नाम नामेति नामेति

Submitted by Revati1980 on 24 March, 2024 - 02:06

नाम नामेति नामेति

" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"

" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."

" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"

" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"

"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"

" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"

हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?

अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.

आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.

आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"

मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?

नाही, असं काहीच नाही, का ?

अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.

तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?

व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?

होय. अनल नाव आहे.

काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?

एएनएएल

याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.

.............

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझं typical ९०'s नाव आहे.
माझं नाव आडनाव एवढं common आहे की कंपनी मध्ये मला unique email सुद्धा मिळाला नाही.
Tcs मध्ये ७ मुली होत्या same नाव आडनाव असणाऱ्या Lol

माझं नाव कितीही कॉमन असलं तरी अडनाव अति कॉमन नसल्याने मला मिळाला नीट ईमेल आयडी Proud
८८,८९,९० वगैरे च्या काळात राहुल आणि प्रियांका नाव कॉमन होतं. राजीव गांधी त्याकाळी बर्याच बायकांचा क्रश होते त्यामुळे असायचं हे असं. माझं नाव पण त्यामुळेच प्रियांका ठेवलं गेलं

माझ्या contact list मध्ये एक डझन प्रियांका, अष्ट श्रुती आणि ३ पल्लवी आहेत त्यातल्या दोन पल्लवी कुलकर्णी आहेत.

आई वडिलांचे सगळे कष्ट पाण्यात गेले म्हणायचे >> Lol

बिचाया मिसेस तुळपुळे >> Lol

हे म्हणजे वश्या जोशीसारखं झालं. >> Lol

होय. अनल नाव आहे. >> मित्राच्या मुलाचे नाव आहे हे नि मुलीचे नाव अतिशी. तो जैन आहे नि जैनांमधे तीर्थंकर नि कोणातरी साध्वीच्या नावावरून ठेवली आहेत म्हणे. हा अमेरिकेत आहे मनुष्य. मुलाची दया येते.

मानव Happy

अतिशी मार्लेना सिंग दिल्ली विधानसभेत मंत्रीपदावर आहे.

शी-शय् = (सं धातु) म्हणजे झोपणे. त्यावरून हे आलेलं दिसतं आहे. (कुंभकर्णाला अतिशयी म्हणावं का?)

खालील माहिती यावरून -
Atiśī (अतिशी).—2 A.

1) To surpass, excel; पूर्वान्महाभाग तयाऽतिशेषे (pūrvānmahābhāga tayā'tiśeṣe) R.5.14; चरितेन चातिशयिता मुनयः (caritena cātiśayitā munayaḥ) Kirātārjunīya 6.32, Bhaṭṭikāvya 7. 46,8.1; न शक्नुमो वयमार्यस्य मतिमतिशयितुम् (na śaknumo vayamāryasya matimatiśayitum) Mu.3.

2) To precede in sleeping; अहं पतीन्नातिशये (ahaṃ patīnnātiśaye) Mb.

3) To annoy, act as an incubus. -Caus. (-śāyayati) To excel; धाम्नातिशाययति धाम सहस्रधाम्नः (dhāmnātiśāyayati dhāma sahasradhāmnaḥ) Mu.3.17.
Source: Cologne Digital Sanskrit Dictionaries: Cappeller Sanskrit-English Dictionary

Atiśī (अतिशी).—sleep or go to rest before another ([accusative]); also = [Causative] surpass, excel.

Atiśī is a Sanskrit compound consisting of the terms ati and śī (शी).
Source: Cologne Digital Sanskrit Dictionaries: Monier-Williams Sanskrit-English Dictionary

1) Atiśi (अतिशि):—[=ati-√śi] [class] 3. [Ātmanepada] -siśīte, to sharpen up (a weapon) for attacking, [Ṛg-veda i, 36, 16.]

2) Atiśī (अतिशी):—[=ati-śī] 1. ati-√1. śī -śete, to precede in lying down, [Mahābhārata];

2) —to surpass, excel;

2) —to act as an incubus, annoy, [cf. Lexicographers, esp. such as amarasiṃha, halāyudha, hemacandra, etc.] :

2) —[Passive voice] -śayyate, to be excelled or surpassed.

3) [=ati-śī] 2. ati-√3. śī to fall or drop beyond, [Kāṭhaka];

—to get out from ([accusative]), leave, [Chāndogya-upaniṣad]

कालच माझ्या जावेकडे चिमुकल्या परीचं आगमन झाले आहे. जन्माक्षर फा/फि.. यावरून नाव सुचवा. आणि व्यावहारिक नाव वेगळे ठेवायचे आहे. मोहन आणि मनिषा यांचे काही कॉम्बो होईल का?

फाल्गुनी

मोहन आणि मनिषा यांचे काही कॉम्बो >> मोनिषा Wink

Thanks ह पा.
फाल्गुनी छान आहे. सध्या फाल्गुन मास पण सुरू आहेच.
(सासूबाईंनी फणिंद्रा नाव शोधून काढले आहे.. )
मोनिषा म्हणले की साराभाई आठवतं. Happy

फाल्गुनी छान नाव आहे.
बोबडे बोल बोलणारे इतर चिमुकले आणि बाळाला बघितले बोबडे बोल काढणारे मोठेही "ही की नै फाल गुनी आहे" असे कौतुक करतील.

फाल्गुनी छानच आहे. अजून हवी असतील तर -

  • 'फेनिल' चालतं का बघा. अर्थ समुद्री लाटांचा फेस. अँड्रोगायनस नाव आहे.
  • नाहीतर अलीकडच्या ट्रेंडनुसार 'फ्रेया'. अर्थ अर्थातच माहित नाही.
  • 'फ़िजा' ('तू हवा है, फ़िजा है, जमीं की नहीं' वालं)

मोहन आणि मनिषा यांचे काही कॉम्बो >> आजकालच्या ट्रेण्डनुसार 'हनिषा'. आमच्या वर्गात आहे एक...

मोहनी >>> मोहनी छान आहे पण 'मोहनी मोहन अमुक तमुक' फार रिपीटेटिव्ह नाही का वाटणार? नुसतंच 'म' किंवा 'मो' वरून नाव ठेवायचे असेल तर मस्त आहे.

देवा !! काय एकेक नावं ही!! वरच्या अनेक कमेंट वाचून ह ह पु वा
हल्ली बिल्ली नाही हं, (किल्ली पण नाही Wink ) आई आणि बाबांच्या नावाची भेळ करून एक नाव बनवायचे हे ३०-४०-५० वर्षांपूर्वी पण नक्की असणार
असे एक भयंकर नाव असलेला मुलगा मला सांगून आलेला, कोणी रिजेक्ट केले लक्षात नाही. पण अर्थातच माझ्या पथ्यावर पडले होते. त्यावरून नंतर माझे लग्न झाल्यावर आम्ही असे म्हणालेलो जर आपल्याला मुलगा झाला तर नाव अंक ठेवावे लागेल (नवऱ्याचे नाव क वरून आहे.)

तसे पतंगराव हे नाव ऐकूनही मला खूप हसू येते. राव हे नंतर लागले असेल ना ? पाळण्यात काय फक्त पतंग असे नाव ठेवले असेल का? Lol
मी आक्रोश व स्वच्छंद अशी पण नावे ऐकली आहेत

मी पंकेश पण ऐकलेय. आणि मनातल्या मनात पंक + ईश करून कपाळावर हात मारून घेतलाय.

आई आणि बाबांच्या नावाची भेळ करून एक नाव बनवायचे हे ३०-४०-५० वर्षांपूर्वी पण नक्की असणार
>>> हो. काही पेज ३ वाल्यांची नावं
राम + मोना = रमोना, आशा + अमित = अश्मित, अमिशा. (एके काळी बॉम्बे टाइम्स वाचल्याची लक्षणं....)

Pages