पाककृती स्पर्धा १: प्रवासी दशमी /पुऱ्या : मंजूताई

Submitted by मंजूताई on 26 September, 2023 - 05:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मिलेट्स वर्ष असल्याने भरपूर प्रयोग केले, करतेय ... आजचा प्रयोग :
एक ते दीड कप वरई पीठ/कणिक, तीन केळी, पाव चमचा दही, चवीपुरते मीठ व तेल/तूप
20230926_100804.jpg20230926_101901.jpg

क्रमवार पाककृती: 

केळी कुस्करून त्यात दही व मीठ घालून जितकी मावेल तितके वरई पीठ/कणिक घालावी. घट्ट गोळा झाला पाहिजे. दशमी लाटून मंद आचेवर तूप/तेल सोडून शेकावे. तूपाबरोबर, लोणच्याबरोबर छान लागतात.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

गोड पदार्थ आहे पण गोड म्हणावा का इतका बेताचा गोड मी तरी त्याला अगोड म्हणीन पण तुम्ही तो गोड मानून घ्यावा Happy ह्याच पीठाच्या पाकातल्या
पुऱ्या करता येतील. पाणी नसल्याने दशम्या बरेच दिवस टिकतात.
भिजवते वेळी खूप घट्ट भिजवायचे नाही दहा पंधरा मिनिटे मुरू द्यावे.

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
वरई पीठ वापरले तरी मऊसर होते का.
ही दशमी उपासालाही उपयुक्त ठरेल. (दह्यामुळे कदाचित मऊ राहील असे वाटते)

छान प्रकार आहे.
प्रवासात केळी नेणे आउटडेटेड आहे, रेल्वे स्टेशनवर आता मिळतही नाहीत, सॅक मधून नेता येत नाहीत.
अशा दशम्या करून नेल्या की पोटभरीचे खाणे होईल.
एरव्हीसुद्धा अधून मधून बदल म्हणुन चांगल्या वाटतील.

सहज जमणारी....
आमच्याकडं अशाच काहीशा पण रताळी उकडून ती गव्हाच्या पिठात मिसळून करतात. त्याला घा-या बोलतात.

सगळ्यांना धन्यवाद! हो खूप साधी आहे म्हणून टाकू की नको विचार करत होते. पण जुन्या पाककृतीची नोंद असावी म्हणून टाकली. भरड धान्याचे प्रयोग करतेय अनायसे वरी पीठ होते घरात. ...मूळ पाककृती कणकेचीच आहे.
प्राचीन, भिजवते वेळी खूप घट्ट भिजवायचे नाही दहा पंधरा मिनिटे मुरू द्यायचे .