काश्मिरी दम आलू

Submitted by जाई. on 3 September, 2023 - 23:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. छोटे बेबी बटाटे ( दहा ते बारा)
२. जिरे - १/२ टीस्पून
३. लवंग - २
४. काळी मिरी -१/२ टीस्पून
५. दालचिनी -१
६. धणेदाणे -१ टीस्पून
७. दही -५०० ग्राम
८. बेडगी मिरच्या -३ मिडीयम साईज
९. लाल तिखट : जितके झेपेल तितके
१०. कसुरी मेथी / कोथिंबीर
११. तेल
१२. हळद
१३. हिंग
१४. मीठ

क्रमवार पाककृती: 

#श्रावणइथलासंपतनाही

यावर्षी आलेल्या अधिकाच्या श्रावणाने अस्मादिकासारख्या मासेखाऊंची पंचाईत करून ठेवलीये . आधीच मोजके वार नि त्यात श्रावण अधिके अशी स्थिती. त्याच त्या भाज्या किती वेळ खाणार ? अश्या वेळी आहे त्या भाज्यांमध्ये वेरिएशन करण भाग पडत.

बाजारात फिरताना बेबी पोटैटो मिळाले आणि नेहमीच्या बटाट्याच्या भाजीपेक्षा वेगळ्या चवीची काश्मिरी दम आलू करुन बघितली.

कृती थोडक्यात : छोटे बटाटे उकडून साल काढून त्यांना टूथपिकने टोचे मारून पॅनमध्ये थोड्या तेलावर सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावेत. परतून घेतल्यावर लाल तिखट भूरभुराव आणि बटाटे एकसारखे करुन घ्यावेत.

दुसरीकडे खडे मसाले कोरडे भाजून त्याची पूड करुन घ्यावी . बेडगी मिरच्या प्रमाणात घेऊन गरम पाण्यात भिजवून मिक्सरवर पेस्ट करुन घ्यावी

दह्यात खड्या मसाल्याची पूड , बेडगी मिरचीची पेस्ट मिसळून दही चांगलं फेटून घ्याव

त्यानंतर एका पॅनमध्ये तेलावर हिंग , हळद , थोडं काश्मिरी तिखट (रंग येण्यासाठी) यांची फोडणी करून घ्यावी. त्यात फेटलेल दही घालव . मिश्रण ढवळून घ्याव . त्यावर झाकण ठेवून उकळी आणावी. यावेळी गॅसची आच मिडीयम असावी . उकळी आल्यावर फ्राय केलेले बटाटे त्यात घालावे . चविप्रमाणे मीठ घालाव. मिडीयम आचेवर झाकण ठेवून १० मिनिटे शिजवावे. शेवटी गॅस बंद करुन वरून कसुरी मेथी अथवा कोथिंबीर पेरावी. फारच लाड करायचे असल्यास आणि उपलब्ध असल्यास क्रीम घालावे.

हा एंड प्रॉडक्ट फोटू! एंजॉय !!!

वाढणी/प्रमाण: 
४ जण
माहितीचा स्रोत: 
यूट्यूब चॅनल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परफेक्ट दिसते आहे.

मी धणे वापरत नाही. सुंठ पावडर व बडीशेप पावडर वापरते. बटाटे पारबॉईल्ड करून अवनमधे शेकवून घेते.

मस्त रेसिपी आहे.मी साधारण असेच करायचे.धने आणि मिरपूड वापरली नाही, वापरून बघते.फोटो एकदम तोंपासू.

जाई.ला आता दम देण्याचा अधि़कृत परवाना आणि प्रॅक्टिस देखिल मिळाली हे ह्या पाक़कृतीवरुन समजुन येत आहे Wink

मस्त रेसिपी
#श्रावण.. धर्तीवर #नवरात्र साठी मला उपयोग होईल याचा.
यापूर्वी सुरती पनीर घोटाळे असे करून झाले आहेत आणि पचलेही आहेत. Wink Wink Wink