विरोधी पक्षांचे कडबोळे भाजप ला पर्याय ठरू शकते का ?

Submitted by फुरोगामी on 17 July, 2023 - 09:10

२३ जून ला पाटण्यात भाजप विरोधी पक्षांनी बैठक बोलावली होती , त्या बैठकी ला काँग्रेस ,स पा , जे डी एस , टी एम सी ,राष्ट्रवादी , उ बा ठा शिवसेना आणि आप सहित छोट्या मोठया पक्षांचे प्रमुख नेते हजर होते .
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांचा भावी पंतप्रधानपदाचा चेहरा गुलदस्त्यात ठेवून भाजप ला सत्तेतून खाली कसे खेचायचे यावर चर्चा झाली , तर आप च्या केजरीवाल ने मात्र अध्यादेश विरोधात बैठकीतील पक्षांनी निषेधाचा ठराव पास करावा अपेक्षा ठेवली होती .
पण दिल्लीच्या सत्तेतून केजरीवाल ने बाहेर काढल्याचा राग प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस अजून विसरली नसल्यामुळे त्यांनी केजरीवाल ला इग्नोर केले त्यामुळे आप आणि काँग्रेस मधील कलगीतुरा अजून मिटलेला नसल्याचे दिसून आले .
त्या नंतर पश्चिम बंगाल मध्ये नेहमीप्रमाणे पंचायत समितीच्या निवडणूका हिंसग्रास्त वातावरणात पार पडल्या .
कोलकत्ता हायकोर्टाने बॅनर्जी सरकारला केंद्र सरकार कडून सी आर पी एफ च्या तुकड्या पुरेशा प्रमाणात बोलाऊन घेवून निवडणुका पार पाडायला सांगितल्या होत्या.
पण ममता ने हलगर्जीपणा दाखवल्या मुळे वेळेवर तुकड्या मतदान केंद्रात पोहोचल्या नाहीत .
परिणामी टी एम सी व्यतिरिक्त इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बळी पडले , त्यामुळे ममता चा निषेध करण्यासाठी बंगाल काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्याला म्हणजे अधीरांजन चौधरी ला आंदोलन करावे लागले .
विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडा जाऊ नये म्हणून पश्चिम बंगाल मधील या हिंसाचार युक्त निवडणुका बद्दल राष्ट्रीय काँग्रेसच्या महामहीम गांधी कुटुंबाने मौन राखणे पसंद केले हे विशेष .
अशा प्रकारच्या तडजोडी करून एकट्या भाजप विरोधात तब्बल २४ विरोधी पक्ष आज १७ जुलै ला बँगलोर मध्ये पुन्हा एकत्र येत आहेत , त्यातील ७ पक्षांचे प्रत्येकी एकच खासदार आहेत , तर चार पक्षांचा यापूर्वी एकही खासदार निवडून आलेला नाही.
एकंदरीत विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा भाजप विरोधात वज्रमूठ उगारली आहे , यशस्वी होतील की नाही हे काळच सांगेल ......

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

डाव्या विचारांच्या पक्षात ठाकरे गेले तिथेच ठाकरे संपले.
झुल उतरली की खरे रूप दिसणार च आहे.
काळजी नसावी

२०१९ च्या निवडणुकांआधी मोठा दहशतवादी हल्ला होईल असं भाकीत वर्तवलं होतं आणि ते खरं ठरलं ना? सत्यपाल मलिक त्याबद्दल काय म्हणाले? पोलिस अधिकारी दविंदर सिंग कुठे आहे सध्या?
श्रीलंकेत झालेला दहशतवादी हल्लाही आपल्या पुलवामासारखाच होता. गुप्तहेर यंत्रणांनी (जाणूनबुजून?) केलेला ढिसाळपणा.

F२० ला टरबुजा म्हणणाऱ्याचे आता ग बया असान मधील फोटो काल खूप व्हायरल झाला होता !
आत्मविश्वास हरवलेले वागणे , घमंडी आघाडी मधील नेत्यांशी बायकांसारखे तोंडावर हात ठेवून बोलणे आणि बायकासारखे टोमणे मारणे या बायकी गुणांनी नटलेला दुसऱ्यांना शारीरिक ठेवण वरून बोलतो म्हणजे आश्चर्य !

बायकी गुण यासारखे शब्द वापरून सनातन धर्मात स्त्रियांना कसं हीन लेखलं जातं याचा पुरावाच आपण देतोय हे फुरोगामी महाशयांना कळणार नाही. आता शेफाली , फेमिनिस्ट वाली झिजलेली निरर्थक टेप येईल.

अरे वा !
भरत शेठ नी अजून फेमिनिस्टगिरी चा बुरखा उतरवला नाही वाटतं , आता तर आता ग बया च समर्थन करायला लागलेत Happy

हा काय प्रकार आहे ते माहीत नव्हतं. आता ट्विटरवर शोधलं तेव्हा कळलं. भाजपायींचं फ्रस्ट्रेशन अगदीच उतू चाललं आहे. दोन दिवसांपूर्वी असंच शाम मीरा सिंगच्या मागे लागले होते.

नेताजींच्या नातवाने भाजपला सोडचिट्ठी दिली म्हणे

संघाच्या पूर्व प्रचारकांनी नवीन पक्ष स्थापन केला, भाजप हिंदुत्वापासून दूर जातोय असा आरोप त्यांनी केलाय. त्याच्या संस्थापकांनी सांभाळायला हवं. नाहीतर हरेन पंड्या व्हायचा

विरोधी पक्षांतील कडबोळ्याची एक एक काडी निसटू लागली तर !
काल १०० वर्ष जुन्या काँग्रेसच्या नेता आधी रंजन ने आम्ही २ जागांची भिक मागितलेली नाही
असे ठणकावून सांगितले !
शाब्बास रंजन साहेब !
राजपुत्रात हिम्मत नाही तुम्ही तरी
अजून ठणकावा आणि आघाडीचे १०० तुकडे करून टाका
Happy
नाही तर काय ?
सर्वात मोठ्या जुन्या पक्षाला भिकऱ्या सारखी वागणूक देणारी ममता स्वतःला कोण समजते ?
इंडिया आघाडीच्या बैठकीत गांघी माय लेका ला गोड गोड बोलून फसवते आणि बंगाल मधील लोकसभेच्या सगळ्या जागा एकटीला पाहिजे असे हि सांगते .

याच विरोधी पक्षांच्या कडबोळ्यांतील एक कमकुवत काडी म्हणजे उर्वरित राष्ट्रवादी पक्ष !
प्रभू श्री रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या राष्ट्रवादीच्या नेता आव्हाड ने राम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केलं
आणि सो मी वर उधाण आले .
त्याला अजित दादाने उर्वरित राष्ट्रवादी संपवायला सुपारी दिली असेल का ?

अधी रंजन ने बंगाल मध्ये ममता विरोधात आघाडी उघडलेली दिसते . आज इडी पथक मुस्लिम बहुल भागात मुस्लिम आमदाराच्या घरी रेड मारायला गेली असता ममता च्या गुंडांनी हल्ला केला , त्या हल्ल्या विरोधात अधि रंजन साहेब बोलले आहेत .
भविष्यात बंगाल मधील भाजपचा अजून एक चेहरा आधीरंजन ठरू शकतो .....

बंगाल मध्ये भाजपच्या नेत्यांनी बांगड्या भरल्या असाव्यात, म्हणून इतर पक्षांवर जाळी टाकू पाहतात?

मुख्य चेहरा ठरवण्याचा अडथळा,एकमत नाही. दोन मोठ्या पक्षांनी खरगे यांची निवड केली. बाकीच्या लोकांचे अजून ठरले नाही.

Pages