भाजप एवढे अजित पवारच्या पाय का पडते ?

Submitted by हस्तर on 24 October, 2023 - 06:06

हे मी नाही म्हणत
मीडिया मधल्या बातम्या आणि त्याहून महत्वाची आकडेवारी बघा

https://www.lokmat.com/editorial/bjp-in-government-but-the-government-is...
. ५० आमदार असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे १० मंत्री आहेत. चाळीसही आमदार नसलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे ९ मंत्री आहेत आणि ११५ आमदार असलेल्या भाजपचे फक्त १० मंत्री आहेत. ५० आमदार असलेल्या पक्षाकडे मुख्यमंत्रिपद आहे, चाळीसही आमदार नसलेल्या पक्षाकडे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्रीपद आहे, तर ११५ आमदारांच्या पक्षाकडे उपमुख्यमंत्रिपद; गृहमंत्री पद आणि थोडकीच महत्त्वाची मंत्रिपदे आहेत

जर शिंदे गट फोडून एवढा आटा पिटा केला ,वर सगळी कडे नमो लाट आहे तर साडेतीन जिल्ह्यांच्या पक्षाकडे एवढा पाया पडायची गरज काय ?
शिवसेना काय वाईट होती ? त्यांचे संघटना राष्ट्रवादी पेक्षा जास्त ,निष्ठावंत कार्यकर्ते जास्त

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भाजपला संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली हवा आहे. त्यांचे पहिले लक्ष्य सर्वंकष सत्ता. लोकसभा जागांच्या दृष्टीने महाराष्ट्र हे दुसर्‍या क्रमांकाचे राज्य.
आता एकेक राज्य हातातून निसटताना दिसत आहे,
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे आपले काही खरे नाही, हे भाजपच्या लक्षात आले. जंग जंग पछाडूनही मविआच्या कारभारावर जनतेत असंतोष निर्माण करता आला नाही. त्यामुळे २०२४ निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात आपले सरकार असणे गरजेचे. त्यासाठी आधी शिवसेना फोडली. पण त्या ४० पैकी किती जण स्वतः निवडून येऊ शकतील आणि लोकसभेत मते मिळवून देतील याबद्दल साशंकता. म्हणून राकॉ फोडणे गरजेचे झाले.
अजित पवारांनी भाजप आणि फडणवीसांचं जेवढं माकड केलं आहे, तेवढं दुसर्‍या कोणी केलं नसेल.

शेवटी ज्याच्या हाती सत्ता येते तोच सिकंदर >>> आणि जे सत्ता मिळवून देतात ते मतदार बंदर.

सर्वात मोठे असत्य म्हणजे एकहाती सत्ता/ स्थिर सरकार म्हणजे प्रगती ला वाव....या उलट एकहाती सत्तेमुळे जनमत, स्वयत्त संस्था अगदी वेळप्रसंगी न्यायव्यवस्थाही मोडीत काढले जाते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. साल्यांना अधांतरी झुलत त्रिशंकू करुन ठेवला तर जनतेच्या भल्यासाठी थोडीफार तरी कामे केली जातात.

अस्थिर सरकार चांगले हे मत निराशेतून आले आहे.

निराशा का ?
तर राज्यकर्ते जे जनताच निवडते त्यांची निवड चुकते.
पण स्वतः आपणच दोषी आहे हे मान्य न करता दोष दुसऱ्याच गोष्टी ला देवून स्वतः नामा निराळे राहायचे ही वृती.
स्थिर सरकार ठाम निर्णय घेवु शकते हे त्रिवार सत्य आहे.
पण योग्य लोकांना निवडून देण्याची जनतेची लायकी असायला हवी.
अयोग्य लोक निवडून दिलीत तर सरकार बहुमताचे असू किंवा आघाडीचे जनहित कधीच करणार नाही.

माझं तर म्हणणं आहे आपण अध्यक्षीय लोकशाही आणूयआ. पहिले अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे गव्हर्नर दोन्ही एकच सर.

सरकार योग्य नाही असे जे बोंबलत असतात ह्याचा अर्थ च हा आहे नालायक लोक अडाणी लोकांनी निवडून दिली आहेत

Vp सिंग चे अस्थिर सरकार होते.
फालतू कायदे ह्याच भंगार सरकार नी पास केले..
अस्थिर सरकार नी चांगले निर्णय घेतल्याचे एक उदाहरण ध्या.
Dr Manmohan सिंह सरकार सोडून .
Dr स्वतचं अती प्रचंड हुषार होते

सरकार योग्य नाही असे जे बोंबलत असतात ह्याचा अर्थ च हा आहे नालायक लोक अडाणी लोकांनी निवडून दिली आहेत>>> माझ्या मते सर्वच नालायक आहेत, त्यामुळे चेक ॲंड बॅलन्स साठी कडबोळे असणे केव्हाही चागले...नालायक लोकांकडे ठाम निर्णय घेण्याईतके पाठबळ असले तर ते स्वतःच्या फायद्याचेच निर्णय जनतेच्या माथी मारण्यासाठी त्याचा उपयोग करतात हे वारंवार दिसून आले आहे. पाशवी बहुमत हे अघोषित हुकुमशाही लादू शकते हे कुणीच नाकारू शकत नाही....आणि या चोरांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या आनंदासाठी हुकुमशाही लादून घ्यायला हे लाखो स्वातंत्र्यवीरांनी हे स्वातंत्र्य मिळवलेले नव्हते.

अस्थिर सरकार का हवं वरचा टेक भारी आहे.
पण काहीही फायदा नाही. महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार होतं. काय झालं?
थोबाड फुटल्याशिवाय (आता कोणाचं आणि किती वेळा विचारू नका) काही होणे नाही.

खेळिया, शब्द जपून वापरा.>> >> चुकून शब्द निघून गेला....पुन्हा अशी चूक होणार नाही. कोणत्याही जातीला हिणवण्याचा विचार नव्हता... कधीच नसतो... प्रतिसाद संपादित केला आहे...मोठ्या दिलाने माफी असावी.

पूर्ण बहुमतासाठी कोणते योग्य लोक? महाराष्ट्र विधानसभा आणि देशाची लोकसभा यासाठी उदाहरणे द्याल का?

अत्यंत दर्जाहीन प्रतिसाद.
लोकप्रतिनिधी निवडताना तो क्रिमिनल नाही ना?.
तो जातीवादी किंवा धार्मिक द्वेष करणारा नाही ना.
त्याचे शिक्षण किती आहे.
त्याच्या कडे समाजहित करण्याची कुवत आहे का?
त्याचे धंदे काय आहेत.
तो सभ्य आणि रॉयल व्यक्ती आहे का?
इतकेच लोकांनी बघायचे आहे.
कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे
आपल्या जातीचा आहे का.
आपल्या धर्माचा आहे का
हे बघण्याची बिलकुल गरज नाही.
पण इतका प्रगल्भ विचार करून मतदान करणारी लोक असायला हवीत.
तर च चांगली लोक सत्तेत येतील.

तो जातीवादी किंवा धार्मिक द्वेष करणारा नाही ना.
त्याचे शिक्षण किती आहे. >> ह्या दोन निकषावर न टिकणारे नाव कुणाचे आठवते ??

हस्तर, हाच प्रश्न मला काही दिवसापूर्वी पडला होता. अजीत पवारांनी पुण्याचे पालक मंत्री पद स्वतःला मिळवण्यासाठी लहान मुलासारखे वागणे, रुसणे हे अनाकलनीय होते. तसेही काका- पुतण्या- काक ( काकांची कन्या सुसु ) स्वतःला पुण्याचे जहागीरदार समजतात. जसे काही यांच्या बापजाद्याने यांना आंदण दिलेय.

मग एका परीचीत काकांना ( हे भाजप मधल्या आतल्या गोटाशी संबंधीत आहेत, फक्त आमदार खासदार वगैरे नाहीत ) विचारले तेव्हा ते म्हणाले थोडे दिवस कळ काढा, मग बघा रिझल्ट. शहा व मोदींना काय कच्चे समजलात का? पवार कुटुंबीयांना हे दोघे चांगलेच ओळखुन आहेत. वगैरे वगैरे..

आता मी पण कळ काढणार आहे. बघ्या. घोडा मैदान ( निवडणुका ) तसेही लांब नाही.

हस्तर, हाच प्रश्न मला काही दिवसापूर्वी पडला होता. अजीत पवारांनी पुण्याचे पालक मंत्री पद स्वतःला मिळवण्यासाठी लहान मुलासारखे वागणे, रुसणे हे अनाकलनीय होते. तसेही काका- पुतण्या- काक ( काकांची कन्या सुसु ) स्वतःला पुण्याचे जहागीरदार समजतात. जसे काही यांच्या बापजाद्याने यांना आंदण दिलेय.

मग एका परीचीत काकांना ( हे भाजप मधल्या आतल्या गोटाशी संबंधीत आहेत, फक्त आमदार खासदार वगैरे नाहीत ) विचारले तेव्हा ते म्हणाले थोडे दिवस कळ काढा, मग बघा रिझल्ट. शहा व मोदींना काय कच्चे समजलात का? पवार कुटुंबीयांना हे दोघे चांगलेच ओळखुन आहेत. वगैरे वगैरे..

आता मी पण कळ काढणार आहे. बघ्या. घोडा मैदान ( निवडणुका ) तसेही लांब नाही.

मग एका परीचीत काकांना ( हे भाजप मधल्या आतल्या गोटाशी संबंधीत आहेत, फक्त आमदार खासदार वगैरे नाहीत ) विचारले तेव्हा ते म्हणाले थोडे दिवस कळ काढा, मग बघा रिझल्ट. शहा व मोदींना काय कच्चे समजलात का? पवार कुटुंबीयांना हे दोघे चांगलेच ओळखुन आहेत. वगैरे वगैरे..>>>>

असे भाजपच्या गोटातील अनेक काका पवारांनी भाजपला पुर्ण पिळून काढले तरी कळ काढा कळ काढाच करतच राहतात. ह्या कळकळीने पार भाजपची वाट लागली. (अजून ऊरली सुरली पुढील निवडणूकात लागनारच आहे) १०५ घेऊन घरी बसावे लागले, सिचन घोटाळ्यात क्लिनचीट द्यावी लागली. अजित दादांना १० मंत्रीपद द्यावे लागले. अजून कसली कळ काढता काका म्हणावं?? (काकांना आतल्या गोटात फक्त सतरंज्या ऊचलायला बोलावतात का? तेही कन्फर्म करा.)

तं श्रुत्वा निनिदं घोरं तस्व भीमस्य रक्षसः।
आचार्यमुसंगम्य भीष्मः शान्तनवोऽब्रवीत् ॥

दांडपट्: इत्र चलं अंद:धुद: ब्रो
आचार्यः दिड.मूढ मति प्रो
शिशिरगमनागमन हेमंतागमन
खड्ग दे दणादण दे दणादण

काँग्रेस,सेना,राष्ट्रवादी एक झाल्या मुळे bjp पुढे मोठे आव्हान उभ राहिले होते.
पण सेना आणि राष्ट्रवादी फुटून एक गट bjp ल मिळाल्या मुळे bjp ला निवडणूक जिंकणे सोप झाले आहे.

शहा व मोदींना काय कच्चे समजलात का?## मोदीचा करिष्मा ओसरला कीं काय, हे असले धंदे करायला लागतात ते??

आम्ही पार्टी विथ द डिफरंस आहोत या बोलाच्या कढीचे काय झाले?

मी या आधीही अनेक फोरम वर आणि इथेही कदाचित कोणत्या तरी धाग्यावर बोललो असेन, मोदी आणि शहा यांनी महाराष्ट्रातल्या मतदारांना गायपट्ट्यातले मतदार समजण्याचा जो अतिशहाणपणा केला आहे तो महाराष्ट्र भाजपाच्या आजवरच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरवणारा ठरणार आहे. महाराष्ट्रातील मतदार/जनता जरी स्वतः वैयक्तिक आयुष्यात पुर्णपणे विधिनिषेध पाळत नसला/नसली, तरीही जे तो उघड उघड पाळत नाहीत किंवा सर्व तत्वे उघड उघड खुंटीला टांगतात आणि वरुन त्याचे समर्थन करतात ( बोली भाषेत माजुर्डा) त्यांच्या विरोधात उभे रहाण्यात नेहमीच त्याचा कल असतो.

शिवसेना काय वाईट होती ? त्यांचे संघटना राष्ट्रवादी पेक्षा जास्त ,निष्ठावंत कार्यकर्ते जास्त>> >> भाजपाचा हिंदू वोटर्सचा बेस वाढवायचा तर स्कोप फक्त येनकेन प्रकारे शिवसेनेचा मतदार फोडणे (प्रतिमाभंजन, आमदार,/नेते पळवणे) हाच होता, अगदी युतीत असताना ही मोठा भाऊ बनण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात आपले अपक्ष उभे करुन, त्यांना पाठबळ देऊन पुढच्या निवडणुकीत वाढीव जागांची मागणी रेटने, मतदारसंघावर कब्जा करुन भाजपाचा वोटरबेस वाढवणे हे सर्व प्रकार झाले, जे आता सर्वांना उघड झाले आहेत.

सत्तेत मित्र हवेत हे भाजपाचे मुळ ध्येय कधीच नव्हते, त्यांना फक्त आपले बस्तान बसवायला/ हातपाय पसरायला ओसरीची गरज होती, वेळप्रसंगी अपमान गिळूनही त्यांनी ती ओसरी मिळवली हे त्यांचं राजनितीक कौशल्यच म्हणावे लागेल. नड्डा जे चुकून बोलून गेले की या देशात फक्त एकच पक्ष रहायला हवा, हेच त्यांचे मुळ ध्येय होते, आहे आणि राहील. त्यामुळे पॅरासाईट सारखे इतर क्षेत्रीय पक्षांवर वाढणे आणि पुरेसे बस्तान बसल्यवर त्या प्रादेशिक पक्षाच्या मुठ मातीची सोय करणे हीच त्यांची मोडस ओपरेंडी राहिली. तेच त्यांनी शिवसेनेसोबत केले. शिवसेना फोडणे हा एक लॉंग टर्म प्लॅन होता आणि राष्ट्रवादी फोडणे हे २०२४ ला सत्तेच्या पर्यायाने इडी, सिबीआय, आइडी यांच्या चाव्या आपल्या हातात राखण्यासाठी क्रमप्राप्त होते...........केंद्रात सत्ता गेली तर अमीत शहा आणि त्याच्या मुला सोबत काय होईल असा अंदाज आहे?? आता पुढे निवडणूकीत समजून येईल याचा किती फायदा भाजपाला होतो आहे.

Bjp विरुद्ध लोकमत जात आहे ह्याची जाणीव bjp ला आहे.
Ed च वापर कसा राजकीय फायद्यासाठी केला जातो हे प्रथम च bjp नी भारतीय लोकांना दाखवून दिले आहे.
Bjp विरुद्ध लोकमत आहे हे मान्य केले तरी bjp ला विरोध करणारा कोणता तरी राजकीय पक्ष तरी अस्तित्वात असावा ना?
आणि अशा पक्षाला प्रतिभा वंत नेतृत्व पण असावे ना?
तर लोकांना पर्याय मिळेल.

Bjp विरुद्ध लोकमत आहे पण पर्याय च लोकांसमोर bjp नी शिल्लक ठेवला नाही.

Bjp विरुद्ध लोकमत आहे पण पर्याय च लोकांसमोर bjp नी शिल्लक ठेवला नाही>>> लोक दगडालाही शेंदूर फासून देव बनवतात, अशा देवाचे दैवत्व त्या दगडातील गुणधर्मामुळे नसते तर त्याला स्थापन केलेल्या समुहाच्या विश्वासात ते देवत्व दडलेले असते. जसे या आधी दगडांचे देव झाले तसे या पुढे ही होतील. त्याची चिंता नसावी. नवीन दगडाच्या शोधात लोक आहेत हेच या प्रक्रियेत सर्वात जास्त महत्त्वाचे असते.

सध्या राहुल त्याच प्रोसेस मध्ये आहे !
आणि भाजप च्या सत्ते मुळे भ्रष्ट्राचारी विरोधकांना त्रास झाला असेल , इडी मुळे सामान्य लोकांना काय प्रॉब्लेम आहे तेच समजत नाही .
त्याच प्रमाणे भाजप सत्तेत असल्यामुळे देशाचे कोणते कसले नुकसान झाले हे कोणी सांगू शकेल का ?
दुसरी गोष्ट कडबिळ्यांचे सरकार आले तरी चालेल , पुन्हा एकदा लोकांना घेवूद्या च अनुभव !

अदाणीचा फायदा = देशाचे नुकसान.
भाजप सत्तेत आल्यामुळे देशाचा अ‍ॅव्हरेज आय क्यु खाली गेला.
तूर्तास नुकसानीचे हे दोन दाखले पुरे.

भाजपमुळे भ्रष्टाचारी विरोधकांना त्रास झाला? उदा : अजित पवार. त्यांना फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून उपमुख्यमंत्रीपदी बसावं लागतंय . (अजित पवार हे भ्रष्टाचारी आहेत हे भाजप , विशेषतः फडणवीसांचंच म्हणणं आहे ).

राजकारणातील सर्वात खालचे पद सरपंच,.
आणि प्रशासनातील सर्वात खालचे पद तलाठी,किंवा पोलिस हवालदार .
हेच लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करतात.

पक्ष कोणताही असू ध्या .
किंवा .
कोणत्या ही सामाजिक स्तरातून आलेला कर्मचारी असू ध्या.
इतका भ्रष्टाचार भारतात मुरलेला आहे.
त्या हा अमका पक्ष भ्रष्टाचारी असा आरोप करताच येत नाही.
सर्व च भ्रष्ट आहेत.
फक्त percentages च फरक असू शकतो

फार्स, महाराष्ट्रातील जनतेची अक्कल आता गायपट्ट्यातील जनतेइतकी झालेली असण्याची फार मोठी शक्यता तुम्ही विचारात घेतली आहे का?

अकलेचे माहित नाही पण आतापर्यंत फक्त गाय पट्टयातच होणार्‍या लाजिरवाण्या गोष्टी आता महाराष्ट्रातही होऊ लागल्या आहेत. बीफ च्या संशया वरून मॉब लिंचिंग, त्या आरोपींना राजकीय संरक्षण, दंगलीमुळे इंटरनेट बंद ठेवायची नामुष्की वगैरे. सुशिक्षित मराठी तरूण आता गुजरात मध्ये जावून भेळपुरी विकतील.

मुंबई मध्ये मोडकळीस आलेल्या जुन्या चाळीच्या बिल्डिंग खूप लोकांनी बघितल्या असतील.
प्राईम लोकेशन नाला आहेत.
त्या buliding मध्ये सर्व आर्थिक स्तरातील लोक राहतात.
काहींची घर सुख समृद्धी नी भरलेली आहेत तर काही गरीब आहेत.
पण ह्यांचे सर्वांचे भविष्य फक्त त्या कमजोर सांगाड्यावर आहे .
तो कोसळला की सर्वांचं अस्तित्व संकटात सापडणार.आहे.
तसे भारताची अवस्था मोडकळीस आलेल्या इमारतीं सारखी आता आहे.

जो पर्यंत इमारत कशी तरी उभी आहे तो पर्यंत सर्व सुरक्षित आहेत.
पण जर ती कोसळली तर सर्वांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.
गरीब,अती गरीब,श्रीमंत,अती श्रीमंत ह्या मोडकळीस आलेल्या भारत नावाच्या इमारतीत राहत आहेत.
ती कोसळू देवू नका.
चार स्तंभ ज्या वर इमारत उभी असते.
त्या स्तंभ ला कीड लागली आहे.
भारताला उत्तम नेतृत्व मिळाले नाही,विचारी लोकांचे पाठबळ मिळाले नाही .
तर हा देश कधी ही कोसळू शकतो.
आणि तो कोसळला की सर्वांचे अस्तित्व धोक्यात येईल.

भावनिक राजकारण करणाऱ्या नेतृत्व चं भारताला गरज नाही.
विचार, संयमी, दूर दृष्टी असणारे नेतृत्व हवं आहे.
अनेक जण मोदी न कडे आशेने बघत आहेत.
त्यांनी काही चुका केल्या असतील पण तसेच खंबीर नेतृत्व भारताला हवं आहे

जनता माफ नही करेगी
https://www.youtube.com/watch?v=VGmNBxoRPgc

जब तक इस अ‍ॅड मे दिये गये वादे हकीकत मे उतर नही जाते, भाजपा को सत्ता दिलाते रहेंगे.
https://www.youtube.com/watch?v=jdhFJYuhD38

फार्स, महाराष्ट्रातील जनतेची अक्कल आता गायपट्ट्यातील जनतेइतकी झालेली असण्याची फार मोठी शक्यता तुम्ही विचारात घेतली आहे का?>>> अक्कल कदाचित झाली ही असेल पण पण उपजत मुरलेल्या भावना आणि स्वभावविशेष बहुतांशी अकलेवर भारी पडतात. त्यामुळे एखाद्याचा माज उतरवाची खुमखुमी जितकी मला महाराष्ट्रातल्या लोकांच्या अंगात मुरलेली दिसते तितकी इतरत्र ती विरळाच आढळते. म्हणूनच हातचं राखून अंदाज बांधला आहे. शेवटी निवडणूकांत काय होईल ते दिसेलच.

अदाणी घोटाळा हे भावनिक राजकारण आणि वोट देताना जय हनुमान बोला हे विचारी संयमी आणि दुरदृष्टी चे राजकारण ‌‌‌‌‌... वाह रे पठ्ठेहो...भले शाब्बास

हे सर्व ठीक आहे ,खरे आहे असे मानले तरी पर्याय कोण आहे bjp ल.
यूपी,बिहार च्या यादव पार्टी, .
महाराष्ट्र मधील पवार,ठाकरे पार्टी.
बंगाल मधील ममता पार्टी.
की अस्ताव्यस्त झालेली काँग्रेस पार्टी.
केजरीवाल ची आप.
दक्षिणेतील राज्यांना देशाशी काही देणंघेणं नाही.
पर्याय कुठे आहे

शरद पवार न च वय 80 च्या पुढे असेल.
निसर्ग आपले काम करत च असतो इतके वय असल्या वर शरीर नक्कीच साथ देत नाही.
त्यांनी पक्षाची जबाबदारी पुढच्या फळी मधील नेत्यांवर सोपवणे गरजेचे होते पण नाही.
लोभ काही संपत नाही
त्यांनी फक्त मार्गदर्शक म्हणूनच च काम करणे गरजेचे होते.
पक्ष फुटण्याचे हे पण एक कारण असू शकतं

दक्षिणेतील राज्यांना देशाशी काही देणंघेणं नाही.>> काय सांगता!!
याला काही आधार आहे का? की आपली नेहमी सारखी तलवारबाजी..

लोकांसमोर bjp नी शिल्लक ठेवला नाही
>>>
कोण हे लागून गेले शिल्लक न ठेवणारे? बीजेपी किंवा इतर कुणाही पक्षासमोर लोकांनी पर्याय शिल्लक ठेवला नाही- असं मात्र होऊ शकतं, आणि साक्षात इंदिरा गांधींबद्दलही असं झालं आहे. तुम्ही बहुतेक अ‍ॅडल्ट आहात, मतदार आहात असा एक अंदाज आहे, आणि तो बरोबर असेल तर तुम्ही स्वतःचाच अपमान करत आहात.

पर्याय कोण आहे bjp ला
>> ते असं नसतं हे कितीवेळा सांगून झालं आहे, सिद्धही झालं आहे. संसदेसमोरच्या चनेफुटाण्यावाल्यांचा पक्षही चालेल, असं कुणीतरी केव्हातरी, बहुतेक विकु का कोण, म्हणून गेलेच आहेत (पद्धत आहे म्हणायची, येतील परत इथंच, जे असतील ते).

तर हा देश कधी ही कोसळू शकतो
>>>
असलं काहीही झालेलं नाही, आणि होणार नाही. हा देश एक महानद आहे, आणि तो आपल्या डौलाने, आपल्या स्वतःच्या वेगाने आणि चालीने हजारो वर्षे सुखेनैव चालतो आहे. कुणीतरी जोकर येऊन छडी फिरवून बदलून टाकीन म्हणेल तर ते होत नाही, शक्यही नाही. जोकर आणि छड्या सतत बदलत राहतात, पण देश त्याच्या स्वतःच्या चालीने बदलत राहतो, चालत राहतो.

हायला, आता लक्षात आलं, हे महाशय अजित पवार वगैरेंना डायरेक्ट इंटरनॅशनल कम अध्यात्मिक पातळीवर न्यायलेत. अशाने अजित पवार सुद्धा हाणतील यांना. सांभाळा.

उगाच वैश्विक वगैरे प्रतिसाद लिहिला झालं. मॅग्नेटिक कायतरी आहे यांच्यात. इनसे कैसे बचे ये सोचना मंगताहै. यांच्या चक्करमध्ये डिलक्सच्या ऐवजी सूट बूक केला गेला, किंवा फुगेवाडीच्या ऐवजी रुबीहॉलला गेलो तर केवढ्यात पडेल.

देश कोसळणे कशाला म्हणतात.?
हे पहिले समजून घ्या.
१) अर्थ व्यवस्थेचे तीन तेरा वाजने.
२) देश कर्जात बुडणे( जसे आता श्री लंका विषयी झाले)
३) देशात कायद्याचे राज्य संपुष्टात येणे.
पोलिस यंत्रणा आणि न्याय व्यवस्था पूर्ण नाकाम होणे.
प्रशासन पूर्ण पने भ्रष्टाचार मुळे अस्तित्व हिन होणे
४) लोकांची संपत्ती,जीवन हे धोक्यात येणे.
५) चलना ची किंमत खूप मोठ्या प्रमाणात कोसळणे.( म्हणजे महागाई चरम सीमेवर पोचणे)
आणि ह्याची सुरुवात झाली नाही असे कोणी बोलू शकतं नाही..

अजितपवार अजितपवार दहा वेळा म्हणा बघू.

धाग्याच्या विषया, हे आहेत सर. सर, हा धाग्याचा विषय. ओळख करून घ्या बघू, कामी येईल. हो सकता है हमारा त्रास वाचेगा.

Pages