तुम्ही कधी टीव्हीवर झळकला आहात का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 January, 2024 - 07:26

तुमचा कधी वर्तमानपत्रात फोटो आला आहे का? असा एक धागा मायबोलीवर यापुर्वीच आला आहे.
तर आता त्याच धाग्याला अपग्रेड करून तुम्ही कधी टीव्हीवर झळकला आहात का हा धागा काढत आहे.

धागा काढायचे तात्कालिक कारण म्हणजे नुकतेच माझी मुलगी टीव्हीवर झळकली. पराक्रम म्हणाल तर एक स्त्री दुसर्‍या स्त्रियांच्या सुखदुखात सामील होताना कॅमेर्‍यात कैद झाली Happy

त्याचा विडिओ ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=uQkWOlM2qrI

मी स्वत: क्रिकेटचा प्रचंड मोठा चाहता आणि (feminism) स्त्रीवादाचा पुरस्कर्ता असल्याने जितक्या आवडीने पुरुष संघाच्या क्रिकेट मॅचेस पाहतो तितक्याच आवडीने महिला संघाच्या देखील बघतो. यातूनच लेकीला सुद्धा क्रिकेटची गोडी लागली. ती क्रिकेट बघण्यापेक्षा क्रिकेट खेळणे जास्त पसंद करते. पण अध्येमध्ये स्कोअर काय झाला, कोण जिंकतेय, कोहलीने किती मारले वगैरे चौकशी करत असते. काही दिवसांपुर्वी माझ्याकडे आली आणि म्हणाली की भारत-ऑस्ट्रेलिया महिलांचे क्रिकेट सामने होणार आहेत. ते मला बघायला जायचे आहे...

ठिक आहे जाऊ म्हटले. तसे तिने अजून दोनतीन मैत्रीणी जमवल्या. पण अचानक उद्भवलेल्या परीस्थितीमुळे मला जाता आले नाही. अजून एक-दोन मैत्रीणींचे वडील सोबत असल्याने तशी चिंता नव्हती. तरी आपल्याला जाता आले नाही याची चुटपुट लागली होतीच. पण ती परत आल्यावर मला समजले की मी काय गमावले होते. वरच्या व्हिडिओत बघून ते समजेलच...

पण मी सुद्धा जर तिच्यासोबत टीव्हीवर झळकलो असतो तर ती माझ्या आयुष्यातली पहिली नाही तर दुसरी वेळ असती.

विजेटीआय कॉलेजला डिप्लोमा करत असतानाची गोष्ट. तेव्हा जितेंद्र जोशीचा कॅम्पस म्हणून एक कार्यक्रम गाजत होता. कार्यक्रमाची रुपरेषा अशी की दर एपिसोडला एखाद्या कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊन तिथल्या पोरांबतबत धमाल करायची. आमच्या कॉलेजला ईतकी धमाल केली की त्याचे दोन एपिसोड बनले. कालपासून युट्यूबवर शोधत आहे. ईतर बरेच सापडले, पण आमचा नेमका सापडत नाहीयेत.

असो, तर आम्हीही गाणी म्हटली, नाच केला, दंगा घातला. आमच्या ग्रूपचे जय जय महाराष्टृ माझा गाणे कार्यक्रमात पुर्ण दाखवले गेले. आमच्या मुलींनी एका हिंदी गाण्याला मराठीत गायले, ते सुद्धा बहुधा दाखवले गेले. एक वाक्य दिले होते आम्हाला. आई एक नाव असतं.. याची पुढची ओरिजिनल ओळ घरातल्या घरात गजबजलेले गाव असते अशी आहे. आम्हाला आमच्या मनाने बनवायला सांगितली होती. मी म्हटलेले की पुढे बाबांचेच आडनाव असते, पण ते बहुधा सेन्सॉर कट झाले.

काही हरकत नाही. पण पुरेसा वेळ मी टीव्हीवर झळकलो होतो. माझ्या आईने कार्यक्रमाची वेळ सर्व नातेवाईक मित्रमैत्रीणींना सांगितली होती. सोबत हे सुद्धा सांगितले होते की आधी कल्पना असती तर गधड्याला चांगले कपडे घालून पाठवले असते. त्यांच्यामते मी तेव्हा फार गबाळा राहायचो. आता बायकोच्या मते मी आणि माझी मुले फार गबाळे राहतो. तरी मुलीला मॅच बघायला पाठवताना नीटनेटके कपडे आणि मुद्दाम खास केशरचना करून पाठवले होते. कारण झळकलीच टीव्हीवर तर असे एक्स्क्यूज आम्हाला देता येणार नव्हते Happy

यावेळी माझा चान्स हुकला, पण पुढच्या वेळी मी नक्की जाणार, आणि त्या अनुभवासह याच धाग्यावर पुन्हा येणार.

आणि हो, ते जितेंद्र जोशी कॅम्पस विजेटीय एपिसोड कोणाला युट्यूबर सापडला तर मला लिंक विपु करा नक्की...

बाकी माबोवर तर कैक मोठ्या हस्ती आहेत. काहीजण असेही असतील ज्यांच्यासाठी टीव्हीवर झळकणे ही नित्याची बाब असेल. पण त्यातही पहिल्या वेळेची आठवण स्पेशल असेल. माबोकरांचे अनुभव वाचायला सर्वांनाच आवडतील. तर लाजू नका. संकोच करू नका Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हपा Lol
अंजूताई, वावे, देवकी तै मस्त पोस्ट.
हा धागा आवडला आहे त्याबद्दल परीला थॅंक्यू. Happy

मी पण बंद टिव्हीसमोरून इकडूनतिकडे फिरताना प्रतिंबिंबात का होईना टिव्हीवर आले होते, प्रसिद्धी म्हणजे तरी काय प्रतिबिंबाच्या मागे धावणेच...... तुम्ही तरी चालू टिव्हीवर झळकलात, आम्ही तर बंद. Lol

परीचे अभिनंदन..! तिच्या चेहर्‍यावरचे हावभाव मस्त आहेत..
सगळ्यांचे किस्से मस्त.. जे टिव्हीवर झळकलेत त्यांचं अभिनंदन..!

ह पा - छान विनोद..!

टिव्ही वर कधी झळकले नाही .. पण त्या निमित्ताने एक प्रसंग आठवला.

दहावीला असताना एकदा लवकर वर्ग सुटला होता. आम्ही तिघी मैत्रिणी रस्त्याने गप्पा मारत निघाल्या होत्या. रस्त्यावरून गवत, पेंढा भरलेल्या बैलगाड्या रांगेत वखारीत निघालेल्या.. त्या बैलगाडीचे चित्रीकरण दोन परदेशी माणसं समोरून करत येत होती.. आम्ही कुतुहलाने त्यांचाकडे पाहू लागलो.. तेवढ्यात त्यांनी अचानक कॅमेरा आमच्या दिशेने वळवला आणि आमचं चित्रीकरण सुरु केलं.. आम्ही तिघीपण खूप लाजलो.. आम्ही माना खाली घालून हसत होत्या तेवढ्यात त्यांच्या सोबतचा गाइड आणि ते परदेशी आम्हांला लाजू नका म्हणू सांगू लागले.

गाइड म्हणाला की, ते दोघे आपल्या देशातल्या खेड्यातल्या जीवनमानाचा अभ्यास करायला आले आहेत परदेशातून..!

ते कुठल्या देशातले होते.. ते आम्ही विचारलंच नाही.. आता बरीच वर्ष झाली पण कुठेतरी परदेशी माणसांच्या अभ्यासाच्या विडियोत आम्ही नक्की दिसत असू.. असं वाटते.

लग्नात वाजणाऱ्या कोळी गीतांचे अल्बम मध्येच खूप निघत होते.. तेव्हा एक मैत्रिण होती.. जिचे नातेवाईक अश्या गाण्यांचे अल्बम काढत असत.. तिने खूप आग्रह धरला होता.. अल्बममधे जे गाणं बसवणार आहेत त्यात नाचायला ये.. नाचाची प्रॅक्टीस पण माझ्या ऑफीसच्या जवळ होती.. पण मी काही जास्त उत्सुकता दाखवली नाही त्यात .. कदाचित गेले असते तर एखाद्या अल्बममध्ये कुठेतरी कोपऱ्यात नाचताना नक्की झळकले असते.

एकेक किस्से मस्त
वाचतोय.. पण प्रतिसाद देणे टाळले.. कारण हाच नवीन वर्षाचा संकल्प आहे. एव्हाना माझेच उगाच इथे आठ झाले असते Happy

आणि हो, लेकीचा व्हिडिओ आवडलेले, तिचे कौतुक केलेले लोक्स धन्यवाद Happy

धन्यवाद शर्मिला Happy

@ कँपस अ फेअर वॉर
हो हेच नाव होते. पूर्ण आठवत नव्हते. गूगल केले शोधायला तेव्हा Zee Marathi युट्यूब चॅनलवर याचे एपिसोड फक्त campus कँपस नावाने अपलोड केलेले सापडले.

व्वा! परी क्यूट दिसतेय!!
साधारण १०-१२ वर्षांपूर्वी आम्हाला मराठी 'सा रे ग म प ' शो च्या फिनालेचे पास मिळाले होते. त्या पर्वाचा एकही एपिसोड पाहिला नव्हता पण फायनल लाईव्ह पाहिली. त्या निमित्ताने टीव्ही वर झळकलो होतो. अजय - अतुल परिक्षक होते व विश्वजीत बोरवणकर जिंकला होता.

She is cute and living the moments. महिला क्रिकेट बघायला जाणे म्हणजे विशेष बाब आणि त्यासाठी अधिकचे कौतुक Happy

तुम्ही कधी टीव्हीवर झळकला आहात का?
हो, "Global News" या कॅनेडियन न्युज चॅनेलवर रेमेम्ब्रेन्स डे निम्मित आमची एक बाईट घेण्यात आली होती. आम्ही हे न्युज चॅनेल बघत नसल्याने आम्ही त्यावर झळकू किंवा आमची हि बाईट दाखवण्यात येईल अशी पुसटशी हि कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये आल्यावर माझ्या एका कॅनेडियन सहकारनिने मला सांगितले कि तू काल टीव्ही वर दिसलास. मग घरी येऊन IPTV वरील रेकॉर्डेड प्रोग्रॅमचे मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग केले. सध्या विडिओ हाताशी नाहीये पण विडिओ आमच्या चॅनेल वर अपलोड करून त्याची लिंक इथे नक्के देईन.

मी दोनदा आलोय टीव्हीवर... वर्तमानपत्रातही आलोय तसा. टीव्हीवर पहिल्यांदा, सीओईपीच्या शेवटच्या वर्षाला असतांना, रेगाटाच्या एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं, त्यानंतर आयबीएन लोकमत नं माझी मुलाखत घेतली होती बातम्यांसाठी; केवळ २-३ मिनिटांचा बाईट होता २००९ साली.
आणि दुसर्‍यांदा सोनी टीव्हीवरच्या एंटरटेंमेंट के लिए कुछ भी करेगा कार्यक्रमात ग्रूप व्हायोलीन वाजवलं होतं (जुनी माबोकर पजो सोबत) २०१४ मध्ये.

माझ्या दुर्दैवाने आमच्या डी वाय पाटील स्टेडियम मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघांच्या मॅच असूनही मी जावू शकलो नाही. मी डी वाय पाटील यूनिवर्सिटीला फॅकल्टि असल्याने मला तिन्ही मॅचेसचे प्रत्येकी 20 पासेस मिळाले होते. पण मला त्यादरम्यानच मुंबईबाहेर जायचे असल्याने त्यांचा काहीही उपयोग नव्हता. शेवटी पासेस मित्रमंडळींना वाटावे लागले.

2018 ला ब्लॉग माझा मध्ये उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं होतं.समारंभाला जाणं जरा वैताग प्रकार होता, वर्किंग डे पुणे मुंबई वगैरे, पण पयल्यांदा टीव्हीवर म्हणून चक्क जोगेश्वरी ला हॉटेल बुक करून एकटी 1 रात्र राहून सकाळी पोहचले होते.
माझ्या आधी बक्षीस मिळालेले तिन्ही जण एकदम भारी भारी गोष्टी करतायत फेसबुक वर.महाराष्ट्र देशा ब्लॉग चे ओनर पहिला नंबर, नितीन साळुंके उत्तेजनार्थ आणि अमोल कुलकर्णी उत्तेजनार्थ.मला कारावान मिळाला.
हे बक्षीस घेऊन घाईत पुण्याला निघता निघता हॉल मध्ये अमेय वाघ दिसला.म्हणून त्याला सेल्फी विनंती केली.तर सेल्फी लवकर निघेचना.आणि त्याला स्टेजवर बोलावलं तेव्हाच, त्याला घाई होती.हा अत्यंत विनोदी सेल्फी (माझ्या चेहऱ्यावर लॉटरी लागल्याचे भाव आणि स्टेजवर जायचं असल्याने अमेय वाघ च्या चेहऱ्यावर 'जाने कहां से चले आते है' वाले उखडलेले पण तरीही सभ्य भाव) दुर्दैवाने बॅकप मध्ये हरवलाय.
https://youtu.be/IOn_KjQ-FoM?feature=shared

हेहे आय विश रुपाली!! मला तुम्ही नाही म्हटलं तरी चालेल.ऑनलाईन मे नो मोठा लहान.
मी निळ्या हिरव्या कुर्त्यात आहे.ती पांढरी सुफी ब्लॉग ची लेखिका पूजा आहे.

नाही अजून तरी.

एकदा माबोमुळे आला असता चान्स
देउळ चित्रपटाचे माध्यम प्रायोजक माबो होते. तेव्हा आपण काढलेल्या देवळाचे फोटो टाकायचे होते. सिलेकटेड एन्ट्री ला प्रीमियर तिकिटे आणि आमंत्रण.
मी टाकलेला झाला होता सिलेक्त, पण प्रीमियर मुंबईत होता. मग संयोजक / आयोजकांना तसे सांगितले जमणार नाही असे.

उत्तेजनार्थ तेही 5 वर्षांपूर्वी चं, त्याला इतकं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद मंडळी.दरवर्षी होते स्पर्धा. आपल्या मायबोलीवर काही वर्षात पहिली, दुसरी बक्षिसं मिळालेले बरेच आहेत.

अनु अभिमान वाटला तुझा, अभिनंदन (उत्तेजनार्थ असलं म्हणून काय झालं, असं का म्हणतेस, तेही महत्वाचं) त्यावेळी बघितलेलं मी. मला दुहेरी आनंद झालेला . तू होतीस आणि पहिला आलेला पंकज समेळ आमच्या शाळेचा विद्यार्थी, तसा बराच ज्युनियर पण 2018 साली, शाळेच्या सुवर्णमहोत्सवात ओळख झाली, माझं कर्तृत्व ह्यात काही नाही पण माझा भाऊ आणि तो एकत्र कमिटीत असल्याने ओळख झाली आणि गप्पाही झाल्या, एरवी मला कळलंही नसतं. मी ही खिजगणतीत नसते कोणाच्या, भावामुळे शक्य झालं.

झकास मुंबईत यायचं होतंस की. फोटो सिलेक्ट झाल्याबद्दल अभिनंदन.

मी अनु अरे वा, तुमचे खूप अभिनंदन
महाराष्ट्र देशा ब्लॉगचे ओनर >> पंकज समेळ, माझा खूप चांगला मित्र, आता काल परवाच आमचे बोलणे झाले Happy

अच्छा मध्यलोक, भारीच की. पंकज समेळ डोंबिवलीकर आणि आमच्या शाळेचा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर चा विद्यार्थी.

Btw बघितला व्हिडीओ, अभिनंदन.

Pages