चंद्र सूर्य आणले आरतीला

Submitted by दत्तात्रय साळुंके on 3 September, 2023 - 02:41

हे मायभूमी मी जे
वचन तुज दीधले
तव आरतीला आज
मी चंद्र सूर्य आणले

उद्दाम रीत जगाची
विपरीतच ती कधीची
राबविली तंत्रे तयांनी
मंडूकांच्याच हिताची

जेव्हा तंत्रज्ञान त्यांस मी
मागितले मणुष्य हिता
हिणवून मज म्हणाले
होतसे भिकारी काय दाता?

कोणी न पुसतो कधी
दुबळ्यांस या जगात
जाणून हेच सत्य मी
आणले बळ मनगटात

उद्दाम जरी ते होते
घमंडी आपुल्याच तो-यात
संकट समयी मीच दिले
तयांना माणुसकीचे हात

वसुधैव कुटुम्बकम्
हा नारा सनातनाचा
हा बलशाली भारत देश
कृष्ण आणि रामाचा

वचना करिता देतो जीव
रघुकुलाची रीत इथली
दुष्ट निर्दाळण्या अवलंबे
श्रीकृष्ण नीती गीतेतली

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गे मायभू तुझे मी - कवितेचा संदर्भ आणि चंद्रयान, आदित्य मोहिमा, मागच्या वेळी भारताला हिणवणारं व्यंगचित्र - सगळे संदर्भ छान जोडले आहेत या कवितेत.

sanjana25
खूप धन्यवाद...
हपा खूप धन्यवाद...
>>>>गे मायभू तुझे मी - कवितेचा संदर्भ आणि चंद्रयान, आदित्य मोहिमा, मागच्या वेळी भारताला हिणवणारं व्यंगचित्र ->>>> हो हीच मुख्य कल्पना....
आपण जेव्हा जेव्हा तंत्रज्ञान विकसित देशांना विशेषतः अमेरिकेला मागितलं ते नाकारलं. उदा. सुपर कंप्युटर, क्रायोजेनीक इंजिन...
सध्या म्हणे भारतात CHatGPT सारखं काही होऊ शकत नाही. गुगल CEO भारतीय मूळ असलेले... मायक्रोसॉफ्ट मधे कोणी तरी असेल आणि यांचे प्रोग्राम बॅक एंडला कोण लिहितं. एक व्हिडिओ लिंक यांना उघडी पाडायला पुरेशी...आवश्य पहा. मोठी आहे वेळ मिळेल तेव्हा पहा...
https://youtube.com/shorts/QnlahaMDz60?si=G4gDIF57dB4-9BhM
हेच ते प्रसिद्ध व्यंगचित्र...
IMG_20230903_173925.jpg

मला ही कविता वाचताना, शिख लोकांचा सोहेला आठवला =
गगन मै थालु रवि चंदु दीपक बने तारिका मंडल जनक मोती ॥ धूपु मलआनलो पवणु चवरो करे सगल बनराइ फूलंत जोती ॥१॥
अर्थ: सारा आकाश (जैसे कि) थाल है। सूरज और चाँद (उस थाल में) दिये बने हुए हैं। तारों के समूह, जैसे, थाल में मोती रखे हुए हैं। मलय पर्वत से आने वाली हवा, जैसे धूप (धूणे की सुगंध) है। हवा चौर कर रही है। सारी बनस्पति ज्योति-रूप (प्रभु की आरती) वास्ते फूल दे रही है।1।

Kirtan Sohila: This is the night time prayer said by all Sikhs before they go to sleep. Three Sikh Gurus – Guru Nanak, Guru Ram Das and Guru Arjan - contributed five shabads in total to this bani on the pain of separation and celebrating the bliss of union with Almighty.

कुमार १
अनेकानेक धन्यवाद...

सामो
खूप धन्यवाद...

शिखांचे सोहेला अत्यंत सुंदर काव्य आहे .‌‌धन्यवाद या अप्रतिम काव्यांजली साठी...
तुमचं वाचन अचंबित करणारं आहे.

>>>>>>>>तुमचं वाचन अचंबित करणारं आहे.
माझी रुममेट शीख होती. ती जे ऐकायची ते इतकं आवडायचं की आनंद साहीब, सोहेला, जपजी साहीब, रेहरास, सुखमणी साहीब सर्व वाचलं ऐकलं गेलं. अर्थात ग्रंथसाहीब फार मोठा आहे - https://www.srigranth.org/servlet/gurbani.gurbani?S=y
पण खूप आवडतो. नानक व अन्य गुरुंना कोणत्या विलक्षण भावसमाधीत या बाणी स्फुरल्या असतील. अमृत आहेत अमृत!

>>>>नानक व अन्य गुरुंना कोणत्या विलक्षण भावसमाधीत या बाणी स्फुरल्या असतील. अमृत आहेत अमृत!>>>> अगदी....
ग्रंथसाहीब आरामात वाचतो...दुव्यासाठी धन्स..