सेलेब्रिटींचे वाढदिवस

Submitted by रघू आचार्य on 3 November, 2023 - 03:56

नोव्हेंबर मधे मोठे लोक जन्म घेतात.
चाचा नेहरू नोव्हेंबरचे. इंदिराजी सुद्धा नोव्हेंबर मधल्या.

तसं तर ऑक्टोबर पण सेलेब्रिटींचाच.
स्टार ऑफ द मिलेनियम म्हणजे बिग बींचा वाढदिवस ११ ऑक्टोबरला असतो. हे काहीच नाही पण हजबंड हंटर रेखाचा वाढदिवस सुद्धा १० ऑक्टोबरला असतो. वाढदिवस चिकटून यावेत आणि नेमके तेच दोघे बॉलिवूडचे प्रसिद्ध कपल म्हणून चाहत्यांच्या हृदयात विराजमान व्हावेत हे सुद्धा आश्चर्यच ! कधी कधी अधून मधून अमिताभ आणि जया ही कायदेशीर जोडी आहे ही आठवण होते. म्हणजे माध्यमे करून देतात. म्हणजे जया बच्चन यांची चिडचिड झाली कि छापून येते कुठे तरी, मग आठवते, अरेच्चा ! ही तर बिग बीं ची बायको !!!

बिग बींचा विषय निघालाच आहे तर बघा एकाच घरात स्टार ऑफ द मिलेनियम आणि विश्वसुंदरी राहतात.
विश्वसुंदरीचा वाढदिवस एक नोव्हेंबरला असतो. तेव्हांच तिच्यावर लिहायचं होतं. हे असं दरवर्षी होतंं. पण इतक्या भावना दाटून येतात कि शब्द आकुंचन पावतात आणि मग काहीच लिहून होत नाही. अव्यक्ताचं व्यक्तीकरण कसं करायचं ? ते ज्यांना जमतं ते मग आपली होणारी बाब हिरावून नेतात. म्हणतात ना बोलनेवाली कि मिट्टी भी बिकती है...
images.jpeg

ऐश्वर्या राय !!
बस नाम ही काफी है !
पण हे नाव घेतलं कि काही नावं आपसूकच आठवतात.
पहिलं म्हणजे सलमान खान. :रागः

हा सलमान खान माझ्या एका व्यवहारी जगातल्या क्रशला फार आवडायचा तेव्हांपासून मनातून उतरला. व्यवहारी जगत म्हणजे समजलंच असेल.
कारण विश्वसुंदरीने जो धक्का दिला त्याचा परिणाम अजूनही आहे. तर सलमान खान न आवडण्याची अनेक कारणे तेव्हांपासूनच्या युवकांकडे आहेत, तेव्हढीच कारणे तेव्हापासूनच्या युवा महिलांकडे सलमान खान आवडण्याची कारणे आहेत. फिमेल फॉलोईंगच्या जिवावर चित्रपट हिट्ट करणारा हिरो म्हटलं तरी चालेल. आणि फिमेल फॉलोईंग असले कि बाप्या लोकांची वरात आपोआपच निघते.

actress-aishwarya-rai-14pk928ut022pg4s.jpg
हम आपके है कौन बघताना एव्हढ्या काही वेदना झाल्या नव्हत्या. म्हटलं कर ना भाऊ काय रोमान्स करायचा तो माधुरी बरोबर. ते अनिल कपूर नाहीतर संजय दत्त म्हणून पाहून घेतील. आपल्याला काय त्याचं ?

अरे पण दगडी शरीराच्या ओंडक्या ! लाडातच आलास कि.
हम दिल दे चुके सनम मधे कुठलीही हिरॉईन असती तरी तो रोमान्स काळजाचा ठोका चुकवणारा होताच, इथे चक्क ऐश्वर्यासोबत दगड ! पिक्चरची स्टोरीच अशी होती कि कुठलीही हिरॉईन अशी दृश्ये देताना प्रेमात नाही पडली तरच नवल. यात तिची काहीच चूक नाही. चूक भन्साळ्याची आहे. मनिषा बिनिषा घ्यायच्या ना त्यात. तिला खामोशी द म्युझिकल मधे घेऊन सोडून दिली. बिचारी ना ना करते पाटा वरवंटा घेऊन फिरत बसली.

download (1).jpeg
तर या दगडी पहिलवानाने ऐश्वर्या पळवली आणि त्याला शिव्याशाप न लागता उलट तो एकामागोमाग एक हिट देणारा सुपरस्टार झाला. पहिला शंभर कोटीचा स्टार, दोनशे कोटीचा स्टार, लागोपाठ नऊ चित्रपट शंभर कोटी क्लबमधे गेलेला एकमेव सुपरस्टार यामुळे आमीर खान मागे पडला. आमीर खान सुद्धा मुलींना आवडायचा. पण त्याने कधी आवडत्या हिरॉईनसोबत अफेअर केले नाही हे एक आणि दुसरे म्हणजे तो दगड नव्हता.
सिनेमे पण चांगले करायचा. अभिनय पण उत्तम असायचा. परफेक्शनिस्ट असल्याने येडपट खानापेक्षा तो नेहमीच आवडला. पण हे म्हणजे ज्यांच्याशी घेणं देणं नाही त्यातल्या एका पेक्षा दुसरा आवडण्यासारखं.. अगदी जेव्हां भाजप पहिल्यांदा सत्तेत आली तेव्हां नाईलाजास्तव अडवाणींपेक्षा वाजपेयी आवडायचे तसं. दगडापेक्षा वीट मऊ ही म्हण शब्दशः खरी ठरायची इथे.

दुसर्‍या एका क्रशला सनी देओल आवडायचा. ती सनी देओल चं कौतुक ताल सोडून करायची. मग क्रश बदलली. पण तिला सलमान आवडत होता. या क्रशना एखादा हिरो आवडलाच पाहिजे का ? पिक्चर मधला असल्याने परपुरूषावर भाळली असे पण म्हणता येत नाही. सिनेमे येण्या आधी नाही का बायका कृष्णाची मूर्ती ठेवत ? त्याला सगळं सांगत. सखा मानत. तो देव आहे म्हणून पुरूष मुकाट्याने सहन करत. म्हणजे मेंदू असा ट्रेन झालेला असे कि जिवंत पण सामान्य माणसाकडे बायकोने हसून पाहिलं कि अंगाचा जो तीळपापड होईल तो देवादिकाच्या बाबतीत होत नव्हता. आधुनिक काळात तेच स्थान चित्रपटातल्या स्टार्सना मिळालं. आपली क्रश, गफ्रे, बायको यांना स्टार आवडणे ही सामान्य बाब झाली.

पण नवर्‍याला एखादी हिरॉईन आवडते हे बायकांना चालत नाही.
त्यामुळे ही आवड बोलून दाखवता येत नाही. म्हणून अव्यक्त. तरी सुद्धा देहबोली म्हणा, डोळे म्हणा चुगली करतातच. त्यामुळे बायकांना बरोब्बर समजतं कि नवरोबाला ही हिरॉईन जास्तच आवडते.

नायिका आवडणे तशी सामान्य बाब आहे. म्हणूनच तिचा वाढदिवस लक्षात ठेवणे हे सुद्धा नॉर्मल आहे. काहींना हिरो आवडतात. त्यात आपला फायदा काय ? नायिका आवडत असली आणि ही आवड तिला समजलीच तर यदाकदाचित फायदा होईल. पण एखाद्या एखादा हिरो आवडतो ही आवड त्याला समजल्याने कोणते फायदे होत असतील ? सरळमार्गी लोकांना हा प्रश्न पडतो.

म्हणूनच ही आवड लपवण्यात अर्थ नाही. ती आवडते तर तिचा वाढदिवस साजरा केलाच पाहिजे म्हणून एक नोव्हेंबरला तयारी केलीच होती. पण हाय रे रामा ! दुसर्‍या दिवशी लिहायचं तर मग या दिवशी कुणाचा वाढदिवस आहे का हे पण बघायला लागणार. मग त्याच्या विषयी एखादा शब्द लिहावा लागणार. असं कुणा कुणाबद्दल लिहीणार ? ते पण मनात नसताना ?

आपलं कसं फोकस्ड असतंय. ऐश्वर्या म्हणजे ऐश्वर्या आणि प्लान बी म्हणून सोनाली बेंद्रे. उत्तम व्यवस्थापनाचे लक्षण हे प्लान सी , डी , ई, एफ तयार असणे हे असते. तसे मग इलियाना डिक्रूज, अनुष्का शेट्टी, अमृता राव, नेहा असे प्लान ठेवले होते. पण इतक्या वेळा अव्यक्त राहणं सोपं नाही.
खरं तर हे व्यक्तीकरण तसं पाणचटच. अर्थात या पांचटत्वाला काही कारण आहे. ज्याला पाणचट वाटतंय त्याने थांबलं तरी हरकत नाही, पण मग शेवटी नुकसान झालं तर सांगू नका.

दगडी सलमानचा एक काळ होता. त्या आधी सनी, जॅकीचा होता. अनिल कपूरचा होता.
नानाचा होता, पण अमिताभने जो काळ गाजवला त्याची तुलनाच होऊ शकत नाही. तसा तो दुसरा सुपरस्टार !
पहिल्या सुपरस्टारची क्रेझ मात्र अमिताभपेक्षा जास्त. कदाचित फिमेल फॉलोईंग मधे राजेश खन्ना हा नंतर सुद्धा सलमान खान येईपर्यंत विक्रमादित्यच राहिला. मध्यंतरी आमीर खान नेक्स्ट डोअर बॉय बनला होता. पण अभिनयामधे हे सगळे अमिताभच्या आसपास सुद्धा नाहीत.

अमिताभची तुलना फक्त दिलीप कुमारशी होऊ शकते.
काय स्टायलिश लोक होते. स्टाईल मधे काका पण कमी नव्हता. त्याचा काळ असताना त्याचे मॅनेरिजम्स भुरळ पाडत. उगाच नाही आराधना सारखा सामान्य कथा असलेला सिनेमा लोकांनी डोक्यावर घेतला.

बघा, ऐश्वर्या रायच्या आठवणीने किती गोष्टींना उजाळा मिळाला.
ती होतीच विश्वसुंदरी आणि तिने राजघराण्यातच जायला हवं म्हणून गप्प बसलो.
आता राजघराण्याच्या जागी औद्योगिक आणि सेलेब्रिटी घराणी आली.

आजचे राजे म्हणजे अंबानी, अदानी किंवा बच्चन्स, कपूर्स , खान्स इत्यादी.
त्यातल्या अंबानीच्या घरात मुनीमांची टीना दत्त म्हणून गेली. मग ऐश्वर्याने बच्चन्स निवडले. नवरा काय नावाला कुणीही ठोंब्या असला तरी चालला असता. घराण्याचं नाव पाहिजे.

आपल्यासाठी या पर्‍याच. तिच्या सोबत रोमान्स करायचा तर मग कुणाच्यात तरी स्वतःला पहावं लागतं. तिथे पडद्यावर आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याला कोण चाललं असतं ?

जसं बिग बी म्हटलं कि रेखाच आठवतं तसंच ऐश्वर्या म्हटलं कि लोकांना ऋत्विकच आठवायचा. पूर्ण जगभरात हे दोघेही आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. खरे तर हिंदी सिनेमाला हृत्विक, ऐश्वर्या, आमीर आणि सलमान मुळेच इतर देशातले प्रेक्षक सुद्धा गांभीर्याने घेऊ लागलेत.
ऋत्विक मुळे रोशन्स हे घराणे सुद्धा एक नंबरला आले. जे जे अमिताभच्या काळात दहा , अकरा, बारा ते पुढच्या क्रमांकावरचे स्टार्स होते ते आपापल्या मुलांमुळे नावारूपाला आले.

जितेंद्राचा बोलबाला अमिताभच्या काळात राहिला आणि विनोद खन्नाचा पण. हे समांतर लोक. तसाच समांतर धरम पाजी. धरम पाजींचा नंबर कोणत्याही सुपरस्टारमुळे बिघडला नाही. उलट काकाचं सुपरस्टार पद एकाच वर्षी धर्मेंद्राचे नऊ सिनेमे हिट झाल्याने डळमळीत झालं. त्यातल्या चार पिक्चर मधे धरम पाजी चोर होते.

अमिताभ, जितूजी आणि विनोद खन्नाची मुलं त्यांना शोभेल अशी झाली नाहीत. उलट फ्लॉप स्टार्स म्हणून शिक्का बसला. पण जितूजींच्या मुलीने टिव्ही इंडस्ट्रीवर एकहाती राज्य केलं. धरम पाजींच्या मुलाने पुढचे सुपरस्टारपद पटकावले. पुढचा अँग्री यंग मॅन म्हणून सनी उदयाला आला. बिचार्‍याने काकी सोडून अफेअर्स नाही केली. नाहीतर अमिताभ रेखा सारखं त्याचंही नाव कुणासोबत जोडलं जायला हवं होतं. त्यामुळे त्याचं सुपरस्टार पद अपूर्ण राहिलं. याबाबतीत त्याने दक्षिणेच्या रजनीकांतचा आदर्श घेतला.

जे जे सुपरस्टार झाले त्यांनी सौंदर्याचा पराक्रम गाजवलेल्या कन्या पटकावल्या. रेखा जितूजी, निश्चलजी, विनोद मेहराजी करत करत बिग बीं कडे स्थिरावली. हेमा जितूजी, संजीवजी, गिरीशजी करत करत धरम पाजी़कडे स्थिरावली. पण हेमाच्या मुलींनी पण नाही काढलं. रेखाला तर मूलबाळच नाही. बिग बींचं सरकार फारच काळजीवाहू निघालं.

लॉटरी लागली राकेश रोशनला. बिचारा विनोद मेहराच्या ही नंतर नंबर लागेलसा हिरो. त्याच्या पेक्षा अभिनय न करणारा फ्रोजन खान जास्त हिट राहिला. त्याचाही मुलगा फारच दीनवाणा निघाला. आताशा वजन कमी झाल्याचे फोटो बघायला मिळाले. प्रति विनोद खन्ना म्हणून उदयास आलेल्या तंदुरूस्त ओबेरॉयचा पण विवेक काही काळ जागृत झाला. तो ही न आवडण्याचे कारण सलमानप्रमाणेच. आता बिचारा चरित्रपट करतोय. तो असाधारण कधीच वाटला नाही. एकदाच वाटला जेव्हां विश्वसुंदरीचं त्याच्या बरोबर अफेअर असल्याच्या बातम्या आल्या.

याच्या बरोबर ?

या झिपर्‍या बरोबर ?

शोभलं का गं तुला ऐश ?
अभिषेकचं एक ठीक आहे. त्याच्या सारखा भाग्यवान कुणी नाही. बायको आणि बाप प्रसिद्ध आणि कमावते असण्याचं भाग्य फार कमी लोकांच्या वाटेला येतं. त्यामुळे आपलं काम चाललं काय न चाललं काय, सगळं चालतंय.

हे असं होतं..
ऐश्वर्या राय आहे ती. सम्राज्ञी आहे. करोडो लोकांच्या हृदयावर तिचं साम्राज्य आहे. मग शुभेच्छा देताना पण एव्हढा आढावा आपोआप घेतला जाणारच ना ?

उशिराने का होईना विश्वसुंदरीस वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
तिचं वय नसतं विचारायचं. ते तालच्या वेळीच लॉक झालंय.

आज कुणाचा वाढदिवस आहे ते माहिती नाही..

पन काल हा धागा न लिहीण्याचे कारण म्हणजे....
बरं जाऊ द्या
आवरतो आता हा पांचट लेख. पांचटच म्हणायचं. कारण धागा सेलेब्रिटींना वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी काढला होता हे सांगायचंच राहिलं लांबण लावायच्या नादात. Wink
सेलेब्रिटी म्हणजे महत्वाचे स्टार्स.
जसे रणवीर शौरी, रणवीर सिंग, रणवीर कपूर, अजय देवगण, अक्षय कुमार, अनिल कपूर, संजय कपूर, उदय चोप्रा, संजय दत्त, सनी लिओनी, सनी देओल, बॉबी देओल, धर्मेंद्र, हेमा मालिनी, फैजलखान, सैफ अली खान, के आर के, मिका सिंग, राखी सावंत झालंच तर फरीदा जलाल, जावेद जाफ्री, नावेद जाफ्री...

आणि हो !

कालच्या वाढदिवसाबद्दल.... एक कुणीतरी शाहरूख खान म्हणून माजी टिव्ही स्टार आहे तयास देखील शुभेच्छा !

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अच्छा म्हणजे आम्हाला उगाचच नाही वाटायचं अभिषेक-राणी मुखर्जी जोडी आहे असं.
पण अभिषेक बच्चन आणि करिष्मा कपूर अशीपण जोडी होती ना?
रूपाली, साथियामधल्या विवेक ओबेरॉयसाठी +१ Happy

अभिषेक बच्चन आणि करिष्मा कपूर अशीपण जोडी होती ना?
>>
बच्चन च्या साठीला दोघांची एंगेजमेंट पण झाली होती...
पण पुढे डब्बी मुळे मोडलं (काका - काकी, डब्बू - डब्बी)

@अँकी, अभिषेक बच्चन करिष्मा कपूरच्या लग्नाच्या बातम्या वाचल्या होत्या. डब्बी Proud

ऋषी कपूर डिंपल सुद्धा लग्न करणार होते पण रज कपूरने होऊ दिलं नाही, कारण ते दोघे सावत्र बहीण भाऊ आहेत अशी एक अफवा होती. Lol
डिंपल ही राज नर्गिसची मुलगी असून सांभाळायला कापडियांकडे दिली होती. सो सिंपल... देवयानी चौबळ असलंच काय काय लिहायची. पण तिच्यावर कधी कुणी कारवाई केली नाही.

ग्रेपवाईन च्या हवाल्यानी समजलेली काही लफडी...

खिलाडी : नवाब शाह ची बेगम, सांबा ची पुतणी / भाची, सॉफ्ट पॉर्न वाल्याची बायडी, फनीबोन्स, पिगी चॉप्स
विमल : लोलो, सांबा ची पुतणी / भाची, राणी ची बहिण

टायपिंग पेशन्स संपला
बाकी पार्ट 2 मधे...

ह्या सगळ्या गडबडीत फा च्या पोस्टला दाद द्यायचं राहून गेलं. फा - as usual म्हणायचंय, पण म्हणत नाही, पण मस्त लिहिलंयस रे. देव आनंद आणि राजेश खन्नाविषयी तुझी निरीक्षणं परफेक्ट आहेत.

र.आ., वावे, फेफ - आभार Happy

पहले उस आदमी के बाल काटके दिखाओ ही भानगड होईल. >>
डब्बी >>> Lol

ते सांभाची भाची वगैरे वाचले की कोणीतरी कोणालातरी आणलेल्या स्थळाची चर्चा चालू आहे असे वाटते Happy

ऐश्वर्या भाग्यवान निघाली जोडीदाराबाबत, करिश्माचं तिच्या आईमुळे दुर्भाग्य म्हणायचं.

राणी आणि ज्युनिअर बच्चन व्हावं अशी जयाची इच्छा होती हे वर लिहिलेलं युवा नंतर खूप ऐकण्यात होतं.

गेल्या जनरेशनच्या अभिनेत्रींपैकी ऐश्वर्याने आपलं वागणं अतिशय क्लासी ठेवलं आहे असं सतत जाणवतं .. चित्रपटातली गरज वगळता केलेलं अंगप्रदर्शन वगळता खऱ्या सार्वजनिक आयुष्यात कधीही अंगप्रदर्शन नाही , खाजगी आयुष्याचं प्रदर्शन नाही , मुजोरपणा व्यक्त करणारी वक्तव्यं नाहीत.. तात्पुरत्या प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी थर्ड रेट कार्यक्रमांमध्ये खाजगी आयुष्याचा पाढा वाचणं नाही ...

तुलना करणं कदाचित योग्य नसेल पण अलीकडे राजकीय पाठबळाच्या जोरावर हवेत गेलेल्या माजी मुख्यमंत्री पत्नींनी मुलीसोबतचे शेअर केलेले जीभ बाहेर काढलेले फोटो - नको त्या गोष्टींची आठवण करून देणारे .. , शोभत नसलेला बिबळ्या ड्रेस आणि थिल्लर वक्तव्यं कुठे आणि माजी विश्वसुंदरी असून थिल्लर वेशभूषेच्या मोहाला बळी न पडता स्वतःचा आणि मुलीचा आब सतत राहील अशीच वेशभूषा दोघींसाठी निवडण्याची मॅच्युरिटी , संयत वागणं कुठे ... कौतुक वाटत राहतं .. ऐश्वर्या पूर्वीपेक्षा आवडू लागली आहे .

धमाल लेख. पुलंची एक अळूच्या फदफद्याची उपमा आहे ते कसं वाहत कुठून कुठे जातं, तसा आहे. अर्थात तसाच लिहिलाय आणि जमलाय.
ऐश्वर्य ५० वर्षांची झाली हे पाहून धक्का बसला.

काल झी मराठीवर माधुरी आली होती. बहुतेक चष्मा लागलाय पण लावत नाही . डोळे बारीक करून बघत होती.

प्रतिसादातून अजून मनोरंजन झाले.
काही ठिकाणी एकमत एकदम.
सलमान नावडता लिस्ट मध्ये जायला त्याने ऐश ला दिलेला त्रास देखील होताच.

काल झी मराठीवर माधुरी आली होती. बहुतेक चष्मा लागलाय पण लावत नाही . डोळे बारीक करून बघत होती>>> Lol Lol म्हणजे आमच्या सारखीचे ती Wink

लेख आणि प्रतिक्रिया मस्त आहेत. अजून येउंद्यात Happy
राधानिशा +१. मला १ हॉलीवूड शो मधे तिने तुम्ही भारतिय एकत्र (पालकांसोबत) का राहता ह्या प्रश्नाला दिलेले उत्तर फार चपखल वाटले होते..तेंव्हा पासून व्यक्ती म्हणुन तिच्या बाबत आदर वाटतो. सुशमिता ची मतं तर आहेतच उत्तम. दोघी आपापल्या जागी बेस्ट आहेत.

मस्त लेख !

मला १ हॉलीवूड शो मधे तिने तुम्ही भारतिय एकत्र (पालकांसोबत) का राहता ह्या प्रश्नाला दिलेले उत्तर फार चपखल वाटले होते..)))
@ aashu29 काय उत्तर दिले होते

इथे अफेअर्सचा विषय आला आहे म्हणून - धरमपाजींची सगळ्यात जास्त अफेअर्स असावीत. मीनाकुमारी, हेमामालिनी , मग जया प्रदा , अनिता राज. आपला लेक आपल्या पावलावर पाऊल ठेवून चाललेला मात्र त्याला खपलं नाही. त्याने एका पिक्चरमध्ये डिंपलसोबत जबरदस्तीने किसिंग सीन ठेवला. यक्क.

डिंपल राज नर्गिस ची मुलगी असल्याची अफवा इथे कुणीच ऐकलेली नाही ? सो सॅड ! शोनाहो Lol
किमान सोनाक्षी सिन्हा रीना रॉयची मुलगी असल्याची तरी ऐकलीये का ?

मजा आली - काकी महान होते.

"आपलं कसं फोकस्ड असतंय. ऐश्वर्या म्हणजे ऐश्वर्या आणि प्लान बी म्हणून सोनाली बेंद्रे. उत्तम व्यवस्थापनाचे लक्षण हे प्लान सी , डी , ई, एफ तयार असणे हे असते. तसे मग इलियाना डिक्रूज, अनुष्का शेट्टी, अमृता राव, नेहा असे प्लान ठेवले होते" >> ह्यातली सोनाली, अम्रूता, नेहा वगैरे नावे वाचून माझा डुआयडी आहे कि काय असे मलाच वाटून गेले. Wink

ऐश्वर्या वरचं लेखन धमाल आहे. Happy

सलमान खान मला अजिबात आवडत नाही. हातचं राखून काम करतो, शिवाय ते काळवीट प्रकरण आणि रोड किलमुळे माणूस म्हणून सुद्धा मनातून उतरला आहे. शिवाय कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या..! तसेच संजय दत्तचे टाडा प्रकरणापासून तोही मनातून उतरला. चांगले नागरिकच किंवा माणूसच नसाल तुम्ही तर या प्रसिद्धीला काय अर्थ आहे.

ऐश्वर्या हुशार आहे, अभिषेक खरंच चांगला आणि प्रगल्भ वाटतो.
रेखाची सिमीच्या शो मधली मुलाखत बघितली आणि तिनं किती सहन केलं आहे हे लक्षात आलं. ती 'हजबंड हंटर' नव्हती, तिच्या आयुष्यात आलेले पुरुष 'अंगवस्त्र हंटर' होते. तरीही ती कधीही कडवटपणा दिसू देत नाही, यात तिचं मोठेपण दिसून येतं.

अमिताभ बच्चनने जे यश - प्रसिद्धी बघितली आहे , ती मिळवल्यानंतर तोल सांभाळणं अशक्य असावं, पण त्याला जमलं आहे.

हिरो-हिरोईन एकमेकांसोबत दिवसरात्र शूटिंग करतात, फिजिकली क्लोज प्रॉक्जिमिटी मधे येतात, सिनेमा चालावा म्हणून अफेअरच्या अफवा पसरवल्या जातात, तरूण- यशस्वी असतात त्यांच्याकडून अशा चुका(?) झाल्या तर नवल काय..!

असामी Lol

फेफ - अफवा नसती तर शत्रू - रीना यांनी घेतलेल्या कष्टांचे फळ विनासायास मिसेस सिन्हांच्या उदरात कसे गेले असेल ? Wink हे अमर अकबर अँथनीला लाजवणारं मेडीकल सायन्स झालं. ( त्या वेळेला सरोगसी सर्रास नसणार)

@अस्मिता - ही वेगळी जीवसृष्टी आहे. यक्ष आणि अप्सरांची. त्यामुळे मर्त्य मानवांना फाट्यावर मारत, कोण काय म्हणेल याचा लोड न घेता ते मजेत जगत असतात, त्यांच्या बातम्या सुद्धा ते स्वतःच मर्त्य मानवांच्या सृष्टीत चघळण्यासाठी सोडून देतात. म्हणून आपण सुद्धा एंजॉय करायचं. आपण काय त्यांची गचांडी पकडायला जात नाही. तसे कुणी करायला लागले तर मात्र आपण त्यांच्या बाजूने. एरव्ही सुरक्षित अंतरावरून आपण त्यांची आणि त्यांनी आपली मजा घ्यावी हे प्रॅक्टीकल आहे. याबाबतीत शिरीष कणेकर, देवयानी चौबळ , द्वारकानात संझगिरी यांच्या लिखाणाचा फॅन आहे.

डिंपल राज नर्गिस ची मुलगी असल्याची अफवा इथे कुणीच ऐकलेली नाही ?
>>>>> ऐकलीय ही अफवा..

काका आणि टीना बद्दल ही ऐकलेल.

आलिया भट्ट बद्दलची अफवा तर तिनेच करणच्या शो मध्ये सांगितल्यावर माझं Uhoh झालेलं

पण मला अजूनही सांभा च्या पुतणी / भाची बद्दल क्लिअर नाही झालं !

अरे छान लेख. चक्क सध्या कामाव र फोकस असल्याने वाचायचा राहिला होता. ऐश्वर्या स्कॉर्पिओ असल्याने मी फॅन नाही पण दुरून अ‍ॅडमायर करते. ताल मधील गाण्यात व एरवीही अप्रतिम दिसली आहे. ते अजुनही मुलीचा हात वाकडा धरून का चालतात दोघी. हात सोडला तर मुलगी
पळून जाइल काय.

सुरुवातीला अस्तात नट नट्यांचे वाढदिवस. नोव्हेंबरच्या शेव्टाला दिग्गज लोकांचे वादि असतात.

सुरुवातीला अस्तात नट नट्यांचे वाढदिवस. नोव्हेंबरच्या शेव्टाला दिग्गज लोकांचे वादि असतात. >>> आज कमलहसनचा वाढदिवस आहे.

एक करोड मानधन घेणारा भारतातला पहिला स्टार.
विरासत या अनिल कपूरच्या सिनेमासाठी कमलला पुरस्कार मिळालाय लेखनाचा. विरासत ज्यावरून काढला तो थेवरमगनम कमल हसनचा. त्याची कथा त्याने वतः लिहीली होती.
हे राम च्या वेळी पण त्याने स्वतः पटकथा लिहीली. त्या प्रोजेक्ट मधे काम करायची शाहरूख खानने इच्छा व्यक्त केली तेव्हां कमल म्हणाला कि खूप पैसे खर्च झालेले आहेत. तुझ्यासाठी छोटासा रोल दिला तरी तुझे मानधन मला झेपणार नाही. त्यावर शाहरूख ने फुकट काम करायची तयारी दाखवली. कमलने त्याला घड्याळ भेट दिलं.
हा किस्सा आज ऐकला. Happy

मजा आली लेख व प्रतिसाद वाचुन.
फ्रोझन खान, काकी वगळता हे लोलोल होतं.
नेहा कोण?
अभिषेक एरवी बरा असेल पण नट म्हणुन पडेल आहे.
फारेन्डचा पहिला प्रतिसाद मस्त होता पण अभिषेक आवडतो वाचुन आश्चर्य वाटलं (म्हणजे आवडुदे, फक्त आश्चर्य वाटलं).
सनी देओलची अफेअर होती हे वाचुन तर फारच आश्चर्य वाटलं.
आलिया भट्ट बद्दलची कोणती अफवा?

Pages