अजून किती बळी जाणार?

Submitted by केअशु on 23 October, 2023 - 02:59

आज हे वृत्त वाचले.

https://www.livemint.com/companies/people/parag-desai-wagh-bakris-ed-pas...

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर येतो. यांच्यामुळे लोकांचा जीव जातो किंवा लोक जखमी होतात. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर पुरेशा क्षमतेने काम होत नाही. दरवेळी पेटावाले किंवा प्राणीमित्र भटक्या कुत्र्यांच्या बाजूने बोलत राहतात. मुक्या प्राण्यांना समजून घ्या. भटकी कुत्री का पिसाळतात , रात्रीबेरात्री का भुंकतात हे समजून घ्या वगैरे टेपा लावतात. अगदी न्यायालयापर्यंत लढत राहतात भटक्या कुत्र्यांसाठी. माणसांमधे बलात्कारी , मनोरुग्ण , सणकी अशा स्वभावाचे लोक असू शकतात मग भटक्या कुत्र्यांनी असं वागलं तर त्यांना ठार का मारता? वगैरे विचारणा प्राणीमित्र करतात.भटकी कुत्री रात्रीबेरात्री भुंकतात त्याचा त्रास होत असेल तर सणासुदीला मोठमोठ्यानं डॉल्बी लावले जातात ते कसे चालतात अशीही विचारणा होते.
भटक्या कुत्र्यांची पैदास शून्यावर आणण्यात खरा अडथळा हे प्राणीमित्रच आहेत. एखाद्यादिवशी या प्राणीमित्रांचाच बळी भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानं गेल्याशिवाय यांना त्या विषयाचे गांभीर्य समजणार नाहीये.
प्राणीमित्रांच्या या अतिरेकी प्राणीप्रेमाला पायबंद घालू शकेल असा एखादा नियम , कायदा भारतात का असू नये?

Group content visibility: 
Use group defaults

कुत्रे आणि टीसी हे जो घाबरतो त्याच्याच मागे लागतात >>>> हा जर जोक असेल तर हा हा.
पण हे खरं नाही. रात्री बाईकवरून जाणाऱ्या लोकांना stray dogs विनाकारण chase करतात. त्यांच्यासाठी निव्वळ करमणूक असावी, पण लोकांचे अपघात होतात. दिवसा साळसूद/ सौम्य असणारी कुत्री देखील या खेळात जोरदार सामील असतात.

मी भटक्या कुट्र्यांबद्दल चीड व्यक्त केली आहे कारण माझ्या maid चा छोटा साडेतीन वर्षांचा मुलगा आईबरोबर जात असताना एका कुत्र्याने विनाकारण हल्ला केला. मुलगा सरळ रस्त्यावरून आईचा हात धरून चालत होता. त्या कुत्र्याने मुलाचा खालचा ओठ तोडून नेला. आता मुलगा गेले वर्षभर बिना ओठाचा जगतो आहे. कदाचित आयुष्यभर.
मी तिला Southern command hospital मधे जायला सांगितलं आहे (orange ration card मुळे तिथे treatment मिळते). आशा आहे की तिथे plastic surgery करून मिळेल. ससून ने तर हाकलून दिले. यावर प्राणीप्रेमीची प्रतिक्रिया शुन्य. Idiots!!!!

खालचा ओठ तोडून नेला. >>> आई ग Sad मलाही याचीच भीती वाटते नेहमी...कधी एखादा कुत्रा पिसाळतो आणि गरज नसताना चावत सूटतो.. आणि याचे प्रमाण बरेपैकी आहे

भाऊ रात्री येतो. हातात बिस्किटाचे पुडे घेउनच. कुत्र्यांचं टोळकं आलं की घाल बिस्किटं. जकात पट्टी भरावीच लागते.

माझ्या पूर्ण आयुष्यात भटक्या कुत्र्यांनी कधीच त्रास दिला नाही >>> भटकी कुत्री सरांच्या घरी येऊन टॉयलेट बाथरूम वापरून, फ्लश करून, पाय धुवून मगच जातात
सर त्यांच्याकडून शुल्कही घेत असतील

पाळीव कुत्रे वाले देत नसतील पैसे Happy

संडास,आणि मूत्र बिन्धास्त रस्त्यावर >>>> हा मुद्दा आला की चर्चेत असणारे ज्यांच्याकडे कुत्रा आहे अशी लोकं आम्ही नाही असे करत हे आवर्जून सांगतात. ते खरेही असेल. पण तरी तुम्ही नाही तर आणखी कोणी तसे करत असेल. कारण हा त्रास सगळीकडे आहेच.. स्पेशली सकाळी सफाईवाले येऊन जायच्या आधी झेलावा लागतो. त्यात कोणी आधीच केक कापला असेल तर त्याच्या पायाचे पुढंवर उमतलेले ठसे सुद्धा चुकवत चालावे लागतात..

२०११ ते २०१७ मी मलबार हील मध्ये जॉब साठी जायचो.
सकाळी चर्नी road ते मलबार हील गिरगाव चौपाटी वरून चालत जायचो.
लाडकी कुत्री त्यांच्या मानवी मालक बरोबर तेव्हाच फेरफटका मारण्या साठी चौपाटी वर असायची.
मालकाची खासगी प्रॉपर्टी असल्या सारखे ते कुत्रे रस्त्यावर बिन्धास्त संडास करायचे
मानवी मालकांना ते चुकीचे वाटायचे नाही.

(९९% जी लोक लाडकी कुत्री पाळतात त्यांची शी आणि सू सार्वजनिक जागेत नेवून च करून घेतात.
फक्त 1% कुत्रे पालक योग्य ती काळजी घेतात)

ह्या सहा वर्षात फक्त एकमेव तरुणी मी बघितली जी कुत्रा घेवून यायची पण .
पूर्ण तयारी नी ..
कुत्र्या नी संडास केली की ती उचलून घ्यायची ,तिच्या जवळ असणाऱ्या प्लास्टिक पिशवीत ते संडास ठेवायची आणि कचऱ्याच्या डब्यात टाकायची.
एकमेव अशी तरुणी मला दिसली.
बाकी सर्वांचे लाडके कुत्रे सार्वजनिक जागा बिन्धास्त घाण करत होतें.
भटके कुत्रे ह्यांना मानवी मालक नसतो .
म्हणून त्यांना टार्गेट करणे सोप असते.

सोसायटीला झाकण असलेली बिन मिळते आणि त्यांनी ती ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळी आणून ठेवायची असते. त्यामुळे कुत्र्यांना आधीसारखं कुठे खायला शोधायची सोय राहिलेली नाही.

भरत कोणत्या विश्वात राहता आणि लोकांची बुध्दी भ्रष्ट का
करता.
मलबार हिल, cuff parade सारख्या posh भागात च तुम्ही सांगता तशी स्थिती आहे
आणि त्या भागात भटकी कुत्री पण नसतात.
पण अत्यंत त्रासदायक असणारी कबुतर मात्र असतात ती लोकांच्या घरात बिन्धास्त प्रवेश करून घान करतात.

म्हणजे सगळी साधनसंपत्ती आणि पब्लिक सपोर्ट आहे शासनाकडे. पण जबाबदारी कुणाची तर प्राणीमित्रांची. हास्यास्पद.

Submitted by कॉमी on 24 October, 2023

तुम्ही भारतात असता की अमेरिकेत?
अमेरीकेत भरपूर साधनसंपत्ती असूनही इथलं शासन असं भटक्या कुत्र्यांची जबाबदारी घेत नाही. बिन मालकाचं कुत्रं shelter मध्ये नेतात. तिथे कोणीतरी रेस्क्यू डॉग म्हणून घरी पाळायला नेते किंवा शेल्टरवाले सांभाळतात. तेही नेहमी शक्य नसते त्यामुळे kill shelter असतात. हे असं भटकी कुत्री मिळून रात्री भुंकत फिरतायत, लहान बाळांना किंवा धडधाकट बिझनेसमनला मारून टाकतायत असे प्रकार नसतात.
प्राणीमित्र शब्द पण योग्य नाही. कुत्राप्रेमी म्हणा. भटक्या कुत्र्यांनी मिळून मांजरीच काय आसपासच्या जंगलातील हरणांना वगैरेही असंच टोळी करून मारून टाकल्याचं वाचलं आहे. प्लस त्यांना खायला हे प्राणीमित्र चिकन मटण देतातच. कुत्रा सोडून इतर सर्व प्राणी(माणूसही) मेलेले त्यांना चालतात.

अमेरिकेत कुत्रे नसतात पण माणसं पिसळतात त्याचं काय? दर महिन्याला कोणत्यातरी सायकोने शाळेत नाहीतर रेल्वेत गोळीबार केल्याची घटना येते पेपरात. त्यापेक्षा आमची कुत्री बरी. सगळ्यात सुरक्षित देश भारत आहे. आणि भारतापेक्षा सुरक्षित कोकण आहे.

अमितव तुमची कॉमेंट आणी आव अजिबात आवडला नाही.. झोपडपट्टी तले लोक उघड्या वर शौच करतात ते मजबुरी असावी पण उच्चभ्रू लोकांनी ते पाहून त्यांच्या पेट्स ला तसे करू द्यावे का? चुकीचंच आहे ते तुम्ही भलावण करत असलात तरी..

<भरत कोणत्या विश्वात राहता आणि लोकांची बुध्दी भ्रष्ट का करता.>
हेमंत सरकारस्वारी, मी मंगळावर राहतो. पण तुम्ही इथे येऊ नका.

तुम्ही भारतात असता की अमेरिकेत?
>> भारतात.
अमेरीकेत भरपूर साधनसंपत्ती असूनही इथलं शासन असं भटक्या कुत्र्यांची जबाबदारी घेत नाही. बिन मालकाचं कुत्रं shelter मध्ये नेतात. तिथे कोणीतरी रेस्क्यू डॉग म्हणून घरी पाळायला नेते किंवा शेल्टरवाले सांभाळतात. तेही नेहमी शक्य नसते त्यामुळे kill shelter असतात. हे असं भटकी कुत्री मिळून रात्री भुंकत फिरतायत, लहान बाळांना किंवा धडधाकट बिझनेसमनला मारून टाकतायत असे प्रकार नसतात.
>>>> जबाबदारी म्हणजे हेच म्हणायचे आहे. जबाबदारी म्हणजे भटक्या कुत्र्यांच्या समस्येची जबाबदारी.

रेबीजचे डोस कधी घ्यावे लागतात? लक्षणे काय?
डॉक्टरांनी सांगितले की २४ तासांच्या आत रेबीज प्रतिबंधक लसीचा पहिला डोस, तिसऱ्या दिवशी दुसरा डोस, सातव्या दिवशी तिसरा डोस आणि शेवटचा डोस २८ व्या दिवशी द्यावा लागतो. अन्यथा रेबीजची लागण होण्याचा व मृत्यूचा सुद्धा धोका उद्भवतो.रेबीजची काही स्पष्ट लक्षणे म्हणजे हायड्रोफोबिया (पाण्याची भीती), मान दुखणे आणि उलट्या होणे.

https://www.loksatta.com/trending/8-year-old-girl-dies-after-dog-bites-m...

मी नव्यानेच जॉईन केलेली आमची "डीवायपीयू स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, नेरुळ, नवी मुंबई," ८ व ९ डिसेंबर २०२३ दरम्यान दोन दिवसीय 11th Annual National Conference of Consortium Against Rabies (CARCON) 2023 आयोजित करणार आहे. ह्या कॉन्फरेन्समध्ये देशभरातील नामांकित व्यक्ते (प्रामुख्याने रेबीजवर कार्यरत संशोधक, वैज्ञानिक व शासनाचे प्रतिनिधी), प्राणीसंघटना, व प्राणिपालक ह्यांना सहभागी करून घेण्याचा मानस आहे. तर इच्छूक मायबोलीकर (सशुल्क) नावनोंदणी करून कॉन्फरेन्समध्ये सहभागी होऊ शकतात.

अमेरिकेत कुत्रे नसतात पण माणसं पिसळतात त्याचं काय? दर महिन्याला कोणत्यातरी सायकोने शाळेत नाहीतर रेल्वेत गोळीबार केल्याची घटना येते पेपरात.
बोकलत बोलले आणि अमेरिकेत गोळीबार झाला.

प्राणी पाळणे हा प्रकार माणूस हजारो वर्षापासून करत आहे.
पण त्या अडाणी माणसांनी खूप उच्च दर्जा चे वर्तन ठेवले होते.
ते आजचे तथाकथित सुशिक्षित लोक पण ठेवत नाहीत.
कुत्रा माणूस खूप दिवसा पासून पाळत आहे .
पण एक मर्यादा राखून त्याला बेडरूम पासून किचन पर्यंत कधीच माणसाने प्रवेश दिला नाही.
त्याच्या नैसर्गिक वर्तनावर कधीच बंधन घातले नाही.
हल्ली फ्लॅट मध्ये कुत्री,मांजर पाळली जातात.
बेडरूम पासून किचन पर्यंत ह्यांचं वावर असतो.
त्या मुळे प्राण्यान पासून माणसात विषाणू,जिवाणू ह्यांचे संक्रमण होण्याचा धोका आहेच.
त्यांच्या केसा मुळे, विष्छे मुळे नव नवीन आजार माणसात संक्रमित होवू शकतात.
भटकी कुत्री काही वेगळी वागत नाहीत.त्यांचा तो नैसर्गिक स्वभाव आहे समूह मध्ये राहण्याचा.
समूहात असताना कुत्री वेगळी वागतात.
हिंसक होतात आणि तो त्यांचा नैसर्गिक स्वभाव आहे.
माणसे पण समूहात असताना वेगळे वर्तन करतात.
माणसं पण समूहात असली की हिंसक होतात.
कारण प्राणी म्हणून माणसाचा पण तो नैसर्गिक स्वभाव आहे.
भटकी कुत्री म्हणजे मालक नसलेली.
आणि पाळीव कुत्री पण नैसर्गिक वातावरणात न राहणारी.फ्लॅट मधील.
माणसासाठी धोकादायक च आहेत.
ह्याचा अर्थ त्यांना मारून takne हा नाही.
त्यांना नैसर्गिक वातावरणात सोडणे हा उपाय आहे.
त्यांची संख्या मर्यादित ठेवणे हा उपाय आहे.

प्राणी पाळणे हा प्रकार माणूस हजारो वर्षापासून करत आहे.
>>>>
बहुधा पूर्वी माणसे गरज म्हणून प्राणी पाळत असावेत. म्हणजे संरक्षण हवे तर कुत्रा किंवा वाघ पाळा, खाद्य हवे तर कोंबड्या, बकऱ्या, बदके पाळा..
आजकाल बरीच माणसे आवड म्हणून कुत्रा, मांजरी, मासे, कासव पाळतात.
काही जण तर स्टेटस म्हणून कुत्रा पाळतात.
आमच्या कॉलेज कॅन्टीनचे मामा कॉलेज मधील भटके कुत्रे गळ्यात पट्टा टाकून फाईव्ह गार्डनला फिरायला घेऊन जायचे.ते कश्याला मग त्यांचे सुसूशीशी साफ करत बसताहेत..

सर एखादा तरी विषय असा आहे का की त्यावर तुम्ही अधिकारवाणीने बोलत नाही Happy
शरूखवले सर नाही, दांडपट्टा वाले सर
दोन्ही सर एकदम उपस्थित असल्याने गोंधळ होऊ शकतो म्हणून हा खुलासा
अर्थात हे दोन्ही सरांना लागू होत पण सध्या दांडपट्टा वाल्या सरांनी शरूख वाल्या सरांची हवा आपल्याकडे घेतलीय Happy

कुत्री हा विषय आला की .
भटकी आणि पाळीव असा भेदभाव करता येत नाही.
माझा प्रतिसाद बिलकुल चूक नाही.
चूक असेल तर एक एक पॉईंट वर प्रतिवाद करा.

Pages