Submitted by अश्विनीमामी on 29 January, 2024 - 02:40
तर मं डळी पुणे किंवा नाशीक येथे २ बीएच के २ रेस्ट रूम वाला फ्लॅट विकत घेणे आहे. जाणकार माहिती द्या.
१) कोणता एरिआ चांगला? मुंबई हून कॅब ने आरामात येता यावे. व मला ट्रीटमेंट ला ह्या घरातून मुंबईस जावे लागेल. ते जमावे.
२) काय कागद पत्रे जमवावी?
३) होम लोन कुठून घेउ?
४) माझी गरज ७५० - १००० स्क्वे फूट आहे. अगदीच अंधेरी स्टाइल बारका नाका एव्ढा फ्लॅट नको.
५) इन्स्टा वर फार जहिराती येतात पण त्या खर्या असतात का?
६) अजून काय विचारावे बिल्डर ला/ री सेलर ला?
७) मला रीसेल/ रेडी टू मुव्ह इन फ्लॅट हवा आहे. नव्या स्कीम नको. साइट वरौन माहिती विचारले की हजारो फोन व मेसेजेस येत राहतात.
तुमच्या काही सूचना असल्यास नक्की लिहा. मला मदतच होईल. धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमा, अथश्री सारखा पर्यायही
अमा, अथश्री सारखा पर्यायही ध्यानात घ्यावा… आम्ही एका नातेवाईकाकरिता बघत होतो व आपल्यावर एकटं राहायची वेळ आली तर हे डोक्यात घेऊन बघत होतो तर तो पर्याय योग्य वाटला. वर कोणीतरी लिहीलंय अथश्री बावधनमध्ये जागा नाहीय्. भूगावमध्ये विकत व भाड्याने आहेत इतरही ठिकाणी असतील आम्ही ह्या दोन ठिकाणी बघितलं. त्यांच्या जाहिरातीवरून जेष्ठांकरिता चांगले वाटले. मुख्य म्हणजे काही मेडिकल इमर्जन्सी आली तत्काळ सेवा उपलब्ध आहे. भाड्याने राहून पहायचं आवडलं तर विकत किंवा भाड्यानेच राहता येईल वन बीएचकेमध्ये. स्वयंपाक करावासा वाटला तर करायचा नाहीतर तिथल्या किचनमध्ये जेवायचं. युट्युबवर इगतपुरीचा रेको आला ते खूप छान वाटलं पण महाग. कोल्हापूरचा रेको आला तोही छान वाटला पण प्रत्यक्ष पहायवा हवे. अथश्रीसारखे अजूनही असतील. पनवेलला खूप स्वस्त वृध्दाश्रम व कुष्ठरोगाश्रम आहे तिथे पिकनिकला गेलो होतो तोही चांगला वाटला.
नाशकात ओला उबर स्टेशनात येऊ
नाशकात ओला उबर स्टेशनात येऊ देत नाहीत (कारण रिक्षाचालकांची अरेरावी), बाहेर पेट्रोलपंपापर्यंत चालत जावे लागते, तो प्रकार अद्याप सुरू आहे की आता येऊ देतात.
पुणे आणि मुंबईत तुलना केल्यास
पुणे आणि मुंबईत तुलना केल्यास, मुंबईत फक्तं घरं महाग आहेत. पुण्यात एकंदरीत कॉस्ट ऑफ लिव्हिंग जास्त आहे. तुम्ही वर लिहिल्यानुसार पुण्यात राहून ट्रिटमेंट साठी मुंबईला जायचे असेल तर वाकड, पुनावळे, बाणेर, पाषाण, बावधन हे हायवे लगतचे भाग सोयीचे वाटतात. बिल्डर, सोसायटी आणि सोयींनुसार किमती मध्ये फरक आहे.
परांजपे सारख्या बिल्डरच्या फ्लॅट्सच्या किमती आसपासच्या इतरांपेक्षा नेहमीच जास्त असतात. अथश्री सारख्या ज्येष्ठ नागरिकांच्या सोसायट्या हायवे लगतच्या बालेवाडी, बाणेर, बावधन भागात आहेत. तिथे राहण्यासाठी किमान वय 60 वर्षे असावे लागते. सोयी सुविधांचा विचार केला तर हे प्रोजेक्ट एक नंबर आहेत.
उंड्री, पिसोळी, खराडी हे भाग मुंबईला वरचेवर जाण्यासाठी सोयीचे नाहीत.
डीसेंट सोसायटीत दोन बेडरूमचे घर घेण्यासाठी किमान 75 लाख बजेट ठेवावे लागेल.
अमा ट्रीटमेंट साठी मुंबईला
अमा ट्रीटमेंट साठी मुंबईला किती वेळा जावे लागेल आणि त्याची फ्रिक्वेन्सी पुढे कमी कमी होत जाणार का सगळा विचार करून निर्णय घेत असाल. पण शिफ्टहोणार असाल तर ट्रीटमेंटच पुण्यात शिफ्ट नाही का करता येणार?
कारण जाऊ कॅबने मुंबईला केव्हाही असे आता वाटते, पण नंतर ती एक कटकट/गैरसोय वाटू/होऊ शकते.
ट्रीटमेंटलाही पुण्यात पर्यायी
ट्रीटमेंटलाही पुण्यात पर्यायी डॉ सुचवतीलच मुंबई चे डॉ.पुण्यात बरेच बेस्ट डॉक्टर्स आहेत या स्पेशालिटीज चे.
गणीशम फेज 2 पिंपळे सौदागर(हायवे वरची, फेज 1 गल्लीत आहे तीही चांगली आहे) ही पण चांगली सोसायटी आहे.सोसायटी उत्सव, उपक्रम खूप उत्साहात होत असतात.सोसायटी च्या आत सुंदर गणेश मंदिर, आजूबाजूला बरीच हॉस्पिटल आणि टेस्टिंग लॅब आणि हॉटेल, 100 मीटर वर गोविंद गार्डन बी आर टी बस स्टॉप(हेहे, कोणाला वाटेल मीच बिल्डर आहे या सोसायटी ची.)
ज्युपिटर हॉस्पिटल एरियात ऋतूपर्ण सोसायटी आहे, ती पण बाहेरून छान दिसते.
अनु, flat उपलब्ध आहेत का
अनु, flat उपलब्ध आहेत का गणीशम मध्ये? तुम्हाला कल्पना आहे का? Resell आहे की बांधकाम सुरु आहे? जालावर मिळेल का माहिती?
बहिणीसाठी हवी आहे माहिती.
तिची family विचार करत आहे
रिसेल असेल, सोसायटी जुनी आहे
रिसेल असेल, सोसायटी जुनी आहे 10 वर्षं.
आमच्या सोसायटी मध्ये काही जणांचे फ्लॅट आहेत तिथे, विचारून सांगते.
<<ट्रीटमेंटलाही पुण्यात
<<ट्रीटमेंटलाही पुण्यात पर्यायी डॉ सुचवतीलच मुंबई चे डॉ.पुण्यात बरेच बेस्ट डॉक्टर्स आहेत या स्पेशालिटीज चे.>> असे झाल्यास उत्तम. कारण आपण हवे तेव्हा कॅब घेऊन मुंबईला जाणे वेगळे आणि एखाद्या गोष्टीसाठी ठरावीक दिवशी आणि कधी अचानक ट्रीटमेंटला जावे लागणे वेगळे.
उंद्री भाग कसा आहे ? >>>>>>
उंद्री भाग कसा आहे ? >>>>>>
विकु, मोठमोठ्या टाऊनशिप्स आहेत. मोठे बिल्डर्स आणि प्रीमियम प्रॉपर्टीज आहेत, पण शहराच्या फारच बाहेर आहे. आजुबाजु अजुन develop होते आहे. जवळपास मॉल्स आणि खाऊचीऊ दुकानं भरपूर आहेत. शहराबाहेर ' सांस्कृतिक पुणे ' पासुन दुर रहावणार असेल मराठी मंडळी नसली / हळदीकुंकवाला आमंत्रण आली नाही तरी चालणार असेल, हिंदी/इंग्लिश भाषेत मैत्री चालणार असेल तर का नाही? हा भाग विचार करू शकता. बाकी इथे Corinthian club आहेच.
पाण्याचा problem आहे कारण हा भाग आताशी पीएमसी मधे समाविष्ट झाला आहे. सगळे मोठे बिल्डर्स आणि एकूणच rich class असल्याने टँकर्स, बोअरवेल इत्यादीने गरज भागवतात. Shortage नाही, पण मुबलक ही नाही. कॅम्प किंवा सिटीत वारंवार जाणार असाल तर रस्ते मात्र फार comfortable नाहीत. भरपूर ट्रॅफिक आणि अरुंद रस्ते. पण सिटीत जायची गरज पडणार नाही एवढे मॉल्स, ग्रोसरी स्टोअर्स, हॉटेल्स आहेत. पब्लिक transport इल्ले. स्वतःची कार असणं अत्यावश्यक.
मी सुचवेन की उंड्री अलीकडे NIBM एरिया तपासा. मोठे projects येताहेत.
मुंबईत राहणे हा पर्याय नाहीये
मुंबईत राहणे हा पर्याय नाहीये का? तुमचे डॉक्टर, ट्रीटमेंट या दृष्टीने बरं पडेल आणि मुंबईची pace व efficiency पुण्यात नाही. ती इंग्रजांनी बांधलेली महानगरी आहे. आता तर जबरदस्त developed आहे.त .पुण्यात रिक्षा , कॅब वगैरे अजिबात reliable नाहीयेत. पोल्युशन प्रचंड आहे. मुंबई ती मुंबई शेवटी.
ट्रीटमेंट साठी मुंबईला जाणार हे ठीक. पण मुंबई पुणे वाहतूक कोंडी हा आता रोजचा factor आहे. म्हणजे काही नाही तर अगदी लॉंग वीकेंड आला म्हणून, जरांगेचा मोर्चा आला म्हणून, वाटेत काहीतरी अपघात झाला- अशा कोणत्याही कारणाने जॅम होतो व मुंबई सिटीत तर वेळ लागतोच.
कधी काही emergency आली तर पुण्यात कोणते डॉक्टर, हॉस्पिटल असणार आहेत ते ठरवून तिथे आसपास घर बघा. पुलं देशपांडे रिटायरमेंटनंतर जोशी का प्रयाग हॉस्पिटल का अशाच कोणत्यातरी हॉस्पिटलच्या गल्लीत शिफ्ट झाले होते ते आठवलं.
तुम्हाला कधी काही मदत लागली तर सपोर्ट सिस्टीम पुण्यात आहे का? तसं असेल तर ते नातेवाईक ज्या भागात राहतात तिथेच जवळपास घर घेतल्यास सर्वांना सोयीचं पडेल.
आणि सपोर्ट सिस्टीम मुंबईत असल्यास मुंबईतच राहायचं का हाही विचार करावा.
मुंबईतून येणाऱ्या माणसासाठी
मुंबईतून येणाऱ्या माणसासाठी पुण्यातील पब्लिक ट्रान्सपोर्ट (विशेषतः बस आणि रिक्षा) सध्या तरी नाईटमेअर आहे. मुंबईसारखी एन्ड टू एन्ड कनेक्टिव्हिटी फार कमी आहे. मेट्रो झाल्यावर माहित नाही. इव्हन ओला उबरचे राईड एक्सेप्ट करून मग कॅन्सल करण्याचे प्रमाण (ऍज कंपेअर्ड टू मुंबई) जास्त आहे.
प्लस पॉईंट - आजूबाजूला सर्वत्र भरपूर उपक्रम (ट्रेकिंग, सायकलिंग, छंद वर्ग, आकाश दर्शन, भजन मंडळ ई.) चालू असतात मुंबईत या गोष्टी ठराविक भागात कॉन्सन्ट्रेटेड आहेत. सोसायट्या बऱ्यापैकी मोठ्या असल्याने संध्याकाळी/रात्री सोसायटीमध्येच (सायकल चालवणारी/स्केटिंग करणारी मुले अंगावर आदळण्याची शक्यता सोडल्यास) निवांत वॉक, डॉग वॉक करता येऊ शकते.
पुणे चांगलं आहे रिअल इस्टेट
पुणे चांगलं आहे रिअल इस्टेट ला.मुंबई मध्ये रेंट आणि खरेदी करताना ब्लॅक दोन्ही जास्त आहे असं ऐकून आहे.
पब्लिक ट्रान्सपोर्ट च्या अडचणी आहेत.पण अगदी योग्य एरिया बघून(बस स्टेशन/डेपो जवळ) बस ने ये जा करणारे बरेच ज्ये ना/प्रि ज्ये ना/मध्यम वाईन(हे वयीन चं ऑटो करेक्ट, गंमत वाटली म्हणून तसंच ठेवतेय. मिडल एज लोक मध्यम वाईन, आणि ज्ये ना अजून छान मुरलेली ओल्ड वाईन.)
सायकल वाली/स्केट वाली मुले गाड्यावर किंवा माणसांवर आदळणे हे एकदम सर्वत्र आढळणारं दुःख आहे
धन्यवाद ट्रीटमेंट ची सोय
धन्यवाद ट्रीटमेंट ची सोय पुण्यात होउ शकेल. वांधो नथी. व माझे सोडा लेकीच्या नावावर एक फ्लॅट घेउन द्यायचा आहे. जमले तर फर्निश करुन.
माझी फार डिमांड नाही. अध श्री मध्ये भाड्याने राहुन चालेल. तिथून जागा सर्च करता येइल ना.
चांगल्या सूचना देत आहात.
मुंबई सारखी मेडिकल केअर व कनेक्टिव्हिटी कुठेच नाही हे बरोबर. पण इथले काम संपल्यावर रेंट द्यावे लागेल. ते स्वतःच्या फ्लॅट मह्ये राहिल्यास द्यावे लागणार नाही असा एक विचार आहे.
तुम्हाला लवकरात लवकर, चांगला
तुम्हाला लवकरात लवकर, चांगला रिसेल फ्लॅट मिळो.पुण्यात घर घेणे हा चांगला निर्णय आहे.याबद्दल
अजून माहिती मिळेल तशी कळवत राहेन.
अमा,
अमा,
पुणे ४ मधेच घे. इकडूनही जाता येते मुंबईला.
आणि भागवत बिल्डिंग मधे घेउन टाक म्हणजे मग कसल्याच ट्रीटमेंट ची गरज भासणार नाही.
ट्रीटमेंट ची सोय पुण्यात होउ
ट्रीटमेंट ची सोय पुण्यात होउ शकेल. वांधो नथी. व माझे सोडा लेकीच्या नावावर एक फ्लॅट घेउन द्यायचा आहे. जमले तर फर्निश करुन.>>
तसं असेल तर अगोदर डॉक्टर/ हॉस्पिटल नक्की करून मग त्या नुसार कोणत्या भागात घर घ्यायचं ते ठरवणं योग्य होईल.
औंध, बाणेर, वाकड, रावेत, हिंजवडी, पिंपळे सौ. - गुरव - निलख आणि एकंदरीतच नवीन वाढणाऱ्या भागांमध्ये कॉस्मो कल्चर जास्त आहे. कोथरूड किंवा पेठांमध्ये राहायची सवय असेल तर एकदम फरक जाणवतो. बावधन पासून कोथरुड, हायवे, पाषाण, हिंजवडी, बाणेर हे भाग जवळ आहेत.
बाकी मुंबईतील कनेक्टिव्हिटी बद्दल दुमत नाही पण मेडिकल केअर पुण्यात सुद्धा उत्तम आहे ( अभिमान, तोही जाज्वल्य! )
अथश्री जवळ्च परांजपॅ ंचा
अथश्री जवळ्च परांजपॅ ंचा ट्रायडंट प्रोजेक्ट पण चेक करा - ए आणी बी टोवर्स रेडी आहेत' जून जुलॅ मधे
अमा, सुरुवातीला रेंट करा.
अमा, सुरुवातीला रेंट करा. रहायला गेलात की तिथे राहून कुठला एरीआ तुम्हाला सोयीचा होईल हे बघणे-ठरवणे सोपे जाईल. 'लेकीसाठी' असा विचार असेल तर वर्षभरात तिलाही काय आवडत आहे त्याचा अंदाज येइल. तुम्हाला छान तुमच्या मनासारखा फ्लॅट मिळो.
मुलीच्या नावे घ्यायचं
मुलीच्या नावे घ्यायचं म्हणताहात तर असा विचार करूनही घेता येईल - तिला ज्या भागात ऑफिस आहे त्या भागात फ्लॅट.
उदा. माझ्या एका मित्रानी वाघोलीत विटीपी रिअलिटी मध्ये मात्र ३२ लाखांत २ बीएचके घेतला जेणेकरून कॉमरझोन, येरवडा पासून ते इऑन आयटी पार्क्स जवळ पडतील आणि सेम असा फ्लॅट (सिमिलर बजेट चा) तो हिंजवडी भागातही पाहतोय, जेणेकरून तिकडले ऑफिसेस जवळ पडतील.
भविष्यात पुण्यात कुठही नोकरी असली तरी त्या त्या भागात स्वतः चा फ्लॅट आणि उरलेला एक भाड्यानी देऊन ते इनकम हाताशी राहील असा विचार.
अजून एक पैसा - जर मुम्बै जवळ
अजून एक पैसा - जर मुम्बै जवळ हवी हाच निकष असेल तर माझ्या मते नाशिक जास्त उजवं. कारण कसार्यापर्यंत गेलं की लोकल कनेक्टिव्हिटी फारच चांगली आहे. तुलनेनी, (पुणे मुंबई रस्त्यापेक्षा) नासिक मुंबई शांत, कमी गर्दी चा रस्ता आहे. नाशकात फ्लॅट चे रेट्सही पुण्यापेक्षा कमी असतील.
मला वाटतं इतका सल्ला घेण्याची
मला वाटतं इतका सल्ला घेण्याची गरज नाही.
पुणे काय किंवा नाशिक काय किंवा मुंबई काय महानगर आहेत.
मेडिकल सुविधा प्रतेक शहरात आहेत.
पण मुंबई ची बरोबरी देशातील कोणतेच शहर करू शकत नाही.
ब्रिटिश लोकांनी ह्या शहराचा पाया घातला आहे आणि तो अगदी मजबूत आहे.
पुणे असू किंवा देशातील कोणते ही शहर मुंबई ची बरोबरी कधीच करू शकणार नाही .
पुणे हे सदा सर्वकाळ सार्वजनिक वाहतूकी मध्ये मागास च राहणार आहे.
राजकीय दबाव .मध्ये नियोजन चालू असल्या मुळे योग्य नियोजन बद्ध शहर पुणे कधीच बनणार नाही.
तुम्ही पुण्याचा नाद सोडा आणि मुंबई किंवा नवी मुंबई मध्येच चांगली locality बघून घर घ्या
अति प्रचंड .
अति प्रचंड .
ओवल मैदान.
क्रॉस मैदान .
आझाद मैदान.
५ km च्या area मध्ये आहेत.
एकच उंची च्या इमारती.
मोठे रस्ते.
फेरीवाल्यां साठी जागा .
Csmt सारखे भव्य रेल्वे स्टेशन.
.
किती मोठी दिव्य दृष्टी ब्रिटिश सरकार कडे होती.
. महालक्ष्मी रेस क्रॉस मैदान पण नष्ट करायला निघालेले स्व देशीय सरकार.
नियोजन बद्घ शहर निर्माण करण्याची कुवत आपल्या मध्ये बिलकुल नाही.
त्या मुळे पुणे,नाशिक सर्वोत्तम ,नियोजन बद्ध आदर्श शहर बनतील असे बिलकुल वाटत नाही
नाशिक बद्दल मी माहिती देऊ
नाशिक बद्दल मी माहिती देऊ शकेन.... मी इथे सेटल झालो आहे...... फोन वर व्यवस्थित बोलता येईल..... rupadhye@gmail.com वर मेल केल्यास फोन नंबर देईन
Thank you review. Will
Thank you review. Will connect
अमांनी माहिती द्या, म्हटले
अमांनी माहिती द्या, म्हटले आहे. पण मला काही प्रश्न पडलेत ते लिहितो. वावगे वाटल्यास सांगा - प्रतिसाद उडवेन.
निवृत्तीनंतर घर भाडे भरावे लागेल, म्हणून मालकीचं घर हवं. ते चांगलं ऐसपैस हवं. हे मुंबईत शक्य नाही म्हणून पुणे किंवा नासिक. असं दिसतं आहे.
पण निवृत्तीनंतर गृहकर्जाचे हप्ते भरावे लागतील. अनिरुद्ध यांनी गृहकर्ज घेताना वय, परतफेडीचा कालावधी , नोकरीतील शिल्लक वर्षे हे मुद्दे मांडला आहेच. गृहकर्जाचे व्याज, हफ्ते कोण भरणार आहे?
लेकीसाठी घर घ्यायचे आहे, तर ते तिच्या सोयीने, तिच्या आवडीनेही असायला हवे.
भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा कर्ज काढून घर घेणे हा निर्णय निव्वळ आर्थिक लाभहानीचा विचार करता आतबट्ट्याचा आहे. अर्थात हा निर्णय घेताना भावनिक आणि अर्थेतर मुद्देही असतात हे मान्य आहे. त्यांचं वेटेज जास्त असू शकतं. दोन्हीची तुलना व्हावी.
भरत, अगदी हेच लिहायचं होतं
भरत, अगदी हेच लिहायचं होतं आणि वावगं वाटू नये म्हणूनच लिहीलं नाही. मुलं कुठे राहणार हे जर का नक्की असेल तर ठीक आहे पण आजकाल मुलं नोकरी बदलत असतात. परदेशी मुलं आहेत व नागपुरात आमच्या सोसायटीत चार घरं बंद आहेत. मुलांना इथे येऊन विकायला सवड , उर्जा नाही. घरापेक्षा पैसे ठेवणं सोयीचं हेमावैम..
हा सर्व विचार झालाच असेल,
हा सर्व विचार झालाच असेल, थोडंफार अर्निंग मेम्बर च्या नावे लोन, थोडे फंड असं करता येईलच. ओळखीत काही जणांनी केलं आहे.
उत्तम पॉईंट मांडला आहे. बरेच
उत्तम पॉईंट मांडला आहे. बरेच चार्टर्ड अकाउंटंट हा विचार मांडतात. अमा यांनी याबद्दल विचार केला असावा असे वाटते.
अनु म्हणतात तसा ऑप्शन बरेचदा पालक वापरतात.
मुलांच्या हातात डिस्पोजेबल इन्कम असेल आणि इतर काहीही फायनान्शिअल ऑब्लिगेशन (एजुकेशन लोन/ घरात मदत करण्याची गरज ई.) नसेल [ आणि/किंवा मुलांची लाइफस्टाईल पालकांच्या दृष्टीने खर्चिक होत असेल तर त्याला थोडा आळा बसावा] तर एक चांगला मार्ग म्हणून पालकांनी डाउनपेमेंट करून मुलांच्या नावे फ्लॅट घेऊन त्यांना ई एम आय भरायला लावल्याची दोन उदाहरणे नुकतीच ओळखीत घडली.
टेक्निकली हे मुलांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर आक्रमण/टिपिकल ममव विचारसरणी वगैरे वाटू शकेल. पण मुलांनी लोन पेपर्सवर सह्या केल्या असल्यामुळे त्यांची तत्वतः मान्यता असावी असे गृहीत धरूया.
धन्यवाद मला हीच चर्चा
धन्यवाद मला हीच चर्चा अपेक्षित आहे.
पालकांनी डाउनपेमेंट करून मुलांच्या नावे फ्लॅट घेऊन त्यांना ई एम आय ची भरायला लावल्याचे उदाहरण नुकतेच ओळखीत घडले.>> असे थोडे फार विचार आहेत. मी आहे तो परेन्त इ एम आय भरेन.
मी २०१२ मध्ये मुंबईत आले तेव्हा कमी किमतीत फ्लॅट उपलब्ध होते. पण तेव्हा मुलगी दहवीच्या ही खाली होती. नुकताच बिझनेस सोडला होता व कसलीच शास्वती नव्हती. मी इथे तीन महिन्याच्या वर टिकेन असे कोणालाही वाटले नाही. तेव्हा फ्लॅट घ्याय्चे सुचले नाही.
सल्ला देणारे कोणीच नव्हते व
सल्ला देणारे कोणीच नव्हते व तेव्हा तिचे शिक्षण ही प्रायोरिटी होती. आता मी डाउन पेमेंट करु शकते व इ एम आय भरु शकते. पण घर व लोन तिच्या नावावर . मी आहे तितके दिव्स तिथे राहणार असा बेसिक विचार आहे. बरोबर आहे का काही घोटाळे होउ शकतात?
Pages