मे महिन्यातील सर्वोत्तम कविता

Submitted by Admin-team on 8 June, 2009 - 12:04

मे महिन्यातील सर्वोत्तम कविता आहे - http://www.maayboli.com/node/7912
दिवेलागणी!
दिवेलागणीला का कुणास ठाऊक पण एकलेपण दाटून येतं. जाणत्यांचं सोडाच पण लहानगं, दुपट्यातलंही ह्या वेळी किरकिरतं, कावरंबावरं होतं.... कुणी जवळ हवं वाटतं.
कशी ही वेळ? आपल्या आपल्यातच आपल्यालाच हरवणारी?
हे एकलेपण, ही हुरहुर इतकी उत्कटपणे ह्या कवितेत उतरलीये!
उत्कट असूनही काहीशा धूसर, अबोध अशा प्रतिमांच्या अनुभूतीमुळे कविता वाचकाला आत वळवत राहते... 'इथे इथे' या अत्यंत साध्या पण समर्थ अशा शब्दप्रयोगातून एका क्षणात कविता विलक्षण प्रत्ययकारी होते.
कविता संपूर्णं आयुष्याच्या दिवेलागणीला नेऊन ठेवते शेवटी. केवळ अप्रतिम.

************************************
गेल्या महिन्यात आलेल्या काही सुचनांप्रमाणे या महिन्यापासुन कविता निवड समिती तयार केली आहे. त्यात सहभागी झाल्याबद्दल दाद, रैना आणि स्लार्टी यांचे मनःपूर्वक आभार. त्याना या कामात मार्गदर्शन केल्याबद्दल वैभव जोशी आणि स्वाती आंबोळे यांचेही आभार.

या सर्वोत्तम कवितेशिवाय इतर अनेक कविता लक्षवेधी होत्या. तर निवड समितीला लक्षवेधी वाटलेल्या काही निवडक कवितांचं दालन दोन दिवसात तुमच्यासमोर सादर करु.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीकांत यांचे अभिनंदन ! Happy

कविता निवड समितीचे अनेक आभार!

श्रीकांत यांचे हार्दिक अभिनंदन! अंदाज होताच. निवड समितीचे आभार.
..............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

श्रीकांत यांचे अभिनंदन..

निवड समिती/वैभव्/स्वाती यांचे आभार..लक्षवेधी कवितांची कल्पना फारच उत्तम!

अरे वाह इथला शोध आहे तर.. श्रीकांत वेल डिसर्वींग!!!! फार सुंदर निर्मीती..

गुड जॉब.. दाद, रैना, स्लार्टी, स्वाती आणि वैभव...!!!

अभिनंदन श्रीकांतजी ! सत्याला २००% अनुमोदन !!

***********************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

श्रीकांत अतोनात अभिनंदन आणि पुढील कविता लेखनासाठी शुभेच्छा!

अभिनंदन श्रीकांत.

मनःपूर्वक अभिनंदन श्रीकांत, आणि शुभेच्छा. Happy