नाम नामेति नामेति

Submitted by Revati1980 on 24 March, 2024 - 02:06

नाम नामेति नामेति

" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"

" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."

" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"

" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"

"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"

" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"

हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?

अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.

आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.

आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"

मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?

नाही, असं काहीच नाही, का ?

अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.

तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?

व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?

होय. अनल नाव आहे.

काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?

एएनएएल

याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.

.............

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काही नावं ही कॉन्टेक्स्ट सोडून वापरली तर विनोद होतो, पण तसा कॉन्टेक्स्ट न सोडण्याचं भान बोलताना असायला हवं. त्यात ती नावं असणार्‍यांचा/ठेवणार्‍यांचा काय दोष? नाव आहे 'प्रताप' म्हणून उगाच "घ्या, यांचे आईवडील काय म्हणणार - हा आमचा प्रताप?" असले फालतू जोक्स करण्यात काय पॉइंट आहे!

अनुराग नावावरून शाळेतला किस्सा आठवला. हस्तलिखिताला अनुराग नाव मी सुचवले,त्यावर बाईंनी डोळे मिचकावून विचारले कुठे वाचला हा शब्द? मला काही सांगता येईना.पण बाईंच्या त्या डोळ्याच्या हालचालीवरून वाटले की काहीतरी चावट अर्थ असावा.घरी आईला विचारल्यावर अर्थ कळला.
अवांतराबाबत क्षमस्व!

कॉलेज मध्ये मदन सर होते. आधी राहायचो तिकडे मनसे लीडर मदन म्हात्रे आहे. मदन आणि प्रणय नाव बरेच ऐकिवात आणि ओळखीत आहेत. तीच गोष्ट पद्मभूषण बद्दल. फार प्रचलित नसेल हे नाव पण एक मित्र आहे ह्या नावाने. पद्मश्री भाग्यश्री राजश्री तिन्ही बहिणी आहेत जवळच्या नात्यात. एक नाव हल्ली ऐकले तेव्हा फार विचित्र वाटले .... दुर्योधन !! पण आहे इकडे एका शिवसेना शाखा प्रमुखाचे नाव. असो... नावात काय आहे... स्पेलिंग लिहिता आली आणि नावा बरहुकुम सही करता आली की झालं. तेही नसेल तर ही सोय आहेच.

ह्यावरून
एक आठवले...

हो किंवा नाव आहे '. विनोद ' म्हणून उगाच "घ्या, यांचे आईवडील काय म्हणणार - हा आमचा विनोद?" असले फालतू जोक्स करण्यात काय पॉइंट आहे!

एक मदनही होता टीममधे. तो बिचारा लाजायचा नाव सांगताना.>>>

खोसला का घोसला मधील चिरौंजीलालची आठवण आली.

मदन, प्रणय या नावांनी काही विशेष वाटलं नाही.

आमच्या रूममध्ये होता एक प्रणय

आणि आमच्या गावाकडे एक मोठा राजकीय पुढारी आहे
मदनराव...!

आमच्या कंपनीत आहे एक दुर्योधन , कधी प्रत्यक्षात भेट नाही झाली पण एक दोन वेळा call मध्ये बोलले आहे.
बाकी कियारा , मायरा , समायरा अशा आहेत ओळखीच्या .

मदन आमच्या गल्लीत होता एक.
ते नाव काय ओकवर्ड नव्हतं वाटलं.
वयाने आमच्यापेक्षा 7 ते 8 वर्षे मोठा असल्याने त्याला " मद्दा " असेच म्हणायचो.
मदनदादाचा शॉर्टफोर्म मद्दा

प्रणय नावाचा फक्त प्रणॉय रॉय माहिती आहे Lol तेही पूर्वी प्रणव रॉय वाटायचं.
मदन हे नाव तर खूप वेळा ऐकलंय.
थेंब आणि ठिपका ही नावं व्हाट्सएपवर विनोद म्हणून वाचली होती. खरोखरच असतील असं वाटलं नव्हतं. अजून एक असा विनोद म्हणजे जुळ्या मुलांची नावं अपेक्षित कुलकर्णी आणि अनपेक्षित कुलकर्णी Lol

आयत नाव असते तर त्रिकोण आणि चौरस सुद्धा असायला हवे. >>> भूमितीतला नव्हे हो, कुराणातील आयत असतो तो. आपल्या श्लोकसारखा.

माझ्या वर्गात एक अपेक्शित होता. त्याच्या भावाचं नाव अकल्पित होतं. म्हणजे अपेक्शित आणि अनपेक्शित होते.

पदावली कसे आहे नाव?>>
त्यापेक्षा पदाली ठीक असं वाटलं.
पण मग इंग्रजी स्पेलिंगचा विचार करता नकोच!

पदावली - equation बहुतेक नेमकं आठवेनाबीजगणितात असते ती
>>> हा शब्दसुद्धा आठवत नाहीये इतके इक्वेशन तोंडात बसले आहे. मी आपले पायांची ओळ/पायाने आखलेली ओळ/कवितेतल्या पदांची ओळ असा काहीतरी विचार करत बसले होते.

वाघ सिंह हत्ती अश्या जनावरांवरून नावे ठेवतात.
पण कुत्रा मांजर उंदीर गाढव अश्या जनावरावरून कोणी नावे ठेवत नाही. भले मग तुम्ही कितीही श्वान प्रेमी का असेना. नाव ठेवायची वेळ आली की जंगलाचे राजा आणि शक्तिशाली जनावरेच आठवतात. माणसांचे नाव सोडा लोकं कुत्र्याचे नाव सुद्धा टायगर ठेवतात.

मानव Rofl
बाकी नावाला अर्थ हवा वगैरेला काहीही अर्थ नाही. काय वाट्टेल ते नाव ठेवा.
जग वर्णलिपीच्या पुस्तकाच्या बाहेरच्या अभ्यासक्रमातली नावं ठेवतंय. X Æ A-Xii .. (अरे मायबोलीवर टाईप झालं!!! आता खरंच सुडोमि!) आणि इथे वैश्य आणि शूद्र प्रकारच चालू आहेत.

Pages