३-४ भाग खूप खिळवून ठेवणारे होते. नंतर जरा नेटाने बघावी लागत आहे. स्लो झाली आहे खूप.

पाचव्या भागात पहिलं पुस्तक संपतं.

दुसरं पुस्तक वाचायला काढलं पण मागे पडलं. नेटसिरीज आली आहे तर नेटाने वाचायला हवं.

रच्याकने, सोफोनची निर्मितीचं आश्चर्यकारक वर्णनही पुस्तकात वाचायला हवं. इथे ते डायरेक्ट तयार होऊन कार्यरत झालेले दाखवले आहेत.

अर्थात ती प्रोसेस दाखवणं सोपं नसणार.

इथे पुढच्या पुस्तकातील स्पोईलर्स पण आहेत. पण पुढचा सीझन येईपर्यंत किती वेळ जाईल आणि तोवर विसरून जाऊ आणि सध्या क्लोजर मिळतंय.... इ. असेल तर वाचा.....
‡‡‡‡
https://bleedingcool.com/tv/3-body-problem-that-einstein-joke-is-the-key...