Submitted by स्वाती_आंबोळे on 5 February, 2024 - 09:11
ललित कला केंद्रातील विद्यार्थी सादर करत असलेलं एक नाटक हिंदू देवदेवतांचा अपमान करत असल्याचं कारण देऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. नाटकाशी संबंधित असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना अटक करण्यात आलं.
सोशल मीडिआवरच्या पोस्ट्स वाचून मला इतकंच कळलं.
मला खालील प्रश्न पडले, कोणाला यासंदर्भात माहिती असेल तर कृपया सांगा:
त्या नाटकात नक्की अपमानास्पद असं काय होतं?
या प्रसंगी मारहाण झाली का? कोणी सुरू केली?
अटक कोणत्या कायद्याखाली झाली?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळी चर्चा वाचली. बर्याच
सगळी चर्चा वाचली. बर्याच जणांनी अत्यंत प्रगल्भ मुद्दे मांडले आहेत तेही मुद्देसूदरित्या. विशेषत: फारएण्ड आणि साजिरा यांच्या पोस्टी फार आवडल्या. मला इतकं मुद्देसूद नीटनेटकं लिहिता येत नाही तरीपण संबंधित प्रसंगाच्या निमित्तानं जे जुनेच उद्वेग आणि प्रश्न मनात उद्भवताहेत ते इथं लिहावे असं वाटतं.
भारतीय संस्कृती, धर्म आणि परंपरांच्या नावानं उठसूट गळे काढणार्यांची संख्या अचानक विलक्षणरित्या वाढलीय. पण यातल्या किती लोकांना खरंच माहित्येय आपण कशाबद्दल बोलतोय? आजपासून जवळ ५ ते ६ हजार वर्षांपूर्वी या भूमीत सुरू झालेला तात्त्विक विचारांचा आणि भारतीय दर्शनाचा अभिमान वाटावा असा इतिहास आहे हा! पाश्चात्त्य जगात पहिल्या जाणत्या तत्त्ववेत्त्याची नोंद झाली तेंव्हा आपल्याकडे चारही वेद आणि उपनिषदांचे लिखाण पूर्णही झाले होते. ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म या संकल्पनांवर भरपूर मिमांसा, तर्क-वितर्क आणि प्रगल्भ वाद-विवाद इथेच घडत होते. विश्वातले सर्वात प्राचिन तत्त्ववेत्ते या धर्मात घडले. आणि हो - चार्वाक दर्शनही इथेच पहिल्यांदा रुजले आणि आपल्या संस्कृतित तेही एक महत्त्वाचे दर्शन मानले गेलेय. चार्वाक हे पहिले संपूर्ण नास्तिक दर्शन होते ज्यांनी वेदांमधील शास्त्र प्रमाण मानायचे नाकारले आणि ईश्वर, आत्मा वगैरे सगळ्या संकल्पना धुडकावून लावल्या. त्यांच्यावर भरपूर टिका झालीच अर्थात पण तशी ती इतरही सगळ्याच दर्शनांवर झालीच.
कधी विचार केला का की तत्त्वचिंतन, स्थापत्त्य, कला, विज्ञान या सगळ्यात नेमका हाच समाज इतका पुढारलेला का होता? कारण ते भरपूर अभ्यास करण्याचं, चिंतन करण्याचं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य इथल्या अनेक बुद्धिमान व्यक्तिंना त्या काळानं दिलं. सूर्य आणि ग्रहमाला, कालगणना हे असलं काही लोकांनी आधी कधी ऐकलं-पाहिलेलं नसलेलं कुणी समोर मांडलं म्हणून त्या माणसाला फासावर दिलं गेलं नाही किंवा ईश्वराच्या अस्तित्त्वावर चर्चा केली म्हणून विष प्यायला लावलं गेलं नाही कुणाला. उल्टं-सुल्टं, महत्त्वाचं-बिनमहत्त्वाचं, तार्किक-अतार्किक, पटणारं-न पटणारं.... कसंही असेल तरी प्रत्त्येकाचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे. व्यक्त होणार्यानं न भिता व्यक्त झालंच पाहिजे. हीच खरंतर आपली संस्कृती नाही का? आणि ज्याचा अभिमान वाटावा तीच सहिष्णूता आता आपल्याला आपली कमजोरी का वाटू लागलीय?
म्हणजे आपण मुस्लिमांचा द्वेश करतो - का? तर ते फार कट्टर आणि असहिष्णू आहेत म्हणून. बर्याच प्रमाणात ते खरंही आहेच. आणि त्याचवेळी आपण स्वत: कट्टर का होत नाही असं भोकाड पसरतो? ज्यांच्या झापडबंदपणाची आपण घृणा करतो त्यांच्यासारखंच स्वत: होऊ बघतो? गंमत आहे.
उलट ज्या कारणांनी आपली समृद्ध संस्कृती भविष्य पाहू शकली नाही ती कारणं निस्तरली पाहिजेत. काही वर्गांपूरतेच मर्यादित ठेवले गेलेले ज्ञान नामशेष झाले. ते जनसामान्यांत वाटले गेले असते तर शाश्वत झाले असते. ती प्रक्रीय खर्या अर्थानं एकोणिसाव्या शतकात सुरू झाली तर त्यालाही आडवं घातलं जातंच आहे. आपल्याकडे अयोध्येच्या राममंदिराचे पुनरुज्जिवन मोठ्या धडाक्यात होते पण नालंदा विद्यापिठाला, तिथल्या ग्रंथालयाला पुन्हा ते पूर्वीचे तेज मिळवून देण्याचे स्वप्न या देशात कुणालाच पडत नाही हेच दुर्देव आहे. असो.
दुर्दैवाने जाओ पहले उस आदमी
दुर्दैवाने जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ म्हणत धागा हिंदू मुस्लिमकडे जात आहे.
हेच नको होते मला.
नका खतपाणी देऊ अश्या विषयांना.
अश्याने राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येते..
मुग्धमानसी, अतिशय सुंदर
मुग्धमानसी, अतिशय सुंदर पोस्त!
ज्यांच्या झापडबंदपणाची आपण घृणा करतो त्यांच्यासारखंच स्वत: व्हावे म्हणून चेकाळणारे बव्हंशी ब्राह्मण व स्यूडो ब्राह्मण असतात त्यांचा कावा असा असतो की एकदा आपला धर्मही झापडबंद झाला की गेली काही दशके झालेल्या सुधारणा अन डू करता येतील व उतरंडीतले आपले सर्वोच्च स्थान पुन्हा मिळेल. शाफुआ वर वारंवार चिखलफेक हेही त्याचेच उदाहरण. साने गुरुजींसारख्या निरलस व्यक्तीमत्वावरही चिखलफेक, कारण त्यांच्या प्रयत्नाने पंढरपूर अस्पृश्याना खुले झाले व मंदीर विटाळले !
अनेकांची टेप एकाच ठिकाणी अडकलेली आहे. "त्यांचा" पण अपमान करून दाखवा / केला तर तुमची हीच भूमिका असेल का(नसेलच) ?
व्हाइटहॅट यांची टेप एकाच
व्हाइटहॅट यांची टेप एकाच ठिकाणी अडकलेली आहे. "त्यांचा" पण अपमान करून दाखवा / केला तर तुमची हीच भूमिका असेल का(नसेलच) ?
कुणीही महापुरुष असू देत भूमिका हीच असेल असे अनेकांनी सांगून पण पुन्हा तेच तेच लिहिण्याचे काय प्रयोजन आहे हे कळण्यापलिकडे आहे!
चला , पण अकोल्यात कुणीतरी तुमची इच्छा पूर्ण केलेली दिसते. ती बातमी समोर आलेली नाही म्हणून या चर्चेत आली नाही पण होय तिथेही हीच भूमिका आहे. तिथेही झुंडशाही झालेली असेल ,हाणामारीने नाटक बंद पाडणे हे झालेले असेल तर तेही चूकच आहे. कुणीही खरे पुरोगामी लोक हीच भूमिका घेतील . यात इतके अविश्वसनीय का वाटते आहे?
व्हाइटहॅट यांची टेप एकाच
डबल पोस्ट.
त्यांचा अपमान करून दाखवा, हे
त्यांचा अपमान करून दाखवा, हे आवाहन मला मजेशीर वाटतं. भावना दुखावून घेऊ नका, असं सांगणाऱ्या लोकांच्या खांद्यावर बंदूक का ठेवता? मुळात अपमान म्हणजे काय, हेही तुम्हीच ठरवणार. तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याचा वापर करून तुमच्या लेखी ते जे कोण आहेत, त्यांच्याबद्दल बोला. आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू.
>>>
>>>
छान निरिक्षण आणि उत्तम विवेचन फिबां.
तुमच्या आणि साजिरा यांच्या पोस्टमुळे मला तरी अजुन एक दॄष्टिकोन मिळाला या सगळ्याकडे बघण्याचा.
<<<
अनुमोदन!
>>>
बट यु आर म्हणिंग राईट इथला एकंदरीतच सूर बघता मला पटले आहे की इथे काहींना हा मुद्दा पॉलिटीसाईझ करायचा असावा असे वाटते आहे तर बहुतेकांना तात्वीक चर्चेत रस दिसतो आहे.
उगाच वेळ वाया घालवला मी
<<<
नाही, हर्पेन, तुमचे मुद्देही रास्त आहेत, आपले या घटनेकडे बघण्याचे दृष्टीकोन निराळे आहेत इतकंच. हा वेळ नक्की वाया गेला नाही.
माझ्या अज्ञानातून/एकांगी दृष्टीकोनातून आलेल्या पोस्टमुळे तुम्ही दुखावला गेलात बहुधा, त्यासाठी मी क्षमा मागते.
मैत्रेयीला अनुमोदन.
अकोल्यातला प्रकारही तितकाच निषेधार्ह आहे. पण त्याबद्दल इथे लिहिणार्यांची भूमिका गुळमुळीतच असणार, असं कोणी काही लिहायच्या आतच ठरवून आणि त्यावर हसूनही मोकळी झालेली दिसतात मंडळी. हे अजब आहे!
पण निदान अकोल्यातल्या घटनेमुळे व्हाइटहॅट यांना थोडासा दिलासा मिळाला असेल अशी मला आशा आहे. मला व्यक्तिशः दोन्ही घटनांमुळे तितकंच वाईट वाटलं. कालपासून मला 'दुसरे' आणि 'समोरचे' या शब्दांचा आवाका केवढा मोठा आहे याची भयप्रद जाणीव झाली आहे.
चकितचंदूंचं असंच होतं.
चिनूक्स, ते निवेदन आणि लोकसत्तेतला लेख इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. अवघड आहे खरंच!
गुस्ताखे रसूल की एक ही सजा
गुस्ताखे रसूल की एक ही सजा
सर तन से जुदा सर तन से जुदा!
अशा घोषणा मुस्लिम समुदायात अनेकदा ऐकू येतात. पाकिस्तानात तर जय श्रीराम जितक्या उत्साहात म्हटले जाते तितक्या उत्साहात हा मंत्र म्हटला जातो. भारतातही ह्या घोषणा दिल्या जातात. अनेकदा ही निव्वळ घोषणा नाही तर तशी प्रत्यक्ष कृती करून दाखवणारे महाभाग भारत आणि पाकिस्तानात अनेकदा दिसलेले आहेत.
ह्या भावनेला स्वतंत्र भारतातही खतपाणीच घातले गेले आहे. मुस्लिमांच्या भावना अगदी हळूवार जपण्याकडेच भारतीय सरकारचा कल राहिला आहे. सॅटानिक व्हर्सेस हे एक ठळक उदाहरण आहे. पण निकाह हा सिनेमा, गुलाम ए मुस्तफा हा सिनेमा, हम सिनेमातील जुम्मा चुम्मा नामक भंकस गाणे ह्या प्रसंगीही सरकार नमते घेऊन संबंधित गोष्टींवर बंदी घालताना दिसते.
ह्यातून एक संदेश असा जातो की असहिष्णू असणे म्हणजे ताकदवान असणे. लोकांनी आपल्याला घाबरून असणे. उलट सहिष्णू असणे म्हणजे दुबळेपणा. आपल्या देवाची विटंबना, टिंगल, अपमान सहन करणे म्हणजे सहिष्णूता नसून दुबळेपणा आहे.
आम्ही बहुसंख्य असताना, आमचा विचार समजून घेणारे, आमच्या बाजूचे सरकार असताना आम्ही असा दुबळेपणा का दाखवायचा? केवळ आम्ही हिंदू आहोत म्हणून पडती बाजू का घ्यायची? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
ते मुस्लिम वाईट्ट वाईट्ट आहेत हं, पण तुम्ही नका तसे बनू. ते तालिबान आणि आयसिस कसे वाईट्ट वाईट्ट आहेत बघितलेत ना? तुम्हाला तसे व्हायचे आहे का? वगैरे वगैरे समजावणीच्या सुरात सांगितले जाते. पण समस्या अशी आहे की मुस्लिम धर्माविरुद्ध बोलले की अफगाणी तालिबान आणि इराकी/सिरियन आयसिस नाही तर शेजारचा पंक्चरवाला उस्मान आणि भंगारवाला नवाब असले लोकही खवळून उठतात आणि ते करणार्याचा गळा चिरायला एका पायावर तयार असतात.
ह्याचे खरे उत्तर असे असायला हवे की तुम्ही तुमच्या धर्माचा देवाचा अपमान सहन कराच. पण आम्ही कुठल्याही धर्माविरुद्ध कुणीही बोलू शकेल ह्याचे स्वातंत्र्य देऊ. त्याला विरोध करणार्या लोकांना जन्माची अद्दल घडवू. सर तन से जुदा वगैरे घोषणा देणारे हिंसेला चिथावणी देत आहेत म्हणून त्यांच्यावर कायदा वापरुन शक्य तितकी कडक कारवाई करू. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे पूर्ण असावे नाहीतर त्याला अर्थ नाही.
मुग्धामानसी, विकु, मै, चिन्मय
मुग्धामानसी, विकु, मै, चिन्मय सगळ्यांना +१
हर्पेनचा सुतावरुन स्वर्ग/ एक्स्टापोलेशनची घाई मुद्दा ही बॅक ऑफ इ माईंड कायम ठेवायचा प्रयत्न करेन.
अकोल्याचा अर्थातच निषेध.
इथे फक्त तात्विक चर्चा करायची
इथे फक्त तात्विक चर्चा करायची आहे का ? >> गल्लत नको.
अकोल्यातला प्रकारही तितकाच
अकोल्यातला प्रकारही तितकाच निषेधार्ह आहे. पण त्याबद्दल इथे लिहिणार्यांची भूमिका गुळमुळीतच असणार, असं कोणी काही लिहायच्या आतच ठरवून आणि त्यावर हसूनही मोकळी झालेली दिसतात मंडळी. हे अजब आहे! >>>> स्वाती, त्यालाही हिस्टरी आहे. कारण इथेच अनेक बाफवर अशा घटनांमधे "अहो यांनीच त्यांना डिवचले असणार" असे आधीच गृहीत धरून मोकळे होण्याचेही प्रकार झाले आहेत.
अर्थात यांनी त्यांना व त्यांनी यांना डिवचणे व नंतर दंगल होणे हे कॉमन आहे. हे इन्फाइनाइट लूप आहे
विकु ब्राह्मणांना सरसकट "थ्रो अंडर द बस" करायला सदैव तत्पर असतात
मंदिरातील दक्षिणा काय, इथे वरचा उल्लेख काय. विकु इतर सोशल नेटवर्क्सही पाहा. या घटनेला होणारा विरोध सरसकट आहे. असंख्य पब्लिक असे आहे की ज्यांना याचा मनापासून राग येतो. तो रागही खरा आहे. पण यातील अनेकांना नीट समजावले तर समजते. असे ईशनिंदेचे कायदे आणले तर उद्या कोणीही उपटसुंभ तुम्हाला गैर न वाटणार्या उल्लेखालाही आक्षेप घेउन "पैलवानाचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य" सादर करेल वगैरे सांगितले की हे मॅटर वाटते तितके सोपे नाही हे त्यांच्या लक्षात येते.
सर्वांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून या गोष्टी राग आला तरी का दुर्लक्षित करायच्या हे त्यांना माहीत नसते. शार्ली हेब्दो मधे मर्डर्स होतात, हिंदी पिक्चर मधे एकाही मुस्लिम सिम्बॉल्स्ना टच सुद्धा केला जात नाही व हिंदूंच्या प्रतिमांबद्दल टोटल ओपन फील्ड असते हे त्यांना दिसते. त्यावर "त्यांच्या बाजूने" नीट समजावणारे कोणी नाहीत. जे समजावणारे आहेत कायम उच्चासनी, कॉण्डिसेण्डिंग पोस्ट्स टाकत असतात, किंवा तु.क. उत्तरे देतात. त्यांना या लोकांनी कधीच झिडकारले आहे. त्यांचे हे लोक कधीही ऐकणार नाहीत. अमेरिकेत एमएसएनबीसी वर मागा लोकांना शिकवण्यासारखे टोटल पॉइंटलेस आहे ते.
इथे फक्त तात्विक चर्चा करायची
इथे फक्त तात्विक चर्चा करायची आहे का ? >> गल्लत नको. >>> +१
याच्यावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य काय असावे हा व पोरांनी स्वतःला धोक्यात घालू नये म्हणून कसे वागावे हा वडिलकीचा सल्ला - हे दोन्ही खूप वेगळे विषय आहेत. स्वतंत्र पोस्टींमधे लिहिले तर गल्लत होणार नाही इतकेच. उदा - पैलवानाचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य तुझ्या पोस्टमधे वाचून मला आश्चर्य वाटले होते. पण ते जर या मुलांना सांभाळून राहा अशा अर्थाने लिहीले असेल तर बरोबर आहे. पण अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या दृष्टीने असेल तर चूक आहे.
बाय द वे, हर्पेन, मामी -
बाय द वे, हर्पेन, मामी - "भारतातील कायदा व सुव्यवस्था" बद्दल च्या स्वातीच्या पोस्टचा अर्थ मी असा काढला होता - "अभाविपला थेट अॅक्शन घेण्याची गरज का पडली? विद्यापीठ ऑथोरिटीज, पोलिस व सरकार यांच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ते करू शकत होते". का. व सु. इतकी बिघडली आहे की सरकारच्याच संघटनेला कायदाबाह्य अॅक्शन घ्यावी लागली - असा तो प्रश्न होता. त्याचे उत्तर "नाही" हे क्लिअर आहे. र्हिटोरिकल प्रश्न होता तो.
>>> त्यालाही हिस्टरी आहे.
>>> त्यालाही हिस्टरी आहे. कारण इथेच अनेक बाफवर अशा घटनांमधे "अहो यांनीच त्यांना डिवचले असणार" असे आधीच गृहीत धरून मोकळे होण्याचेही प्रकार झाले आहेत.
मला कल्पना नव्हती, धन्यवाद.
मी किती आणि कोणकोणत्या कोनांतून एव्हाना 'दुसर्या'/'समोरच्या' बाजूला उभी दिसत असेन या कल्पनेने हसू आलं.
>>> स्वातीच्या पोस्टचा अर्थ मी असा काढला होता
धन्यवाद, फा. असाच होता.
मला कल्पना नव्हती, धन्यवाद.
मला कल्पना नव्हती, धन्यवाद.
मलाही नव्हती.
मला ज्यांच्याबद्दल आदर आहे अशा ब्राह्मणांची यादी फार मोठी आहे. त्यामुळे मी ब्राह्मणांना सरसकट "थ्रो अंडर द बस" करतो हे खरे नाही. वरील घटनेत ज्यांन रामाचा अपमान दिसला व मी दिलेल्या इतर गोष्टीत दिसला नाही ते ब्राह्मण व स्यूडो ब्राह्मण यांचा संताप रामभक्तीतून आलेला नाही यावर मात्र मी ठाम आहे.
इथे सगळे "एका प्रतिष्ठित
इथे सगळे "एका प्रतिष्ठित विद्यापीठात काय घडले" यावर चर्चा करत आहेत, मते मांडत आहेत असे मी समजत होतो.
सोमीवरील अशा चर्चेत मूळ विषय सोडून आपापला प्रोपोगंडा चालवणारे, उघडपणे स्ट्रॉमॅन ऑर्गुमेंट करणारे असतात याची अर्थात जाणीव आहे.
पण या धाग्यावर आतापर्यंत झालेल्या चर्चेला नक्की तिथे काय , कसे घडले यापेक्षा मायबोलीवर पूर्वी कोण, कसे केव्हा व्यक्त झाले होते याला अधिक महत्व आहे आणि त्यानुसार लोक व्यक्त होत आहेत वगैरे आता कळले.
उद्या हकिमपेट विमानतळावर जाऊन भाकऱ्या भाजायला माणुस हवा आहे का विचारेन.
बाय द वे हॉस्टेल मधली मुले
बाय द वे हॉस्टेल मधली मुले आधीच तयार होउन बसली होती हे तरी खरे आहे का ?
आगे भी जाने ना तू
आगे भी जाने ना तू
पीछे भी आने ना तू
या धाग्यावर आतापर्यंत
या धाग्यावर आतापर्यंत झालेल्या चर्चेला नक्की तिथे काय , कसे घडले यापेक्षा मायबोलीवर पूर्वी कोण, कसे केव्हा व्यक्त झाले होते याला अधिक महत्व आहे. >> Well said.
नक्की तिथे कसे काय घडले हे
नक्की तिथे कसे काय घडले हे तिथे प्रत्यक्ष जाऊन बघणे शक्य नाही. पूनम पांडे खरंच मेली कि नाही हे घटनास्थळी जाऊन पाहून मग मायबोलीवर लिहा असा आदेश देण्यासारखे झाले.
तिथे काय घडले हे सांगणार्या भरमसाठ लिंका आलेल्या आहेत. पुरेशा आहेत.
पण या धाग्यावर आतापर्यंत
पण या धाग्यावर आतापर्यंत झालेल्या चर्चेला नक्की तिथे काय , कसे घडले यापेक्षा मायबोलीवर पूर्वी कोण, कसे केव्हा व्यक्त झाले होते याला अधिक महत्व आहे आणि त्यानुसार लोक व्यक्त होत आहेत वगैरे आता कळले.//
आता त्यात काय प्रॉब्लेम आहे? इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मुद्दा घेऊन रडणारे अनेक जण हे भाजप विरोधक म्हणजेच पर्यायाने काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांचे partisan समर्थक म्हणून इथे प्रचार करत असतात. पण आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी थिएटरमध्ये हिंसाचार करून चित्रपट बंद पाडून प्रेक्षकांना मारहाण केली तर चालते. आपल्या नेत्यासारखा दिसणारा मॉडेल घेतला म्हणून जाहिरातीवर बंदी व कंपनीवर हल्ला केलेला आवडतो. अमिताभ बच्चनचा कोणताही चित्रपट महाराष्ट्रात रिलीज होऊ देणार नाही अशी धमकी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देतात ते चालते. तो deal breaker नसतो समर्थनासाठी. आपल्या महापुरुषाबद्दल meme बनवलं की लगेच "हे पेज रिपोर्ट करा, प्रत्येक गावात केस ठोका" चालू होतं. या लबाड लोकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुळका असा खोटा आहे.त्यामुळे तो मुद्दा निघणारच आहे.
म.टा. प्रतिनिधी, नगर:
म.टा. प्रतिनिधी, नगर: ‘श्यामच्या आई’वरील विकृत मिम सोशल मिडियात व्हायरल होत आहेत. गटारी अमावस्येच्या निमित्ताने या दोघांच्या तोंडी विकृत संवाद दाखवून हे मिम व्हायरल झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचीही आता मोहीम सुरू झाली आहे. अनेकांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांना इमेल पाठविण्यात येत आहेत.
बायकोला दारूचा वास येऊ नये आणि करोना होऊ नये म्हणून काय वापरशील? यावर श्याम 'मास्क' असे उत्तर देतो. असे मिम तयार करण्यात आले आहे. याला हरकत घेण्याचे कारण म्हणजे समाजामध्ये श्यामची एक सालस संस्कारित प्रतिमेचा आदर्श निर्माण झालेला असताना असले गलिच्छ संवाद त्यांच्या तोंडी देऊन प्रतिमा कंलकित करण्याचा हा प्रयत्न असल्याकडे गृहमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
हे पण शोधलं कोणीतरी
श्यामची आई काय आहे बाय द वे? अत्र्यांचा मुव्ही आहे माहीत आहे पण ते OG बुक आहे ते fiction आहे की memoir?
आता त्यावर meme केलं म्हणून पुरोगामीना गृहमंत्रीनि लीगल कारवाई करायला हवी होती(सैया भये कोतवाल- मविआ सरकार होतं).
आणि साक्षात राम सीता आमच्या हिंदु देवतांच्याबद्दल लोकांनी गप बसायचं काय? किती sense of entitlement असावा म्हणजे.
वरचे सर्व प्रकार हे निषेधार्थ
वरचे सर्व प्रकार हे निषेधार्थ आहेत.
पण अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे खोडसाळपणा नाही. ऐतिहासिक असल्याचा आव आणून खोटारडेपणा करणे नव्हे.
अल्पसंख्याक, दुर्बल घटकांबद्दल क्षोभ निर्माण व्हावा असे स्वातंत्र्य आम्हाला हवे ही विकृती आहे. आज पाश्चात्य जगात मिश्र लोकसंख्या वाढत चालली आहे. आता तिथेही वर्णभेदविरोधी, जातपात भेदभाव विरोधी कायदे येऊ लागले आहेत. लवकरच इथल्या लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खोडसाळ कल्पना लक्षात येतील.
इथले राडे तिथे व्हायला सुरुवात झाली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फेरविचार करावा लागेल.
कोणतेही स्वातंत्र्य जबाबदारीशिवाय नसते.
त्यासाठी फक्त विवेकाची गरज असते.
एक स्त्री पात्र जे पूर्ण पणे
एक स्त्री पात्र जे पूर्ण पणे हेल्दी - निरोगी - आहे. एका प्रेमळ रिलेशन शिप मध्ये आहे. व पुढे जाउन तिला दोन मुले होणार आहेत. अश्या पात्राला विडी पाजवायचा सीन किती अभद्र वाटतो. तंबाखू चे दुष्परिणाम संहिता लेखकास माहीत नसेल का. बर लेखक विद्यार्थी असेल तर वरुन सुपरवाइज करणारे ह्यांना लक्षात यायला हवे होते. भारतात सिनेमात /सिरीअल मध्ये स्मोकिन्ग दाखवायला बरोबर नोटिफिकेशन द्यावे लागते. स्मोकिन्ग इज हार्म्फुल टु हेल्थ. ही वॉर्निन्ग प्रयोगा आधी दिली होती का? मार्क कापले असते का ह्या व्हायोलेशन बद्दल.
https://www.emro.who.int/tfi
https://www.emro.who.int/tfi/news/tobacco-scenes-films.html हे बघा.
भारतात सिनेमात /सिरीअल मध्ये
भारतात सिनेमात /सिरीअल मध्ये स्मोकिन्ग दाखवायला बरोबर नोटिफिकेशन द्यावे लागते
>>>>
हो, या भावना दुखावायच्या चर्चेत हा मुद्दा राहिला बाजूला.
Smoking दाखवताना तसा इशारा देतात कारण धूम्रपान या व्यसनाची जाहिरात होऊ नये. जर देवाचे काम करणारे कलाकार सुद्धा पडद्यामागे धूम्रपान करतात असे दाखवले तर ते आणखी घातक आणि धूम्रपान प्रचारक झाले.
पण असो,
एकूणच अशी नाटके बसवणाऱ्याना सामाजिक भान जास्त असेल असे वाटत नाही.
पण कोणीतरी हवे या पोरांना मार्गदर्शन करणारे.
पण तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर तुम्ही सामाजिक भान न राखता कसेही वागले तर चालते असे त्यांचे मार्गदर्शक गुरुजन असतील तर खरेच अवघड आहे !
त्यानंतर जो राडा झाला तो निषेधार्ह आहे. पण म्हणून यांनी जे केले ते कौतुकास्पद होत नाही.
त्यामुळे त्यांना समर्थन देताना फक्त त्यांना झालेल्या मारहाणी किंवा पोलिसांनी केलेल्या अटके बद्दल द्या.. त्या आधी जे त्यांनी केले ते मात्र योग्यच केले असा चुकीचा समज त्यांचा होऊ नये याची काळजी घ्या. अन्यथा नवीन पिढी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे योग्य अयोग्य न बघता कुठल्याही गोष्टी करायचे स्वातंत्र्य असे समजेल...
धूम्रपान करण्यामुळे लोकांच्या
धूम्रपान करण्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील म्हणून नोट दाखवतात का?
धूम्रपान करण्यामुळे लोकांच्या
धूम्रपान करण्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील म्हणून नोट दाखवतात का?> मग तिथे प्राध्यापक कशाला बसवला आहे.
धूम्रपानाची नोट दाखवण्याचा
धूम्रपानाची नोट दाखवण्याचा आणि भादुचा संबंध आहे कि कर्करोग जागृती आणि प्रतिबंध अभियानाचा भाग म्हणून ते धोरण स्वीकारले आहे?
तुलना होऊ शकते का? होत असल्यास हरकत नाही.
कर्करोग महत्त्वाचा नाही का?
कर्करोग महत्त्वाचा नाही का?
त्याबद्दल सामाजिक भान राखले नाही तरी चालते का?
शेजारच्या मुलीला (किंवा मुलगाही चालेल) सिगारेट पिताना काकांनी पाहिले आणि तिला म्हटले नको पिऊ बाळ त्याने कॅन्सर होतो..
त्यावर ती बोलणार मी सज्ञान आहे....
माय लाईफ माय चॉईस....
व्हाई शूल्ड बॉईज हवे ऑल द फन...
ओके! तिने म्हटलेले हे सारे बरोबरच आहे.. मान्य!
पण ती सिगारेट
पितेओढते हे सुद्धा चूकच आहे हे मान्य करायला इतके अवघड आहे का?Pages