अजून किती बळी जाणार?

Submitted by केअशु on 23 October, 2023 - 02:59

आज हे वृत्त वाचले.

https://www.livemint.com/companies/people/parag-desai-wagh-bakris-ed-pas...

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर येतो. यांच्यामुळे लोकांचा जीव जातो किंवा लोक जखमी होतात. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर पुरेशा क्षमतेने काम होत नाही. दरवेळी पेटावाले किंवा प्राणीमित्र भटक्या कुत्र्यांच्या बाजूने बोलत राहतात. मुक्या प्राण्यांना समजून घ्या. भटकी कुत्री का पिसाळतात , रात्रीबेरात्री का भुंकतात हे समजून घ्या वगैरे टेपा लावतात. अगदी न्यायालयापर्यंत लढत राहतात भटक्या कुत्र्यांसाठी. माणसांमधे बलात्कारी , मनोरुग्ण , सणकी अशा स्वभावाचे लोक असू शकतात मग भटक्या कुत्र्यांनी असं वागलं तर त्यांना ठार का मारता? वगैरे विचारणा प्राणीमित्र करतात.भटकी कुत्री रात्रीबेरात्री भुंकतात त्याचा त्रास होत असेल तर सणासुदीला मोठमोठ्यानं डॉल्बी लावले जातात ते कसे चालतात अशीही विचारणा होते.
भटक्या कुत्र्यांची पैदास शून्यावर आणण्यात खरा अडथळा हे प्राणीमित्रच आहेत. एखाद्यादिवशी या प्राणीमित्रांचाच बळी भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानं गेल्याशिवाय यांना त्या विषयाचे गांभीर्य समजणार नाहीये.
प्राणीमित्रांच्या या अतिरेकी प्राणीप्रेमाला पायबंद घालू शकेल असा एखादा नियम , कायदा भारतात का असू नये?

Group content visibility: 
Use group defaults

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमधून जे ४ लेनचे हायवे जातात त्या रस्त्यांवर भाकड गुरांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण प्रचंड आहे. बीफ बॅन झाल्या पासून हे अपघात वाढले आहेत.

https://www.thehindu.com/news/national/other-states/over-900-deaths-in-accidents-caused-by-stray-cattle-in-haryana-in-five-years/article65753193.ece

भारतात इतके लिंचिंग नी आणि काय नी काय करतात. पाकिस्तानमध्ये घुसुन अतिरेक्यांना मारतात आणि साधी कुत्री मारता येत नाहीत? विष बिष नाही घालत का परस्पर? करताय काय!
भारत आणि रशिया म्हशीचे मांस निर्यात करार साईन अप करतंय ना?

प्राणीमीत्रांनी प्राण्यांना पकडण्याविरुद्ध किंवा निर्बीजीकरण करण्याविरुद्ध काही कायदा पास होणे थांबवले असे काही उदाहरण आहे का तुमच्याकडे ? किंवा असलेले कायदे एन्फॉर्स करण्यात खूप मोठ्या प्रमाणावर अडथळे आणले असे काही ? मला तर शासन व्यवस्थेचा आळशीपणा दिसतो. जर प्राणीमित्र लोकांनी शासनाला मोकळीक दिली तर विश्व भटक्या कुत्र्यांपासून मुक्त नंदनवन होईल असा लेखाचा सूर आहे. शासनाला कचऱ्याचे कंटेनर वेळेवर उचलण्याची मोकळीक आहे ना ? उचलतात का ? नाही. भटके कुत्रे अश्या कचऱ्यावरच जगतात, हवेवर नाही.

म्हणजे सगळी साधनसंपत्ती आणि पब्लिक सपोर्ट आहे शासनाकडे. पण जबाबदारी कुणाची तर प्राणीमित्रांची. हास्यास्पद.

पूर्वी भटके कुत्रे पकडून नॅशनल पार्कमध्ये बिबळ्यांना खाद्य म्हणून सोडले जायचे. भटक्या कुत्र्यांची संख्या कमी व्हावी म्हणून त्यांना मारायला न्यायालयाने बंदी घातली आहे. आता त्यांना रिलोकेट करण्यावरही बंदी आहे.

कुत्र्यांना ठार करणे , त्रास देणे हाही गुन्हा आहे.

भटक्या कुत्र्यांना खायला घालणार्‍या फीडर्सना आडकाठी करणे, धमकावणे, त्यांना तुमच्या घरी नेऊन खायला घाला असे सांगणे यासाठी तुमच्यावर पोलिस केस होऊ शकते.

उलट सोसायट्यांनी आवारातल्या कुत्र्यांसाठी निवारा आणि अन्नपाण्याची सोय करावी असे न्यायालयाचे आदेश आहेत.

भटक्या कुत्र्यामांजरांवर कुटुंबनियोजनाच्या (?) शस्त्रक्रिया करून त्यांची संख्या आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, पण तो पुरे पडत नाही. मुंबई मनपाने नुकताच यासाठी पंधरवडा की सप्ताह पाळला होता. हे काम स्वयंसेवी संस्थांना आउट सोर्स केले आहे आणि त्यासाठी त्यांना पैसे दिले जातात. अशा संस्था कमी आहेत आणि त्यांना आपले काम करायला जागा मिळणे कठीण जाते.

भटक्या कुत्र्यामांजरांना खाऊ पिऊ कसं केव्हा कुठे घालायचे याबद्दलही न्यायालयाने की अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाने नियम केले आहेत. सोसायटीच्या प्रवेशद्वाराशी नको. अधिक रहदारीच्या वेळी नको, इ.

आमच्या भागातील वरिष्ठ पोलिस अधिकारी प्राणीप्रेमी आहेत. त्यांच्या फेसबुक पेजवर रोज त्यांचे भटक्या कुत्र्या मांजरांसोबतचे फोटो असतात. त्या पोलिस स्टेशनमध्येही भटक्या कुत्र्यांना मुक्तद्वार आहे. पंख्याखाली मस्त झोपलेल्या कुत्र्यांचा फोटो त्यांनी शेअर केला.

या बातमीनंतर मला त्या पोलिस अधिकार्‍याच्या पोस्ट्स वारंवार दिसू लागल्या. एका महिन्यात दोन सोसायट्याच्या पदाधिकार्‍यांना फीडर्सना त्रास दिला म्हणून पोलिस स्टेशनला बोलावल्याचे दिसले.

आमच्या समोरच्या सोसायटीत दोन कुत्रे आहेत. ते कुत्रे गेटमधून आत शिरणार्‍या, त्यांच्यामते संशयास्पद लोकांवर भुंकतातच. कधीकधी दुचाक्यांचा पाठलाग करतात. दोन शाळांतली मुले या रस्त्याने जात येत असतात. त्यातील काही या कुत्र्यांच्या भुंकण्याचं प्रकरण कळल्यापासून त्यांना येताजाता आवाज करून चिडवतात.
सोसायटीत एक डिस्पेन्सरी आहे. तिथे येणार्‍या पेशंट्सनाही हे कुत्रे घाबरवतात.
आमच्या शेजार्‍यांच्या केअर टेकरवर आमच्या गेटमधून बाहेर पडताना दोन्ही कुत्र्यांनी एकत्र हल्ला केला व त्यातला एक त्या इसमाला चावला.
कुत्र्यांना आपल्या मनातली भीती वाचता येते आणि घाबरलेल्याच्या ते पाठी लागतात. सॉर्ट ऑफ डिमेंटर्स. काल आमच्या वरच्या घरातला ११-१२ वर्षाचा मुलगा त्याचा मित्र खेळा यला येण्याची वाट पाहत रस्त्यावर उभा होता. कुत्रे दुसर्‍या कोणावर तरी भुंकायला म्हणून समोरून गेटबाहेर आले. तेव्हा हा मुलगा घाबरून पळाला. तर एक कुत्रा त्याच्या मागे लागला. सुदैवाने चावला नाही. पण यापूर्वी मुलांनाही चावला आहे.

कुत्रे अशावेळी कोणावर धावून जात असतील , भुंकत असतील तर अशावेळी फीडर फॅमिली तिथेच उभी असली, तिथून जात असली तरी आपण त्या गावचेच नाही असं करते.

सध्या मी मॉर्निंग वॉकला जाताना दोन फुटाची एक काठी घेऊन जातो. वाटेत दोन जागा अशा आहेत जिथे सात आठ कुत्री असतात. त्यांनी काही ठरवले तर त्यांच्यापुढे त्या काठीने निभाव लागेल का माहीत नाही. तसंच कुत्र्यांना काठीने घाबरवणे हेही आक्षेपार्ह आहे म्हणे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी एका वकिलाच्या हाताला बँडेज होतं. तो कारमधून बाहेर पडताच भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता. सरन्यायाधीशांनी बँडेज पाहून चौकशी केली आणि मग त्यांच्या त्यांच्या भटक्या कुत्र्यांच्या भीतीदायक अनुभवाची चर्चा झाली. suo moto action घेणार का ते कळले नाही.

त्याआधी काही दिवस रेबीज होऊन मेलेल्या एका मुलाचा व्हिडियो व्हायरल झाला होता. कुत्रा चावल्या चावल्या इंजेक्शनचा कोर्स सुरू करणे आवश्यक आहे. एकदा रेबीज झाला की काही उपाय नाही. आणि मृत्यू फार भयानक होतो. मुलाला कोणत्याही हॉस्पिटलने अ‍ॅडमिट करून घेतले नाही. तो वाहनात वडिलांच्या मांडीवर रडत असल्याची क्लिप फिरत होती.

काही देशांमध्ये भटक्या कुत्र्यांना समाज - फीडर्स, हॉटेल्स - भरपूर खायला घालतो. मग ते सुस्तावतात आणि कोणाला त्रास देत नाहीत (म्हणे).

मुंबईत अनेक वर्षांपासून बर्‍याच भागात कचर्‍याचे ते गोलाकार उघडे डबे नाहीत. आता प्रत्येक सोसायटीला झाकण असलेली बिन मिळते आणि त्यांनी ती ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळी आणून ठेवायची असते. त्यामुळे कुत्र्यांना आधीसारखं कुठे खायला शोधायची सोय राहिलेली नाही.

कॉमी, आमच्या समोरच्या सोसायटीतली अमुक कुत्रे चावतात म्हणून मनपात तक्रार आल्यावर मनपावाले कुत्रे पकडायला आले होते. तेव्हा प्राणिमैत्रिणीने धावत येऊन ती कुत्री न्यायला मनाई केली. तिने सध्या फीडिंग करायचे काम एका तरुणाला दिले आहे. कुत्र्यांना सोसायटीपासून लांब रस्त्याच्या टोकाला जिथे इमारती नाहीत, तिथे नेऊन खायला घाला असे सोसायटीतल्या एकाने सांगितल्यावर - प्राणिमैत्रिणीने रस्त्यावर खायला घालणे चुकीचे नाही. मी काही सोसायटीत खायला घालत नाहीए (यावरून आधी सोसायटीच्या मी टिंगमध्ये बराच गदारोळ झाला होता)
असं ठणकावलं. व त्या तरुणाला सांगितलं, की पुन्हा कोणी अडवलं तर १०० वर फोन करून मी त्या प्राणिप्रेमी पोलिस अधिकार्‍याचे नाव घेऊन, त्यांच्याशी बोल असे सांगितले.

भटक्या कुत्र्यांना मारू नये, रिलोकेट करू नये, फीडर्सना त्रास देऊ नये हे निर्णय प्राणीप्रेमींनीच न्यायालयात जाऊन मिळवले आहेत. अर्थात या सगळ्या गोष्टी (मारू नये इ.) मला योग्य वाटतात. पण त्याच वेळी भटक्या कुत्र्यांची भीतीही वाटते.

BTW या पराग देसाईंनी सुद्धा भटक्या कुत्र्यांसाठी काम केले आहे (देणग्या, दवाखाने, शेल्टर्स इ.)

मला पण हे कुत्रे क्युट वाटतात पण हे प्राणी प्रेमी वात आणतात. आमच्या एरियात दोन चार कुत्री आहेत त्यांना मी एकदा हटकल तर ते माणसं सारखे बाजूला झाले पण बाजूची प्राणी प्रेमी बाई कुत्र्यासारखी अंगावर आली. मी पण भडकलो बोललो एव्हढा पुळका आहे तर घरी ने आणि बांध. तडक बाजारात गेलो आणि कुत्र्याचा पट्टा आणला. एका कुत्र्याच्या गळ्यात बांधला आणि बोललो घे तुझा कुत्रा. बाई चांगलीच भांबावून गेली. तिच्या घरापर्यंत कुत्रा घेऊन पाठीवर गेलो. जाताना कुत्र्याशी गप्पा मारत होतो. कुत्र्याला बोललो ही बघ तुझी नवीन मम्मी. मम्मी तुला आता चिकन मटण देणार, हाडं देणार, दुधू देणार. कुत्रं पण शेपटी हलवत मस्त चालत होतं. घरी पोहचल्यावर बाईला बोललो मी डेंजर माणूस आहे रस्त्याने चालताना गप्प होतीस म्हणून कुत्रा परत घेऊन जातोय यापुढे माझ्यासमोर असा थिल्लरपणा करशील तर तुला आणि कुत्र्याला एकच रूममधे डांबून ठेवीन. त्यानंतर ती बाई दोन दिवस तापाने आजारी होती.

मी स्वतः dog owner आहे पण तरीही उपद्रवी dog lover नाही. मला stray dogs बद्दल कणभरही प्रेम नाही (कारणं वर भरतने लिहिलेली आहेत तीच). Stray dogs पेक्षा मला प्राणीप्रेमी (incl कबुतरांना खायला घालणारे) लोकांची जास्त चीड आहे. कुत्र्यांची आवड आहे तर स्वतःच्या घरात का ठेवत नाहीत. सोसयटीच्या जीवावर यांना प्राणीप्रेम का दाखवायचं असतं? ना त्यांना कंट्रोल करतात, ना त्यांची शी-शु साफ करतात. फक्त खायला घालणे म्हणजे प्रेम का?
जे लोक खरोखर कुत्रा पाळतात, ते त्या कुत्र्याला घरात ठेवतात, हजारो रुपये औषधपाण्यासाठी घालतात, वेळच्या वेळेला खायला घालणे, shampoo करणे, vaccines, शि-शु साफ करण्याची जबाबदारी घेतात.
(अपवाद वगळता) प्राणीप्रेमी वरवर सोयीस्कर तेवढच प्रेम करतात, मग बाकी जगाला कितीही त्रास झाला तरी चालेल.

मीरा यांच्याशी सहमत, मीही भुभु पालक आहे पण काही करता फक्त प्राणिप्रेमी म्हणून मिरवणारे डोक्यात जातात

वरती नसबंदी संदर्भात मुद्दा आला आहे त्यासंदर्भात एक स्वयंसेवी संस्थेशी बोललो त्यांनी सांगीतले की महापालिका कडे पुरेसे मनुष्यबळ आणि निधी असतो पण ते काम टाळायला बघतात
नसबंदी केल्यावर पुढे आठवडाभर भुभ्याची काळजी घ्यावी लागते जखम असते ती
पण हा सगळा व्याप पालिकेला नको असतो
स्वयंसेवी संस्था ना औटसोर्स करतात पण त्यासाठी इतकी तुटपुंजी रक्कम दिली जाते की त्यात ऑपरेशन सोडा एक आठवड्याची बिस्किटे येतात जेमतेम
एकूणच प्रचंड अनास्था हेच कारण

दुसरीकडे म्हणजे सो कॉल्ड माणूस म्हणवून घेणाऱ्या लोकांनी या भटक्या कुत्र्यांवर केलेले अत्याचार पाहिले तर काटा येतो अंगावर
तापलेले तेल ओतणे, शेपटीला फटाके बांधणे, अंगावरून गाडी नेणे, डोळे फोडणे, गच्चीवरून खाली टाकून देणे, बांधून ठेऊन काठीने मारून पायाची हाडे मोडणे Sad

कुत्रा चावतो तो त्याचा स्थायीभाव आहे पण या विकृत लोकांचे काय करायचे?

जी लोक कुत्री पाळतात त्यांचा पण त्रास च असतो लोकांना.
सार्वजनिक जागेत.
म्हणजे रस्त्यावर, सोसायटी आवारात ही पाळीव कुत्री संडास आणि मूत्र विसर्जन करतात.
त्यांचे मालक बिलकुल ती केलेली घाण साफ करत नाहीत.
त्या मुळे अनेक वेळा अनेक ठिकाणी हाणामाऱ्या पण झालेल्या आहेत..

भटक्या कुत्र्या न विषयी म्हणाल तर ती एक समस्या आहेच.
ही भटकी कुत्री सरासरी देशी जातीची असतात.
अस्सल भारतीय.
सरकार नी माध्यम मार्ग शोधावा..एकदा मोठ् भूखंड त्या साठी विकसित करावा .
अशा भटक्या कुत्र्या न साठी.
अनेक प्रजाती जगातून नष्ट होत आहेत.
ही प्रजात पण जपने गरजेचे आहे.

https://twitter.com/pfaindia

पराग देसाईंचा मृत्यू कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे झाला नाही हे हॉस्पिटलचं स्टेटमेंट त्यांनी आवर्जून शेअर केलं आहे.
https://twitter.com/pfaindia/status/1716656382160883809 त्यांच्या अंगावर कुत्र्यांच्या चावण्याच्या किंवा हल्ल्याच्या खुणा नव्हत्या, असं हॉस्पिटल म्हणतंय. संस्था म्हणतेय त्यांना आधी ब्रेन हॅमरेज झाला आणि ते पडले.

भरत अगदी योग्य आहे तुमचे.
देसाई चा मृत्यू ब्रेन hamrage मुळेच झाला आहे.
पण मेंढरं सारखी वृत्ती मीडिया नी दाखवली आणि एक सारखी head लाईन देवून बातमी दिली.
भटक्या कुत्र्या न मुळे त्यांचा मृत्यू झाला म्हणून.

तो माझा मुद्दा नाही. समजा भटक्या कुत्र्यांपासून पळताना ते पडल्यामुळे ब्रेन हॅमरेज झाला असेल तर? ते भटक्या कुत्र्यांपासून पळत होते हे त्या संस्थेने नाकारलेले नाही. त्यांच्या मृत्यूबद्दल आधी दु:ख व्यक्त करायची तसदीही घेतलेली नाही.
आणि देसाईंचा एकवेळ झाला नसेल, पण भटक्या कुत्र्यांमुळे कोणाचाच मृत्यू झाला नाही , असं आहे का?

तुम्ही इथे सुद्धा नेहमीप्रमाणे फाटे फोडायला आला असाल तर भटकी कुत्री तुमच्या मागे लागावीत अशा शुभेच्छा तुम्हांला देईन.

भारतात भटकी कुत्री जास्त असण्याची कारण.
१) लोक आपली पाlळीव कुत्री नंतर रस्त्यावर सोडून देतात.
२) किंवा लोक पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर फिरण्यास मोकळीक देतात.
३) योग्य प्रकारे त्यांची नसबंदी केली जात नाही त्या मुळे त्यांची संख्या वाढते.
४)रस्तावर कचरा असाच उघडा पडलेला असतो त्या मध्ये फेकलेले अन्न असते .
ते कुत्र्यांची अन्न ची गरज भागवते.

भटक्या कुत्र्यांचा त्रास खरेच बेकार आणि जीवघेणा आहे.
ते भुंकतात वगैरे ठीक आहे. पण रात्री खरेच बेकार भीती वाटते त्यांची.
मुंबईत राहायला असताना कधी जाणवली नव्हती. तिकडची लाईफ स्टाईल आणि नाईट लाईफ वेगळी होती.
पण नवी मुंबईमध्ये आधी वाशीला राहताना रात्री बारा नंतर रस्त्याला भीती वाटायची. सासुरवाडी चालत पाच मिनिट असल्याने रोज पोरांना घेऊन जाणे व्हायचे. कधी परतताना बारा वाजले तर ओला कॅब करून परत यायचो. पाच मिनिटे रमतगमत फुकटात चालावे तिथे सव्वाशे रुपये खर्च करणे परवडले असा विचार करायचो ते फक्त आणि फक्त कुत्र्यांच्या भीतीने. चावला मुलाला चुकून एखादा तर कितीला पडायचे...

सुदैवाने आता जिथे राहतो तिथे रात्री बरीच जाग असते. कुत्र्यांची भीती कमी वाटते. रात्री दीड दोन वाजताही जाग असल्याने मुलांसोबत फिरताना काही वाटत नाही.

किबहूना नवीन घर शोधताना मी आवर्जून रात्रीचे त्या एरियात जाऊन फिरायचो आणि तिथे कितपत जाग असते, कुत्र्यांचा त्रास असतो का वगैरे चेक करायचो. रात्रीचे बाहेर फिरणे खूप असल्याने एवढा हा प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा होता.

कॉमी, शासन इतर कुठलेही प्रश्न सोडवायला जितके निरुत्साहाने तयार असते तेवढेच या बाबतीत. या बाबतील प्राणीमित्रांचा आणि त्यांनी केलेल्या कोर्टकेसेसचा दबाव असल्याने त्यांचं.. म्हणजे शासनाचं आणखी फावतं. त्यामुळे रोख प्राणीमित्रांवर असल्यास वावगं नाही.
भरत +१.

आमच्या कॉलनीत एके काळी 19 भटकी कुत्री होती. माझा नवरा रात्री 10-11 ला यायचा तर काही कुत्री कारच्या आजूबाजूला धिंगाणा घालून मग जायची. नवरा कार लावून जिने चढून दारात सुखरूप दिसल्यावरच जिवात जीव येत असे.
आता संख्या कमी झाली तरी उपद्रव आहेच.

कुत्रे आणि टीसी हे जो घाबरतो त्याच्याच मागे लागतात. मी या दोन्ही प्राण्यांजवळून जराही विचलित न होता जातो. माझ्या वाटेला आतापर्यंत कुठलाच कुत्रा वा टीसी आलेला नाही.

माझ्या पूर्ण आयुष्यात भटक्या कुत्र्यांनी कधीच त्रास दिला नाही
पण पाळीव लाडक्या कुत्र्यांचा त्रास मात्र झाला आहे.
संडास,आणि मूत्र बिन्धास्त रस्त्यावर करायला ह्यांचे मालक सकाळी सकाळी ह्यांना सार्वजनिक ठिकाणी फिरवत असतात

अर्धी मुंबई उघड्यावर संडास आणि मूत्र विसर्जन करते.
काही दुटप्पी लोकांना कुत्र्यांनी केलेलं दिसतं.
अशा दुटप्पी लोकांच्या मताला कचर्‍याची टोपली दाखवतो मी! अणि माझा टॉमी अशांच्या विजारी बरोब्बर ओल्या करतो.

Pages