भाजप एवढे अजित पवारच्या पाय का पडते ?

Submitted by हस्तर on 24 October, 2023 - 06:06

हे मी नाही म्हणत
मीडिया मधल्या बातम्या आणि त्याहून महत्वाची आकडेवारी बघा

https://www.lokmat.com/editorial/bjp-in-government-but-the-government-is...
. ५० आमदार असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे १० मंत्री आहेत. चाळीसही आमदार नसलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे ९ मंत्री आहेत आणि ११५ आमदार असलेल्या भाजपचे फक्त १० मंत्री आहेत. ५० आमदार असलेल्या पक्षाकडे मुख्यमंत्रिपद आहे, चाळीसही आमदार नसलेल्या पक्षाकडे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्रीपद आहे, तर ११५ आमदारांच्या पक्षाकडे उपमुख्यमंत्रिपद; गृहमंत्री पद आणि थोडकीच महत्त्वाची मंत्रिपदे आहेत

जर शिंदे गट फोडून एवढा आटा पिटा केला ,वर सगळी कडे नमो लाट आहे तर साडेतीन जिल्ह्यांच्या पक्षाकडे एवढा पाया पडायची गरज काय ?
शिवसेना काय वाईट होती ? त्यांचे संघटना राष्ट्रवादी पेक्षा जास्त ,निष्ठावंत कार्यकर्ते जास्त

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बहुतेक हेमंत सरांचा दिवसभर एका जागी बसून वेळ कसा घालवावा हा प्रश्न मायबोलीने सोडवलेला दिसतोय. मिसळपाव वर पण होते का तुम्ही ? तिकडे काय अनुभव ?
राजेश काय हेमंत काय, आयडेन्टिटी गुप्तच राहत असल्याने तोंडावर पडले तरी चालतेय त्यांना. एखाद्या मुद्द्यावर चीतपट झालेच तर लगेच पवित्रा बदलून "अहो हिमालय इंग्लंडमधे कुठे आहे हे नाही हो विचारलेलं, तुम्हाला समजतच कसं नाही ? चीनने डोकलाम वर हल्ला केला त्याबद्दल तुमचं मत काय ? "
हे त्यांना जमतं. परत सरकार दहशतवादी नसतं हा त्यांच्या युक्तीवाद इथे उपस्थित करून चीन दहशतवादी नाही का ? असा प्रश्न विचारला कि कंपू करू नका असा आणखी भन्नाट आरोप ते करतात.

ते जिथे जातील तिथे ते सर्वोच्च न्यायाधिशाच्या सरन्याधिशांना पिंजर्‍यात उभे करणारे न्यायाधीश असतात, त्यामुळे इथले आयडी तर किस झाड कि पत्ती ! पूर्वी तीन न्यायाधीश कथा, एक न्यायाधीश कथा अशा डिटेक्टिव्ह स्टोरीज मिळायच्या वाचनालयात. त्यातलेच एखादे पात्र असावेत.

अदाणीचा फायदा = देशाचे नुकसान.
भाजप सत्तेत आल्यामुळे देशाचा अ‍ॅव्हरेज आय क्यु खाली गेला.
तूर्तास नुकसानीचे हे दोन दाखले पुरे.>>>>>
हे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना आज पर्यंत कळले नाही आणि तुम्हाला कळले ?
याच अदानी ला काँग्रेसच्याच कित्तेक मुख्यमंत्र्यांनी गुंतवणुकीसाठी बोलवले आहे , बाकीचे लाईन मध्ये उभे आहेत.
प्रत्येक राज्याला अदानी ची गुंतवणूक हवी आहे , पण काँग्रेसचा राजकुमार मात्र तूम्ही घरातील लाईट लावली की तुमचे पैसे अदानीच्या खिशात जातात सारख्या बालिश गप्पा हाणत असतो.

ती महुआ एकटीच अदानी च्या नावाने खडे फोडत आहे आणि अख्खी टी एम सी लांबून तमाशा बघत आहे . अदानी ला विरोध करताना देखील विरोधकांची एकी नसते तर फालतु गट बाजी चालत असते , सुशिक्षित जनता यांच्यावर विश्वास ठेवील का ? तरी पण केंद्रात पुन्हा एकदा कडबोळ्यांचे सरकार यावे आणि चांगला हाहाकार माचला पाहिजे अशी इच्छा आहे .
फक्त एकदा राहुल ने मीडियात सांगावे हमारे सहयोगी दल ने अदानी की investment अपने अपने राज्य मे करना बंद किया है !
बास्स !
बघा भाजप सत्तेतून बेदखल होती का नाही ......

दोन दा कळ. ती पोस्ट चुकुन डबल झाली.

काका सतरंज्या उचलणारे असतीलही. त्यांना त्याचे काही नाही तर मला कशाला काय वाटायचेय? संज्याने नाही का करामतीकर काकांसाठी खुर्ची उचलुन आणली होती, तसेच काका पण असतील. तसेही रीटायर माणसाला काही न काही उद्योग हवे असतातच.

बाय द वे, काका पण अदाणीला जाऊन भेटत असतात. काका हुशार आहेत, पप्पुला हे कळायला अख्खा जन्म लागेल. पप्पु आता पोतराजासारखे फटके पण मारुन घ्यायला लागलाय. हेच बघायचे बाकी होते. Proud

कधी पंक्चर काढायला जातो, कधी ट्रक चालवतो. एक न धड भाराभार चिंध्या !

महाराष्ट्रात आतासुद्धा कडबोळी सरकार आहे आणि हाहाकार माजला आहे. पण त्याला बहुधा अमृतकाल म्हणत असावेत.

अदाणीबद्दल सुशिक्षित लोकांचे डोळे उघडले आहेत. (तसं तर याच महाभागाने ते आधी कबूल केलं आहे. पण.....)
पुन्हा भाजप सरकार आलं की महाराष्ट्रातसुद्धा चारपाच ब्रिजभूषणसि़ंग , कुलदीप सेगार तयार होतील . राठोड आणि कदम आहेतच. मज्जा ना?
मणिपूर तर झाल़ंच आहे.

फार्स, महाराष्ट्रातील जनतेची अक्कल आता गायपट्ट्यातील जनतेइतकी झालेली असण्याची फार मोठी शक्यता तुम्ही विचारात घेतली आहे का?>>> मी १६ वर्षे दिल्ली NCR मधे राहुन २०२१ ला मुंबईत आलो. मला हो गोष्ट सतत जाणवते. महाराष्ट्र / मुंबई खुप मागे पडत आहे.सगळीकडे नुसते राजकीय पक्षांचे बॅनर लागलेले असतात. त्यामुळे शहराला एक विद्रुप कळा येते. रस्त्याची अवस्था तर भयानक आहे. ठाण्यात तर प्रचंड खड्डे आहेत अगदी स्पिडब्रेकर वर पण खड्डे आहेत Happy
सोसायटीत तर घरच्या गणपतीला पण ढोल पथक बोलवतात लोक. अगदी दिल्ली टाईप शो ऑफ असतो. वर आणि मुंबईत रहात असल्याचा attitude आणि प्रचंड superiority complex. अरे जरा बाहेरच जग / भारत बघा. असो हे खुपच मोठे विषयांतर झाले.

5 वर्ष पूर्ण कार्यकाळ केलेला एक च मुख्यमंत्री महाराष्ट्र ल मिळाला आहे.
एक च पक्षाचे सरकार महाराष्ट्रात खूप वर्ष पूर्वी होते.
तो इतिहास झाला येथून पुढे तर कधीच एकाचं पक्षाचे येणार नाही.
कडेबोळ चे सरकार च महाराष्ट्र मध्ये असणार

काका सतरंज्या उचलणारे असतीलही. त्यांना त्याचे काही नाही तर मला कशाला काय वाटायचेय? >>>> मग ज्या कामाला ठेवलंय तेवढंच करा म्हणावं. कशाला मोठ्या गप्पा मारायच्या, सतरंज्या ऊचलायच्या, झाडू मारायचा नी चालू लागायचं. ऊगाच आतल्या गोटातील माहीतीय वगैरे फुशारक्या काकांनी मारू नये. बाकी ह्याच संज्याने १०५ घरी बसवून महाराष्ट्र वाचवला हे विसरू नका. महाराष्ट्रावर ऊपकार आहे त्यांचे.
बाकी काकांचा नी अदानीची मैत्री जुनी आहे म्हणून तर काकांना विश्वगुरू आपला गुरू मानतात. काकाअदानीच्ा कानात काही कुजबूजले तर विश्वगुरूंना वडनगर गुरूही राहता येनार नाही.

भाजप समर्थकांनी एका प्रश्नाचे उत्तर द्या. अजित पवार भ्रष्टाचारी आहेत की नाहीत?>> समर्थक कश्याला सुप्रीम लीडर साहेबांनीच सांगितले आहे की. खरेच बोलतात ते.

भाजप समर्थकांनी एका प्रश्नाचे उत्तर द्या. अजित पवार भ्रष्टाचारी आहेत की नाहीत? >>>>>
ते भाजपसोबत आहेत तो पर्यंत नाही. भाजपची साथ सोडली की भ्रष्टाचारी.

कोण कोणत्या पक्षात आहे ह्या वर तो व्यक्ती भ्रष्टाचारी आहे की नाही हे अवलंबून आहे.
प्रत्यक्षात सर्व पक्षातील सर्व नेते भ्रष्ट आहेत.
( अपवाद ०.०००००१ लोक असू शकतात ती पण खात्री देता येत नाही)

बाकी ह्याच संज्याने १०५ घरी बसवून महाराष्ट्र वाचवला हे विसरू नका. महाराष्ट्रावर ऊपकार आहे त्यांचे.>>>>>>>> Rofl Rofl Rofl Rofl

संज्याच्या कर्तुत्वावरचा तुमचा अढळ विश्वास पाहुन मन गहिवरुन आलं, हृदय सद्गदीत झालं आणी नकळत हात जोडले गेले. Biggrin माऊली धन्य आहात.

याच संज्याने अख्खी शिवसेना संपवली. चिन्ह पण दिले शिंदे गटाला. उधोजी हातात नसलेला चुना व तंबाखु मळत बसले. पेंग्विन सुपरफास्ट पद्धतीने बोलु लागला. काय काय घडवले संज्याने ! जरा सर्व्हे करा संज्या विषयी. उगाच भुवया उंचवुन फालतु बडबडायचे, दरवडाणीच्या सुरात धमक्या द्यायच्या, खंडण्या वसुल करायच्या, सुसुबाई बरोबर बॉल डॅन्स करायचा हेच करायला सांगा याला.

शिवसेना संपली का याचं उत्तर निवडणुकीत मिळेल. तोवर धीर धरा.

तोवर अजित पवार भ्रष्टाचारी आहेत की नाहीत, ते ठरवा आणि सांगा.

बाय द वे, काका पण अदाणीला जाऊन भेटत असतात. काका हुशार आहेत, पप्पुला हे कळायला अख्खा जन्म लागेल. पप्पु आता पोतराजासारखे फटके पण मारुन घ्यायला लागलाय. हेच बघायचे बाकी होते. >>>>>>>
तरी पण मॅडम गेली वीस वर्ष झाले त्याला सेटल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि काँग्रेसी बिचारी जनता ब्र काढायला तयार नाही Happy
अरे किमान उमेदवार भक्कम तरी मागा !

अदाणीचा फायदा = देशाचे नुकसान.
भाजप सत्तेत आल्यामुळे देशाचा अ‍ॅव्हरेज आय क्यु खाली गेला.
तूर्तास नुकसानीचे हे दोन दाखले पुरे.>>>>>>
पाहिजे तर अदानी साठी अजून एक धागा काढायचा ना !
इथे उल्लेख करायचा आणि काँग्रेसच्या अलायांस मध्ये अदानी दर्शन साठी हपापलेल्या नेत्याबद्दल एकायची तयारी ही नाही याला काय अर्थ आहे ?

भाजप मुळे लोकांचं काय नुकसान झालं हा प्रश्न कोणी विचारला?

अजित पवारांवरच्या धाग्यावर अजित पवारांबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची तयारी नाही याला काय अर्थ आहे?

सरकारी संपत्ती नगण्य भावात खासगी उद्योगांना कमिशन घेवून विकण्याची परंपरा भारतात खूप जुनी आहे .
आता खरेदी दार अडाणी आहे पहिला कोणी बजाज,जिंदाल असेल..
बँकांचे उद्योगपती नी घेतलेले कर्ज ज्या हेतू नी घेतले त्या वर खर्च न करता स्व स्वार्थासाठी ते पैसे त्यांनी उडवले तरी .
ती कर्ज ( उद्योग वाचवण्या साठी ह्या गोंडस नावाखाली)
माफ करण्याची परंपरा पण भारतात खूप जुनी आहे.
आता अडाणी,अंबानी लाभार्थी आहेत पहिले दुसरे उद्योगपती लाभार्थी होते.
बस फक्त इतकाच फरक आहे.

न खाउंगा न खाने दुर्गा.

अरे ले लो भाई जुमला ले लो
गरम मसालेदार जुमला ले लो.

बरं धागा अजित पवारांवर आहे. तिथे सुद्धा हाच जुमला लागू पडतो ना?

BJP अजित पवार नाच्या पाया पडत नाही.
Bjp अजित पवार ह्यांना आपल्या तालावर नाचवत आहे.

धाग्याचे शीर्षक चुकीचे आहे.
इतक्या भ्रष्टाचार chya केसेस अजित पवार न वर सरकारी यंत्रणा दाखल करतील की त्यांचे राजकीय जीवन च संपून जाईल .
त्या पण खऱ्या केसेस कोर्टात सिद्ध होणाऱ्या..
आणि केंद्रात bjp सरकार आहे केंद्र सरकार बहुमत असणारे काय करू शकते ह्याची जाणीव त्यांना आहे.
ते भीती नी bjp मध्ये गेले आहेत.
त्यांचे पाय पकडून त्यांना bjp नी पक्षात आणले नाही.
कान पकडून आणले आहे.
पुढे पण bjp ch सत्तेत आली तर
अजित पवार ना कोणतेही मंत्रिपद नाही दिले तरी ते hu की चू पण करणार नाहीत

अजित पवार ना कोणतेही मंत्रिपद नाही दिले तरी ते hu की चू पण करणार नाहीत>> पुण्याच्या पालक मंत्री पदासा ठी रुसुन बस्लेले ना.

BJP अजित पवार नाच्या पाया पडत नाही.>>>

खालील पर्यायांतुन योग्य पर्याय निवडा -

- BJP, अजित पवार, नाच्या पाया पडत नाही.
- BJP, अजित पवार नाच्या पाया पडत नाही.
- BJP अजित पवार नाच्या पाया पडत नाही.
- BJP, अजित, पवार नाच्या पाया पडत नाही.

संजय राऊत
कधी सत्तेत होते,कधी कोणत्या खात्याचे मंत्री होते.
त्यांच्यावर भ्रष्टाचार च आरोप कसा करणार, फसवणुकीचा होवू शकतो.पण तो सिद्ध करने अवघड असते.
अजित पवार खूप वर्षा पासून सत्तेत पदावर आहेत.
त्या पदाचा वापर करून अनंत भ्रष्टाचार केल्याची ची प्रकरण नक्कीच आहेत.

आणि ती सिद्ध करणे पण जास्त कठीण सरकार ल जाणार नाही.
अजित पवार ह्यांच्या बरोबर गेलेले बहुसंख्य लोक मंत्री पदावर होते.
आणि एकनाथ शिंदे बरोबर गेलेली पण बहुसंख्य लोक मंत्री पदावर होती.
हे साम्य लगेच लक्षात आले पाहिजे.
संजय राऊत आणि अजित पवार ह्यांच्यात फरक आहे ना.
तो लक्षात घ्या.
संजय राऊत सत्तेत कधीच नव्हते पण अजित पवार सत्तेत होते

शारद पवार पण खूप वर्ष सत्तेत होते.
१) त्यांनी अडाणी,मोदी संबंध वर कधीच भाष्य केले नाही.
२) मोदी न वर कधीच सरळ हल्ला चढवला नाही.
३) ब्रीज भूषण प्रकरणात कधीच bjp वर टीका केली नाही.
४ ) सिक्कीम की कुठे त्यांनी bjp सरकार ला पाठिंबा दिला आहे.
५) मणिपूर विषयी केंद्र सरकार वर त्यांनी कधीच टीका केली नाही.
आता ह्याला चाणक्य नीती म्हणत असाल तर वेगळी गोष्ट आहे..

शारद पवार पण खूप वर्ष सत्तेत होते.
१) त्यांनी अडाणी,मोदी संबंध वर कधीच भाष्य केले नाही.
२) मोदी न वर कधीच सरळ हल्ला चढवला नाही.
३) ब्रीज भूषण प्रकरणात कधीच bjp वर टीका केली नाही.
४ ) सिक्कीम की कुठे त्यांनी bjp सरकार ला पाठिंबा दिला आहे.
५) मणिपूर विषयी केंद्र सरकार वर त्यांनी कधीच टीका केली नाही.
आता ह्याला चाणक्य नीती म्हणत असाल तर वेगळी गोष्ट आहे..

याच संज्याने अख्खी शिवसेना संपवली. चिन्ह पण दिले शिंदे गटाला. उधोजी हातात नसलेला चुना व तंबाखु मळत बसले. पेंग्विन सुपरफास्ट पद्धतीने बोलु लागला. काय काय घडवले संज्याने ! जरा सर्व्हे करा संज्या विषयी. उगाच भुवया उंचवुन फालतु बडबडायचे, दरवडाणीच्या सुरात धमक्या द्यायच्या, खंडण्या वसुल करायच्या, सुसुबाई बरोबर बॉल डॅन्स करायचा हेच करायला सांगा याला. >>>>
राऊत साहेबांनी १०५ घरी बसवले हिया रागातून संज्या वगैरे असं बोलून तुम्ही फस्ट्रेशन काढलं तरी काहीही फरक पडत नाही.

२०१९ ला राऊत साहेबांनी महाराष्ट्र वाचवला नसता तरआसगळं काही गुजरातला शिफ्ट झालं असतं. पार इडी समोरही न झूकता राऊतांनी आपण खरे मराठी मावळे आहोत हे दाखवून दिलं भाजप आणी इडीच्या दहशतीला न जुमाननारा महाराषच्रातील एकमेव नेता संजय राऊत आहेत. भाजपवर थेट टिका फक्त राऊतच करतात. राऊतांविरूध्द इतकी गरळ ओकली जाण्यामागे हे एकच कारण आहे.
मराठी माणसाचा स्वाभिमान म्हणजे संजय राऊत

बाकी रश्मा नी पुरोगामी जाणूनबुजून धागा भटकवताहेत. भरत सर बरोबर सांगताहेत. मुळ प्रश्न तोच राहतो. अजित पवार भिरष्ट आहेत की नाही. ह्याचं ऊत्तर भाजप समर्थकांनी द्यावं.

राऊत साहेबांनी १०५ घरी बसवले हिया रागातून संज्या वगैरे असं बोलून तुम्ही फस्ट्रेशन काढलं तरी काहीही फरक पडत नाही.

सत्तेत कोण आहे आता.
१०५ च सत्तेवर आहेत ना.
सरकार ची धोरण १०५ वालेच ठरवत आहेत ना.
आणि १०५, ला मदत करून सत्तेवर आणणारे जुने जाणते च आहेत.
एक दोन वर्षापूर्वी ते bjp विरोधकांना ते आदर्श वाटत होते.

अजित पवार भ्रष्ट आहेत म्हणून तर दबावाला बळी पडून ते तिकडे गेले ना.
.
पण त्यांच्या भ्रष्ट वागण्या वर आता नियंत्रण आहे.
जे पाहिले नव्हते.

भूगोलाच्या तासाला साठोत्तरी मराठी कविता कशी बहरली यावर दिलेल मुक्त प्रवचन काहींचे डोळे दिपवू शकते. ते बरोबर आहे असे त्यांचे मत मनाला सुखावणारे असू शकते.

पण तास भूगोलाचा चालू आहे हे त्यांना कोण सांगणार?

आधी त्वेषाने तलवार चालवायचे आता चक्क बाजू घेताहेत

लक्षात घ्या नी इथे कोणत्याच आयडी ला विरोध करत नाही.ना कोणाची बाजू घेत आहे.

ठाकरे नी राष्ट्रवादी ,काँग्रेस सह सरकार बनवले ती योग्य लोकशाही प्रक्रिया होती.
पण bjp नी विनाकारण आकड तांडव केले म्हणून मी bjp विरुद्ध लिहीत होतो.
कारण त्यांची भूमिका चुकीची होती.
ठाकरे सरकार योग्य काम करत होते.
Covid सारखी स्थिती त्यांनी योग्य हाताळली होती.
पण ज्यांच्या भरवश्यावर bjp विरोध केला तीच मंडळी bjp मध्ये गेली.
शिंदे प्लस आमदार.
अजित पवार प्लस आमदार.
म्हणजे आपण चुकीच्या लोकांना पाठिंबा देत होतो ह्याची आता जाणीव झाली.
सर्व सारखेच आहेत त्यांचा पर्सनल स्वार्थ त्यांना महत्वाचा आहे.
हे सिद्ध झले.
म्हणून माझी पण मत बदलली

Hemant +1
सहमत. तुमची भूमिका या (पोस्टपुरती) पटली.
सध्याच्या राजकारण्यांबद्दल हीच जनभावना आहे. कुणा एकाची तळी उचलून धरा असा आग्रह नसेल तर पटणारे आहे. पण दुर्दैवाने सध्या तरी यातूनच एक निवडून द्यायचे आहे.

जनतेची ही अगतिकता हुषार राजकारणी हेरणार नाहीत तरच नवल. त्यामुळेच आमचा भ्रष्टाचार त्यांच्या पेक्षा शुभ्र कसा, आमचे फोडाफोडीचे राजकारण त्यांच्या पेक्षा पवित्र कसे ही जाहिरात ते करतात. उबग येतो.

नवीन खेळाडू आलाच तर तो निवडून येऊ शकणार नाही हे जनतेला पटवून दिलं जातं.

तर मग करायचे काय?
सोल्यूशन काय?

ठाकरे नी राष्ट्रवादी ,काँग्रेस सह सरकार बनवले ती योग्य लोकशाही प्रक्रिया होती.>>>बरोबर, एखाद्या पक्षाने निवडणूक पुर्व युती तोडणे हे लोकशाही प्रक्रियेत मान्य आहे, पण स्वार्था साठी पक्ष भुमिकेशी फारकत घेऊन (नियमबाह्यरित्या) एखाद्या गटाने पक्ष बळकावणे अथवा दुसऱ्या पक्षात जाणे हे घटनेने घालून दिलेल्या मर्यादांच्या (१०वे परिशिष्ट) बाहेर आहे, नियम बाह्य आहे. त्याउप्परही निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांना हाताला धरुन या घटनाबाह्य/नियमबाह्य कृत्याला पुढे रेटणे हा वागणूकीतला आणि वैचारिकतेचा भ्रष्टाचारच आहे. पैशांचा भ्रष्टाचार तर वेगवेगळ्या प्रकारे सगळेच एकजात करतात पण वरील कृत्यांना लोकशाहीच्या चौकटीत 'त्यांनी त्यांचे राजकारण केले' म्हणून माझे समर्थन त्यांना आहे, अशी पुस्ती जोडणे ही जर कोणताही स्वार्थ नसेल तर, कदाचित स्वतः ची फसवणूक असू शकते अथवा तार्किक/वैचारिक कुवतीतला तोकडेपणा.

भाजप एवढे अजित पवारच्या पाय का पडते ?
>>>>

एक विनंती
शीर्षकात अजित पवारांच्या असा बदल करता येईल का?
एकेरी उल्लेख असलेले शीर्षक योग्य वाटत नाही.

Pages