तुम्ही कधी टीव्हीवर झळकला आहात का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 January, 2024 - 07:26

तुमचा कधी वर्तमानपत्रात फोटो आला आहे का? असा एक धागा मायबोलीवर यापुर्वीच आला आहे.
तर आता त्याच धाग्याला अपग्रेड करून तुम्ही कधी टीव्हीवर झळकला आहात का हा धागा काढत आहे.

धागा काढायचे तात्कालिक कारण म्हणजे नुकतेच माझी मुलगी टीव्हीवर झळकली. पराक्रम म्हणाल तर एक स्त्री दुसर्‍या स्त्रियांच्या सुखदुखात सामील होताना कॅमेर्‍यात कैद झाली Happy

त्याचा विडिओ ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=uQkWOlM2qrI

मी स्वत: क्रिकेटचा प्रचंड मोठा चाहता आणि (feminism) स्त्रीवादाचा पुरस्कर्ता असल्याने जितक्या आवडीने पुरुष संघाच्या क्रिकेट मॅचेस पाहतो तितक्याच आवडीने महिला संघाच्या देखील बघतो. यातूनच लेकीला सुद्धा क्रिकेटची गोडी लागली. ती क्रिकेट बघण्यापेक्षा क्रिकेट खेळणे जास्त पसंद करते. पण अध्येमध्ये स्कोअर काय झाला, कोण जिंकतेय, कोहलीने किती मारले वगैरे चौकशी करत असते. काही दिवसांपुर्वी माझ्याकडे आली आणि म्हणाली की भारत-ऑस्ट्रेलिया महिलांचे क्रिकेट सामने होणार आहेत. ते मला बघायला जायचे आहे...

ठिक आहे जाऊ म्हटले. तसे तिने अजून दोनतीन मैत्रीणी जमवल्या. पण अचानक उद्भवलेल्या परीस्थितीमुळे मला जाता आले नाही. अजून एक-दोन मैत्रीणींचे वडील सोबत असल्याने तशी चिंता नव्हती. तरी आपल्याला जाता आले नाही याची चुटपुट लागली होतीच. पण ती परत आल्यावर मला समजले की मी काय गमावले होते. वरच्या व्हिडिओत बघून ते समजेलच...

पण मी सुद्धा जर तिच्यासोबत टीव्हीवर झळकलो असतो तर ती माझ्या आयुष्यातली पहिली नाही तर दुसरी वेळ असती.

विजेटीआय कॉलेजला डिप्लोमा करत असतानाची गोष्ट. तेव्हा जितेंद्र जोशीचा कॅम्पस म्हणून एक कार्यक्रम गाजत होता. कार्यक्रमाची रुपरेषा अशी की दर एपिसोडला एखाद्या कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊन तिथल्या पोरांबतबत धमाल करायची. आमच्या कॉलेजला ईतकी धमाल केली की त्याचे दोन एपिसोड बनले. कालपासून युट्यूबवर शोधत आहे. ईतर बरेच सापडले, पण आमचा नेमका सापडत नाहीयेत.

असो, तर आम्हीही गाणी म्हटली, नाच केला, दंगा घातला. आमच्या ग्रूपचे जय जय महाराष्टृ माझा गाणे कार्यक्रमात पुर्ण दाखवले गेले. आमच्या मुलींनी एका हिंदी गाण्याला मराठीत गायले, ते सुद्धा बहुधा दाखवले गेले. एक वाक्य दिले होते आम्हाला. आई एक नाव असतं.. याची पुढची ओरिजिनल ओळ घरातल्या घरात गजबजलेले गाव असते अशी आहे. आम्हाला आमच्या मनाने बनवायला सांगितली होती. मी म्हटलेले की पुढे बाबांचेच आडनाव असते, पण ते बहुधा सेन्सॉर कट झाले.

काही हरकत नाही. पण पुरेसा वेळ मी टीव्हीवर झळकलो होतो. माझ्या आईने कार्यक्रमाची वेळ सर्व नातेवाईक मित्रमैत्रीणींना सांगितली होती. सोबत हे सुद्धा सांगितले होते की आधी कल्पना असती तर गधड्याला चांगले कपडे घालून पाठवले असते. त्यांच्यामते मी तेव्हा फार गबाळा राहायचो. आता बायकोच्या मते मी आणि माझी मुले फार गबाळे राहतो. तरी मुलीला मॅच बघायला पाठवताना नीटनेटके कपडे आणि मुद्दाम खास केशरचना करून पाठवले होते. कारण झळकलीच टीव्हीवर तर असे एक्स्क्यूज आम्हाला देता येणार नव्हते Happy

यावेळी माझा चान्स हुकला, पण पुढच्या वेळी मी नक्की जाणार, आणि त्या अनुभवासह याच धाग्यावर पुन्हा येणार.

आणि हो, ते जितेंद्र जोशी कॅम्पस विजेटीय एपिसोड कोणाला युट्यूबर सापडला तर मला लिंक विपु करा नक्की...

बाकी माबोवर तर कैक मोठ्या हस्ती आहेत. काहीजण असेही असतील ज्यांच्यासाठी टीव्हीवर झळकणे ही नित्याची बाब असेल. पण त्यातही पहिल्या वेळेची आठवण स्पेशल असेल. माबोकरांचे अनुभव वाचायला सर्वांनाच आवडतील. तर लाजू नका. संकोच करू नका Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनु तुझा ब्लॉग माझा favorite आहे. मायबोली आधी तू तिथे लिहायची ना? ऑफिस मधे काम करून कंटाळा आला की मी नेहमी उघडायचे तुझा ब्लॉग. शिवाय क्षेत्र सारखे असल्याने (इलेक्ट्रॉनिक्स अणि मग सॉफ्टवेअर) सगळे सगळे relate व्हायचे.
तुला बक्षीस मिळाल्याचे वाचून खूप आनंद झाला Happy अभिनंदन! तुला खूप सार्‍या शुभेच्छा, पुस्तक निघो, अजून खूप पारितोषिके मिळो!

अच्छा मध्यलोक, भारीच की. पंकज समेळ डोंबिवलीकर आणि आमच्या शाळेचा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर चा विद्यार्थी. >> हो
Btw बघितला व्हिडीओ, अभिनंदन. >> धन्यवाद

मस्त बोललायत मध्यलोक. >> धन्यवाद.
इतिहासाची आवड असल्याने तसे बोलल्या गेले असेल. पण नव्या पिढीला पहिले आणि दुसरे महायुद्ध काय आणि त्यात किती लोकांनाच हकनाक बळी गेला हे आजच्या इन्स्टा आणि स्नॅपचॅट च्या युगात लक्षात यायचे नाही म्हणून रेमेम्ब्रेन्स दिवस, विजय दिवस, असे सोहळे व्हायला पाहिजे Happy

परीचा व्हिडीओ क्युट आहे.
विकु, बापरे!
झळकलेल्या सर्वांचे अभिनंदन.
मस्त बोललायत मध्यलोक>>+१

मी झळकलो नाही पण दिसलो होतो एका बातमीत.
सहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्सने हॉट स्प्रिंग जवळील हवा - ज्यात निसर्गतः: हवेत असणाऱ्या हेलियमचे प्रमाण जास्त असते - त्याचे ९९.९९५% एवढे शुद्धीकरण करण्याचा प्रोजेक्ट केला. हेलियमचे द्रवीकरण करण्यास एवढी किमान शुद्धता लागते. ही शुद्धता मोजण्यास मास स्पेक्ट्रॉमिटरचा एक सेट अप लागतो तो आम्ही सप्लाय केला होता त्यात त्याचे अचूक मोजमापन करण्यास छोट्या स्केलवर टेक्नॉलॉजी ट्रान्सफरही होती. यासाठी मी तिथे जात असे. एवढी शुध्दता असणारा हेलियम बनवणारे तेव्हा थोडकेच देश होते. ज्या दिवशी तेवढ्या शुद्धतचे मी मोजमापन केले तेव्हा पूर्ण खात्री करून प्रोफेसर्स आनंदाने ओरडले. मग रिपोर्ट प्रिंट करून पळाले. अर्ध्या तासाने कळले की प्रेस कॉन्फरन्स बोलावली आहे, लॅब नीटनेटकी करा, प्रेसवाले इकडेही येतील. आमचा इक्विपमेंट सेटअप एका वेगळ्या छोट्या पार्टिशन मध्ये होता. आमच्या सिस्टम स्क्रीनवर नेमका कुठला ग्राफ आणि मेजरमेंट दाखवायचे आणि काय बोलायचे हे सांगण्यात आले. मुख्य कॉन्फरन्स त्यांच्या कॉन्फरन्स रूम मध्ये झाली. मग लॅब मध्ये येऊन पाचेक मिनिटात शुटिंग झाले. त्यात आमच्या मेजरमेंटचे सुद्धा झाले, मला बोलावे लागले नाही.
दुसऱ्या दिवशी टीव्हीवर अनेक बातम्यांत एक बातमी झळकली "India now joins elite club to have technology to produce liquid Helium." (पण त्यांनी अद्याप द्रविकरण केले नव्हते.)
पैकी एक दोन नॅशनल आणि कलकत्त्याच्या लोकल चॅनलवर मी दोन सेकंदांकरता दिसलो.

ज्या दिवशी तेवढ्या शुद्धतचे मी मोजमापन केले तेव्हा पूर्ण खात्री करून प्रोफेसर्स आनंदाने ओरडले. >>> क्या बात

वाह मानवमामा भारी,
अगदी स्वदेश, शाहरूख, नासा डोळ्या समोर आले.. Global Precipitation Measurement वगैरे Happy

मध्यलोक छान व्हिडिओ, युट्यूब अपलोड करून इथे शेअर केलात ते ही छान, एकाला बघून दुसरे करतात Happy

आम्ही देखील कुठल्या तरी कार्यक्रमाच्या गर्दीत टीव्ही वर दिसलो आहोत.

आई एक नाव असतं..
घरातल्या घरात गजबजलेले गाव
खूप छान

आम्ही देखील कुठल्या तरी कार्यक्रमाच्या गर्दीत टीव्ही वर दिसलो आहोत.

आई एक नाव असतं..
घरातल्या घरात गजबजलेले गाव
खूप छान

आम्ही देखील कुठल्या तरी कार्यक्रमाच्या गर्दीत टीव्ही वर दिसलो आहोत.

आई एक नाव असतं..
घरातल्या घरात गजबजलेले गाव
खूप छान

@केदार जाधव:
खरोखरच प्रेरणादायी प्रवास Happy तब्बल अर्ध्या तासाची मुलाखत सह्याद्रीवर येणे हेच खूप काही सांगून जाते. पूर्ण मुलाखत बघितली. जर्मन शिकवण्याची तुमची आंतरिक तळमळ खूपच भावली. इतके प्रचंड फॉलोअर्स असूनही चानेलवर जाहिरात नाही लावली, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे इत्यादी मुद्दे, तसेच ज्या पद्धतीने तुम्ही ते शिकवता आणि सोबत जर्मन-मराठी साधर्म्य दाखवून ती सोपी करता, जर्मन संस्कृतीची सुद्धा ओळख करून देता हे सारे फारच वाखाणण्याजोगे आहे. तुमचे जर्मन शिकण्याचे चानेल मी अनेकांना सुचवणार आता.

@वावे: जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन... जुनी आठवण. हे मस्त असायचे त्याकाळात. मला मी सहभाग घेतलेले प्रदर्शन आठवले.

@हर्षल_चव्हाण, मध्यलोक: खूप छान हो.अभिनंदन Happy

@हपा आणि फि बां Lol

@mi_anu: भारीच कि. अभिनंदन Happy तुमचे माबोवरचे लिखाण/प्रतिसाद सुद्धा खूपच खुसखुशीत नर्मविनोदी असतात. ब्लॉग ची लिंक द्या.

@मानव: खूपच रोचक प्रतिसाद. हेलियमचा शुद्धीकरण आणि द्रवीकरण Happy खूप मोठी अचिव्हमेंट आहे. यावर वेळ मिळेल तेंव्हा वेगळी पोस्ट लिहा कि विज्ञान विभागात.

सर्वच जणांचे प्रतिसाद किती छान आहेत.

टीव्हीवर झळकणाऱया सगळ्या ताऱयांच अभिनंदन!
अनु व केदारचा कार्यक्रम पाहीला होता.
मध्यलोक अभिनंदन!

अनु, आधी एकेरी नाव लिहलं होतं गं.. पण नंतर ते खोडलं मी ..! आधी मला वाटलं होतं की हिरवा कुर्ता घातलेली तू असशील पण मला खात्री वाटत नव्हती..( कॉलेजची मुलगी असावी असा समज झाला माझा.. हे मी खरंच लिहतेय बरं..!!) ..

मध्यलोक , केदार, हर्षल,मानवजी अभिनंदन..!

मानवजी, तुमचा वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अभ्यासू प्रतिसाद मला नेहमीच आवडतात.

मी शाळेत असताना बालचित्रवाणी साठी समूहगीत गायले होते. ते टीव्ही वर झळकले.
आमच्या शाळेने २ मराठी कविता एक गवताचं पातं आणि दुसरी सुरवंटराव ह्याचे समूहगीत प्रकारात सादरीकरण केले होते. त्यापैकी गवताचं पातं ग्रुप मध्ये मी होते. आम्हाला सगळ्या मुलींना कुठून तरी एकसारखे दिसणारे पिवळे झगे घालायला दिले होते. त्यातील एकही मापात नव्हता. शूटिंग साठी भगभगीत दिवे लावले होते स्टेज वर. त्याचा इतका त्रास झाला की बरीच मुले नंतर आजारी पडली. मला तर तापच भरला होता आठवडा भर. पुढे कधीतरी हे टीव्ही वर दाखवले गेले. पण आमची शाळा दुपारी भरायची त्यामुळे बालचित्रवाणी बघायलाच मिळायचे नाही. शनिवारी शाळा सकाळी असायची पण त्यावेळी बघू असे ठरवले तर ते दाखवायचे नाहीत. पुढे एकदा माझ्या आत्याच्या पोस्ट कार्ड आले आणि त्यात तिने लिहिले होते की ते गाणे त्यांनी बघितले टीव्ही वर. पण आमच्या घरातील लोकांना काही ते बघायला मिळाले नाही. दूरदर्शन वर एकच प्रोग्राम पुन्हा कधी दुसरा नवा प्रोग्राम नसेल तेव्हा दाखवत असत. त्यातही बालचित्रवाणी, किलबिल आणि संतवाणी ह्यात तेच तेच दाखवले जायचे आलटून पालटून. आमचे गाणे समूहगीत असल्याने फिलर होते. ते कधी लावतील त्याचा नेम नव्हता. पुढे साधारण ६-७ महिन्यांनी ते गाणे माझ्या बाबांना टीव्हीवर दिसले तेव्हा मी आणि माझ्या बहिणीने आनंदाने उड्या मारल्या होत्या. त्यानंतर पण २-३ वेळा ते असेच अवचित दिसले पण इतके अप्रूप राहिले नव्हते. पुढे त्या कॅसेट मध्ये नव्या गाणी भरली असावी कारण नंतर कधीही ते लागले नाही. ही साधारण १९९२-९३ ची गोष्ट आहे. ह्या कामाचे मला १०० रुपये मानधन म्हणून मिळाले होते.

अनु अभिनंदन!!
ब्लॉग ची लिंक आहे का?

@ मुख्य धागा
मुद्यामच प्रतिसाद टाळला होता. व्हिडिओत एकाच फ्रेम मधे कलर व्हील आणि कलर टेंपरेचर मधे जाणवणारा फरक आहे. त्यामुळेच कमेंट टाळली. कारण नंतर मी गंमत केली होती टाईप प्रतिसाद आला असता. ते मायबोली सोडून जातो टाईप. वेड्यात निघायला नको म्हणून शंकाही लिहिली नाही. कारण मग दोन तीन आयडीज ट्रोलिंग करायला आले असते. एका आयडीने व्हिक्टीम कार्ड खेळले गेले असते. काही मैला आयडी सरसावत आल्या असत्या...

कुणाच्याही मुलांचे कौतुकच आहे. पण शंकेला जागा नसावी. वेड्यात काढण्याची हिस्ट्री नसावी. लांडगा आला सारखी गत झाली.

व्हिडिओ खराखुरा असेल तर मनःपूर्वक कौतुक!!!

व्हिडिओ खराखुरा असेल तर मनःपूर्वक कौतुक!!!
>>>>

धन्यवाद फिल्मसुख Happy

बाकी लोकं काय म्हणतील या विचाराने शंका मनात ठेवू नये. त्रासातून मोकळे व्हावे.. आपण ते केलेत हे आवडले.

तसेही आपली शंका रास्त होती. खरेच तसे वाटत आहे.
पोरगी थोड्या वेगळ्या रंगाची म्हणा किंवा फोटोजेनिक असल्यामुळे म्हणा पण बरेचदा हा अनुभव घेतला आहे. मी सुद्धा बरेचदा सोलो फोटो मध्ये उजळ दिसतो आणि तिच्या सोबत फोटो काढला की काळा.. गधडी सगळा फ्लॅश खेचून घेते की काय कल्पना नाही Happy

रोहिणी, वा मस्तच की. 'सुरवंटराव' - धमाल बालगीत असावे असे नावावरुन वाटते.

Pages