चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपटात मॉडर्न आजी आजोबा बघायला छान वाटते.
रडगाणे गाणारे म्हातारे म्हातारी बघायला वैतागवाणे.
आणि हे असे वाटणे स्वाभाविक आहे.
पिक्चर आपण यासाठीच तर बघतो.
म्हणून तर झिम्मा चालला. ज्यात बायका बायका इंग्लंड फिरून आल्या.
म्हणून तर बाईपण भारी देवा चालला ज्यात बायका बायका स्पर्धेत उतरल्या, स्टेशनवर नाचून वायरल झाल्या.
जे आपल्या समाजात सहजी घडत नाही पण मनात इच्छा असते असे घडावे ते चित्र पिक्चरने दाखवले की आवडते समाजाच्या त्या घटकाला....

सत्तर ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवर ज्ञानदीप आणि अजून काय काय कार्यक्रम असायचे. त्यात घर आणि खिडकीचा सेट. नाटक सुरू झालं कि खॉक खॉक करणारी म्हातारी. "अगं चहा आणतेस ना ?" या प्रश्नाला थरथरत्या आवाजात "मला मेलीला उठवत नाही हो आता. वय झालं " असं उत्तर देणारी ( दूरदर्शन सुरू झालंय त्या विनय आपटेंना सांगा ना चासकरांना मला एखादा रोल द्यायला म्हणून आलेली टुणटुणीत मध्यमवर्गीय महिला ) थकलेली म्हातारी या संचात नाटक सुरू झालं कि आम्हाला धसकाच बसायचा कि आता पोरांना व्हिलन बनवणारं काही तरी असेल.

वडील मन लावून बघायचे. ते म्हणायचे कि "पोरांकडून फार अपेक्षा ठेवायच्या नाहीत" चौथी पासूनच हे रँगिंग झालंय.
"अरे आम्ही का नाही बघणार आई वडिलांना ? ही चार पाच टाळकी त्यांची पोरं त्यांना बघत नाहीत म्हणून थेट टिव्हीवर येतात" असं नंतर नंतर आम्ही एकमेकांना सांगायचो.

बालगंधर्वला नाटकंही असलीच. त्याचं परीक्षण लिहायला अरूणा अंतरकर नावाची महा पकाऊ बाई. ती दर वेळी उन पाऊस सिनेमाची आठवण काढून गहीवरलेले रकाने भरायची. त्यामुळं लहानपणापासूनच भिंगाखाली स्कॅन होऊन मोठे झालो. ( पण कुछ कुछ होता है च्या वेळी शाळेत होतो हे सांगायचंच राहीलं. हम दिल चुके सनम आमच्या कॉलनीतल्या ऐश्वर्या बरोबर पाहिला तेव्हढा वेळ योग्य वयात होतो).

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मेरे प्रतिसादोंसे मेरी उमरका पताही नही चलता -
संतूर वादन. बजाज कंपनीची संतूर वाजवा आणि चिरतरूण रहा.

>>जे आपल्या समाजात सहजी घडत नाही पण मनात इच्छा असते असे घडावे ते चित्र पिक्चरने दाखवले की>>
तुला माबोचं मांजरेकर म्हणयला हवंय का? किती ते!

बागबान २
पुस्तकाचे पैसे ढापल्यावर मुलांनी पुन्हा दुर्लक्ष केल्यावर शेती करून मातीतून सोनं पिकवणारी आई !
435189931_2226868494317186_5659376011061607786_n.jpg

ट्रेलर क्रिन्ज आहे एकदम.
भारतात सिनियर सिटिझन होम्स किंवा असिस्टेड लिविंग हे कल्चरच नाही. हल्ली अशा कम्युनिटीज थोड्या प्रमाणात येऊ लागल्यात पण त्या बहुधा उच्च मध्यमवर्गीय किंवा सधन वर्गाला परवडाणार्‍या असतात. सामान्य थरातील लोकांना परवडतील अशा ठि़क ठाक सोयी असलेली सिनियर होम्स उपलब्ध नसणे अन मुळात तिथे जाण्याचा माइंडसेट च नसणे हे दोन्ही प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळेच मग आई वडीलांनी फुकटात बाळंतपणे आणि बेबी सिटिंग करण्याचे आणि मुलांना फुलटाइम म्हातारपणाची काठी बनण्याचे ऑब्लिगेशन येते. सिनियर होम मधे जाणे म्हणजे मुले विचारत नाहीत/ मुलांनी टाकले/ वार्‍यावर सोडले अशी हृदयद्रावक विचारसरणी सोडली पाहिजे.

आचार्य, Lol
त्यांची आईसुद्धा भूतपूर्व 'ड्रीमगर्ल' आहे, प्रेक्षकांची खरीखुरी उषा नाडकर्णी.

सिनियर होम मधे जाणे म्हणजे मुले विचारत नाहीत/ मुलांनी टाकले/ वार्‍यावर सोडले अशी हृदयद्रावक विचारसरणी सोडली पाहिजे
>>>>>>

आज आपल्याकडची जी म्हातारी पिढी या स्टेजला आहे म्हणजे पन्नास साठच्या दशकातील ज्यांचा जन्म आहे, ज्या वातावरणात ते वाढले आहेत त्यांना ही विचारसरणी सोडायला सोपे नाही. आणि जनरेशन गॅप मुळे त्यांच्याच पुढच्या पिढीला हे समजणे अवघड आहे.

श्रीकांतचा ट्रेलर बघितला. एकदम राजकुमार राव स्टाईल सिनेमा. तो अक्खा खाऊन टाकणार शंकाच नाही.
ती अंध लोकांची डोळे हलवायची स्टाईल काय परफेक्ट उचलली आहे. कुमुद मिश्रा ने पण एका सिनेमात फार भारी काम केलंय अंध व्यक्तीचं. फार कमी लोकांना बघितलंय अशा इतक्या बारकाव्यांसकट काम करताना..

बागबानही मला मेलोड्रॅमॅटिक वाटला होता. >>>
बागबान बटबटीत होता >> +१

इथे मी 'ऊर्ध्व लावणारी बाहुली' कुठे मिळते ती इमोजी शोधतोय. >>>
तो अजितदादा सहकारी बुडीत बचत बॅंकेत कामाला असेल. >>>
नाना काय प्रेमळ- कणवाळू म्हातारा वाटणार आहे का , त्यात डबल रोल ! >>> Lol

मी बागबानच्या किंवा चिकवा धाग्यावर पूर्वी लिहीले होते. ६०-७० च्या दशकातील कथा पुन्हा दाखवताना मुंबई किंवा मोठ्या शहरातील जागेची अडचण व त्यामुळे मुलांची होणारी कुचंबणा वगैरे बघून स्वतःच वेगळे राहायचा प्रयत्न करणारे म्हातारे पालक वगैरे जरा नवीन टच द्यायला काय हरकत होती? पण मुले टोटल व्हिलन करून एकदम ढोबळ करून टाकले होते. त्यात तो सलमान खान आईबापाची पूजा वगैरे करणारा.

अमिताभ हा पूर्वी "बच्चन" होता हे अमिताभ व दिग्दर्शक दोघेही विसरले आहेत. टणक म्हातारा पेटून उठतो व सर्वांना सरळ करतो असे काहीतरी त्या सचिनच्या "आत्मविश्वास" सारखे तरी दाखवायचे. अमिताभने गायलेले गाणे चांगले होते इतकेच लक्षात आहे.

झिम्मा/बाईपण चा प्रेक्षकवर्ग थोडा वेगळा. जॉइण्ट फॅमिलीत राहणार्‍या किंवा स्वतंत्र राहात असल्या तरी खूप स्वातंत्र्य नसलेल्या किंवा स्वातंत्र्य वापरण्याची सवय नसलेल्या बायका. त्यातील अनेकींना एक रॅण्डम ट्रिपला एकटी जायला मिळणे हे अपील झाले असेल यात आश्चर्य नाही.

It is like this. Refer the Matrix movies. Zion city is made for 1% of the people who do not believe in the Matrix and keep rebelling. It is only to satisfy their need to rebel. Machines can destroy entire Zion and chirkut like Morpheus anytime
So such movies Zimma and baipan are made to satisfy the urge to rebel in some women and return safely to patriarchy protection. Trip karun jhali khel khelle pudhe kaay?

It is made for audience not really experiencing full financial freedom and decision making freedom.

मैं लडेगा
https://youtu.be/1FmLRrApI7Y?si=beW4n3EN14zR1Qvi

ट्रेलर तर छान वाटतोय. ट्रू स्टोरी वरून प्रेरित झालेला आहे असे लिहिले आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार असणाऱ्या आकाश प्रताप सिंह यानेच कथा लिहिली आहे, निर्मिती केली आहे आणि ट्रेलर मधील परफॉर्मन्स सुद्धा चांगले दिसत आहे. बघायला हवा.

सिनेमा/नाटक/पुस्तक आवडणे आणि रिलेट होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अर्थात रिलेट झालं की बहुतेक वेळा ते आवडतं. पण आवडण्यासाठी रिलेट होणं आवश्यक नसतं असं माझं मत आहे. पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीतल्या, वेगळ्या काळातल्या, आपल्या आयुष्यात कधीही घडण्यासारख्या नसलेल्या गोष्टीही, उदाहरणार्थ शेरलॉक होम्सच्या कथा मला आवडतात. आणि ती काही फँटसीही नसते.
जनरल कुठल्याही कथेतल्या/सिनेमातल्या भावभावना 'रिलेट' होऊ शकतात हे मान्य आहे. पण तेवढंच कारण नसतं आवडण्यासाठी आणि आवश्यकही नसतं. Not necessary, not sufficient.
(मला झिम्मा आणि बाईपण, दोन्ही आवडले होते Wink त्यातल्या कुठल्याही बाईशी रिलेट न करताही. केवळ मनोरंजन म्हणून बघायला आवडले. )

सिनेमा/नाटक/पुस्तक आवडणे आणि रिलेट होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अर्थात रिलेट झालं की बहुतेक वेळा ते आवडतं. पण आवडण्यासाठी रिलेट होणं आवश्यक नसतं असं माझं मत आहे. > Happy . पटलं आणि आवडलं .

अर्थात रिलेट झालं की बहुतेक वेळा ते आवडतं. पण आवडण्यासाठी रिलेट होणं आवश्यक नसतं असं माझं मत आहे. >>> १००% सहमत.

पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीतल्या, वेगळ्या काळातल्या, आपल्या आयुष्यात कधीही घडण्यासारख्या नसलेल्या गोष्टीही >>> हो पुस्तक्/सिरीज/सिनेमा चांगले जमले असेल तर तो त्यामुळेही आवडतो. जरी कथेशी रिलेट होण्याचा काहीही संबंध नसला तरी.

स्वातंत्र्य वापरण्याची सवय नसलेल्या बायका>> एकदम योग्य शब्द फारेंड. अशा अनेक वहिन्या, ताई आजु बाजूस पाहीलेल्या असल्याने विचित्र वाटले नाही.. स्टेशन वर नाचणे जरा अ.अ. झाले तरी.

फक्त ट्रेलर इतकाच सिनेमा चान्गला निघतो की नाही हिच शन्का आहे.>>+१ हल्ली ट्रेलरमधेच सिनेमा दाखवतात असे वाटते.

>>मैं लडेगा<<
क्लिप बघुन नकळत तेंडल्याची पाकिस्तानमधली मॅच आठवली. वकार युनुसच्या बाउंसरने तेंडल्याचं नाक फोडलं, रक्त्स्त्राव बघुन सिद्दुने त्याला रिटायर होण्याचा सल्ला दिला, पण हा पठ्ठ्या त्याच्या बंबय्या हिंदित बोलला "मै खेलेगा.." - दॅट वाज द डिफायनिंग मोमेंट ऑफ इंडियन क्रिकेट...

राज +786
मला तर क्लिप न बघता ही मे लडेगा हे वाचूनच मै खेलेगा आठवले... सिद्धू ने सुद्धा फेमस केला आहे तो किस्सा.

तो ट्रेलर आता पहिला.. त्या दिवशी बघायचा राहिलेला... छान आहे.. थिएटर नाही.. पण टीव्हीवर नक्की बघेन

Pages