विरोधी पक्षांचे कडबोळे भाजप ला पर्याय ठरू शकते का ?

Submitted by फुरोगामी on 17 July, 2023 - 09:10

२३ जून ला पाटण्यात भाजप विरोधी पक्षांनी बैठक बोलावली होती , त्या बैठकी ला काँग्रेस ,स पा , जे डी एस , टी एम सी ,राष्ट्रवादी , उ बा ठा शिवसेना आणि आप सहित छोट्या मोठया पक्षांचे प्रमुख नेते हजर होते .
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांचा भावी पंतप्रधानपदाचा चेहरा गुलदस्त्यात ठेवून भाजप ला सत्तेतून खाली कसे खेचायचे यावर चर्चा झाली , तर आप च्या केजरीवाल ने मात्र अध्यादेश विरोधात बैठकीतील पक्षांनी निषेधाचा ठराव पास करावा अपेक्षा ठेवली होती .
पण दिल्लीच्या सत्तेतून केजरीवाल ने बाहेर काढल्याचा राग प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस अजून विसरली नसल्यामुळे त्यांनी केजरीवाल ला इग्नोर केले त्यामुळे आप आणि काँग्रेस मधील कलगीतुरा अजून मिटलेला नसल्याचे दिसून आले .
त्या नंतर पश्चिम बंगाल मध्ये नेहमीप्रमाणे पंचायत समितीच्या निवडणूका हिंसग्रास्त वातावरणात पार पडल्या .
कोलकत्ता हायकोर्टाने बॅनर्जी सरकारला केंद्र सरकार कडून सी आर पी एफ च्या तुकड्या पुरेशा प्रमाणात बोलाऊन घेवून निवडणुका पार पाडायला सांगितल्या होत्या.
पण ममता ने हलगर्जीपणा दाखवल्या मुळे वेळेवर तुकड्या मतदान केंद्रात पोहोचल्या नाहीत .
परिणामी टी एम सी व्यतिरिक्त इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बळी पडले , त्यामुळे ममता चा निषेध करण्यासाठी बंगाल काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्याला म्हणजे अधीरांजन चौधरी ला आंदोलन करावे लागले .
विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडा जाऊ नये म्हणून पश्चिम बंगाल मधील या हिंसाचार युक्त निवडणुका बद्दल राष्ट्रीय काँग्रेसच्या महामहीम गांधी कुटुंबाने मौन राखणे पसंद केले हे विशेष .
अशा प्रकारच्या तडजोडी करून एकट्या भाजप विरोधात तब्बल २४ विरोधी पक्ष आज १७ जुलै ला बँगलोर मध्ये पुन्हा एकत्र येत आहेत , त्यातील ७ पक्षांचे प्रत्येकी एकच खासदार आहेत , तर चार पक्षांचा यापूर्वी एकही खासदार निवडून आलेला नाही.
एकंदरीत विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा भाजप विरोधात वज्रमूठ उगारली आहे , यशस्वी होतील की नाही हे काळच सांगेल ......

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

राउतांच्या भजनी लागले की जादू उतरली, करिश्मा संपला असली स्वप्ने पडायला लागतात Wink

मोदी सरकार हे भाजपापेक्षा मोठे नाही तर तो भाजपाचा चेहरा आहे. काल त्या कडबोळ्याला एकत्र येऊन किमान त्यावर पण एकमत करता आले नाही; आणि निघाले निवडणूक जिंकायची स्वप्ने बघायला Rofl

कर्नाटकात मोदीने प्रचार केला. काय झालं?
तिथे मुख्यमंत्री कोण ते सांगितलं होतं का भाजपने?
इंडिया शायनिंगच्या फुग्याला लागलेली टाचणी विसरलात? तेव्हा सुद्धा टिना टिना करून नाचत होतात.

Modi is good listener ## कुठल्या क्षेत्रातलं काही कळत नसलं की ऐकून घ्यावं लागतं

काल तर म्हणे ठग आघाडीत INDIA नावाचे श्रेय घेण्यावरून फुल्ल स्पर्धा लागली होती .
आप ने जाहीर केले की ती कल्पना त्यांची होती , मग frustrated ममता कशी गप्प बसेल ?
तिच्या पक्षाच्या वतीने देखील जाहीर केले India नाव सुचवण्याची आयडिया त्यांचीच होती .
मग इतकी मोठी ठग आघाडी पूर्णत्वास आणणारी काँग्रेस गप्प बसेल याची आपण कल्पना करू शकतो का ?
काँग्रेसची प्रवक्ती श्रीनेत ने देखील सांगितले की ती सुपर आयडिया राहुलचीच होती .
जनते समोर राहुल ला बुद्धिमान नेता जाहीर करण्याची संधी तिच्या सारखे पगारी नोकर कसे सोडतील ?

विरोधी पक्षांचा करता तसा अभ्यास स्वतःच्या पक्षाचाही करा.## ते मोदीला follow करतात. दुसऱ्याचं वाकुन पहायचं असतं

भाजप आघाडीत एक ही खासदार नसलेले पक्ष जास्त आहेत पण भाजप आणि इतर पक्षांचे मिळून सध्या ३४० वर लोकसभा खासदार आहेत .
तर काँग्रेस आघाडीत सगळे मिळून १४९ , थोडक्यात ऊपा आघाडीला अजून खूप मोठ्ठा पल्ला गाठायचा आहे.

इंडिया आघाडीत काँग्रेस ४९
टी एम सी २३
डी एम के ३४
आप ११
आणि जनता दल १६
हे मुख्य पक्ष पंतप्रधानपदासाठी दावेदार असणार .
जर का ही आघाडी जिंकली की भारताचे वाटोळे इच्छिणारी
चीन धार्जिण गँग जाम खुश होइल , कारण ना भूतो ना भविष्याती रस्सीखेच होईल.....

भाजपचे एकट्याचे ३०३ खासदार. सहयोगी मिळून ३४०. Rofl

तरीही आणखी ३८ पक्षांची मदत हवी. त्यातला एक तर आता काही दिवसांपूर्वी स्थापन झालाय Lol

आणि हे लेखात लिहितात एकट्या भाजपविरोधात. मोदी म्हणतो मै अकेला. स्वतःचेच दात स्वतःच्याच घशात गेलं की कसं वाटतं? तुम्हांला वरचेवर अनुभव येतो ना? राकॉच्या ७०००० करोडच्या घोटाळ्यावरून रेकून बोलायचं आणि तीन दिवसांनी त्याला उपमुख्यमंत्री करायचं!

INDIA आघाडी जिंकेल की नाही हे माहित नाही, पण ती जिंकावी असे मात्र मनापासून वाटते. मी राहूल भक्त नाही, तोही माणूसच आहे, मसीहा वगैरे नाही. राहुल आल्यावर यंव होईल आणी त्यंव होईल असे छातीठोक दावे मी करणार नाही. मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला व कच्चे तेल महागले तर पेट्रोल महाग होणारच, मग ते मोदी असोत किंवा राहूल. पण राहूल narcissistic खोटारडे नाहीत ही एक मोठी जमेची बाजू आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे विविध संस्था व स्तंभ यांची चेक्स अँड बॅलन्सेस ची एक व्यवस्था आहे ती तरी रिस्टोअर होईल. टीव्ही अँकर्स सरकार वर न घाबरता टीका करतील. पी एम ओ मधून आलेल्या फोनला घाबरणार नाहीत. अमक्या मशीदीत सापडलेला फव्वारा वगैरे सोडून बेरोजगारी, महागाई अशा विषयावर डिबेट करतील. गुजरात मधली न्यायलये मॅनेज करून आपल्याला अनुकुल निकाल आणणे बंद होईल. पेट्रोल , डॉलर यांचे भाव वाढले तर सेलिब्रिटी लोक ट्वीटर वर न घाबरता विनोद करतील. संसदेत राजदंड आणणे, दलित महिलांना समारंभात न येऊ देणे, असले रिग्रेसिव्ह प्रकार बंद होईल. बलात्कारी लोकांना निदान हारतुरे देऊ नयेत इतके तारतम्य पाळले जाईल.

काही काही पिक्चर इंटर्व्हलपर्यंत बरे आणि जरा सेन्सिबल असतात पण इंटर्व्हलनंतर अगदीच वाहवत जातात आणि फसतात तशी ही वरची पोस्ट आहे Wink

विकु,
इतर सगळं राहू द्या, आपल्या पोराबाळांना हवं ते खायचं ल्यायचं आणि प्रेम केलं त्याच्या/तिच्याशी लग्न करायचं स्वातंत्र्य.
माफक दरात शिक्षण घेऊन स्वतःची प्रगती साधायची संधी, अन मोकाट नफेखोरी करत लूटमार करणार्‍या कॉर्पोरेट्सवर लगाम इतकं झाली की मला पुरे आहे.

काही काही पिक्चर इंटर्व्हलपर्यंत बरे आणि जरा सेन्सिबल असतात पण इंटर्व्हलनंतर अगदीच वाहवत जातात आणि फसतात तशी ही वरची पोस्ट आहे >>>>>>>
चुंबक ला चुंबकच खेचते म्हणून
ईद बद्दल मुस्लिमांना शुभेच्छा आणि
रामनवमी बद्दल हिंदू ना दम देणाऱ्या frustrated ममता बद्दल त्यांचा सॉफ्ट कॉर्नर असतो यातच सर्व आले .

बलात्कार्‍यांना हारतुरे द्यायचे नाहीत म्हटल्यावर राग आलेला दिसतोय.
त्याची पुढची एडिशन ब्राह्मणाने तोंडावर मुतलं तर काय झालं ही सुद्धा आली आहे. ही प्रगती खुंटलेली कशी चालेल?

पुरोगामी आणि bjp जे सांगत असतात तो हिंदू धर्म असेल आणि ते हिंदुत्व असेल .
तर करोडो हिंदू असले हिंदुत्व आणि हिंदू धर्म ह्याचा एक दिवस त्याग करतील
गरीब,शेतकरी,महिला , ह्यांना न्याय देणे हे हिंदू आणि हिंदुत्व मध्ये येत नसेल ..
तर कशाला हवं आहे असले हिंदुत्व.

आपण सर्वांनी वर्गणी काढून शे दीडशे एनाराय लोकांना येण्याजाण्याचा खर्च च वातड चिवडा व कडक लाडू या बोलीवर मणीपूरला पाठवू यात का? निदान तिथे 'मोदी मोदी' ऐकून महामहिम तिथे जातील.

खरे तर ही घटना फारच डिस्टर्बिंग आहे, उपरोधही करावासा वाटत नाही. कुठे दंगलीत उतरून लोकांना शांत करणारे गांधी नेहेरू आणी कुठे जगभर फिरून ग्लोइंग स्किन चे कौतुक करून घेणारे महामहिम !

जिथे रामनवमीची परंपरा नाही त्या बंगालात बाहेरून गुंड आणून रामनवमीच्या नावाने हिंसाचार करायचा भाजपायींचा डाव ममता बॅनर्जींनी आधीच ओळखला. ज्या ज्या राज्यांत भाजपची सरकारं आहेत तिथे रामनवमी, हनुमान जयंतीच्या नावाने ज्या मिरवणुका निघतात त्यात धार्मिक भाव नावालाही नसतो.
महाराष्ट्रात ईडी सरकार आल्याबरोबर हे प्रकार सुरू झाले. अगदी महाशिवरात्रीलाही. कोल्हापुरात एका दर्ग्यावर रॉकेट्स सोडली गेली. आणि ती पडल्यावर जल्लोष.
भाजपने हिंदूंच्या सणांची वाट लावली आहे.

येण्याजाण्याचा खर्च च वातड चिवडा व कडक लाडू या बोलीवर मणीपूरला पाठवू यात का?
<<
जाताना व्हाया यूपी खुश्कीच्या मार्गाने पाठवू. कावडिये भेटले की काळ्या टोप्यांना खर्चापानी पण आपोआप मिळेल जरा. दोनो तरफ से प्रॉफिट.

Deborah M Tungnung
@DeborahTungnung
This morning, we woke up to a very distressing & disturbing video of how Meitei Men paraded 2 Kuki-Zo women n@ked & later r@ped them in the field..

इतकं होऊनही केंद्राला काही हस्तक्षेप करावासा का वाटत नाहीये??
तिथलं राज्य सरकार काय करतं आहे?
शी!

भाजपच्या टोळीत आणखी एक सामील देवेगौडांचा जनता दल सेक्युलर.

वरच्या लेखात खालून तिसर्‍या ओळीत एकट्या भाजप हे ठळक अक्षरांत आहे.
Rofl

२०१४ साली भाजपने मायक्रो लेव्हलच्या गटांचा विचार करून आघाडी केली. थोडा थोडा नजाधार असलेल्यांची मोळी बांधली.याचा त्यांना फायदा झाला. मोदी लहर चा प्रत्यक्षात किती फायदा झाला याबद्दल नक्की सांगता येत नाही. युथ व अन्य असा ५% शिफ्ट असेल असे समजू. तरी पण ४२ ते ४५ % अशी मतांची ट्क्केवारी अनेक राज्यात राहिली.

हे छोटे छोटे मतप्रवाह भाजपाचे पारंपारिक व्होटर नाहीत. भाजपच्या हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही. आपल्या महाराष्ट्राचे उदाहरण घेतले तर महाराष्ट्रात मराठा डॉमिनन्स आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा डॉमिनन्स आहे. त्यामुळे या भागात अल्पसंख्य असलेल्या अन्य जाती जमातींना सत्तेचा फायदा होत नाही उलट सत्तेचा जाच होतो. पश्चिम महाराष्ट्राबाहेर कुणवी कार्ड खेळले जाते. कुणबी मराठा संघ अशा युक्त्यांद्वारे महाराष्ट्रात एकाच जातीकडे सत्ता ठेवली जाते.

अन्य जातींचे संघटन उभे राहणार नाही, पक्ष उभे राहणार नाहीत याकडे लक्ष दिले जाते. उभे राहिलेच तर आधी माघार घेण्यासाटी आमिषे दाखवली जातात. नोकरी, पैसे किंवा पद दिले जाते. नाही बधले तर दम दाटी केली जाते. खोटे गुन्हे टाकले जातात. त्रास दिला जातो. त्याला पुरून जर नेटाने पक्ष उभा केला तर निवडून आल्यावर आमदार , खासदार फोडाफोडी केली जाते. किंवा बदनामी केली जाते.

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी असे अनुभव अनेकदा सांगितलेले आहेत. मराठ्यांनंतर धनगर , माळी आणि वंजारी हे आपापल्या पॉकेटस मधे संख्येने मोठे समूह आहेत. पण बहुमताच्या लोकशाहीत हे कमी पडत. मराठ्यांना दलित आणि मुस्लिम अशी जोड मिळाली कि त्यांच्याकडे निर्विवाद सत्ता येते. पण या समूहांचा उपयोग ते फक्त सत्ता मिळवण्यासाठी करतात. त्यांना सनमानजनक वाटा कधीच देत नाहीत. त्या त्या समाजाचा एखादा उठ म्हटला कि उठणारा घरगडी लाचार सांगकाम्या माणूस नेता म्हणून उभा करायचा आणि तुम्हालाही मंत्रीपद असे ढोल पिटले कि काम भागत होते.

आता मात्र लोकांच्या लक्षात यायला लागलेय कि ही बुजगावणी आपल्या कामाची नाहीत. पोलीस सुद्धा उभे करत नाहीत. ते ज्यांच्या हुकमाचे ताबेदार आहेत ते जातीचे हितसंबंध जपतात. मुस्लीम आणि दलित यांची २२% मतं घेतली तर त्या प्रमाणात सत्तेत सहभाग असायला हवा. तो कधीच नसतो.

त्या पक्षांचे स्वतंत्र नेतृत्व यांना यासाठीच नको असते.
भाजपने खूप पूर्वी यातल्या खाचाखोचा हेरून माधव- म फॉर्म्यल्या प्रमाणे माळी, धनगर, वंजारी यांच्यात काम सुरू केले. त्या वेळी हे समूह सत्तेत नसल्याने ते मुंडे , खडसे यांच्याकडे आकर्षित झाले. त्यामुळे त्यांना ग्रामपंचायती, जिल्हा परीषदा यात सत्ता मिळू लागली. त्यांचा विकास होऊ लागला. राज्याची सत्ता मिळेल असे काही त्यांना कधी वाटले नव्हते.

पन शरद पवारांचे काँग्रेसला संपवण्याचे राजकारण असल्याने त्यांनी सेना भाजपचे उमेदवार निवडून आणून अपक्षांचे बळ पुरवल्याने पहिल्यांदा सेना भाजपचे सरकार आले. सेना भाजपचे सरकार आल्यावर सत्तेवाचून न राहणारे मराठे या पर्यायाकडे गांभीर्याने बघू लागले. त्यातूनच अनेक मराठे शिवसेनेत आणि भाजपात त्या वेळी गेले.

ते पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीत परतले. पण स्थानिक पातळीवर त्यांच्या घरातले उमेदवार भाजप सेनेत राहिले.
पुढे भाजप सेनेने पण मराठा आकर्षित होऊ शकतात हे पाहून माधव फॉर्म्युला पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेरच ठेवला आणि प महाराष्ट्रात असंतुष्ट मराठ्यांना उमेदवारी दिली. आता गावात जे माधव असंतुष्ट असल्याने भाजप सेनेत गेले त्यांना मराठा उमेदवारासाठी काम करावे लागले. पण आता मराठा उमेदवार आपले ऐकणार म्हणून ते करत राहिले आजही करतात.

यातून दलित + मुस्लीम मतपेढीची गरज वाटेनाशी झाली. माधव + मराठा असा माधवम हा नवीन फॉर्म्युला आला. यातून प महाराष्ट्रात देखील भाजप सेना निवडून यायला लागली.

इतर राज्यात सुद्धा कमी अधिक फरकाने अशाच पद्धतीने भाजप वाढली.
अमित शहांनी २०१४ ला फाईन ट्युनिंग केले. राज्याराज्याचा अभ्यास करून युती केली. महाराष्ट्रात धनगरांचा एक गट काँग्रेस सोबत होता. शहांनी जानकरांशी युती केल्याने १००% धनगर भाजपसोबत गेला. बारामती हा धनगर बहुल मतदार संघ आहे. इथे शरद पवारांना धनगरांना सपोर्ट केल्याने पवारांचे नेतृत्व आहे. पण धनगर भाजपसोबत गेल्याने सुप्रिया सुळे निवडून येतील का अशी भीती निर्माण झाली होती. जानकरांना भरपूर मतं मिळाली. पण मोदींनी बारामतीत सभा घेऊ नये अशी व्यवस्था झाल्याने सुळे निसटत्या फरकाने निवडून आल्या. यात अजितदादांचे कौशल्य सुद्धा पणाला लागले होते.

शरद पवारांचे काँग्रेसला संपवण्याचे राजकारण असल्याने त्यांनी सेना भाजपचे उमेदवार निवडून आणून अपक्षांचे बळ पुरवल्याने पहिल्यांदा सेना भाजपचे सरकार आले
>>>>> बरं

धनगर भाजपसोबत गेल्याने सुप्रिया सुळे निवडून येतील का अशी भीती निर्माण झाली होती. जानकरांना भरपूर मतं मिळाली. पण मोदींनी बारामतीत सभा घेऊ नये अशी व्यवस्था झाल्याने सुळे निसटत्या फरकाने निवडून आल्या.
>>>>> जवळपास दीड लाखाहून जास्त मताधिक्य आणि तरीही निसटता विजय... बरं बरं

बाकी चालू द्या

दीड लाख मताधिक्य कसे काय झाले ?

२०१४ मधे राष्ट्रवादीकडे असलेले मताधिक्य

NCP Supriya Sadanand Sule 5,21,562
RSPS Mahadev Jagannath Jankar 4,51,84

२००९ मधे राष्ट्रवादीकडे असलेले मताधिक्य

NCP Supriya Sule 4,87,827
BJP Kanta Nalawade 1,50,996

२००४ मधे राष्ट्रवादीकडे असलेले मताधिक्य
NCP Sharad Pawar 6,34,555
BJP Prithviraj Sahebrao Jachak 2,11,580

१९८४ साली राजीव गांधींच्या लाटेतही शरद पवार देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले होते. त्यांनी पाच लाखाचे मताधिक्य घेतले होते. २०१४ मधे विरोधी पक्षाला मिळालेली मतं पाहता हे मताधिक्य कमी झालेलं नाही, परिस्थिती चिंताजनक नाही का ? मी म्हटलंय कि अजित पवारांचे कौशल्य म्हणून सुळे निवडून आल्या. ते कौशल्य काय हे सांगत नाही. पण त्याचे काही व्हिडीओज व्हायरल झालेले होते. कुठे रस्ते बंद, कुठे पाटाचे पाणी बंद करून मतदानाला भाग पाडले गेले.

असो. बरं या शब्दाच्या पुढे दोन ओळी अर्थबोध होतील अशा लिहील्या तर स्वागत आहे.
पवारांनी सेना भाजपला बळ पुरवल याच्याशी सहमत आहात अशा अर्थाने बरं म्हटलंय असा अर्थ घेतो.

आता विरोधी पक्षांचं सरकार येणार. संशयित,आरोपी यांना सरळ फाशीची शिक्षा परस्पर ठोठावणार . न्यायालय वगैरे नकोच.
एका हिंदी सिनेमा नटाचा खटला गेली वीस वर्षे चालू आहे.

२०१९ मध्ये सुळेना ६,८६,७१४ तर राहुल कूल ला ५,३०,९४० मते पडली होती , पुन्हा एक दीड लाख मतांचा फरक पडला होता .
पण त्यावेळी राष्ट्रवादीची शकले पडलेली नव्हती , पुढील लोकसभा निवडणुकीत मध्ये बारामती मध्ये उलथा पालथ होऊ शकते .

Pages