चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात मराठी चित्रपटाने करूया
कन्नी
https://www.youtube.com/watch?v=r1yTfXsasMw

अजून एक ईंग्लंडला चित्रित झालेला मराठी सिनेमा
चेहरे नवीन आहेत. चित्रपट फ्रेश असावा अशी अपेक्षा.

चित्रपटाचे नाव ऐकून आमच्या जुन्या चाळीतील दोन बहिणी आठवल्या.
राजस्थानी होत्या. एकीचे घरचे लाडाचे नाव होते चानी तर दुसरीचे कन्नी Happy

Crew चा काल अजून एक ट्रेलर आला. धमाल वाटत आहे. बघायला जायला हवे असे वाटत आहे. क्रिती सेननला सुद्धा आजवर मी मोठ्या पडद्यावर बघितले नाहीये.

https://youtu.be/3uvfq4Cu8R8?si=xolct97yk5At97iJ

ओके.. धन्यवाद..गूगल करतो

केले गूगल.. ग्रेट.. हे माहीत नव्हते. आवडेल आता पिक्चर बघायला

https://en.m.wikipedia.org/wiki/Syed_Abdul_Rahim

अस्विनम नावाच्या दक्षिणपंथी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. बहुतेक येऊन गेलाय,ओटीटीवा येणार आहे.
ट्रेलरवरून तुंबाडच्या पठडीतला वाटतो. तशीच एक पौराणिक देवता आहे. देवांचे वैद्य अश्विनीकुमार हे त्यांच्या एका भक्ताला (ज्याची दोन्ही जुळी मुलं अकाली मृत्यू पावलेली असतात ) दोन मूर्ती देतात. त्याआधी ते दोन्हीतला एक मुलगा जिवंत करतात. दोन्ही मुलं जिवंत करणं हे निर्सग नियमाच्या विरोधात असल्याने एकालाही ते जिवंत करणार नसतात, पण काही कारणाने एकाला जिवंत करतात आणि त्याला सांगतात कि या दोन्ही मूर्ती २४ तास तुझ्याजवळच असायला पाहीजेत. चुकूनही त्या दुसर्याच्या हाती जायला नकोत. काही दिवसांनी सैतान एका माणसाचे रूप घेऊन येतो आणि तुझ्या भावाला मी जिवंत करीन एक मूर्ती मला दे असे सांगतो. तो मुलगा फसून त्याला मूर्ती देतो. त्यानंतर तो माणूस मूर्तीच्या सहाय्याने पाताळातून एका दानवाला बाहेर काढतो. अशी सुरूवात आहे.
https://www.youtube.com/watch?v=IEl5cp6fACg

जबर्रदस्त! हा तर मुलांनाही नक्की दाखवणार

आपल्या देशात अशी कमाल माणसे असतात आणि आपल्याला हे एवढे दिवस माहीत नसते ... असाच पहिला विचार मनात आला.

>>आपल्या देशात अशी कमाल माणसे असतात आणि आपल्याला हे एवढे दिवस माहीत नसते ... असाच पहिला विचार मनात आला.

खरंय. नक्की बघणार. धन्यवाद वॉली.

छान आहे ट्रेलर, आवडले. आपल्याकडे शारीरिक अपंगत्व असणाऱ्यांचा आदर केला जात नाही, बौद्धिक क्षमतेबाबत शंका घेतली जाते. जे ट्रेलरमधेही दाखवले आहे, आता हे बघून थोडाफार दृष्टीकोन बदलला तर चांगले वाटेल.

धन्यवाद वॉलई
छान असणार हा चित्रपट. नक्की बघणार

अस्विन्स>>> हा येऊन बरेच दिवस झाले की. Netflix वर आधीच आला आहे. ठीक ठाक हॉरार आहे. अजून चांगला करता आला असता. त्या दंतकथेचा वापर जास्ती करता आला असता

जबर्रदस्त! हा तर मुलांनाही नक्की दाखवणार
>>>
हो, आमचाही तोच प्लॅन आहे. राजकुमार राव ने जबरदस्त काम केलेला दिसतेय आणि APJ सरांचे उल्लेख डोळ्यात पाणी आणतात.

स्वरगंधर्व सुधीर फडके
https://www.youtube.com/watch?v=kMWpBomkH-k

सुनील बर्वेने जबरी काम केलेले दिसते. सुधीर फडक्यांचाच प्लेबॅक असल्याने असेल पण काही सीन्स मधे हुबेहूब तेच वाटतात. मॅनरिजम, गातानाच्या हालचाली वगैरे अगदी अचूक पकड्लेले दिसते. एक ट्रेलर पाहिल्यावर सगळेच पाहिले आणि ऑलरेडी २-३ वेळा पाहिलेत.

Pages