संधी

Submitted by प्रथमेश काटे on 8 August, 2023 - 02:18

संधी

‌‌ उन्हे उतरत आली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस घरांच्या रांगा होत्या. काही दगड विटांच्या वा मातीच्या भिंती, पत्र्याच्या जागोजागी पडलेल्या कौलांच्या छतांची साधी घर होती. काही सिमेंटची, कौलारू, थोडीफार टापटीप घरे होती. एखादे बऱ्यापैकी रंगरंगोटी केलेले, एक मजलीच ; पण जरासे ऐसपैस बंगलीवजा घर होते. रस्त्यावरून तो चालला होता. फिकुटलेला चेहरा, दाढीचे खुंट वाढलेले, केस विस्कटले होते. डोळे खोल गेलेले होते.
तो होता रमण. बत्तीस वर्षांचा तरुण. त्याची अशी अवस्था होण्याला तसंच कारणही होतं. आज तो त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून - तुरुंगवास भोगून येत होता. त्याच्या घरासमोर येऊन तो थांबला. तोच, शेजारच्या घरातला मुलगा बॉलशी खेळत खेळत रस्त्यावर आला. रमणची नजर त्याच्याकडे गेली. त्या मुलाने ही रमण कडे पाहिलं. रमाणने स्मित केले. लहानग्याचा चेहराही फुलला ; पण पुढच्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावरील आनंद मावळून त्यावर काहीशी भीती उमटली. झटकन बॉल उचलून तो घरात पळून गेला. रमण काय ते समजून गेला. खिन्न चेहऱ्याने तो आपल्या घराकडे वळणार तोच त्याला पाठीमागून हाक आली. त्याने पाहिलं तर त्याच्या घराच्या समोरच असलेल्या त्या एक मजली बंगल्याच्या पोर्चमध्ये एक गृहस्थ हसऱ्या चेहऱ्याने उभे होते. ते अर्थात रमणचे शेजारीच होते. श्री. मेढेकर. त्यांनी रमणची आस्थेने विचारपूस केली. त्याला बरं वाटलं जरा आश्चर्य ही वाटलं. आता आपल्याला ओळखणाऱ्यांपैकी अगदी कुणीच चांगली वागणूक देणार नाही असं त्याला वाटलं होतं. मेढेकरांशी दोन शब्द बोलून तो घराकडे गेला.

रमण चांगला शिकला सवरलेला तरूण ; पण काहीसा आळशी व कामचुकार. सधन घरामध्ये लाडाकोडात वाढलेला असल्याने मेहनत करण्याची गरज व त्यामुळे सवय नव्हती. इच्छा तर त्याहून नव्हती. शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने नोकरी सुरू केली ; पण रस नं वाटल्याने काही दिवसातच ती नोकरी सोडून दिली. पुढेही बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या धरून काही महिन्यात सोडून दिल्या. एकटा असताना ठिक होतं. पुढे लग्न झालं. पत्नीही चांगल्या पगाराच्या खासगी नोकरीत होती. तेव्हा तर त्याने प्रयत्न करणं ही कमी केलं. पत्नीच्या पगारावरच घर चालू लागलं. पुढे त्यांना एक मुलगी झाली. आता बायकोला काही काळ नोकरी वैगेरे करणं शक्य नव्हतं. तेव्हा नाईलाजाने पुन्हा त्याला कामधंद्याचा शोध घ्यायला सुरुवात करावी लागली. आणि आता तो एकटाही नव्हता. खांद्यावर जबाबदारी होती ; पण म्हणतात ना स्वभावाला औषध नसतं. पुन्हा आधी सारखं नोकरी धरून, काही दिवसात सोडून देणं सुरू झालं. बायकोने विचारल्यावर ' कामांच्या मानाने पगार मिळत नाही.' अशी काहीतरी सबब सांगायचा ; पण तिला रमणचा स्वभाव चांगलाच ठाऊक होता. तिनं अनेकवार रमणला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला ; पण त्याच्यात काही फरक पडला नाही. मग वारंवार त्यांच्यात भांडणं होऊ लागली. रमणला फारशी मेहनत न करता पैसे कमवावेसे वाटत होते. एकदा, त्याला चांगलंच ओळखून असणारा त्याचा एक मित्र त्याला एका व्यक्तीकडे घेऊन गेला. त्या व्यक्तीनं रमणवर एक कामगिरी सोपवली. कसलीतरी बेकायदेशीर कागदपत्रं पोहोचविण्याचं काम होतं. रमणला ते फारसं पटत नव्हतं खरं, मात्र मोबदल्यात मिळणारी रक्कम समजताच तो तयार झाला. चांगलं - वाईट, कायदेशीर - बेकायदेशीर या केवळ माणसाच्या मनातील कल्पना आहेत. झटपट पैसे कमवायचे तर काहीही करावं लागतं, अशी रमणने स्वतःची समजूत घातली. त्याने काम हाती घेतलं खरं ; पण ते पूर्ण होण्याआधीच त्याला पोलिसांनी पकडलं. त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला व त्याला जेलमध्ये जावं लागलं. त्याच्या बायकोला तर धक्काच बसला. तिचे आई वडील तिला व बाळाला आपल्या घरी घेऊन गेले. तुरुंगातील एकेक दिवस रमणसाठी असह्य होता, त्यात पत्नी बाळ घेऊन त्याला सोडून गेल्यावर तर त्याच्या दु:खात अजूनच भर पडली. मग मात्र इथून बाहेर पडल्यावर प्रामाणिकपणे पडेल ते काम करून, मेहनत करून अभिमानाने, समाधानी आयुष्य जगायच असा त्याने मनाशी निश्चय करून टाकला होता.

बरेच दिवस रिकामं असल्याने घरात खूप धूळ, जाळी जळमटं झाली होती. तो उर्वरित दिवस घराची साफसफाई इ. मध्येच गेला. रात्री आठ - सव्वा आठला थकून भागून तो टीव्ही पाहायला बसला होता. अजून जेवण बनवायचं बाकी होतं. इतक्यात दारावरची बेल वाजली. त्यांनी लगबगीने उठून दरवाजा उघडला. दारात मेढेकर उभे होते. हे मेढेकर असतील साधारण पंचेचाळीशीचे. उंच, मध्यम अंगकाठी. सावळा रंग, चष्म्याआडचे घारे, भेदक डोळे त्यांच्या हुशारीची साक्ष देत होते. अर्थात ते होतेच विचारी, आणि चाणाक्ष. आणि तितकेच समंजस व सहृदय होते. रमणला जेल होण्याच्या नऊ - दहा महिने अगोदरच ते इथे राहायला आले होते ; पण फारच कमी वेळात रमणच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे व आपुलकीचे स्थान निर्माण झाले होते. ' त्या चुकीचा मार्ग दाखवणाऱ्या मित्रापेक्षा यांच्यासारख्या माणसाच्या संगतीत राहिलो असतो तर किती बरं झालं असतं.' त्यांच्याकडे पाहता पाहता रमणच्या मनात एकदम विचार डोकावून गेला.

त्यांच्या हातात एक डब्बा होता. त्यांच्या पत्नीने रमणसाठी व त्यांच्यासाठी जेवणाचा डबा दिला होता. रमणसोबतच रात्रीचं जेवण करण्याचा त्यांचा विचार होता. त्याने मेढेकरांचे हसून स्वागत केले. मग दोघांनीही गप्पा मारत जेवण केले. मेढेकरांची विनोदबुद्धी लाजवाब होती. त्यांनी आपल्या व्यवसायातील अनेक गमती जमती सांगितल्या. त्यांच्याशी बोलता बोलता रमणचं गांभीर्य, उदासीनता बरंचसं कमी झालं. तोही मोकळेपणाने बोलू लागला.‌ मेढेकरांच्या मनात काहीतरी बोलायचं होतं ; पण ते बोलले मात्र नाहीत. ही वेळ बहुदा त्यांना त्यासाठी योग्य वाटली नसावी. जेवून झाल्यावर काही वेळाने ते घरी गेले.

•••••••

दुसऱ्या दिवशी रमण ला उठायला अंमळ उशीरच झाला. ते साहजिकच होते. शारीरिक नसला, तरी मानसिक थकवा खूप आला होता. काल रात्री बऱ्याच दिवसांनंतर त्याला समाधानाची विश्रांती मिळाली होती.
पटापट शेव्ह करून, आंघोळ करून तो तयार झाला. त्याचं कालचं अजागळ रूप पूर्णपणे पालटलं होतं. सफेद फॉर्मल शर्ट आणि काळी पॅन्ट अशा साध्या पण सोबर पोशाखात त्याचं मूळचं साध्या सरळ, सुशिक्षित तरूणांचं रूप आरशात पाहून त्याच्या चेहऱ्यावर कौतुक आणि समाधान झळकत होतं.

तो बाहेर निघण्याच्या तयारीत होता, तोच सौ. मेढेकर टिफीन घेऊन आल्या. त्यांनी रमणची प्रेमाने विचारपूस केली. त्यावरून त्यांनादेखील रमणबद्दल घृणा, तिरस्कार वैगेरे बिलकुल वाटत नव्हता हे स्पष्टच होतं. रमण मनोमन सुखावला. तशा सौ. मेढेकर ही समजूतदार व प्रेमळ स्वभावाच्या होत्या.
नाश्ता उरकून रमण जो घराबाहेर पडला, तो थेट रात्री साडेआठ नऊच्या सुमारास घरी परतला. तेव्हा तो खूप थकलेला तर होताच, मात्र त्यापेक्षाही अधिक दु:खी, चिंतित अन निराश झालेला दिसत होता.

तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळी रमण असा घराबाहेर असतानाच त्याला मेढेकरांचा फोन आला. त्यांनी रमणला घरी बोलावलं होतं. खरंतर इतक्यात रमणला घरी जायचं नव्हतं ; पण मेढेकरांचं मन मोडणं त्याला पटलं नाही. शिवाय नक्की काय काम असावं अशी एक उत्सुकताही मनात निर्माण झाली होतीच. त्यामुळे लगोलग त्याने परतीचा रस्ता धरला.

मेढेकरांच्या घरात, हॉलमधील सोफ्यावर मेढेकर बसले होते. शेजारील कोचावर रमण बसला होता. नुकतंच त्यांचं जेवण उरकलं होतं. आता दोघेही आरामात गप्पा मारत बसले होते. नेहमीप्रमाणे हास्यविनोद सुरू होते ; पण रमणला मात्र मेढेकरांचं त्याच्याकडे काय काम असावं हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती. थोडावेळ इकडचं तिकडचं बोलून मेढेकर मूळ मुद्द्यावर आले -

" रमण, तू नोकरी शोधायला सुरुवात केली असेल ना."

" हो. काल आणि आज दिवसभर ठिकठिकाणी काहीतरी कामधंदा पाहण्यासाठी भटकत होतो, पण..."

" पण ? मनासारखी नोकरी कुठे मिळाली नाही का ? "

" अहो आता कसली मनासारखी नोकरी नि कसलं काय. फक्त जरा बऱ्यापैकी पगाराची, आणि कोणतही साधं सरळ, इज्जतीचं काम असलेली नोकरी मिळावी एवढीच माफक अपेक्षा आहे, पण तीही पूर्ण होणं अवघड दिसत आहे. अर्थात माझ्यासारख्या एका मोठ्या गुन्ह्याबद्दल तुरुंगात जाऊन आलेल्याला माणसावर विश्वास ठेवून कोण नोकरी देणार म्हणा. साहजिकच आहे. " रमण खिन्नतेने म्हणाला.

" रमण. म्हणजे तू झटपट पैसे कमावण्यासाठी एक अत्यंत चुकीचा, बेकायदेशीर मार्ग अवलंबला होतास, याची तुला जाणीव झालीय तर ? " अगदी हळूवारपणे, विचारपूर्वक एकेक शब्द उच्चारीत मेढेकर बोलत होते.

" हो हो. अर्थात." रमण चटकन उत्तरला.

" मग पुन्हा त्या मार्गाने तू जाणार नाहीस याची तुला खात्री आहे का ? " त्याच्या अंतर्मनाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत मेढेकरांनी विचारलं.

" हो. आहे." रमण लगेचच निश्चयी सुरात उद्गारला.

" हम्म." ते मान डोलावून पुढे म्हणाले. " रमण. राग मानू नकोस ; पण तू थोडासा कामधंदा करण्याच्या, मेहनत करण्याच्या बाबतीत आळस करणारा होतास. - खरंतर ' होतास ' हा शब्द मेढेकरांनी जाणूनबुजूनच वापरला होता. - आता प्रामाणिकपणे मेहनत करण्याची, कष्ट करण्याची तुझी तयारी आहे का ? "

" होय."

मेढेकर काही क्षण त्याच्याकडे बघत राहिले. मग पुढे म्हणाले -

" माझ्या ऑफिसमध्ये सध्या ... ..ची जागा मोकळी आहे. मी माझ्या वरिष्ठांशी तुझ्याबद्दल बोललो आहे. सगळं नीट समजावून सांगितलं आहे. इच्छा असेल तर परवा त्यांनी इंटरव्ह्यू साठी यायला सांगितलं आहे."

रमणला क्षणभर काय बोलावं तेच सुचेना. स्वतः ला सावरून तो म्हणाला -

" हो. ऑफकोर्स माझी तयारी आहे. थॅंक्यू."

मेढेकरांंनी त्यावर केवळ स्मित केलं. थोड्या वेळानंतर तो आपल्या घरी निघून गेला. मेढेकर शांतपणे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते.

मेढेकर मघाशी रमणशी बोलत असताना त्याचं, त्याच्या देहबोलीचं बारकाईने निरीक्षण करत होते. त्याचा खरेपणा चाचपून बघत होते. त्यांना लक्षात आलं की रमण जे काही बोलतोय ते सगळं अगदी मनापासून, Genuinely बोलत आहे. रमणला आपल्या कृत्याचा खरोखरच पश्चात्ताप झाला आहे. प्रामाणिकपणे कष्ट करून, मेहनत करून पुढचं आयुष्य सरळ मार्गाने जगण्याची त्याची मनापासून इच्छा आहे. आणि पूर्णपणे तयारी आहे. त्याला आता गरज होती ती फक्त एका संधीची. आणि ती त्याला मिळवून देण्यासाठी मेढेकरांनी जमेल तसा प्रयत्न केला होता रमण या संधीचं सोनं करेल याबाबत मेढे करांना खात्री होती ; पण या उलट सद्य परिस्थितीत रमणला अशी एकच संधी मिळालीच नसती तर...
रमणला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला होता. पुन्हा त्या वाटेने जायचं नाही असं त्याने ठरवलं होतं. हे असे शॉर्ट कट्स सोडून देऊन मेहनत करून, सरळ मार्गाने जगण्याचा त्याने मनाशी निश्चय केला होता. आणि तो मनापासून, ठामपणे केलेला होता. प्रश्नच नव्हता. तो निश्चयाप्रमाणे नक्कीच वागणारही होता, यातही कुठलीच शंका नव्हती ; पण कष्ट करून सुखी, सरळमार्गी आयुष्य जगण्याची इच्छा असूनही, त्यासाठी इतके प्रयत्न करूनही जर त्या प्रयत्नांना यश येताना दिसत नसेल तर मात्र काही काळाने त्याचा हा निश्चय कदाचित डगमगला असता. साधं सुखी आयुष्य जगण्यासाठीही पैसा तर हवाच ना. तोच नसेल तर.. शेवटी तोही सामान्य माणूसच होता. त्याच्या सहनशक्तीला मर्यादा होत्या. प्रत्येक वेळी अपयश आणि निराशाच हाती आली असती तर त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला असता. तो पुन्हा चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. असं झालं असतं तर मात्र रमणचं ' तिथून ' परतणं, माणसात येणं अशक्यप्राय होऊन बसलं असतं. त्याचं सारं आयुष्यच बरबाद झालं असतं ; आणि तसं काही घडू नये या सद्भावनेतूनच मेढेकरांनी रमणला मदत केली होती.

रमणने पूर्ण आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू दिला. तो हुशार होताच. त्याची बुद्धीमत्ता, कॉन्फिडन्स आणि अॅटीट्युड बघून परीक्षक प्रभावित झाले होते.
पुढे तो जॉब त्यालाच मिळाला. रमणने आपल्या मनाशी केलेल्या निश्चयाप्रमाणे आळस, कामचुकारपणा पूर्णतः झटकून टाकला. मन लावून अगदी उत्साहाने काम करण्यास प्रारंभ केला. त्याच्यातून एक नवा रमण ; प्रामाणिक, हुशार, कामसू असलेला रमण निर्माण झाला होता. आपल्या कामात तो स्वतः ला झोकून देऊ लागला. आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू लागला. वरिष्ठ त्याच्या कामावर खूष होते.

रमण आज मेढेकरांच्या घरी आला होता. कामावर रुजू झाल्यानंतर जवळ जवळ वर्षभरातच रमणला प्रमोशन मिळालं होतं. त्याचे पेढे देण्यासाठीच तो आला होता.

" दादा -" रमण मेढेकरांना आदराने दादा म्हणून संबोधत असे. " तुमच्यामुळेच मी आज सुखी आयुष्य जगतोय. माझ्या त्या बिकट परिस्थितीत तुम्ही मला मदत केलीत. म्हणून मला ही प्रगती करता आली."

" नाही रे. तू एक सभ्य, सुशिक्षित तरुण आहेस. एकदा तू जी चूक केलीस, तिच्यातून सावरून प्रामाणिकपणाने, कष्ट करून आयुष्य जगण्याची तुझी मनापासून इच्छा व तयारी होती. गरज होती ती फक्त एका संधीची. ती तुला मिळावी यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न केला. बस."

" ती संधीच तर माझ्यासाठी महत्वाची होती. ती तुमच्यामुळे मिळाली, म्हणून मी माझं आयुष्य सावरू शकलो. खरोखरच तुमच्यासारखा मोठ्या भावासारखा मार्गदर्शक मला शेजारी म्हणून लाभल्याबद्दल मी परमेश्वराचा ऋणी राहीन."

मेढेकरांनी काही नं बोलता फक्त मंदसे स्मित केले.

समाप्त
@ प्रथमेश काटे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जी कठिण काळात साथ न देता सोडून गेली ती कशाला हवीय पुन्हा Light 1
जॉब लागल्यावर २री बायको आणेल की. ही संधी सुद्धा एकदाच मिळणारेय

चांगली रंगवलीय कथा.एकंदर बऱ्याच कथा आणि सिनेमे बघून डोकं तिरकं चालत असल्याने मी शेवटपर्यंत रमण जेलमध्ये मेलाय, त्याला माहितीच नाहीये आणि आफ्टरलाईफ मध्ये मृत मेढेकर दांपत्य स्वागत करतेय, किंवा मेढेकर चित्रगुप्त वगैरे काहीही विचार केले Happy

मलापण, मला सौ मेढेकर म्हणजे सौ रमण असतील ,डबा खाल्या वर रमण उठणारच नाही, नोकरी ची ऑफर म्हणजे स्मगलिंग च काम असेल etc etc अस बरच काही वाटून गेलं

@अज्ञानी - समजलं नाही सर. आपण कथेची थट्टा करताय का ?

@mi_anu - Hahah. thank you mam.

@अंजली_१२ - खूप थॅंक्यू मॅम.

जी कठिण काळात साथ न देता सोडून गेली ती कशाला हवीय पुन्हा Light 1
जॉब लागल्यावर २री बायको आणेल की. ही संधी सुद्धा एकदाच मिळणारेय

>>> हे पण चालतंय की !
माझं म्हणणं तेच आहे, तो मार्गी लागलाय तर त्याचा संसार पण मार्गी लावला असता तर अजून मजा आली असती

एकदम वरण भातासारखी साधी सुधी कथा. आवडली.

मी मात्र मेढेकरांना कोणाचा (म्हणजे बायकोचा) काटा काढायचा असेल व आळ या रमण वर आणायचा असेल किंवा मेढेकरांना रमणबाबत स्पेशल इंटरेस्ट असेल व संधी साधायला पहात असतील असे काहीसे विचार करत होतो. जास्त वेबसिरीज बघीतल्याचा परीणाम.

सपक कथा. काहीच कंगोरे नाहीत.
लेखकाला प्रतिसाद हवे आहेत असं कुठेतरी वाचलं म्हणून मुद्दाम उघडून वाचली. उघडली न्हवती तेच बरं होतं वाटलं. नेहेमीच्या शिरस्त्याने प्रतिसाद दिला नसता. पण हवा आहे म्हणून देतोय.

असे मेढेकर आजुबाजुला असावेत! >> हो ना धन्यवाद.

लेखकाला प्रतिसाद हवे आहेत असं कुठेतरी वाचलं
म्हणून मुद्दाम उघडून वाचली. उघडली न्हवती तेच बरं
होतं वाटलं. >>> मी जरा भावनेच्या भरात ती कमेंट करून बसलो हे खरं आहे ; पण मुद्दाम मला गरज आहे अशा विचाराने कुणी कमेंट करू नये.

असो.आपण कथा वाचलीच आहे, आणि प्रतिक्रिया दिली आहे तर एवढंच सांगेन सर, की हे कथानक तसे साधेसरळच आहे. यात वेगळेपणा आहे तो कथेमधून जो संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्यात.

सपक कथा>>> +१
त्याला काहिही मेहनत न करता सगळं मिळत गेलय. आणि संघर्ष म्हणजे काय त्याला बहुतेक कळणारच नाही.
पण कथा तशी लिहिलिय तर ह्या जर तर ला अर्थच नाही.
प्रथमेश जी, तुम्ही लिहित रहा. लेखनास शुभेच्छा!

जी कठिण काळात साथ न देता सोडून गेली ती कशाला हवीय पुन्हा>> ती सोडून गेली ते उत्तमच केलं, आळशी ऐतखाऊ नवरा पुन्हा तिला कामाला लाऊन सुट्टा ओढत बसला असता (असे नवरे असतात प्रत्यक्षात)

@aashu29 :- आळशीपणा केल्याचा, सुखी आयुष्यासाठी अटळ असणाऱ्या संघर्षापासून पळत राहिल्याचा काय परिणाम होतो हे एकदा लक्षात आल्यावर तो नक्की मनापासून मेहनत करेनच. आणि ती करत असताना संघर्ष काय असतो हे ही त्याला नक्की समजेल. अर्थात तुमचं चूक आहे असं मी बिलकूल म्हणत नाहीये. फक्त माझा point of view समजावून सांगतोय. thank you.

प्रथमेश जी, तुम्ही लिहित रहा. लेखनास शुभेच्छा! >> आभारी आहे. आपल्यासारखा कथेत आढळलेली कमी योग्य शब्दात सांगणारा, आणि त्याचसोबत लेखकालाच एकदम असा तसा ठरवण्याची घाई न करता, त्याचा मान राखून प्रोत्साहन देणारा सुजाण वाचक लाभणं हे भाग्यच.

भन्गार येक्दम >> वाचकांच्या कुठल्याही चांगल्या वाईट मतांचा आदर आहेच ; पण ते मत एक मर्यादा पाळून मांडलं गेलेलं असावं. जाऊद्या, आपल्या कमेंट वरून एवढं शुद्ध मराठी तुम्हाला झेपणार नाही, आणि कळणार तर त्याहूनही नाही हे ध्यानात येतं. शिवाय आपली कमेंट वाचल्यावर मुद्दामहून तुमचा मायबोली वरचा एकमेव लेख वाचला. तो आणि ही कमेंट वाचून आपल्या असंख्य सुंदर, अलंकारिक शब्द सौंदर्याने नटलेल्या मराठी भाषेबद्दल करूणा दाटून आली ( परत आपल्या झेपण्या बाहेरचं झालं. स्वारी बर्का. ) आणि वर कमेंट्स सेक्शन मध्ये आपण आपल्या मातृभाषेचा अनादर ( म्हणजे आदर, रिस्पेक्टच्या उलटं, म्हणजे इंग्रजीत ज्याला disrespect म्हणतात ते. बर्का ) केल्याचंही तोंड वर करून समर्थन केलंत, हे बघून आपलीही किव आली असो.

अजून एक महत्त्वाचं. आपण कथा लेखनाला हात घातला नाही हे मायबोली वरील वाचकांचं नशिब. अशासाठी की आपली अगम्य व्याकरणाचा वापर असलेलं लिखाण आमच्या समजापलीकडच आहे. त्यामुळे कथा दिसत असूनही वाचण्याची हिंमत न झाल्याने आपले अनमोल ( परत तेच. जित्याची खोड.. दुसरं काय. परत स्वारी बर्का ) विचार आमच्या पर्यंत पोहोचणार नाहीत याची रूखरूख लागून राहिली असती.

ती सोडून गेली ते उत्तमच केलं, >>> typical feminist comment which was obviously expected Biggrin
अनेक उदाहरणे आहेत ज्यात ह्याच चुका स्त्रियांकडून सुद्धा घड़तात तेव्हा मात्र बाईपणाचा पुळका येणे अपेक्षा ठेवली जाते हे सुद्धा चूक आहे एवढंच नमूद करायचं होतं !

सकारात्मक संदेश देणारी कथा आवडून गेली !

या कथेचा पुढचा भाग येऊ शकतो ही शक्यता जाणवली
(शक्य असेल तर कथा बीज विकसित करून मालिका करा 4 भागांची !

मेढेकर पतिपत्नी नायकाच्या मागे उभे राहिले ही केवढी मोठी गोष्ट आहे. एखाद्याचे पुनर्वसन करणे सोपे नाही

आता मर्यादा सोडलीच आहे तर‌ ऐक साल्या, मी काही भिक मागत नव्हतो. माझा मुद्दा वेगळा होता. तो तुझ्यासारख्या अकलेच्या कांद्याला काय समजणार म्हणा अर्थात तरी भावनेच्या भरात मी चूकच केली. आणि ती मान्यही केली.

आणि तू कथा लिहून कथेला प्रतिक्रिया मिळत नाही हे बोलून दाखवलं नाहीस हे खरं आहे ; पण त्याचं कारण हे आहे की कथा लिहीण्याची, आणि मुळात या वेबसाईट सारख्या सार्वजनिक प्लॅटफॉर्म वर काही लिहीण्याची तुझी अवकातच नाही.

मला तर वाटलं होतं की माझा रिप्लाय वाचून जनाची नाही तरी मनाची लाज बाळगून गप राहाशील ; पण तू तर इतका निर्लज्ज निघालास की परत कमेंट केलीस. तीही तुझ्या आधीच्या लेख ( तोही एकमेव. अर्थात बरंच आहे. कारण वर सांगितल्याप्रमाणे, तुझी लायकी नाही. ) आणि कमेंट्स ( त्या मात्र बऱ्याच प्रमाणात. आणि अतिशय मुर्खासारख्या ) ज्या अगम्य भाषेत होत्या त्याच भाषेत. आणि हो, मी तुझ्या लिखाणाबद्दल बोललो म्हणूनच खरंतर तुझी जळाली हे माझ्या लक्षात आलं आहे. अरे बथ्थड मेंदूच्या आपण वेबसाईट्स वर वैगेरे लिहीतो, ते लोकांपर्यंत आपले विचार पोहोचविण्यासाठी, किंवा मनोरंजनाच्या हेतूने ; पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा वाचणाऱ्याला आपण काय लिहीलं आहे हे समजेल. अर्थात थोड्याफार चुका तर सगळ्यांकडून होतात ; पण जर काय लिहीलं आहे हेच समजत नसेल तर त्या लिखाणाला काय अर्थ राहतो. तेच तुला अनेकांनी सांगितलय पण तू चूक मान्य करून ती सुधारायची सोडून इतरांनाच ऐकवतो. आणि वर तोंड करून इतरांच्या दर्जेदार लेखनाला हीन लेखतोस, आणि ते लिहीणाऱ्या लेखकांचा गलिच्छ भाषेत अपमान करतोस हलकट साला. छपरी.

आणि मी जे म्हणालो की लेखन करण्याची तुझी लायकी नाही, अवकात नाही ते तुझ्या न समजणाऱ्या लिखाणामुळे मुळीच नाही ( तेवढ्यासाठी एकदम लायकी काढायला मी तुझ्यासारखा मुर्ख नाही. ) तर तुझ्या खालच्या पातळीवरच्या वैचारिक, बौद्धिक पात्रतेमुळे. जी तु इथे दिलेल्या कमेंट्स वरून समजली. तू जर लेखन सुधारून लेखन केलं असतं तर त्यातुन तुझी हीन वैचारिक पात्रता स्पष्ट झाली असती. ज्याचा वाचकांच्या मनावर विचारांवर पगडा बसला असता. म्हणून तुझी सार्वजनिक platform वर लेखन करायची लायकी नाही.

प्रथमेश प्रत्येक ट्रोल ला रीप्लाय कराल तर तुमचा आयडी उडेल. ट्रोल चे काम उकसवणे आहे. बेवेयर!

कथेच्या गुणवत्ते वरून घसरून शेवटी वैयक्तिक घाणेरड्या टीका टिप्पणी करण्यापर्यंत एवढा काय वादग्रस्त विषय ह्या कथेत आहे ?
कुणी तरी सांगेल का ??

@रिक्शाचालक - खरं सांगितलं तर झोंबलं वाटतं. झोंबूदे. पण तुझी खरच एवढी बौद्धिक कुवत नाही. आणि तुझ्या वारंवार येणाऱ्या मुर्खपणाच्या कमेंट्स वरून हे सिद्ध होतं. आणि तू माझ्या कथेच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करतो आहेस. शक्य असतं तर तुलाच हाकलला असता. आणि मुर्खा, भुरटा चोर ?? माझ्या कमेंट्स वरून तू माझ्या व्यवसायाचा अंदाज कसा लावलास ? माझ्या कमेंट्स मध्ये तुला असं काय दिसलं किंवा वाटलं ज्यामुळे तु मला भुरटा चोर म्हणतोयस ? काही लॉजिक आहे तुझ्या बोलण्याला ?

पण यावरून एक सुचलं. आपला ' रिक्शाचालक ( खरंतर रिक्षाचालक असा शब्द आहे. पण तुझ्यासारख्या मराठी व्याकरणावर सूड उगवण्याच्या हेतूने लेखन करणाऱ्याला सांगून काही उपयोग नाही म्हणा.) हे नाव बदलून ' भुरटा चोर ' ठेव. आता तुझ्यासारख्या ने स्वतः चं हे नाव ठेवणं हा बिचाऱ्या घाम गाळून स्वतःच्या कष्टाने दोन पैसे कमावणाऱ्या रिक्षाचालकांचा अपमान आहे. त्यापेक्षा आपल्या योग्यतेचं नाव ठेवलेलं बरं.

@aashu29 - बरोबर आहे तुमचं सर. > हे लिहिल्यानंतर परत रिप्लाय करण्यात काय हशिल आहे हे तुम्हीच विचार करून बघा प्रथमेश काटे .

@रिक्शाचालक - माफ करा सर, रागाच्या भरात मी विचार न करता उलट उत्तरं दिली. खरंतर रागावर ताबा ठेवून शांतपणे विचार केला असता तर सत्य परिस्थिती समजली असती. आपण mentally unstable आहात हे लक्षात आलं असतं. असो. जे झालं ते झालं. चूका शेवटी माणसांकडूनच होतात. आता एकच विनंती करतो हे वेबसाईट कमेंट्स वैगेरे सोडा आणि एखाद्या चांगल्या सायकिअॅट्रिस्टची भेट घेऊन इलाज करून घ्या. खरंतर मानसिक त्रास म्हणजे वेडेपणाच असं नाही पण आपल्या बाबतीत मात्र आहे. आपण तर अगदी पुढच्या स्टेज ला पोचलेले दिसता. आता प्रत्यक्ष वेड्यालाच आपला इलाज करून घे असं सांगण्यात अर्थ नाही म्हणा ; पण इलाज नाही. असो. टेक केअर हं.

@असामी - हो नंतर पुन्हा त्यांची कमेंट बघून परत तोल सुटला होता ; पण आता शांतपणे विचार केल्यावर खरं काय ते कळालं.

साधी सरळ कथा.
पण लेखक महोदय हातात तलवार घेऊन का उतरले ?? तुमचं सगळंच लिखाण वाचकांना आवडेलच असं नाही.
माबोवर तरी शक्यतोवर सांभाळून घेतात, प्रोत्साहन देतात.
नाही कुणाला आवडले तर पुढच्या वेळी चुका टाळण्याचा प्रयत्न करावा.
प्रत्येक वेळी आरे ला कारे करण्यात तुमचा तरी फायदा नाही.

@वीरु - प्रश्न फक्त कथा आवडण्या न आवडण्याचा नाही. चुका समजल्या तर पुढे सुधारणा करण्याचीही तयारी आहेच ; पण कथेबद्दल आपलं मत मांडताना काही तारतम्य बाळगायला हवं ना. भाषा नीट असायला हवी. कथेत उणिवा असल्या म्हणून लेखकाला हीन लेखण्याचा कुणालाही अधिकार नाही.

माबोवर तरी शक्यतोवर सांभाळून घेतात, प्रोत्साहन
देतात. >> समजलं नाही. लेखनात प्रत्येकाच्या काही न्‌ काही चुका होतातच. उणिवा राहतातच. याबाबतीत सांभाळून घेण्या न घेण्यासारखं काय ? आणि माझ्या रिप्लाय बद्दल म्हणत असाल तर माझ्या कथेवर त्यांनी अपमानकारक कमेंट केली आहे, मग मी प्रत्युत्तर देणारच. जर त्यांची कमेंट चालवून घेता येत असेल तर माझं उत्तरही चालवून घ्यायलाच लागेल. किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई करायची म्हटलं तरी दोघांवर करावी लागेल, माझ्या एकट्यावर करता येणार नाही.

नोकरी ची ऑफर म्हणजे स्मगलिंग च काम असेल >>> +१ मलाही असंच वाटलेलं..
कथा ठिक वाटली.

Submitted by प्रथमेश काटे on 11 August, 2023 - 22:16>>> आयडी उडेल हो... आवरा !

आयडी उडेल हो... आवरा ! >> फालतू सल्ले देण्या आधी मी ' वीरू ' यांना दिलेला रिप्लाय वाचा. आणि अशी कशी उडेल ? मला एक कळत नाहीये, एखादा माथेफिरू माझ्या कथेच्या कमेंट सेक्शनमध्ये स्वतः मुद्दामहून माझ्याबद्दल अपमानकारक, चुकीच्या भाषेत कमेंट्स करत आहे, त्याला काहीच तोटा नाही का ? तो कुणी व्ही आय पी आहे की काय ? मग सगळे मलाच का भीती दाखवत आहेत, किंवा माझीच शांत राहण्यासाठी समजूत घालत आहेत ? त्याला कुणीच का काही बोलत नाही ? मला ठाऊक आहे काहींचा हेतू चांगला आहे ( आवरा वैगेरे फालतू अॅटीट्यूड च्या भाषेमुळे तुम्ही मात्र त्यातले नाही हे कळतं ) पण मी काही कुणी फार अहिंसावादी, संयमी व्यक्तीमत्व नाही, माझा जर कुणी विनाकारण insult करत असेल तर मी बिलकूल सहन करणार नाही. आणि प्रत्युत्तर देणार.

Pages