है सबसे मधुर वो गीत

Submitted by Revati1980 on 28 August, 2023 - 00:50

"है सबसे मधुर वो गीत जिन्हें, हम दर्द के सुर में गाते हैं
जब हद से गुज़र जाती है खुशी, आँसू भी छलकते आते हैं
हैं.." हे लिहिलेल्या तलतच्या सुरातल्या ओळी ब्रिटिश कवी पी. बी. शेलीच्या " To the Skylark" मधल्या " Our sincerest laughter, With some pain is fraught; Our sweetest songs are those that tell of saddest thought, " याच्याशी जुळतात असं माझ्या बाबांनी जेंव्हा शैलेंद्रचा मुलगा दिनेश याला कळवलं तेंव्हा तो चकित झाला आणि त्या नंतर त्याच्याशी बाबांचे स्वर जुळले ते आजतागायत. शैलेंद्र म्हणजे बाबांचे दैवत. शैलेन्द्रने लिहिलेल्या प्रत्येक गीताच्या मागचा इतिहास दिनेशच्या तोंडून ऐकल्यावर ते मला सांगताना उनकी आंखे नम हो जाती थी।

बाबांनी सवय लावली होती हिंदी चित्रपटातली गाणी ऐकायची. हॉस्टेलमध्ये फिलिप्सचा रेडिओ उशाशी ठेवून गाणी ऐकायची आणि अभ्यास करतांना पण रेडिओ. विविध भारतीवर ठेवलेला काटा इकडचा तिकडे होईलच कसा? ‘आप के अनुरोधपर', ' मन चाहे गीत’ आणि ‘जयमाला’. म्हणूनच पहिल्या वर्षी इम्तिहान में मिळालेले मार्क्स खूप कमी होते. पण, रुक जाना नही तू कहीं हार के,इक बंजारा गाए, जो खो गया मैं उसको, आनेवाला पल, कुछ तो लोग कहेंगे, जियो तो ऐसे जियो, राही तू मत घबराना, मैं जिंदगी का साथ अशा ओळी मोटिवेट करायच्या. ही हिंदी गाणी नसती तर जीवन असह्य होऊन गेलं असतं.भारतातल्या भूलोकीच्या हिंदी गंधर्वांच्या लकेरी ऐकण्यात काय सुख आहे ते अशा डायहार्ड कानसेनांनाच कळणार. षड्जावर सुरु करुन निषादापर्यंत लीलया आवाज फिरविणारे हे तानसेन आणि बैजू बावरा च्या दोन कन्या ताना आणि रिरी प्रमाणे तानसेनलाही हरवणाऱ्या गायिका. गांधारात गाऊन आवाजाने मधुर गंध पसरविणारे हे गायक म्हणजे गुलाबाच्या आणि चाफ्याच्या पाकळ्यां चुरून आपल्यावर वर्षाव केलाय अशी अनुभूती. ही गाणी ऐकताना ज्यांनी गाण्यांसोबत एखादी लकेर घेतली किंवा ज्यांच्या पावलांनी ठेका धरायला सुरूवात केली ती माणसं जिवंत असल्याचा दावा करू शकतात. आणि त्या सर्व कविराजांची मांदियाळी? ओह!! संगीत मन को पंख लगाए, गीतों से रिमझिम रस बरसाए…

अर्ध्या तासात किंवा काही वेळा एका तासात गाण्यांचा खजिना रीता व्हायचा. गायक आणि चित्रपटाच्या नावांव्यतिरिक्त गीतकार आणि संगीत दिग्दर्शकाच्या नावासह गाण्यांची घोषणा केली जायची. एखाद्या गीतकाराचं नाव घेतलं की पुढे काय असणार हा फॉर्म्युला जवळपास ठरलेला असायचा. उदा. गीतकार आनंद बक्षी नाव ऐकले तर पुढे संगीतकार आरडी बर्मन, किंवा लक्ष्मीकांत प्यारेलाल असतील याची गॅरंटी. शकील बदायुनी आणि नौशाद ही जोडी अगदी फेविकॉल. आनंद बक्षी कधी कधी गुलशन बावरा आणि इंदिवर यांना सोबत घेउन यायचे पण कल्याणजी आनंदजी यांना हमखास आणायचे, तर साहिर कधी नौशाद, रोशन, चित्रगुप्त, रवी तर कधी एस डी बर्मन आणायचे. मजरुह सुलतानपुरी जास्त करून एस डी बर्मन बरोबर घरोबा करायचे. शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांचं नाव घेतलं की मीच पुढची घोषणा करायचे, " शंकर जयकिशन." आणि नव्वद टक्के ते बरोबर असायचं.एसएच बिहारी यांची जोडी ओ पी नय्यर, तर राजा मेहदी अली खान सोबत मदन मोहन हे कधीच चुकायचं नाहीं. कैफी आझमी आणि मदन मोहन अशी जोडी कधी तरी जमायची. मग केंव्हातरी सलील चौधरी,सोनिक-ओमी, सी रामचंद्र, इक्बाल कुरेशी, उषा खन्ना, हंसराज बहल संगीत द्यायला यायचे तर जान निसार अख्तर, कमर जलालबादी, पी एल संतोषी, नक्शल्याल पुरी, एमजी हशमत, गौहर कानपुरी, नीरज, समीर, अंजान, गुलजार, देव कोहली, निदा फाजली, माया गोविंद असे गीतकार भेटीला येत. बाकी गायक गायिका यांचा ताफा असायचा तो मोहंमद रफी, मुकेश, मन्ना डे, हेमंत कुमार, तलत महमूद, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांचाच. गीता दत्त, सुरैय्या, नूरजहान, शारदा, आणि मुबारक बेगम कधीतरी डोकवायच्या.जितकी गाणी ऐकली ती सगळी पाठ झाली. कशी झाली कल्पना नाही. गाण्यातला गोडवा, त्यातले शब्द आणि संगीत नियोजन यांचा बहुतेक वाटा असावा गाणी पाठ होण्यामागे.

या सर्वावर कडी म्हणजे 'झुमरी तलैया से नंदलाल शर्मा!! श्रोत्यांची नावे आणि ठिकाण जाहीर करताना एक नाव न चुकता सतत घेतलं जायच. ''झुमरी तलैया से नंदलाल शर्मा!' एकदा मी रेडिओ श्रीलंका लावला तेंव्हाही झुमरी तलैयाचे नंदलाल शर्मा तिथे पोहोचले होते!!

कॉलेजात वीकली असाईनमेंट असायची. त्याचा निकाल मी झुमरी तलैयाशी जोडायचे. म्हणजे " आज झुमरी तलैया से पिंकी, टीना,महेश,अशोक, रामलाल, साधना, सरिता, नानाजी, रिंकू, घोषबाबू, बिपीन , रमेश, महादेव, नारायण इत्यादि इत्यादि लांबलचक यादी असेल तर मला वीस पैकी अठराच्या खाली मार्क नसतील आणि फक्त दोन तीनच नावे आणि त्यात 'झुमरी तलैया से नंदलाल शर्मा असतील तर वीस पैकी चौदा पंधरा पडतील. मला एक दोन विषयातच अठरा एकोणीस पडायचे. बाकी पंधरा, सोळाच्या आसपास. 'झुमरी तलैया से नंदलाल शर्मा' माझे मार्क खाऊन टाकायचे!! मी मग त्यांचा इतका धसका घेतला की परीक्षेच्या काळात आणि रिझल्टच्या दिवशी झुमरी तलैया से ऐकलं रे ऐकलं की एक मिनिटभर रेडिओचं बटन ऑफ करायची. दीवानी मुजसी नहीं इस अंबर के नीचे…! माझ्या वेडपटपणाचे आता हसू येते.

मग झुमरी तलैया कुठे आहे आणि नंदलाल शर्मा कोण आहेत हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा व्हायची. पोस्ट कार्ड वर " नंदलाल शर्मा, झुमरी तलैया" एवढा पत्ता टाकून त्याना विनंती करावी की " महाशय, तुमची पसंती कृपया थांबवा" असा विचारही एकदा मनात येऊन गेला होता. हे रोज पसंती कळवतात तर यांच्याकडे पोस्टकार्डस् किती असतील? वर्षाचे एक हजार पोस्टकार्डस् त्यांनी एकदम घेऊन ठेवलेत की काय? एकदम एवढे पोस्टकार्डस् घेतल्यावर त्यांना डिस्काउंट दिला असेल म्हणून ते रोज तीन कार्डस् टाकतायत बहुतेक. कार्डवर त्यांनी असा फॉर्म तयार केला असेल की फक्त गाण्याचं नाव टाकायचं आणि पोस्ट करायचं, असे वेडगळ प्रश्न मनात यायचे. मग परीक्षा संपल्यानंतर एकदा एक चाळा लागला तो म्हणजे 'झुमरी तलैया से नंदलाल शर्मा यांची पसंती नेमकी काय असते ते शोधायचे. मग ते ज्या गाण्यांची फर्माईश करायचे त्याची यादी करायची आणि आपल्या आवडी प्रमाणे ही यादी जुळते काय ते पहायचे. असे मी सहा सात महिने सतत केले. आश्चर्याची बाब म्हणजे ही यादी जेंव्हा संपली तेंव्हा 'झुमरी तलैया से नंदलाल शर्माना मी मनोमन सलाम केला.त्यांचा आदर वाटायला लागला. त्यांच्या बदल नकारात्मक विचार केला म्हणून वाईट ही वाटले. त्या गाण्यांची यादी अशी:

ये परबतोंके दायरे,ये शाम का धुंवा/इतनी हसीन इतनी जवां रात क्या करें/अगर सुन ले, तो एक नगमा, हुजूर-ए- यार लाया हूं/न तुम हमे जानो/कोई बता दे दिल है जहाँ/
क्या मिलिये ऐसे लोगोंसे जिनकी फितरत छुपी रहे/अच्छा जी मैं हारी/जाग दिले दिवाना/तू कहां ये बता/इक रात में दो दो चांद खिले/दीवाना मस्ताना हुवा दिल/तडपाओगे, तडपालो/ख्वाब हो तुम या/तेरी दुनियासे दूर/सीनेमें सुलगते हैं अरमाँ/चल उड जा रे पंछी/अगर मुझसे मुहब्बत है मुझे सब अपने गम दे दो/आ जा रे मेरे प्यार के राही/जो बात तुझमें है तेरी तसवीर में नही/दिल का दिया,जला के गया/
तेरी दुनिया में जीने से/छू लेने दो नाजूक/तुम अपना रंजो गम अपनी निगेबानी मुझे दे दो/रंग दिल की धडकन भी लाती तो होगी/मोरा गोरा अंग लइ ले/मुझे दर्द-ए-दिल का पता न था/टूटे हुवे ख्वाबोंने/छेडो ना मेरी जुल्फें, सब लोग क्या कहेंगे/तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही/
जिंदगी ख्वाब है/अखियन संग अखियां लागे आज/
बेरहम आसमाँ/चांद जाने कहां खो गया/जीवन है मधुबन/
दिल जो न कह सका/जानू जानू री/दूर रहकर न करो बात करीब आ जाओ/ना तो कारवांकी तलाश है/चलो इक बार फिर से/ये रात ये चाँदनी फिर कहाँ सुन जा दिल की दास्ताँ/
फैली हुई है सपनों की बाहे आजा चल दे कहीं दूर वहीं मेरी मंज़िल वही तेरी राहे/ नाचे मन मोरा मगन/ लाखों हैं निगाह में ज़िंदगी की राह में/हमको तुम्हारे इश्क़ ने क्या-क्या बना दिया/बंदा परवर थाम लो ज़िगर/है दुनिया उसीकी जमाना उसीका/इशारों इशारों में दिल/ तुमने मुझे देखा/ अल्ला तेरो नाम/ जुल्फ की छाँव में चेहरे का उजाला लेकर,
तेरी वीरान सी रातों को सजाया हमने/हमदम मेरे खेल ना जानो चाहत के इकरार को/आँचल में सजा लेना कलियाँ, जुल्फों में सितारे भर लेना/बिन देखे और बिन पहचाने तुमपर हम कुर्बान/देखो रुठा ना करो बात नजरोकी सुनो/तस्वीर तेरी दिलमे/दिन ढल जाये/वो शाम कुछ अजीब/फिर ना कीजे मेरी गुस्ताख निगाही का गिला/निगाहें मिलाने को जी चाहता है/ पुकारता चला हूं मैं/ मैं ये सोचकर उसके दर से/ऐ मेरे दिल कहीं और चल/याद आई आधी रात को/तुम तो दिलके तार छेड़कर/ ओ सजना बरखा बहार आई/ मस्ती में छेड़के तराना/ओ चांद जहां वो जाए/ पंछी बनू उड़ती फिरू/ लग जा गले के फिर ये/जरूरत जरूरत है/ मुन्ना बड़ा प्यारा/ वो देखो जला घर किसी का/ जा रे जारे उड़ जारे पंछी/ आपकी नजरों ने समझा/ फिर आने लगा याद वही/सजन संग काहे नेहा लगाए/ मैं तेरी नजरका सुरूर हूं/खेलो ना मेरे दिल से/ तुम जो मिल गए हो/ तुम जो हुए मेरे हमसफर/ छोड़कर तेरे प्यार का दामन/देखो माने नहीं रूठी हसीना/ प्यार पर बस तो नहीं है… वगैरे.

एवढी गाणी रोज वर्षभर ऐकल्यानंतर माझं आणि वल्लरी, माझी रूममेट, वल्लरी मुद्गलचं एकमत झालं की जवळ जवळ सगळ्या गाण्यात दिल आणि प्यार हे शब्द असतातच. दिल म्हणजे काय ते कळलं पण प्यार? सायरा बानोला दोन्ही ही कळलं नाही. " दिल विल प्यार वार मैं क्या जानूं रे, " पण प्यार? ये किस मर्ज कि दवा है? गाणी प्रेमाची भाषा बोलतात पण प्रेमाची एक सरळसोट व्याख्या कुठेच मिळत नव्हती. भौतिक स्वरूपात प्रेम दिसतं काय कधी? त्याचा ज्वालामुखीसारखा उद्रेक होतो काय ? त्याच वेगानं ते खालीही बसतं? प्रेम म्हणजे उत्सव? उत्साह? ऊर्जा? नाही वाटत तसं. तुम्ही तुमच्या हार्टथ्रॉबचा हात धरून झाडांच्या सावलीतून पावले टाकीत चालत आहात त्याला प्रेम म्हणता येईल? हरणाला वाळवंटात मृगजळ दिसते तसा भास? दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला I Iove you म्हणणं ? ते देखील काहीं काळानंतर उबग आणेल. प्रेम म्हणजे सुंदर स्त्री? " इन्सान बन गई है किरन माहताब कि…?" तिचा सुरेख हात? "और तेरी मरमरी बाहों का सहारा न मिले." लांब बोटं? नेलपेंट लावलेली? तिच्या किंवा त्याच्यासोबत वाळूत बांधलेला किल्ला? समुद्राच्या लाटांवर केलेलं सर्फिंग? तिला दिलेलं बुके? तिचं मोनालिसा स्माईल? एक रोमँटिक संध्याकाळ? "रात के हमसफर?" रंगीबेरंगी पंख असलेले फुलपाखरू? उन्हात, पावसात, दऱ्याखोऱ्यात, डोंगरावर, समुद्र किनारी घालवलेले क्षण? " ये परबतोंके दायरे"? चंद्राच्या कोरीत, पक्ष्यांच्या थव्यात, मोराच्या पिसाऱ्यात, चांदण्यात, काळया ढगात, कोवळ्या उन्हात, शिंपल्यातल्या मोतीत, काळया मातीत, गुलाबाच्या पाकळ्यात सापडतं का ते? सूर्य मावळताना दोघांनी पाहिलेले आकाशातले लाल, निळे, पिवळे, गुलाबी अशा अनेक रंगाच्या रेघोट्या? "ये शाम का धुआं?" किंवा क्षितिजावर महासागराला भेटणारे निळे आकाश म्हणजे प्रेम? त्याने/तिने तुमच्या शरीराच्या प्रत्येक इंच न इंच त्वचेचे केलेले अवघ्राण? चांदण्या रात्री तलावात तिच्या /त्याच्या सोबत हळू हळू वल्हवलेली बोट? " ये रातें ये मौसम", किंवा सिमल्याच्या धुकारलेल्या एका रात्री नूतनला " तू कहां ये बता.." अशी देव आनंदने घातलेली साद? असेलही कदाचित कारण " प्यार का देखो असर, आए तुम थामे जिगर,मिल गई आज मुझे मेरी मन चाही डगर " असं तो म्हणतो जेंव्हा नूतन बाल्कनीतली खिडकी उघडते. म्हणजे त्याला इच्छित "डगर" मिळाले असा अर्थ झाला असं म्हणेपर्यन्त " क्यों छुपा इक झलक फिर दिखा " अशी तो तिला विनवणी करतो कारण तिनं खिडकी बंद केलेली असते. ते 'झलक ' म्हणजे प्यार का?

एवढं प्रचंड मंथन केल्यानंतर शेवटी एकदा शोध लागला प्रेम म्हणजे काय ते. गुलजारने व्याख्या केली:

प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज़ नहीं
एक खामोशी है सुनती है कहा करती है
ना ये बुझती है ना रुकती है ना ठहरी है कहीं
नूर की बूँद है सदियों से बहा करती है
सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो.
येस्स. सिर्फ एहसास. ते संपलं की द एंड. शेवट.अंत. म्हणून प्रेम कधी सफल होऊच नये. दो प्रेमी हंसोंका जोड़ा बिछड़ना ही चाहिए. त्याची परिणीती परिणीतीत होऊ नयेच. ते तसच राहावं. अमूर्त, अनंत, अनाहत. हूरहूर लावणारं. The sweet pain should linger on, forever. हातात पकडता न येणाऱ्या फुलपाखरासारखं.

अजून एका गोष्टीचा शोध लागला होता. नंदलाल शर्मा सोबत राधा देवी असल्या तर गाणं हमखास लता मंगेशकरचं. नंदलाल शर्मा अधिक राजेंद्र कुमार जैन असेल तर रफी- लता, रफी - आशा युगल गीत आणि मन्ना डे. नंदलाल शर्मा आणि सुरेश कुमार शर्मा असेल तर किशोर, तर नंदलाल शर्मा सोबत शाम सुंदर अगरवाल असेल तर मुकेश आणि तलत असा कोंबो असायचा. या सगळ्यात नंदलाल शर्मा हे कॉमन फॅक्टर. नंदलाल शर्मा सोलो असेल तर हेमंत कुमार, एस डी बर्मन, शमशाद, नूरजहान, सुरैय्या, गीता दत्त यांचा नंबर लागायचा.

हे असे शोध लावण्यात वल्लरीचा सिंहाचा वाटा होता. तिचे शतशः आभार, तिला प्रणाम. ती रेडिओला "रेडीहो" म्हणायची!!. As if to be ready to listen to the songs!!

ज्या झुमरी तलैया से नंदलाल शर्माना मी पसंती लिहू नका असे कळवणार होते त्यांना आता " श्रीमान झुमरी तलैया से नंदलाल शर्मा, तुमची पसंती अत्युच्च दर्जाची असते. मला असं वाटतं की संगीतातलं तुम्हाला बरच काही कळत असावं त्याशिवाय इतकी सुंदर आणि गोड गाणी तुमच्या पसंतीला उतरलीच नसती. आपली एक चाहती." असं लिहून मी " नंदलाल शर्मा झुमरी तलैया, भारत." ह्या पत्त्यावर पोस्टकार्ड पाठवून दिले. काया, वाचा आणि मनानी त्यांना मी वाईट बोलले होते त्यावर हाच एक उतारा होता. Dear Nandlal Sharma was a die-hard कानसेन!!

आता नेट वर झुमरी तलैया शोधलं की ते झारखंड राज्यात कोडरमा जिल्हा आहे त्यातले एक गांव आहे ते कळतं. "तलैया" हा हिंदी भाषेतील लहान तलावासाठी शब्द असून झुमरी हा शब्द "झुरी" म्हणजे स्थानिक भाषेत "झुडुप", जो सामान्यतः खेड्यांमध्ये स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरला जातो त्यावरून तयार झाला आणि झुमरी हे स्थानिक लोकनृत्य आहे असाही शोध लागला.

आता ते सगळं आठवलं की हसायला येतं. आश्चर्याची गोष्ट ही की सध्याच्या २४x७ चॅनेल आणि नॉनस्टॉप संगीताचा कंटाळा येतो. विभाच्या अर्ध्या/एक तासाच्या कार्यक्रमात होणाऱ्या त्या गंधर्वांच्या गुंजनात जी खुमारी असते तीच प्रिय.

....

Group content visibility: 
Use group defaults

आहा! सुरेख आणि सुरेल लिहिलंय.

शैलेंद्रच्या मुलाने शैली शैली शैलेंद्र या नावाने गीतेही लिहिली. दिनेश तोच की वेगळा?

आमच्याकडेही रेडियो सतत चालू असे. पण मी असं अ‍ॅक्टिव्हली ऐकलं नाही.
समीर, देव कोहली ही नावं यायला लागली त्या काळात रेडियो ऐकणं कमी झालं किंवा ज्यात फक्त जुनीच गाणी वाजवली जातात तेच कार्यक्रम अधिक ऐकले.
शैलेंद्र यांनी शंकर जयकिशन खालोखाल एस डी साठी गाणी लिहिली असावीत.
साहिरनेही बहुतेक संगीतकारांसोबत काम केलं (भांडणंही केली), पण मला त्यांची नौशादसोबतची गाणी आठवत नाहीएत.
तुमच्या यादीत सी रामचंद्र थोडे मागे पडलेले वाटले आणि त्यांचे जोडीदार राजेंद्र कृष्ण , पी एल संतोषी राहून गेलेत. राजेंद्र कृष्णही राजा मेहंदी अली खान यांच्या इतकेच मदन मोहनसोबत असत.
उद्घोषकांची नावं , आवाज, स्टाइल लक्षात नाही राहिले का? मला लहानपणी विविधभारतीवर ऐकलेले फार आठवत नाहीत. तेव्हा छायागीत सोडलं तर त्यांना स्वतःचं नाव सांगायची मुभा नसावी. मुंबई ब वरचे मात्र लक्षात आहेत. तसंच तुम्हांला ते नंदलाल शर्मा आठवतात, तसं मला बाळ जांभवसई, पापडी, वसई.
२००० नंतर पुन्हा निवान्तपणे विविधभारती ऐकलं तेव्हाचे उद्घोषक, उद्घोषिका - निम्मी मिश्र, रेणू बन्सल लक्षात राहिल्यात. आता त्या सगळ्या निवृत्त झाल्यात. एक युनूस खान आवर्जून ऐकावेसे वाटतात. डायल इन कार्यक्रम , एसेमेस, ईमेलवरून फर्माइश असं रूप बदललं विविधभारतीने. आजकाल हवं ते गाणं ऐकता येणं फार (नको इतकं?) सोपं झालं आहे. तरीही आपलं नाव, आपला आवाज रेडियोवरून यावा याची क्रेझ असते श्रोत्यांत. त्यांचे एकमेकांशीही बंध जुळतात.

छान लेख. तसेच आपली आवड मध्ये सांगली हून अशोक कुमार व हेमामालिनी चव्हाण हे ही नेहमी पत्र लिहून आवड सांगत असत व ऐकावे लागे.

मी आजकाल रात्री सर्व कामे संपली की एकेक संगित दिग्द र्शक / कवी वगैरेंचे यु ट्युब वर सिलेक्षन आहेत ते लावते व फॉर वर्ड करत बघते.
जुने छायागीत यायचे ते बघायला तरसणारी आमची पिढी. आता हातासरशी गाणे ऐकायला व बघायला मिळते.

काय बहारदार लिहीले आहे.
रोज 'भारत की गूंज', 'सखी सहेली', 'गीत गाता चल' अन्य नावे आठवत नाहीयेत - पण विविधभारतीवरील, हे सर्व कार्यक्रम, अजुनही खूप, प्रचंड आनंद देतात. हे कार्यक्रम ऐकताना, परदेशातही, भारताची आठवण येत रहाते.

अबब! एवढे रेडिओ शी बंध जुळलेली व्यक्ती मला आजवर माहिती नव्हती.
हा लेख निवांतपणे पुन्हा एकदा वाचणार.

मस्त लेख!
आवडला.. भले रेडिओशी रीलेट झाला नाही. कारण मी हॉस्टेलला असताना सीडी प्लेअरचा जमाना आलेला. पण रूमवर चोवीस तास गाणी चालू हवीच हा नियम होता. हा लेख वाचून या आवडीवर लिहावे असे मलाही वाटू लागलेय Happy

<<आहा! सुरेख आणि सुरेल लिहिलंय.>> धन्यवाद भरत. तुमचाही अभ्यास बराच आहे या विषयात.

<<शैलेंद्रच्या मुलाने शैली शैली शैलेंद्र या नावाने गीतेही लिहिली. दिनेश तोच की वेगळा?>> शैलीने जीना यहां मरना यहां या गाण्याचे अंतरे लिहीले. तो २००७ ला स्वर्गवासी झाला. त्याचा लहान भाऊ दिनेश. त्याला एक बहीण आहे अमला नावाची आणि अजून एक भाऊ आहे मनोज.
<<शैलेंद्र यांनी शंकर जयकिशन खालोखाल एस डी साठी गाणी लिहिली असावीत.>> करेक्ट. सलील चौधरी यानी शैलेन्द्रना एसडी कडे रिकमंड केले असे दिनेश म्हणाले. देव आनंदने पण शैलेन्द्र यांचा आग्रह धरला. इन फॅक्ट दिनेशना देवने नवकेतन मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून नोकरी दिली होती. शैलेन्द्र यांच्या मृत्यू नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे सर्वात पहिल्यांदा आला तो देव. राज कपूर आले नाहीत कारण आदल्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता आणि ते हँग ओव्हर झालेले होते. This information is as per Dinesh.

सुंदर लिहिलंय.

>>> ‘आप के अनुरोधपर', ' मन चाहे गीत’ आणि ‘जयमाला’
'जयमाला' म्हणजे फौजी भाइयों के लिये असायचा तो कार्यक्रम ना? एक रात्री (बहुधा १० वाजता? की तो 'गीतगंगा?, आणि मग) 'बेला के फूल' आठवतो आहे. संध्याकाळी साडेसहाला (बहुधा 'मुंबई ब' वर) 'सांजधारा' हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम.

माझ्याही अभ्यासाला आणि परीक्षेचं टेन्शन वगैरे नाटकांना हेच पार्श्वसंगीत असायचं. Happy
सकाळी 'भूले बिसरे गीत', 'संगीत सरिता' वगैरे नुसते कार्यक्रम नव्हते, सुरेल अलार्म्स होते. अमुक कार्यक्रम सुरू होईतो बाबांचा डबा भरला जाणं आवश्यक असायचं आणि मग तमुक कार्यक्रमाच्या घोषणेबरोबर धाकट्या भावाला उठवायला आईची हाळी जायची.

ते विविध भारतीचे निवेदक/निवेदिकादेखील किती सुमधुरभाषिणे होते! 'सुनिये आशा भोसले की आवाज में ?? फिल्म का गाना, इस गीत के बोल लिखे हैं ??ने, और इसे संगीत से सँवारा/सजाया है ??ने'.
अगदी कुलीन आबदार भाषा आणि आवाज!
मला ते मिर्चीबिर्ची रेडिओ आता अगदी ऐकवत नाहीत यांनी बिघडवून ठेवल्यामुळे!

आज मी 'जयमाला' कार्यक्रम ऐकला. पण फौजी भाईयोंके लिये नव्हता. बहुतेक बदललाय आता.
आज एक मस्त गाणे लागले होते - शैलेन्द्र-सलील चौधरी यांचे -

छोटा सा घर होगा बादलोंकी छांव मे
आशा दीवानी मनमे बन्सुरी बजाए रे ....
.
.
यातील - सोने के सिंहासन पर बैठे मेरी प्यारी मां,
मेरा क्या मै पडा रहुंगा अम्मी जी के पांव मे

एकदम विनम्र, मधुर, मिट्ठासपूर्ण.

ज्यांना माहीत नाही त्यांच्याकरता - NewsOnAir अ‍ॅप डाउनलोड करा.

<*मी आजकाल रात्री सर्व कामे संपली की एकेक संगित दिग्द र्शक / कवी वगैरेंचे यु ट्युब वर सिलेक्षन आहेत ते लावते व फॉर वर्ड करत बघते.** येस अमा. पण तू नळीवर तीच गाणी दृक्श्राव्य स्वरूपात काही वेळा मनातून उतरली हे ही तेवढेच खरे आहे.

**मस्त लेख!
आवडला.. भले रेडिओशी रीलेट झाला नाही. कारण मी हॉस्टेलला असताना सीडी प्लेअरचा जमाना आलेला. पण रूमवर चोवीस तास गाणी चालू हवीच हा नियम होता. हा लेख वाचून या आवडीवर लिहावे असे मलाही वाटू लागलेय **
Waiting for your article ऋन्मेऽऽष and thanks.

**अगदी कुलीन आबदार भाषा आणि आवाज!
मला ते मिर्चीबिर्ची रेडिओ आता अगदी ऐकवत नाहीत यांनी बिघडवून ठेवल्यामुळे!**+१०००

गीतगंगा मराठी भावगीतांचा कार्यक्रम सकाळी साडेअकरा. सांजधारा - संध्याकाळी सव्वासहा. त्यानंतर पावणेसातला नाट्यसंगीत. हे आता बंद झाले असावेत. मुंबई ब वर कामगार सभा असे. सोमवारी संध्याकाळी विशेष सांजधारा नामवंत कलाकार सादर करीत. हा दुसर्‍या दिवशी गीतगंगेच्या जागी वाजवत.
रात्री दहाला छायागीत. यात उद्घोषक एखादी थीम धरून गाणी वाजवत. त्याला साजेसं निवेदन. साडेदहाला फर्माइशी गाणी.
रात्री ११ बेला के फूल. शेवटचा कार्यक्रम.
मनचाहे गीत, आपकी फर्माइश दुपारी असायचे.
जयमाला संध्याकाळी सात आठवडाभर सैनिकांच्या फर्माइशीवर असत. रविवारी प्रसिद्ध कलाकार येऊन सैनिकांशी संवाद साधत आपल्या आवडीची गाणी ऐकवत.

छान लिहिलंय !

मग त्या झुमरी तलेय्या च्या नंदलाल शर्मांचा शोध लागला का ?

असे कुठले दूरदूर चे कधी न पाहिलेले , बोललेले लोक मनात घर करून राहतात...कधीतरी आठवले की 'ती सध्या काय करते' मोड ऑन होतो.

खूप छान लिहिलंय! अभ्यासाच कौतुक! माझाही रेडिओ प्रिय! आईची सकाळ रेडिओ शिवाय सुरू व्हायची नाही. वडिलांना बातम्या ऐकायची सवय आठ वाजता बीबीसी न्यूज ऐकल्याशिवाय दिवस पूर्ण व्हायचा नाही. उरलेल्या वेळात रेडिओ आमचा.
App वरून नेट शिवाय ऐकता येतं का? मी मोबाईलवरून ऐकते.

सुंदर लिहिलंय.
ही हिंदी गाणी नसती तर जीवन असह्य होऊन गेलं असतं.+१००

सुंदर लेख!
माझे सगळे लहानपण रेडीओच्या संगतीत गेले. होस्टेलला गेल्यावर रेडीओची साथ सुटली.

खूपच छान लेख आहे. मजा आली वाचताना.

'आपली आवड ' ऐकताना नावं ऐकायला अशीच मज्जा येते. इथे अस्मिता वाहिनी वर दुपारी ऐकते मी पुष्कळदा Happy

https://youtube.com/shorts/jnorm93EEkc?si=QkWISh8ECLt4pyns

ह्या शॉर्ट मध्ये शैलेंद्र यांचा डोक्याला पटका / कपडा गुंडाळलेला एक फोटो आहे , तो मूळ कुठल्या गाण्यातून / चित्रपटातून घेतला आहे कुणी सांगू शकेल का प्लीज ? ते गाणं मला पाहायचं आहे .

छान लेख. माझे सी एस आर्टिकलच ऑफिस पुण्यात बिझी land ला होते. तिथे टेलर लोक जास्त. दिवसभर रिडू चालूच. काय मस्त मस्त गाणी ऐकायला मिळायची:) आमच्या मध्ये तर स्पर्धा असायची फक्त सुरुवातीच्या ट्यून वरून गाणं ओळखायचं Happy

@radhanishaa ते गाणं चली कौन से देस गुजरीया ( बूट पॉलिश)

Pages