तिरुमला होम स्टे

Submitted by Revati1980 on 18 July, 2023 - 11:53

इमॅन्युएल?"

"येस? इमॅन्युएल हियर. कोण बोलतंय?"

" मी रेवती बेवूर . रिमेंबर मी तुझं गेस्ट हाऊस बुक केलं होतं तिरुपतीमध्ये तीन दिवसापूर्वी चार नोव्हेंबरच्या रात्रीसाठी? एअरबीएनबी ॲप वरून?"

" अं.... येस येस.. रेवती मॅडम.. राईट."

" अरे मी तुला गेल्या तीन दिवसात तीस वेळा फोन केला असेल, यु डिडन्ट रिप्लाय."

" मी बाहेर गावी गेलो होतो मॅडम. सो व्हॉट कॅन आय डू फॉर यू माम? टेल मी."

" तू काही करायचं नाहीये. एअरबीएनबी वांट्स रिव्ह्यू. मला गेस्ट हाऊस कसं वाटलं त्याबद्दल फीडबॅक पाठवा असा त्यांचा इमेल आलाय."

" ओके ओके.. करेक्ट. मग माम पाठवा ना! . आय एम शुअर तुम्ही पोजिटीव फीडबॅक द्याल."

" वोव! ग्रेट मॅन यू आर, इमॅन्युएल! मी त्या रात्री चेक इन झाले त्यावेळी गेट वर कुणीच नव्हतं. मी तुला लगेच फोन केला. तू प्रिमायसेसच्या आत मध्ये पार्किंग देतो म्हणालास पण तुझा गेटमन नाही म्हणाला. मी परत तुला फोन केला तर कार बाहेर लावावी लागेल म्हणालास. आमच्या बॅगा पण आम्हीच उचलल्या. गेस्ट हाऊस मध्ये आत शिरलो तर तू साईट वर दाखवल्या प्रमाणे खोल्यांची रचना नव्हती. एसी चालू नव्हता. फॅनला रेगुलेटर नव्हता. एका बाथरूम मध्ये गरम पाणी येतच नव्हतं. टॉवेल, चादरी, साबण काहीच नव्हतं. घरात सर्वत्र डासांचा गुं..गुं.. आवाज. एव्हरी थिंग वॉज केऑटिक. रूम सर्व्हिसला फोन केला तर फोनची तिरडी बांधायची वेळ झाली असावी असं वाटलं . मी तुला लगेच फोन केला बट यु अगेन केप्ट मम अँड पिक्ड अप आफ्टर हाफ अवर. धिस इज नॉनसेन्स, शिअर नॉनसेन्स इमॅन्युएल."

" मॅडम... लिसन टू मी मॅडम प्लीज.. मी तुम्हाला वेरी सॉरी म्हणालो होतो मॅडम. प्लीज माम्."

"डझ सेईंग सॉरी सॉल्वज् एव्हरीथींग? नाऊ लिसन मी काय लिहिणार आहे ते. आता मी तुला जे सांगितलं ते लिहिणारच आहे. शिवाय मी लिहिणार आहे, माझा नवरा जेंव्हा टॉयलेट मध्ये शिरला तेंव्हा छतावर चार पाली दिसल्या त्याला. त्याने मला हाक मारून त्या पाली दाखवल्या आणि मी किंचाळत बाहेर आले. माझ्या सासूबाईंनी विचारलं काय झालं तर मी नुसती पा.. पा.. करत थरथरत होते. सासूबाईंनी मग छताकडे बोट दाखवले. मी वरती पाहिलं तर परत पाल… तेवढ्यात माझा नवरा बाहेर आला आणि बोलला, " मी टॉयलेटचं कवर वर केलं तर, टू लिझार्ड्स वेर देअर्! मी झाकण सोडून दिलं... दण्ण! तो टॉयलेट वापरायचा प्रश्नच नव्हता". त्याच वेळी किचन मधून माझ्या आईच्या किंचाळण्याचा आवाज आला. आम्ही सगळे किचनमध्ये पळालो तर इट वॉज हर टर्न टू ट्रेंबल लाईक या लीफ इन द विंड .. . तिने किचन सिंक कडे बोट दाखवलं तर तिथे फणा काढलेला काळा निळा साप... स्नेक. कोब्रा... आणि बाजूला तडफडणारा बेडूक.... आम्ही थिजून गेलो, स्टॅचू. कीचनचे दार बाहेरून बंद केले आणि त्याच क्षणी बाहेर पडायचा निर्णय घेतला. मी फोन करत होते तुला पण तू घेतला नाहीस.व्हॉट इज धिस नॉनसेन्स इमॅन्युएल? आम्ही काय जंगल सफारी करायला आलो होतो काय? तुमचा होम स्टे तर पद्मावती मंदिराच्या एक किलोमीटर जवळ आहे असे लिहिले होते तुम्ही. इतक्या भर वस्तीत असलेला होम स्टे एवढा हॉरिफायिंग? नंतर गुगल मॅप वर चेक् केल्यावर जे पद्मावती मंदिर तुम्ही लिहिलेलं होतं ते साधं लहान देऊळ होतं. गुगल मॅप वर तुझे लोकेशन चेक केलं तर इट वोज अल्मोस्ट तिरुमला हिलच्या सुरुवातीला होतं.... काय करता तुम्ही....? होम स्टे म्हणून फसवता काय? आम्हाला रात्रीच्या वेळी दुसरं हॉटेल मिळायला किती त्रास झाला ठाऊक आहे? "

" मॅडम, एक्सट्रीमली सॉरी, आय एम अशेम्ड.... पण मॅडम एक रिक्वेस्ट करतो. निगेटिव्ह रिव्यू देऊ नका. माझ्या धंद्यावर परिणाम होईल. मी नवीन आहे मॅडम, मी सॉरी म्हणण्याशिवाय काही करू शकत नाही." ..........

" हॅलो... हॅलो अरे? याने फोन कट केला वाटतं... हॅलो..... हॅलो ........."

" तू त्याला थँक यू म्हणायला हवं होतं."

" तू टॉयलेट मध्ये चार आणि दोन सहा पाली पा हिल्या, तुझा पुढचा कार्यक्रम अर्धवटच राहिला. तरीही?"

"आपण किचन मध्ये घुसल्यावर आईने नागराजाला हात जोडले होते ते तू पाहिलंस ना? सोमवारच्या दिवशी महादेवाने दर्शन दिलं असं ती म्हणाली."

" मला म्हणाल्या कि 'मी हात जोडले आणि म्हणाले कि जा बाबा तू बाहेर, त्रास नको देऊ आम्हाला..' "
.....................................

" कसलं मेसेज आलं आता....? अरेच्या..? हे बघ, त्याने पैसे रिफंड केलेत.... हा बघ मेसेज....!!! सगळे रिफंड केलेत...! ......व्हाय डिड ही डू दॅट....? मी रिफंड कर असं काही बोलले नाही.... थांब फोन करून विचारते....."........................ हा फोन उचलत नाही....." वोव!!!!

" जाऊ दे रेव, विषय आता संपलाय. वुई गॉट अवर मनी बॅक.. फर्गेट इट .... अँड फरगीव्ह."

" मी फार बोलले का रे ? त्याच्या मनाला लागलं असेल का? "

" कान्ट से ... पण तू आता जास्त विचार करू नकोस. लिव्ह इट"

..................................................................................................................................

"इमॅन्युएल, आय ट्राईड टू कॉल यु बॅक द अदर डे, महिन्या पूर्वी. तुम्ही पूर्ण रक्कम परत केली.. मी रिफंड मागितलाच नव्हता. "

"मॅडम, तुम्हाला खूप त्रास झाला त्याबद्दल मला फार वाईट वाटलं. मी मनापासून दिलगीर आहे. तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल पूर्ण परतावा मिळायलाच पाहिजे. मॅडम, तुम्ही पुढच्या वेळी माझ्याकडेच राहायला या. मी संपूर्ण फ्लॅट आता रिनोव्हेट केला आहे, टॉयलेट सकट. मी तुमच्या इ- मेल वर फाईल पाठवत आहे आताच. सगळ्या खोल्या पेंट केल्या आहेत, नवीन पडदे, सोफा आणि नवीन एसी बसवला आहे. फ्लॅट आता एकदम लक्झरियस झालाय. तुम्ही तिरुपतीला पुन्हा याल तेव्हा माझ्याकडेच या . इट विल बी माय प्लेजर मॅडम टू वेलकम यू."

" नक्कीच. आम्ही मार्च मध्ये येणार आहोत. मी आताच तुला ऍडव्हान्स पाठवते. ओके?"
" नको मॅडम, तुम्ही येऊन राहिल्यानंतरच मी पैसे घेईन."
" नो वे... ऍडव्हान्स घेशील तरच आम्ही येऊ."
' बरं मॅडम, विल डू.. अँड थँक्स '

......

Group content visibility: 
Use group defaults

डेंजर
छतावर 4 पाली आणि कमोड मध्ये 2
मी नक्की तिथेच मेले असते हार्ट अटॅक ने.

रीफंड तेही तेलुगू व्यावसायिकांकडून? काल्पनिकच वाटावी इतकी दुर्मिळ घटना.

एक हौस म्हणून तिरुपती,तिरुमला इथे पर्यटन केलं होतं. होम स्टे नाही पण मिळेल ती जागा आणि रेस्टॉरंट. एकूण सर्व प्रकार बराच वरच्या पातळीवरचा सापडला होता.(ऑटो भाडे सोडून). पद्मावती मंदिर तिरुपती स्टेशनपासून पाच किमी दूर आहे कांची रस्त्यावर. पण मला वाटते तिथेही चांगलेच असावे.
तुमचा अनुभव फारच वाईट निघाला.

सेम माझं गोव्याला झालेलं SYL रिझोर्ट मध्ये. मी एक रात्र जमतेम काढली कशीतरी. आणि भांडून सगळे उरलेले पैसे घेऊन सकाळी 9 ला ते रिसॉर्ट सोडलं. शिवाय गूगल वर खराब रिव्ह्यू पण दिला. हे लोक पोचलेले असतात. आपण काही करू शकत नाही. लोकांना असेच फसवत राहतात. आणि बिझनेस करतात....

आगावू बुकिंग करूच नये. तिथे goto hotels असतात त्यातील एक रूम एक दिवस घ्यावी (पाचशे हजार जास्ती पडले तरी फसणे आणि वाद टळतो). मग संध्याकाळी रुम शोधून पाहून दुसरे दिवशीचे बुकिंग करावं.