याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83815
' वेड असतं.
हो असतं.
प्रेम असतं.
हो असतं.
मग मिळत का नाही?
माहिती नाही. '
तो विचार चक्रात बुडून गेला होता.
आणि शेवटी त्याने गाडी काढली.
विचार करतच त्याने गाडी काळाराम मंदिरासमोर लावली.
मंदिर बंद होत आलं होतं.
मात्र त्याला अडवण्याची कुणाची हिंमत नव्हती.
तो सरळ गाभाऱ्यात पोहोचला...
...आणि त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं...
कारण इतर वेळी नेहमी तो असाच तडक महादेवाकडे जायचा.
यावेळी त्याला राम का आठवावा?
तो सरळ ताठ मानेने रामासमोर उभा राहिला...
... त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले...
"तिला जगातलं सगळं सुख मिळू दे," एवढंच तो म्हणू शकला.
*****
"गुड मॉर्निंग..." ती त्याच्या शेजारी बसत म्हणाली.
"गुड मॉर्निंग प्राजक्ता मॅडम. बिलेटेड हॅप्पी बर्थडे..."
आज ती कॉलेजला आली होती.
"वाह. माहिती काढलीस वाटतं. उपयोग नाही रे त्याच्या काही."
"असो वा नसो, माहिती असायला हवी."
"सगळीच माहिती असणं बरोबर नाही."
"आणि सगळच माहिती असण्यात चूकही काही नाही."
"तू कधी बोलण्यात हार जात नाहीस?"
"मी फक्त एकाच गोष्टीत सगळं हरू शकतो... अगदी स्वतःलासुद्धा..."
"आणि ते काय?"
"प्रेमात..."
ती शांत बसली.
"चुकीच्या वळणावर जाऊ नकोस... तुला माझ्याकडून काहीही मिळणार नाही... ती समोर बघत म्हणाली."
"मला तुझ्याकडून काहीही नकोय प्राजक्ता."
तेवढ्यात प्रॅक्टिकलची बेल वाजली.
सर्वजण थियेटरमध्ये जमले.
आणि तो तिला बघू लागला...
...खूप सुंदर आहे ती...
ती त्याच्या समोर आली.
"तू मलाच बघत बसणार आहेस की?"
"अग नाही, मी सगळ्यांनाच बघतो. बघ ती मुलगी, किती छान नाचते आहे."
"अच्छा." ती म्हणाली.
"बाय द वे, हॅप्पी फ्रेंडशीप डे." तो म्हणाला.
"आर वी फ्रेंड्स?" ती म्हणाली.
तो वरमला.
"अजून तरी नाही मिस्टर मनीष. माझी मैत्री स्वस्त नाहीये."
त्याला हसू आलं.
"दॅट्स नाइस. कारण मीसुद्धा चीप नाहीये." तो म्हणाला.
"गुड." ती हसली.
"अजून एक प्राजक्ता. मी स्ट्रिम चेंज करतोय."
"काय झालं?" तिने विचारले.
"कारण हे डान्स वगेरे मला नाही जमणार. खरच नाही जमणार."
"अरे. माझ्याकडे बघ एकदा. मला जमत. तुला का नाही जमणार?"
"ये. असं म्हणून नकोस. एकेकाळी तुझ्या पेक्षा दुप्पट होतो मी."
"काहीही फेकू नकोस."
"एक मिनिट हं. त्याने फोन काढला, आणि एक जुना फोटो दाखवला."
"आईशपथ. अरे केवढा होतास तू?"
"मग. बघ तुझ्यासाठी काय काय केलं मी..." तो जोरजोरात हसत म्हणाला.
"बस." ती ओरडली.
"सॉरी."
थोडावेळ कुणीही काहीही बोललं नाही.
"कोणती स्ट्रिम घेशील मग?"
"माझ्यात काय कला आहे, तेच माहिती नाही."
"धन्य आहेस. बाय द वे तुझ्या तर बऱ्याच मैत्रिणी असतील ना? मग काय प्लॅन फ्रेंडशिप डेचा?" तिने विचारले.
तो थोडावेळ गप्प बसला.
"माझी लाईफ अशी नाहीये प्राजक्ता."
"म्हणजे?"
"जाऊ दे." तो शांत बसला.
"आता बोलच." ती म्हणाली
"माझ्यासाठी जी जगातली सगळ्यात सुंदर मैत्री होती, तिनेच मला सगळ्यात मोठा गील्ट दिला होता इतके दिवस."
"कशाचा"
"मैत्री, प्रेम काहीही निभावू न शकल्याचा."
"म्हणजे?"
"एक मैत्रीण होती. खूप जवळची. प्रेयसी म्हण. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं. माझी मैत्रीण, प्रेयसी किंवा भावी बायको. तीच होती."
"मग रे?"
"मग मी तिला आवडेनासा झालो. त्यात बघितलं तर मी असा वेडा. यू कान्ट इमॅजिन, मी कमीत कमी पाच सहा हजार शब्द तिच्यासाठी लिहित असेल."
"बापरे..."
"...तिचं लग्न झालेलं होतं. तिने स्ट्रीक्टली सांगितलं होतं, लग्नानंतर फोन केलास, तर सगळं संपेन. सगळं... आणि मी नेहमी म्हणायचो. आता कायमचा जातो, आता कायमचा जातो. जाऊच शकत नव्हतो ग. त्यामुळे तिच्या नजरेत खोटारडा म्हणून गणला गेलो
तिच्या नजरेत कायम उतरत गेलो. ती चिडत गेली, आणि मी पाठीचा कणा मोडत गेलो. तिच्या प्रेमात इतका वेडा, की ताकद नव्हती ग, स्वतःला प्रूव्ह करण्याची.
एके दिवशी न राहवून फोन केलाच, आणि तिचा माझ्यावरचा विश्वास कायमचा संपला... चूक माझी होती प्राजक्ता... प्रेम करताना हे विसरलो, की प्रेमात फोर्स नाही होऊ शकत. कुणालाही तुम्ही बळजबरी माझ्याशी बोल, मी किती चांगला आहे, मी तुझ्यासाठी सर्वस्व देईन, हे म्हणून नाही थांबवू शकत.
...उशिरा कळलं फार... सगळं संपल्यावर. ती कायमची गेल्यावर. प्राजक्ता, एकदा नात्यात घसरण सुरू झाली ना, तर कुणी कितीही स्ट्राँग असो, एकतर तो संपतो. नाहीतर ते नातं. प्राजक्ता, एक सांगू?"
तिने मान हलवली.
"मी खोटारडा नव्हतो ग. कधीही फसवलं नाही तिला. होतो फक्त प्रेमात...पण पश्चाताप जाळतो ग, आणि तो जाळतच राहिला...खूप वाईट काळ होता."
ती शांत राहिली.
"पुढे काय झालं?"
"वेल. आम्ही पुन्हा भेटलो, असं भेटलो की पहिल्यांदा तिला भेटतोय, आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे ती मला अजूनही तितकाच जवळचा मित्र मानत होती...तिनेच सांगितलं... गिल्ट ठेवू नकोस. पुढे जा आयुष्यात. खूप पुढे. यू कान्ट इमॅजिन, तिचा आशीर्वाद घेतला मी तुला..."
तो अचानक बोलण्याचा थांबला.
"काय झालं?"
"अग. मी किती बोलतोय. गप्प बसतो." तो गडबडीने म्हणाला.
"एक सुचवू?"
"बोल ना."
"बॅचलर इन परफॉर्मिंग आर्टस - स्क्रिप्टरायटिंग. तुझ्यासाठी बेस्ट असेल. खरच सांगतेय."
"म्हणजे लेखक बनू?"
"नक्की बन. आणि माझ्यासाठी एक लई भारी स्टोरी लिही." ती हसली.
"नक्कीच."
"आणि हो, आयुष्यात स्वतःला रीडिम करणं महत्वाचं असतं रे. स्वतः स्वतःला ओळखण महत्वाचं असतं. शेवटी तुमची मैत्री जिंकली ना? ते सगळ्यात महत्वाचं. मैत्री जिंकतेच रे."
"हो. थॅन्क्स."
"हॅपी फ्रेंडशिप डे, मनिष." ती अचानक म्हणाली.
"काय?"
"हो. हॅप्पी फ्रेंडशिप डे. जर फक्त मैत्रीसाठी इतका जळणारा मित्र असेल, तर मला हवाय यार. फक्त मित्र म्हणून... कळलं?"
"हो."
"चल बाय."
"बाय प्राजक्ता!"
ती निघाली.
तो समाधानाने तिच्याकडे बघत राहिला.
एका जगावेगळ्या मैत्रीची सुरुवात झाली होती...
...या मैत्रीने नाशिकचा इतिहास बदलणार होता...
क्रमशः
वाचतोय हां
वाचतोय हां
मानस मनीष माझं कन्फ्युजन झालंय की हे असंच आहे
शराचं लग्न झालेलं काय!!
शराचं लग्न झालेलं काय!!
मैत्री झाली आता पुढे पाहूया काय होतय ते.
Hinduism is all about pure
Hinduism is all about pure love for God and genuine compassion for all beings
https://youtube.com/shorts/WfsbZI2Mnjs?feature=share
plz माझा चॅनेल subscribe करा
plz माझा चॅनेल subscribe करा
हनुमान चालीसा
Hinduism is all about pure love for God and genuine compassion for all beings
https://youtu.be/FljMqS2pVPk