Submitted by किल्ली on 9 November, 2023 - 10:30

धनत्रयोदशी
धन्वंतरी पूजन व यम दीपदान
ह्या वर्षीच्या दिवाळीसाठी खास धागा.
आपण येथे फराळ, सजावट, किस्से, आठवणी, फटाके, खरेदी, रांगोळी असं सर्व काही लिहूया.
Virtual दिवाळी साजरी करूया!
झब्बूचा खेळही खेळता येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>दूरची Family member दिपक
>>>दूरची Family member दिपक ची नात्याने भाची पडते, आहे आमच्याच वयाची
ओके ओके. मस्त रांगोळी काढलिये
चरांखूसुं!
चरांखूसुं!
आपण पोताला व गंधाला फार
आमच्याकडे नवे शब्द जन्माला आले आहेत.
तूपी म्हणजे तुपकट, टाळूला चिकटणारे.
फुंकणीकरंजी म्हणजे कळलंच असेल.
आठळीचे गुलाबजाम.हे आईने मैदा जास्त घातल्याने मधे बी तयार झाले होते. गुलाबजामचं झाड लावायचं लक्षात आलं नाही. मीच नाव ठेवलं होतं.
जरा पक्कापाक म्हणता तोफगोळा झालेले हिंसक लाडू.
एकदा मैत्रीणीकडे मी केलेले शंपा नेले होते, तर तिच्या भावाने खाल्ले व म्हटला वाईट नाहीत काही, थुंक्यात भिजवून घोळवल्यावर गिळता आले.
कासवछाप- चकल्या, हे पहिल्यांदा चकली पिळताना जवळ पाडावी लागते हे न कळल्याने तयार झाले होते. माझी आजी भाकरीएवढी चकली करून नातवंडांकडे फ्रिस्बीसारखं फेकायची. एकदम खमंग पण खंडीभर नातवंडं असल्याने नाजूकसाजूक कधी करता आलं नाही.
भाकरीएवढी चकली करून
भाकरीएवढी चकली करून नातवंडांकडे फ्रिस्बीसारखं फेकायची >>>
हे भारी आहे!
ह्या वर्षी पहिल्यांदा रांगोळी
ह्या वर्षी पहिल्यांदा रांगोळी काढली. त्या फोटोच लगेच दिवाळी शुभेच्छा पत्र तयार झालं.
तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शूभेच्छा!
यंदाचा फराळ-
यंदाचा फराळ-
चकल्या- साबा. डन.
खारे शंपा-साबा. डन.
गोडे शंपा- मी. डन.
पातळ पोहे चिवडा- साबा. डन.
भाजके पोहे चिवडा- मी. डन.
शेव- दोघी मिळून. डन.
पौष्टिक लाडू- साबा. डन.
बेसन लाडू - मी. आज.
करंज्या - दोघी. आज.
सगळे व्यवस्थित खाऊन चव पाहून
सगळे व्यवस्थित खाऊन चव पाहून अभिप्राय देणे - मी. केव्हाही. निमंत्रणाच्या प्रतिक्षेत.
मानव या की केव्हाही!!
मानव या की केव्हाही!!
पत्ता सांगते. पुण्यात, बिबवेवाडी. सविस्तर पण देते.
फराळ पोचला, मस्त झालाय.
फराळ पोचला, मस्त झालाय.
अरे वा प्रज्ञा, किती छान
अरे वा प्रज्ञा, किती छान
आम्ही दोघी... मी आणि साबा..
आम्ही दोघी... मी आणि साबा..
नऊ प्रकार झाले
ते सुद्धा पहिली आंघोळ व्हायच्या आत.. कमाल!
आमच्याकडे पहिल्या फराळाला किमान पाच प्रकार तरी हवेत असे शास्त्र आहे म्हणत पाचवा प्रकार मिठाई आणली जाते
चरांखूसुं!>> मानव दोन मिनिटं
चरांखूसुं!>> मानव दोन मिनिटं लागली मला हे काय आहे ते समजायला. माबो वरचा नवीन शॉर्टफॉर्म
चकल्या आवडल्या थँक्यु सगळ्यांना....चकल्या सुनबाई नी तळल्या आहेत. ती expert आहे तळण्यात . सगळ्या अगदी एक सारख्या आणि परफेक्ट तळल्या आहेत.
त्यांच्या खाद्य संस्कृतीत अशी Texture च नसतील कदाचित म्हणून शब्द ही नाहीत असं असेल का ?
त्यांच्याकडे थंडी जास्त असते तर कोट, ओव्हर कोट, स्वेटर, स्वेटशर्ट, कार्डीगन, जाकीट, जम्पर असे थोडा थोडा फरक असलेले थंडी साठी किती कपडे !
किल्ली रांगोळी सुंदर , छंदी फंदी रांगोळी छान आणि त्याच भेटकार्ड करण्याची आयडिया त्याहून ही छान.
प्रज्ञा जबरदस्त फराळ , सगळ्याचा एकत्रित फोटो दाखव.
परवा भीतीने ग्रिल ची माळ काढून ठेवली पाऊस आला म्हणून, काल नाही पडला आमच्या इथे पण.
चरांखूसुं.. उकलून सांगा जरा
चरांखूसुं..
उकलून सांगा जरा
खूप सुंदर च्या आधी काय आहे
खूप सुंदर च्या आधी काय आहे
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/CzQUJp8oNNG/?igshid=M3NicjRvYmdvcWc3
खूप सुंदर च्या आधी काय आहे>>
खूप सुंदर च्या आधी काय आहे>>
चकली, रांगोळी
पूर्वी बायकांची न्हाणी आणी
पूर्वी बायकांची न्हाणी आणी पुरुषांची न्हाणी असा प्रकार असे. बायका( आपाप ल्या ) नवृयां ना सुगंधी तेल लावत . ते आंघोळ करून कारिंटे फोडत. बायकांच्या न्हणीला आई केसांना तेल लावुन द्यायची. टाटा सुगंधी तेल होते बहुतेक. बंब तापलेला रसरसलेला. अंधा रात भारी दिसायचा.
आंघोळ करुन खाली फटाके फोडायला. जिमखान्याचे आता कर्वे रोड ची सुरुवात आहे तिथे _ लकडीपुल संपला की. तिथे मोठी रिकामी जागा होती. जी रस्ता रुंदीत गेली. गुलाबी थंडी धुके व फटाके. नवे ड्रेस. साधा शिवलेला फ्रॉक च असे. काका टेलर होते. व त्याला वरुन लेस वगैरे लावायचो घरीच.
कौतुकाबद्दल धन्यवाद लोकहो!!
कौतुकाबद्दल धन्यवाद लोकहो!!
साबांची तब्येत जर बरी नसती तर खारे शंपा बाद होते, केप्र रेडिमिक्सची चकली करायची ठरली होती. शेव ऐन वेळी जमली तर जमली नाहीतर बाद. पौष्टिक लाडूपण बाद झाले असते. मला रोज एक्झाम ड्यूटी होती 4 दिवस.
हेमाताईंच्या चकल्या भारी सुंदर! अगदी एकसारख्या, देखण्या, सोनसळी..
रांगोळीपण सुरेख!
फ्रीसबी >>
मानव
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना !
कोणे एके काळी मायबोलीचा
कोणे एके काळी मायबोलीचा हितगुज दिवाळी अंक होता. तीन वर्षे अंकासाठी मुद्रित शोधन करायची संधी मिळाली. ते दोन आठवडे मारामारीचे आणि मजेचेही असत. फार छान अनुभव होता तो.
प्रज्ञा, भारीच फराळ.. फोटो
प्रज्ञा, भारीच फराळ.. फोटो तरी दाखव
भरत, वाचावं म्हणून शोधलं तर अगम्य कोड आला.
अस्मिता, आतापर्यंत शेवटचा
अस्मिता, आतापर्यंत शेवटचा अंक https://www.maayboli.com/hda/hda_2014/
थॅंक्स भरत.
थॅंक्स भरत.
अस्मिता, बे ला साठी आत्ताच
अस्मिता, बे ला साठी आत्ताच भाजायला घेतलंय
उद्या पहाटे नैवेद्य ठेवताना एकत्र फोटो घेते. मग इथेपण देते.
मस्त धागा किल्लि..
मस्त धागा किल्लि..
पोस्टर लेकीने बनवले.
सुरेख पोस्टर
सुरेख पोस्टर
दिवाळीच्या शुभेच्छा
सर्वाँना दिवाळीच्या शुभेच्छा!
सर्वाँना दिवाळीच्या शुभेच्छा!
माबो दिवाळी अंक नाही तर दिवाळी गप्पा मारायला छान धागा आहे हा!
काल न्यु जर्सीच्या साई पीठ
काल न्यु जर्सीच्या साई पीठ देवळात जाउन आलो. काय उंचीपुरी मूर्ती आहे श्रीविष्णुंची. फार आवडते. आणि त्या देवळातले व्हायब्रेशन्स एकदम आवडतात. सकारात्मकता घेउनच निघालो, परत यायला. खरं तर सध्या परत जॉब शोधते आहे कारण माझा हाही जॉब ऑऊटसोर्स झालेला आहे. असे ऐकिवात आहे की टेस्टिंगचे बरेच म्हणजे खूप खूप जॉब भारतात गेलेत , जात आहेत. माझे गेले २ अनुभव तंतोतंत हेच सांगतात. असो.
श्रीविष्णुंच्या दर्शनाने हुरुप आला.
टेस्टिंगचे बरेच म्हणजे खूप
टेस्टिंगचे बरेच म्हणजे खूप खूप जॉब भारतात गेलेत , जात आहेत>>> या भारतात. भारत आपलाच आहे
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

दिवाळी चा फराळ ... शास्त्र असतं ते ....
Pages