चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युट्युबवर नेमकी गेल्याच आठवड्यात अशोक रानड्यांनी घेतलेली सुधीर फडक्यांची मुलाखत बघितली. मुलाखत घेणारा आणि देणारा दोघे ताकदीचे असले की कशी मुलाखत रंगते याचा नमुना वाटलेला. चित्रपट येतोय म्हणुनच एकएक मुलाखती वर येत असणार.
बाकी त्याच मुलाखतीत का त्या निमित्ताने युट्युबने बाबुजींचा मारा केल्याने दुसर्‍या असेल, श्रीधरला नायडू इस्पितळांत दाखल केलंय हे प्रत्यक्षांत गाणं रेकॉर्ड झाल्यावर रात्री त्यांना समजलेलं असं त्यांनीच सांगितलेलं. पण ते असो.

चरित्रपटांत नव्यादमाचा नवा चेहरा येतोय त्या निमित्ताने. हे एक बरं झालं. हा चित्रपट इथे आला तर नक्की बघेन. बायोपिक बघायचा नाही ठरवले आहे, पण बाबुजी आणि सुनिल बर्वे साठी अपवाद. नको आसू ढाळू आता, पुस लोचनास... ला सावरकरांना आसू येऊन डोळे पुसायला लावले असं धावतं समालोचन बाकी ठिकाणी नसेल अशी आशा आहे. Wink

Lol आणि त्यातली माता म्हणजे मातृभूमी आहे असेही व्हॉट्सअ‍ॅपीकरण होईल त्याचे. कारण त्या काळी सतत भारतमातेचे अश्रू लोकांना पुसायला लावण्याबद्दल पुलंनीच लिहीले आहे ("भारतमाता जी तळहातावर शिर घेउन बसली आहे ती जरा आता नातवंडांना वगैरे खेळवेल, अजिबात नाही" असे काहीतरी Happy )

मात्र सुनील बर्वे गाताना सुधीर फडकेच बसले आहेत असे वाटते. रणवीर-कपिल नंतर इतकी हुबेहूब व्यक्तिरेखा पुन्हा दिसली.

छान आहे ट्रेलर. हा बघायलाच हवा. त्यात बाबूजींच्या भूमिकेमधे सु भा नाही म्हटल्यावर जरा अजून हुरुप आला आहे. Wink

भारतमाता जी तळहातावर शिर घेउन बसली आहे ती जरा आता नातवंडांना वगैरे खेळवेल, अजिबात नाही" >> Lol हे पुलंच्याच आवाजात ऐकू आलं.

बायोपिक आणि सुभा ऐवजी सुब ?
>>>>>

खरे आहे आचार्य..
रोहीत शर्माची कप्तानी काढून पांड्याला दिल्याची फिलिंग आली...
आता पब्लिकने थेटरमध्ये जाऊन सुबोध सुबोध ओरडायला हवे...
बायोपिकचे राजे.. सुबोध भावे.. अश्या घोषणा द्यायला हव्यात

छान आहे ट्रेलर. हा बघायलाच हवा. त्यात बाबूजींच्या भूमिकेमधे सु भा नाही म्हटल्यावर जरा अजून हुरुप आला आहे.>> +१
मुव्हिच्या सुरवातिला किवा शेवटी नाव येतात त्यात आभार प्रदर्शनात सु.भा चे हा बायोपिक न केल्याबद्दल धन्यवाद अशी एक ओळ अ‍ॅड करा.

प्राजक्ता Lol

सुंदर झाले आहे ट्रेलर. बघणार नक्की.

Lol
कशी ओळ ट्रेलर मध्येच टाकली असती आणि मुख्य कलाकाराचा चेहरा दाखवला नसता तर सुबोध भावे नाही तर कोण या उत्सुकतेपोटी जोरदार ॲडव्हान्स बुकिंग झाली असती

नटसम्राट २.०?
>>>>
हो.. फक्त तो वेगळ्या काळातला होता.. हा वेगळ्या काळातील आहे..
पण ट्रीटमेंट तशीच वाटत आहे.. भडक बडबडीत भावना..
तो सुद्धा कधी दुसऱ्यांदा बघावासा वाटला नाही..

त्यापेक्षा बागबान छान होता.. असा अंगावर आला नाही.. त्यामुळे सेकंड हाफ एका पेक्षा जास्त वेळा बघितला आहे.

जुने फर्निचर >>> भडक वाटतोय. (महेश मांजरेकरांच्या खासियत) पण अकाउंट ऑपरेट करू न देणे समजले नाही. त्यामुळे ओटीटीवर आला तर बघेन.
बागबानही मला मेलोड्रॅमॅटिक वाटला होता. बाकी अगदी मॉडर्न लाइफस्टाइल असणारा व बँक मॅनेजर असलेला माणूस निवृत्तीनंतर पैश्यांची योग्य व्यवस्था करत नाही व त्यापायी हाल काढतो हे ८०च्या दशकात शोभले असते. आता बँका स्वतःच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या जोडीदारासह 'निवृत्तीनंतरचे आयुष्य' या विषयावर सेशन्स घेतात. वेगवेगळे पेन्शनर्स क्लब असतात. ते ही रिटायरमेंट फंड्स कसे गुंतवावे वगैरे सल्ले देत असतात.

बागबान बटबटीत होता, त्यापेक्षा त्याचा ओरिजिनल तू तिथे मी बघा. मस्त आहे

आचार्यानु, हसवून मारताय Lol

बागबानही मला मेलोड्रॅमॅटिक वाटला होता.
>>>>
हो तसा होता... मला आवडतात तसे... मी म्हटले भडक नव्हता.. म्हणजे ते अति वास्तववादी दाखवण्याच्या नादात अंगावर येतात.. त्यापेक्षा फिल्मी पद्धतीने मस्त वाटते.. जसे की शाहरुखचे पिक्चर म्हणा.. राजश्रीचे म्हणा.. हिराणीचे म्हणा..
आता मोहॉबते सारखे गुरुकुल कुठे नसते हे आपल्याला माहित आहे.. किंवा मेहुना सारखा कोणी आर्मीवाला कॉलेजमध्ये शिकायला जाऊन टीचर वर लाईन मारने हे रोजच्या आयुष्यात घडत नाही.. तरी बघायला छान वाटते..

जुनं फर्निचर - आवडलं नाही.

Old wine in a new bottle. जी बॉटल ममांच्या शैलीनुसार फेकून मारली आहे. मला म्हाताऱ्यांची 'आम्हाला मुलं विचारत नाहीत' टाईप ठरलेली दुःख उगाळलेली बघायचा कंटाळा येतो. उदा. पिंपळ, फॅमिली कट्टा. याउलट 'चि. व चि.सौ.का.' मधे सिंगल आज्जी एका आजोबांसोबत खिडकीतून उडी मारून पळून जाते व डायरेक्ट लग्न करून 'हे तुमचे नवीन आजोबा' म्हणत आशीर्वाद द्यायला(?) येते. ते धमाल वाटलं होतं.

एरवी हीच म्हातारी तरुणपणी काय करत होती हा संशोधनाचा विषय ठरेल. आपल्याकडे म्हातारं झालं की आपोआपच आदरास पात्र, त्यागाची मूर्ती वगैरे होता येतं. ट्रेलरमधेही तरुणांना लाजवेल अशी कानाखाली दिलेली आहे, नंतर एजिझमचं कार्ड पुढं केलं असेल. ॲन्की यांनी मराठी चिकवावर लिहिल्याप्रमाणे ममांच्या देहबोलीतून अभिनिवेश काही जात नाही.

अस्मिता +१.
म्हातारे आणि त्यांची मुलं यात बिनसलं म्हणजे मुलांचाच दोष हा ठाम फंडा असणारे लोक खुप आहेत. WA वर सतत असे फॉरवर्ड्स येत असतात आणि त्याला भरभरून लाईक्स मिळत असतात.
मला ट्रेलरही पूर्ण बघवलं नाही.

भारतात मराठी सिनेमा बघणारं मार्केट हे एजिंग पॉप्युलेशन + आत्ताच वयात आल्यामुळे मैत्रिणींबरोबर सिनेमाला जाणार्‍या आज्ज्या असं असावं. त्यामुळे झिम्मा/ बाईपण भारी देवा आणि हे असले जुने फर्निचर येत आणि चालत असणार.
मानव +१ ट्रेलरही बघवलं नाही.

म्हातारे आणि त्यांची मुलं यात बिनसलं म्हणजे मुलांचाच दोष हा ठाम फंडा असणारे लोक खुप आहेत. >>>>
अगदी अगदी.
मुलांनी आपले दैनंदिन व्यवहार (ज्येनांच्या सोयीप्रमाणे) ऍडजस्ट करून, (वेगळे राहत असतील तर) स्वतःच्या संसाराचा विचार न करता आपल्या पालकांच्या सेवेसी वाहून घ्यावे, ज्येना तिरसट, एककल्ली, स्वतःचे खरे करणारे असले तरी समजावू नये अश्या सुविचारांचा नुसता भडीमार होत असतो चहुबाजूनी.

तेच नं. मीही एक आजोबा बायकांच्या पाठीवरून हात फिरवून 'चौफेर' आशीर्वाद देताना व नंतर घरात थोडं मनाविरुद्ध झालं की 'आम्ही काय पिकलं पान' म्हणताना बघितले आहेत. यात काही तथ्य नाही. वय झालं तरी माणूस थोडीच बदलणार, उलट 'सेलेक्टिव्ह मॅनिप्युलेशन' आहे!

नाना पाटेकरचा 'माणूस' चित्रपटही साधारण याच धाटणीचा होता. नाना काय प्रेमळ- कणवाळू म्हातारा वाटणार आहे का , त्यात डबल रोल !

Pages