नाईंटी नाईनचा धक्का!

Submitted by mi manasi on 5 October, 2023 - 04:38

....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालापरत्वे आनंदीला ९० हजार देऊन तिच्या परिस्थितीनुरूप १० हजार जमा करायला सांगायला हवे होते, कथानक जास्त परिमाण कारक झाले असते

@ राजा मनाचा
खरं आहे.
पण मी म्हटल्याप्रमाणे गोष्ट कधीतरी ऐकलेली आहे. म्हणजे जुन्या काळातली. गोष्टीचा मतितार्थ लक्षात घ्या. रक्कम काळानुसार, परिस्थितीनुसार बदलत जाईल..
धन्यवाद!

@सामो
ती मला माहीत नाही. पण लोककथा अशाच असतात. लेकी बोले सुने लागे. Happy
धन्यवाद!

मस्त कथा आहे.
पटली आणि आवडली.

बचतीचे टेन्शन आजचे सुख उपभोगू देत नाही हे खरे आहे. म्हणून मी सुद्धा माझा सगळा पगार एका तारखेलाच बायकोच्या अकाउंटला ट्रान्सफर करतो आणि खुश राहतो. पुढे महिन्याचा जमा खर्च सेविंग सगळे टेन्शन बायकोच्या डोक्यावर. पण ती सुद्धा आपल्याकडे घरखर्चाचे सारे हक्क अधिकार आहेत असा विचार करून खुश राहते Happy

@ऋन्मेष
तुमचा तो प्रतिसाद वाचल्यावरच मला ही गोष्ट आठवली.
पण बचतीचे म्हणण्यापेक्षा अधिक बचतीचे म्हणणं योग्य ठरेल.
हुशार आहात पण एका दगडात दोन पक्षी.. Happy
धन्यवाद!

मतितार्थ छान आहे.

पण जरावा/सेंटीनेली बेटावरील रहिवासी नसल्याने, सिव्हीलाइज्ड जगात रहात असल्याने दुसरी बाजूही आहे. ती मला २०१८ पर्यंत असं बिनधास्त बचत, गुंतवणूकीकडे अजिबात लक्षच न देता जगून मग जाणवली. तो पर्यंत असा बाणा होता की जणु काही आपण तर लाथ मारीन तिथे पाणी काढणारे, मरे पर्यंत नोकरी/धंदा करणार आणि असेच कमावत रहाणार. काही बचत व गुंतवणूक कुणीतरी मागे लागून केव्हातरी केल्याने झाली म्हणुन झाली. नाही तर आनंदी आनंद झाला असता एव्हाना.

@ मानव पृथ्वीकर
कथेला अनेक अर्थ आहेत जसे,
१. हिराकडे सगळं असूनही तिला आनंदी विषयी असूया वाटली.
उसकी साडी मेरी साडी से सफेद क्यू?
२. हिराने सांगेपर्यंत आनंदीला अधिक बचत करण्याचा चसका लागला नव्हता. म्हणून ती आहे त्यात समाधानी होती.
३ जास्तीची बचत करण्याच्या नादात किंवा मानूया अधिक श्रीमंत होण्याच्या नादात आनंदी छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायचा सुद्धा विसरून गेली.
आनंदी आधीही चुकीची होती आणि नंतरही.
अती तेथे माती! एवढंच सांगायचंय.
धन्यवाद!

अशी अजून एक कथा आहे ना?
एका श्रीमंत माणसाच्या घरासमोर एका गरिबाची झोपडी असते. श्रीमंत माणूस अर्थात असमाधानी असतो आणि गरीब माणूस समाधानी असतो. श्रीमंताला चिंतेमुळे रात्री झोप लागत नाही आणि गरीब मात्र सुखाने झोपत असतो. त्यामुळे श्रीमंत माणूस आणखी असमाधानी होतो Wink
एकदा एक साधू येतो. श्रीमंत माणूस त्याला आपलं हे दुःख सांगतो. साधू म्हणतो की त्या गरिबाच्या झोपडीत त्याच्या नकळत एक मोहरांची पिशवी ठेव. त्याप्रमाणे तो करतो.
परिणामतः गरिबालाही आता चिंता सतावायला लागते की या पैशांचं काय करायचं? कुणी चोरणार तर नाही ना? वगैरे वगैरे.
पण मला या गोष्टीतली श्रीमंत माणसं एका अर्थाने क्रूर वाटतात. बिचारे गरीब आनंदाने जगत असतात त्यांना उगाचच दुःखी करतात.

@वावे
खूप सुंदर आहे ही पण कथा..
पाहिलं तर दुष्ट आहेत म्हणून सुष्टांचा गौरव होतो. तसंच गरीब आहेत म्हणून श्रीमंतांना श्रीमंती मिरवता येते.
पण समाधान व्यक्तीसापेक्ष असतं हे खरं!
धन्यवाद!

मला खरं तर जरावा किंवा सेंटीनेली सारखे कुठले आदिवासी झालो असतो तर छान झाले असते वाटते अनेकदा. रहायला झोपडी आणि सगळं बेट आपलं, शिकार करा / रानमेवा गोळा करून खा, निसर्गाच्या सान्निध्याची मजा घेत त्याची किमया बघा, गा, नाचा रात्री चांदणे बघत झोपी जा. निवारा आणि वल्कले फुकट प्रश्न फक्त अन्नाचा आणि थोडक्या नात्यांची भावनिक गुंतवणूक त्यातून येणारा थोडा फार ताण या व्यतिरिक्त कसलं टेन्शन नाही. Happy बचत वगैरे शब्दही माहीत नसता.

त्या दृष्टिकोनातुन लिहिलं आहे वरचे, वरच्या पोस्ट मधून असे जाणवत नाही हे आता लक्षात आले.

@ मानव पृथ्वीकर
हा हा हा
अशी स्वप्नं तर सगळ्यांनाच पडत असतील.

>>>>> गा, नाचा रात्री चांदणे बघत झोपी जा. निवारा आणि वल्कले फुकट प्रश्न फक्त अन्नाचा
अन्नाचा, डासांचा, च्लटांचा, जीवाणु-विषाणुंचा थंडी-पावसाचा

यातला मतितार्थ अजिबातच पटला नाही.
सतत पुढचं ध्येय खुणावत असणे आणि त्याच्यापाठी धावणे हाच आनंद आहे. आणि हा आनंद जीवघेणा/ रॅटरेस न ठरता आपण स्वखुषीने त्यात किती जायचं आणि कुठे जायचं नाही याचं तारतम्य बाळगून वर्क-लाईफ बॅलन्स करणे यासारखा दुसरा आनंद नाही. वयाच्या चाळीशी पर्यंत तरी ध्येयामागे जात वरखाली हेलखावे खाल्लेच पाहिजेत. अशा गोष्टी तरुणांना तर अजिबात सांगू नये.

हे सगळं संपलं आणि शब्दशः 'निष्काम' प्रकारे रानमेवा खाऊन झोपडीत हरीहरी करुन जगू लागलो तर मग जगायचं तरी कशाला वाटेल. आहे त्या पररिस्थितीत नुसतं आनंदी रहाणं हे 'ठेविले अनंते' झालं... परिस्थिती आवडत नसेल तर ती बदलायचे कष्ट घेणे हा पण आनंदाचाच भाग असतो. असायला हवा.

अशा गोष्टी तरुणांना तर अजिबात सांगू नये.
>>>>>

मला वाटते की तरुण मुळात कसा आहे त्यावर ठरवावे त्याला काय सांगावे.

जर कोणी मुर्खासारखे रॅट रेसमध्ये धावत असेल तर त्याला जरूर सांगावे. जगण्याचा एक वेगळा दृष्टीकोण त्याला गवसेल.

तसेच जर कोणी असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी म्हणत जगत असेल तर त्याला ही कथा न सांगता ईतर ध्येयवादी लोकांच्या यशोगाथा सांगाव्यात. जेणेकरून तो आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडेल.

एकंदरीत संतुलन साधता यायला हवे. त्यातून येणारे समाधान दिर्घकाळ टीकणारे असेल.

@अमितव
बदलायचे कष्ट घेणे हा पण आनंदाचाच भाग असतो. असायला हवा. >>> होय.
'डॉ. नितू मांडके' होऊ नये..

तुमच्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर तारतम्य, स्वखुशी या गोष्टी ठरतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि तेवढे त्यांचे दृष्टीकोन.
म्हणूनच समाधान, आनंद व्यक्तीसापेक्ष असतात.

@सामो..

'निष्काम' ....... आनंदाचाच भाग असतो. असायला हवा.
+१ >>>
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी!

दुसरी गोष्ट - एक माणूस एका डेरेदार झाडाखाली आरामात पहुडलेला असतो. दुसरा एक माणूस त्याला येऊन सांगतो, अरे तू काही अमुक काम का करत नाहीस?
पहिला - मग काय होईल?
दुसरा - तुला पैसे मिळतील. मग त्यातून तू तमुक घेशील. त्यातून आणखी पैसे कमवशील.
पहिला - मग काय होईल.
दुसरा -......
पहिला - मग काय होईल.
दुसरा -......
पहिला - मग काय होईल.
दुसरा -......
पहिला - मग काय होईल.
दुसरा - मग तू मस्त आरामात राहू शकशील.
पहिला - मग आता मी काय करतोय?

या अशा गोष्टी टोकाचे दाखले देतात. आपल्याकडे हे किंवा ते असे पर्याय नसतात. आपला मार्ग मध्ये कुठेतरी असतो. तो ठरवता आला पाहिजे.

@भरत
माझा ही गोष्ट लिहिण्याचा हेतू हाच आहे की प्रत्येकाने आपल्या परिस्थितीनुसार आपल्या कुवतीनुसार आपला मार्ग आपणच शोधायचा असतो..
धन्यवाद!

भरत, बरोबर आहे.

आणि अशीच एक गोष्ट हवाई की कुठल्या बेटावरील स्वतःचे छोटे घर , बोट असलेल्या कोळ्याची आहे. ती बरीच रंगवली आहे. त्यावरून गढीचिरोलीतील आदिवासी वगैरे गोष्टी बनवल्या आहेत.

गोष्ट साधी सोपी सरळ पण माणसाच्या मनाचे कंगोरे दाखवणारी आहे ..
पण सध्याच्या युगात बचत आणि गुंतवणुकीला पर्याय नाही.
अगदी कितीही कमी उत्पंनन असो वा कितीही जास्त उत्पन्न असो.

माझ्याकडे येणाऱ्या मावशाना भिशी असेल तर बँकेत खाते उघडा, दिवाळीचा बोनस, महिन्याच्या पगारातील काही हिस्सा त्यात टाका, पोस्टाचे बचत खाते चालू करा, त्यासाठी मग बाजूने लागेल तशी मदत प्रसंगी त्यांना त्याचे महत्व पटवून देणे हे सगळे उद्योग केलेत, स्वखुशीने. आणि ते बरोबर वाटत मला.

@छन्दिफन्दि
तुम्ही करता ते योग्यच आहे बचतीचे महत्त्व कोण नाकारेल?
पण तुम्ही म्हणता तसे गोष्ट मानवी मनाचे अनेक कंगोरे दर्शवते. त्यापैकीच एक सरळ अर्थ अधिक बचतीच्या मागे लागून छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद गमावू नये..
धन्यवाद!

Pages