नाईंटी नाईनचा धक्का!

Submitted by mi manasi on 5 October, 2023 - 04:38

....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुन्या गोष्टी नव्याने टाकून प्रतिसाद मिळवण्याचा आनंद चांगला की वाईट ?
हे पण ९९ च्या धक्क्यासारखं झालं का ?

१०० शब्दांच्या कथा लिहिताना आता पुढील वर्षी संयोजक चमुकडून ९९ शब्द येतील आणि आपण त्यात एक शब्दाची भर घालायची Light 1 आणि कथेसमोर भावार्थ लिहायचा

बापरे! प्रतिसादाची भूक मला कधीच नाही. चार प्रतिसाद जास्त मिळून अशी काय माझ्या प्रसिद्धीत भर पडणार आहे.
केवळ धागा भरकटू नये म्हणून मी प्रतिसाद देत होते.
माझ्या शशकवर सुद्धा धागा वर येऊ नये म्हणून मी 'धन्यवाद' असे शेवटचे प्रतिसाद टाकलेले नाहीत. पाहू शकता.
चला, हाही अनुभव घेतला.
वाईट वाटलं.
हे शेवटचं.

परे! प्रतिसादाची भूक मला कधीच नाही. चार प्रतिसाद जास्त मिळून अशी काय माझ्या प्रसिद्धीत भर पडणार आहे.
केवळ धागा भरकटू नये म्हणून मी प्रतिसाद देत होते.
माझ्या शशकवर सुद्धा धागा वर येऊ नये म्हणून मी 'धन्यवाद' असे शेवटचे प्रतिसाद टाकलेले नाहीत. पाहू शकता.
चला, हाही अनुभव घेतला.
वाईट वाटलं.
हे शेवटचं.

Submitted by mi manasi on 6 October, 2023>>>

तुम्ही येवढं मनावर घेऊ नये. हे धागे किंवा हा मंच किंवा इतरही सोमी संवाद (?) साधण्यासाठी आहेत, विचार मांडण्यासाठी आहेत असं गृहीत धरलं, तर तुम्ही प्रतिसादांना उत्तरे देणं, किंवा त्यावर तुमची प्रतिक्रिया देणं हे ओघाने आलंच..

>>>>चला, हाही अनुभव घेतला.
वाईट वाटलं.
हे शेवटचं.

असो मानसी, हे तर साधे खरचटणे झाले. इथे भूल न देता मोठ्या मोठ्या व नाजूक शस्त्रक्रिया होतात Wink Lol

हे तर साधे खरचटणे झाले. इथे भूल न देता मोठ्या मोठ्या व नाजूक शस्त्रक्रिया होतात Wink Lol
>>>
हा नवीन होता Lol

बाई दवे,
या हिशोबाने माझे तर रोज पोस्टमार्टम होते इथे.. किडन्या वगैरे बाहेर काढून, त्याने कॅच कॅच खेळून, जाताना पुन्हा आपल्या जागी बसवल्या जातात Proud

कुणी अशी कॉमेंट केली म्हणुन पोस्ट काढुन टाकणे ही ओव्हर रिऍक्शन आहे. त्यावर हसून घ्यायचं / दुर्लक्ष करायचं / म्हटले ते चुकीचे आहे एवढे सांगून दुर्लक्ष करायचं. त्यापेक्षा जास्त मनाला लावून नाही घ्यायचं. आणि एवढ्या साठी लेख/कथा मुळीच काढून नाही टाकायची.

गेल्या काही आठवड्यात हे 3-4 वेळा तरी झालंय. आणि लोकांना हे असे करायला लागणे हे निकोप समूहाचे/
मंचाचे लक्षण नाही.
मला प्रामाणिकपणे वाटत, अस वारंवार होत असेल तर त्याचा त्या मंचावरील सभासदांनी याचा नीट विचार करायची गरज आहे.

बऱ्याचशा वेळेला टोकदार टीका करणारे, वैयक्तिक पातळीवर उतरून ही टीका करत असतात, आणि बऱ्याचदा त्यांच्या कडे अजिबात योग्य मुद्दे नसतात, मूळ विषयाला भरकटवणे हाच उद्देश असावा ही शंका येते.

कथा काढायला नको होती असे मलाही वाटते.
पण वैयक्तिक मताचा आदर आहे.
एखादी व्यक्ती असते संवेदनशील की तिला नाही झेलता येत बिनबुडाची टीका.

इथे जे नवीन लेखक फोर्मला येत धागे काढतात त्यांना या टीकेला सामोरे जावे लागतेच.
पण गंमत म्हणजे तेच कोणी डू आयडी असे दणादण धागे काढतात त्यावर असे प्रतिसाद नसतात. बहुधा ते आयडी त्या नाव ठेवणाऱ्या कंपूतील असावेत.

ते असो,
पण इथे असा प्रतिसाद का आला हेच अनाकलनीय आहे.
कारण यांचा ट्रेक रेकॉर्ड असे धागे काढायचा नाही आहे.

एखादी व्यक्ती असते संवेदनशील की तिला नाही झेलता येत बिनबुडाची टीका.>>> म्हणजे जे उगाच आरोप करतात ते नामानिराळे आणि तुम्ही उलट त्या लेखकानाच / लेखिकानाच दोष देताय??

इथे जे नवीन लेखक फोर्मला येत धागे काढतात त्यांना या टीकेला सामोरे जावे लागतेच. >>>> म्हणजे हे पण एक गृहितक आहे का?

आणि ते जर असेल तर ते चुकीचे आहे. एवढ्या ठामपणे आणि अभिमानाने सांगण्याची गोष्ट निश्चितच नाही.

एखादी व्यक्ती असते संवेदनशील की तिला नाही झेलता येत बिनबुडाची टीका.>>> म्हणजे जे उगाच आरोप करतात ते नामानिराळे आणि तुम्ही उलट त्या लेखकानाच / लेखिकानाच दोष देताय??

>>>>

असा कसा अर्थ काढलात त्या वाक्याचा?
संवेदनशील असणे हा गुण किंवा स्वभाव समजा.
बिनबुडाची टीका करणारे यांनाच दोष दिलाय वर...

इथे जे नवीन लेखक फोर्मला येत धागे काढतात त्यांना या टीकेला सामोरे जावे लागतेच.
>>>>
आणि ते जर असेल तर ते चुकीचे आहे. एवढ्या ठामपणे आणि अभिमानाने सांगण्याची गोष्ट निश्चितच नाही.

>>>>

पुन्हा चुकीचा अर्थ
मी यालाही चूकच बोलत आहे
यावर मी मागेच एका धागा देखील काढला आहे.
थांबा लिंक शोधतो.

एक पॅटर्न झाला आहे मायबोलीवर !
https://www.maayboli.com/node/78427

चेक करा हा धागा

Living with less doesn't mean living in poverty or deprivation – it just means getting rid of the things in your life that you don't need. When you learn to live with less, you become more mindful of the things you really need and want in life.

Pages