Submitted by सायो on 3 September, 2023 - 14:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
फ्लॉवर, बटाटा, आलं- हि. मिरची- कोथिंबीर ठेचा, नारळाचं दूध, मीठ, साखर, वरुन घालायला कोथिंबीर, फोडणीकरता तेल, हिंग, हळद, जिरं, मोहरी, कढिपत्ता.
क्रमवार पाककृती:
फ्लॉवरचे तुरे काढून पाण्यात घालून ठेवावेत, बटाटेही जरा मोठ्या फोडी करुन फ्लॉवरबरोबरच पाण्यात घालून ठेवाव्यात. हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर ह्याचा ठेचा करुन ठेवावा.
तेल गरम करुन त्यात जिरं, मोहरी घालून तडतडल्यावर हिंग, हळद घालून घ्यावी. वर कढिपत्ता घालावा. एकीकडे फ्लॉवर, बटाटा चाळणीवर निथळून घ्यावं आणि ते फोडणीत घालून परतावं. त्यावर ठेचा घालून परतून घ्यावा. मग त्यावर फ्लॉवर बटाटा बुडेपर्यंत नारळाचं दूध घालून झाकण घालून चांगलं मऊ शिजू द्यावं. (झाकण पूर्ण बंद करु नये. थोडी गॅप ठेवावी नाहीतर भाजी उतू जाते). शिजल्यावर मीठ, साखर, कोथिंबीर घालून पोळी/फुलक्याबरोबर खावी.
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे रेसिपी... साधं पाणी
छान आहे रेसिपी... साधं पाणी घालायचं नाही का अजिबात ?
गरज नाही ममो. मी नेहमी
गरज नाही ममो. मी नेहमी नारळाच्या दुधातच शिजवते. खूप दाट नको असेल तर थोडं पाणी घालू शकता.
ओके सायो
ओके सायो
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त वाटतेय नादू ची ही भाजी.
मस्त वाटतेय नादू ची ही भाजी. आता एकतर नारळ आणून दूध काढायचे सोपस्कार करायला लागतील किंवा आयतं दूध घ्यून यावं सरळ. यावेळी आणलेल्या हिरव्या मिरच्या जहाल तिखट आहेत, त्या वापरून सात्विक झणझणीत भाजी करून पाहायचा मोह होतो आहे खरा...
छान वाटतेय पाकृ.
छान वाटतेय पाकृ.
. असं वाटतं तशीही भाजी खातोच की, याचे वेगळे काही करावे.
मला घरी नादू बनवले की एवढ्या कष्टाने बनवलेले दूध भाजीत घालायला जीवावर येते
विकतचे आणले की मग घरी कोण कशात वापरते तिकडे त्याचे काही वाटत नाही. विकतचे आणुन ही भाजी करून पाहीन.
आवियल (तमिळ) सारखी?
आवियल (तमिळ) सारखी?
योकु+१
योकु+१
ग्राहक संघातून नारळ दूध पावडर आणली होती, तेच वापरून करण्यात येईल!
मस्तच. सुरती कोलम बरोबर मस्तच
मस्तच. सुरती कोलम बरोबर मस्तच लागेल. पोळी / फुलका नको