समृद्धी महामार्ग

Submitted by जावेद_खान on 8 July, 2023 - 01:31

सात महिन्यांत 1000 अपघात आणि 100 हून अधिक मृत्यू. नक्की कुठे काय चुकले आहे समृद्धी महामार्गावर? टायर फुटणे, रस्ता संमोहन, वाहन चालकाने केलेल्या चुका ही कारणं गृहीत धरली तरी इतक्या कमी कालावधीत इतके जास्त अपघात होणे हे जरा जास्तच होतंय. ह्या महामार्गाला बांधताना पूर्ण नियोजन करण्यात रस्ते महामंडळाला अपयश आले काय?

Group content visibility: 
Use group defaults

मी माझ्या कार मध्ये हा प्रयोग करून बघितला आहे. माझ्या कार मध्ये टायर प्रेशर दाखवणारी टीपीएस सिस्टम आहे. साध्या हवेच प्रेशर साधारण 50 किमी गेल्यावर जितक वाढते तितकेच नायट्रोजन चे देखील वाढते. >>>>>>>
याच्या अगदी उलट माझा अनुभव आहे .
हाय वे ला लाँग रनिंग जाण्याची वेळ माझ्यावर येण्याची शक्यता कमी असल्या मुळे मी नायट्रोजन भरण्याच्या नादी लागलो नाही , साधीच हवा भरायचो .
भरणारे ३२ सांगायचे आणि गाडी मधील यंत्रणा ३८ /४२ दाखवायची .
यावर उपाय म्हणून पंपावरील आधुनिक मशीन द्वारे हवा चेक केली की ती ४२ पर्यंत दाखवायची , गाडीमधील यंत्रणा पण तेच दाखवायची .
थोडक्यात हाय वे वर प्रवास करणाऱ्यांनी हातात मीटर घेवून हवा चेक करणे / भरणे करणाऱ्याकडे दुर्लक्ष करून सरळ पंपावरील अत्याधुनिक मशिनद्वारे हवा भरावी .
दुसरी गोष्ट , साध्या हवेच्या तुलनेत नायट्रोजन भरलेली केंव्हाही श्रेष्ठच . साध्या हवेचा प्रेशर आपोआप कमी जास्त होत असतो तर नायट्रोजन तुमची गाडी पंधरा दिवस जागेवरच उभी असेल तरीही सेमच असतो
या ऐकीव माहितीमुळे मी देखील गाडीत नायट्रोजन भरून घेतला , त्या नंतर महिन्याभरात पुण्याहून मुंबईला जाण्याचा योग आला असता दोनशे किमी च्या रनींग मध्ये चार ही टायर मधील हवा एखादा पॉइंट इकडे तिकडे झालेली दिसायची ,ते ही माझा चुलत भाऊ गाडीचा स्पीड सतत स्पीड १०० च्या पुढेच ठेवत असताना .....

म्हणून असं वाटतं ५ ते २५ लाखाच्या गाड्या फिरवणाऱ्यानी दोनशे रुपयकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालण्यात काय हशील ?

ही नवीन अनुभव माहिती आवडली. अजून तीन चार लोकांनी असेच करून खात्री करावी.
हवा भरल्यावर हाताने दणकून टणकपणा पाहावा. नंतर तीस किमी अंतर हायवेवर वेगात आणि अतिवेगात गेल्यावर हाताने दणकून टणकपणा बघावा. लवकरच हाताला टायरची नाडी समजू लागेल आणि प्रेशराचा अंदाज येईल. मग तीस किमीनंतर विश्रांती घेऊन पाहावे. कुठल्या यंत्राची गरज नाही लागणार.

टायरच्या हवेचे प्रेशर तपासण्यासाठी गाडीत डिजिटल प्रेशर गेज ठेवावे. शंका आल्यास टायरची हवा तपासता येते. Analog पेक्षा digital उपकरण हवेचा दाब अचूक दर्शवते. हजार दीड हजारात चांगले उपकरण मिळते.

हवा भरल्यावर हाताने दणकून टणकपणा पाहावा. नंतर तीस किमी अंतर हायवेवर वेगात आणि अतिवेगात गेल्यावर हाताने दणकून टणकपणा बघावा. >>> मस्त आयडिया आहे. 30 किमी गेल्यावर गाडी न थांबवता शेजारी बसलेल्या व्यक्तीस स्टिअरिंग पकडायला लावायचा आणि आपण चालत्या गाडीतच गॉगल घालून खिडकीतून बाहेर पडावे आणि बोनेटवर आडवे उताणे होऊन टायरला हात लावून हवा चेक करायची. आपल्याला असं करताना कोणी पाहिलं की दोन बोटं त्याच्या डोळ्यांकडे रोखून आपल्या डोळ्यात भरल्यासारखं करतात तसं करावं. मस्त मजा येईल.

अजून एक:
रात्री निघून पहाटे देव दर्शन, लगेच त्याच दिवशी परती प्रवास किंवा लग्न कार्य (ज्यात चालकाचा स्वतःचा जवळचा सहभाग, नातेवाईक भेटी, जागरण, नाच गाणं आहे) आणि नंतर ऑफिस गाठायला लांबचा प्रवास हे प्रकार करायचा आग्रह घरात एकच ड्राईव्ह करणारा मनुष्य असेल तर घरच्यांनीही धरू नये.एखादं वेळी पाहुण्या कडे 4 तास माणूस
गप्पा न मारता झोपून वाईटपणा आला तरी चालेल, पण विश्रांती होऊनच परतीची वाट धरली पाहिजे.शिवाय लग्नाचं गोडाचं जेवण खाऊन लगेच प्रवासाला, बाकी लोक डुलक्या घेतायत आणि तेच जेवण जेवलेला ड्रायव्हर एकटा लॉंग ड्राईव्ह करतोय हेही नको.
एकंदर ड्रायव्हिंग हे खोल पाण्यात पोहण्या इतकंच जबाबदारी चं काम आहे असं मानून अवधान ठेवलं जावं.
सध्या मागच्या वर्षात पेपरमध्ये आलेले बरेच अपघात देव दर्शनाहून परतताना किंवा लग्नाच्या वऱ्हाडाला झालेयत.

बेशिस्तपणा: विनाकारण लेन्स चेंज करणे. या हायवेला सर्वात डावीकडील बाजू कमी वेगाच्या वाहनांसाठी, ट्रक्ससाठी आहे, मधली लेन कार्स साठी आणि उजवी लेन ओव्हरटेकसाठी, पण अनेक लोक कायम उजव्या लेनने चालतात, अत्यंत मूर्खपणा. अनेकदा ट्रक गप्पा मारत असल्यासारखे दोन्ही लेन्स अडवतात. अश्या लोकांचे लायसन्स काढून घ्यायला हवे.
Submitted by अजिंक्यराव पाटील on 8 July, 2023 - 22:01

अगदी हेच लिहायला आलो होतो , ४०/५० च्या वेगाने जाणारे पण उजव्या लेन मधूनच जातात, महामार्ग सोडाच शहरात पण चार लेन रस्ता असेल तर सगळ्यांना उजव्या लेन चीच घाई असते, त्यांची नाळ उजव्या लेनमध्ये पुरलेली असावी बहुतेक.
वेग इतका असतो कि जणू घरी कुणाची तिरडी सजली आहे आणि यांनी मडके धरल्या शिवाय तिरडी उठणार नाही,

वाहतूक पोलीस याकडे कमाईचे अजून एक साधन म्हणून पाहत नाहीत तो पर्यंत असेच चालणार.

हेल्मेट न घालण्यासाठी पळवाट खराब रस्ते, बेफाम वेगामुळे जरी अपघात वाढले कि कारण चांगले रस्ते असा दुटप्पीपणा आहे सगळा

मानवी चूक हे जवळ जवळ प्रतेक अपघात च्य मागचे महत्वाचे कारण असते.
आता विमानाचे अपघात पण मानवी चुकांमुळे होवू लागले आहेत.
विकृत,संयम नसलेली लोक वाहन चालक असतील तर अपघात होणारच होणार.
रस्त्यांची चुकीची रचना, गाडी मधील यांत्रिक दोष हे बाकी फॅक्टर पण अपघात स कारणीभूत असतात पण...
त्याचे प्रमाण कमी आहे.
प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यातील प्रसंगाचे स्मरण केले तर .लक्षात येईल
आपल्या आयुष्यात पण असा एक प्रसंग असतो च जो आपल्या मूर्ख पना मुळे अपघात घडण्याचे सर्व योग जुळून आले होते.
पण नशीब चांगले म्हणून थोडक्यात अपघात होण्या पासून आपण वाचलो आहे.

जायचं त्यांना वेगाने जाऊ द्या आपण चालत जावं. डुलतडुलत??
खरं म्हणजे संगणक प्रोग्रामिंग वाले फ्लो डायग्राम काढतात तसा घरातल्या मुलांना काढायला सांगावा प्रवासाचा. तेच चुका दाखवतील सर्वांना.
इथून इथे जायचं, ....इतके तास
विश्रांती..... इतकी
कार्यक्रम ....इतका वेळ
दुसरे दिवशी निघणे .....
डायग्राम बघितल्यावर लगेच कळेल काय घोळ आहे तो.
ड्रायवर आणि गाडीला विश्रांती ठेवली आहे का.

तुम्ही किती ही नियमात,योग्य वेग राखून गाडी चालवा.
विकृत,मनोरुग्ण व्यक्ती दुसऱ्या गाडी च ड्रायव्हर असेल तर तुम्हाला येवून तो धडकणार च.

म्हणून तर मी एकच पॉइंट सारखा लिहीत आहे.
Licence देताना .
डोळ्यात दोष नाही ना.
व्यक्ती मनोरुग्ण,विकृत,संयम नसलेला नाही ना.
हे आधुनिक पद्धतीने चेक करा .
अपघात चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल.

गाडी कोणता ही योग्य अवयव असणारा प्राणी चालवेल.
गाडी चालवता येते की नाही.
त्या टेस्ट ला सर्वात खालच्या पातळीवर ठेवले पाहिजे.
. नजर ठीक आहे की नाही.
हे खूप महत्त्वाचे आहे.
नजर ठीक नसेल तर अंधारात.
Head lights वर.
रस्ता कोणता,divider कोणता, वळण कुठे आहे.
रस्त्याचे बाजू चे टोक कुठे आहे .
हेच चालकांना समजत नाही..
जे काही ते गाडी चालवत असतात ते फक्त अंदाज वर.
परत तोच पॉइंट..
ट्रॅफिक झाले आहे.
तोड lane.
वेगात पुढे जायचे आहे.
तोड lane.
गाडी ठराविक वेगात च कंट्रोल होते अचानक काही
अपेक्षा नसलेला अडथळा आला तर.
वेग जास्त असेल आणि अचानक अपेक्षा नसलेला अडथळा आला तर.
देव जरी गाडी चालवत असेल तरी कंट्रोल करू शकत नाही.
एकादी क्रिया घडण्यासाठी काही वेळ लागतो.
जादू तिथे चालत नाही.

गाडी chalavnara व्यक्ती मानसिक दृष्ट्या निरोगी हवा.
( ह्या मध्ये नशेत नसावा हे पण अपेक्षित आहे)
झोप पूर्ण न झाल्या मुळे मेंदू निर्णय घेण्यास पूर्णतः सक्षम नसतो.
आणि .
माणसाची जशी काही अंतिम क्षमता असते धावण्याची तशी गाडी ची पण असते.
निर्जीव असेल तरी.
त्या क्षमते पेक्षा जास्त वेळ धावला.
तर माणूस ❤️ अटॅक नी मरू शकतो.
गाडी ची यंत्रणा बंद पडू शकते.
ह्या सर्व टेस्ट काटेकोर पने केल्या तर भारतातील .
७०% टक्के तरी चालक कोणतीच गाडी चालविण्यास योग्य नाहीत .
हे सिद्ध होईल.

हायवे वर वाहन चालवताना घ्यायची काळजी असा एक धागा होता. सापडत नाही. त्यात बहुधा हे मुद्दे आलेले आहेत.

एखाद्या अपघाताचे राजकारण व्हायला नको. ते पूर्वीपासून होत आलेले असल्याने आता बदला घ्यायचा अशाने मग ते कधीच थांबणार नाही. जिथे सरकार जबाबदार असेल तिथे नक्कीच त्यांना धारेवर धरावे. आताच्या अपघातात ड्रायव्हरच्या रक्तात अल्कोहोलचे अंश सापडले अशा बातम्या आहेत.

या केस मधे

१. समृद्धी हायवेवर जाताना नायट्रोजन भरलाय कि नाही हे जसे चेक करतात तसे हायवे ला लागताना ड्रायव्हरने अक्लोहोल घेतलेय कि नाही याची सोपी टेस्ट का घेतली नाही ? माझ्या माहितीप्रमाणे ती घेतच नाहीत.

२. इतक्या लांब अंतराचे हायवे १५० किमी वेगासाठी बनवायचे असतील तर वाहनांचे टायर्स टिकणार का याचा विचार करणे अशक्य नव्हतडिझाईअशा लांबच्या पण वेगवान रस्त्यांसाठी सिमेंटचा वापर करू नये. टार रोड किंवा अन्य पर्यायाचा वापर करावा.

३. गडकरी जिथे तिथे दिली जयपूर दोन तास, जम्मू दिल्ली दोन तास, दिल्ली डेहराडून दोन तास असे वारंवार सांगत आहेत. मुंबई नागपूर पाच तासात जाता येणार असे ते सांगतात. म्हणजे या वेगाने जा ही जाहीरातच ते करताहेत. या वेगाने गेल्यावर इतर अपघातात टायर फुटलेत त्याची जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी होती. उलट टायर फुटल्याच्या अपघातांची एव्हढी चर्चा झाली नाही आणि त्यानंतरही गडकरी तेच तेच सांगत राहीले. यावर विरोधी पक्षांनीही कधी ब्र उच्चारला नाही. त्याची कारणे आताच्या सत्तांतरात दिसली. सरकारला अचूक कारणांसाठी धारेवर धरण्यात विरोधी पक्षाला इंटरेस्ट नसून सत्तेत कसे जाता येईल इतकाच इंटरेस्ट असल्याचे २०१४ नंतर वारंवार दिसले आहे.

त्यामुळे अशा अपघातांनंतर कारणांवर योग्य ती उपाययोजना होईल का ?

सहा महिन्यांत ६,४३७ जणांचा मृत्यू; राज्यात अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक

अतिवेगाने वाहने चालवणे, वाहनांची खराब स्थिती ही अपघातांची कारणॅ - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे संयुक्त कार्यकारी संचालक अनिल कुमार गायकवाड

यात नायट्रोजन, हायवे संमोहन इ. मुद्द्यांवर प्रश्नोत्तरे आहेत.

<< १. समृद्धी हायवेवर जाताना नायट्रोजन भरलाय कि नाही हे जसे चेक करतात तसे हायवे ला लागताना ड्रायव्हरने अक्लोहोल घेतलेय कि नाही याची सोपी टेस्ट का घेतली नाही ? माझ्या माहितीप्रमाणे ती घेतच नाहीत. >>

----- एव्हढ्या मोठ्या प्रमाणांत वाहनचालकांची तपासणी करणे हे भ्रष्टाचारासाठी नवे कारण मिळायला नको.
गरज ही शोधाची जननी आहे. तळीराम यातूनही मार्ग काढतील... हाय वेला गाडी लागल्यावर हाय होण्यासाठी पाण्याची बाटली ( water bottle) तोंडाला लावतील. Happy

मला माहित नाही म्हणून विचारत आहे, या मार्गावर गाडीच्या टायर मधे नायट्रोजन भरला आहे /नाही याच्या तपासण्या होतात?

<< गडकरी जिथे तिथे दिली जयपूर दोन तास, जम्मू दिल्ली दोन तास, दिल्ली डेहराडून दोन तास असे वारंवार सांगत आहेत. मुंबई नागपूर पाच तासात जाता येणार असे ते सांगतात. >>
----- दोन शहरांना जोडणे हे महत्वाचे आहे. वेग आला, कमी वेळांत गंतव्यस्थानी पोहोचणे आले, पण सोबत वाढलेली रिस्क पण आली आहे. वेगवान आयुष्य म्हणजेच विकास असा समज पसरविणे चुकीचे आहे.

थोडेसे निगडित व थोडेसे अवांतर असे ....
विमानात जसे उंची कमी झाल्यावर सूचना मिळते तशी सूचना देणारी यंत्रणा गाड्यांमध्ये करता येईल का? म्हणजे पुढच्या गाडीच्या खूप जवळ गेल्यावर, चालकाला पेंग येऊन डोळे मिटायला लागल्यावर, चाके गरम झाल्यावर, इत्यादी.
तसेच प्रवासी वाहनामध्ये स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा असावी.
चालक विरहित गाड्यांचा वापरामुळे अपघात बरेच कमी होतील असे वाटते. मानवी चुकांमुळे होणारे अपघात टळतील कि ज्याचा अपघातांमध्ये खूप मोठा वाटा आहे. कुठेसे वाचल्याचे स्मरते कि सर्व गाड्या या चालक विरहित व एकमेकांशी संभाषण करणाऱ्या असल्या तर एखादी गाडी ब्रेक लावणार असेल तर मागच्या सर्व गाडयांना ती सूचना त्वरित मिळते व त्या पण ब्रेक लावतात. आपल्या देशाने अशा तंत्रज्ञानात गुंतवणूक करावी व विकासासाठी वेग द्यावा.
रच्याकने, विमानात असतात तसे सीटबेल्ट बसमध्ये का नसतात?

<< म्हणजे पुढच्या गाडीच्या खूप जवळ गेल्यावर, चालकाला पेंग येऊन डोळे मिटायला लागल्यावर, चाके गरम झाल्यावर, इत्यादी. >>

------- कल्पना चांगली आहे, आणि असे तंत्रज्ञान उपलब्द आहे. आज काही गाड्यांत दिसत असेल पण भविष्यात सर्वच गाड्यांत येणार आहे. दोन संबंधित बातम्या.

https://www.hondainfocenter.com/2021/CR-V/Feature-Guide/Interior-Feature...

https://www.cnn.com/2019/12/27/business/technology-detects-drowsy-driver...

(अ) Pre-collission breaking - पुढच्या गाडीचा वेग कमी झाल्यास, किंवा लेन बदलून अचानक दुसरी गाडी समोर आल्यास - माझ्या गाडीचाही वेग त्या प्रमाणांत कमी होतो ( हे अनेक वेळा टेस्ट केले आहे). आता मागून कुठली गाडी धडकल्यास ... काही करता येत नाही.
(ब) lane departure and sway warning - गाडी लेन मधून बाहेर जात असेल म्हणजे पांढरी रेष ओलांडत असेल तर सतर्क करण्यासाठी बिप वाजतो. रस्त्यावर lane mark ( पांढरी/ पिवळी रेषा) असणे आवश्यक आहे.

लेन मार्किंगसाठी २" x २" चौकोनी ठोकळे एक एक फूट अंतरावर बसवलेले काही ररस्त्यांवर, महामार्गावर आहेत.
त्यावर चाक आले की रप-रप असा मोठा आवाज आणि कंपने होतात, चालकाचे लक्ष नसेल / डुलकी लागत असेल तर लगेच भानावर येतो.

सगळी वाहने स्मार्ट होईस्तो / झाली तरी याचा वापर करावा.

उदय यांचे विश्लेषण उत्तम.

दुर्दैवाने भारतात ड्रायविंग शिकताना/शिकवताना फार कमी विचार केला जातो. 'हायवेपे राईट लेन पकड के ८० के स्पीड से गाडी चलाओ' सांगणारी खूप ड्रायविंग स्कुल्स आहेत. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरही सुरुवातीला अपघातांचे प्रमाण जास्त होतेच. त्यात कार्सचे प्रमाण जास्त होते. कारण लोकांना विना अडथळ्याच्या सरळसोट रस्त्यांची सवयच नाही दुर्दैवानं आपल्याकडे.

गाड्यांच्या टायर चा दर्जा , त्यातील हवा , गाडीची वेळोवेळची सर्व्हिसिंग हे किमान नियम किती नागरिक पाळतात
>>> अगदी अगदी. आजही पावसाळ्याच्या सुरुवातीच्या वीकेंड्सला, गणपती/दिवाळी/ख्रिसमस अश्या मोठया सुट्टांच्या वेळी पुणे मुंबई मार्गावर घाटात किती वाहने बंद पडलेली असतात?

वेगवान महामार्गांची गरज काय हा प्रश्न मुळात चुकीचा आहे. मालवाहतुकीसाठी विशेषतः नाशिवंत मालाच्या वाहतुकीसाठी वेगवान महामार्ग गरजेचे आहेत.
बेशिस्त, ड्रायव्हिंग स्किल ला फार कॅज्युअली घेणारी लोकं, सेफ्टी फीचर्स ऑप्शनमध्ये देणारी गाडी या सर्वांचा परिपाक म्हणजे असे अपघात असतात. फार कमी वेळा अपघातामध्ये ह्युमन एरर फॅक्टर नसतो.

सरकारला विदर्भात असणाऱ्या तापमानाचा अंदाज नसावा? जवळपास 42+ तापमान असणाऱ्या भागात काँक्रिट चा रस्ता का?
यापेक्षा जास्त तापमानाच्या भागात काँक्रीटचे रस्ते नाहीत काय? गुजरात, राजस्थान, मेरठ दिल्ली हायवे वगैरे काँक्रीटचे नाहीत काय?

रात्री निघून पहाटे देव दर्शन, लगेच त्याच दिवशी परती प्रवास किंवा लग्न कार्य (ज्यात चालकाचा स्वतःचा जवळचा सहभाग, नातेवाईक भेटी, जागरण, नाच गाणं आहे) आणि नंतर ऑफिस गाठायला लांबचा प्रवास हे प्रकार करायचा आग्रह घरात एकच ड्राईव्ह करणारा मनुष्य असेल तर घरच्यांनीही धरू नये.
>>>> बरोबर. लोकांना कमीत कमी वेळात, स्वतःला फारशी तोशीस न लागता (सुट्टी इ. ची) सगळे हवे असते.
प्रवास प्लॅन न करणे, रात्री उशिरा पोहोचलेल्या चालकाने सकाळी लवकर अगदी ४-४.३० वाजता परत दुसरी ट्रिप घेणे, हे अगदी सर्रास चालते. ड्रायव्हर जर घरचा नसेल तर लोकं ड्रायव्हरला चहासाठी थांबूया का हे पण विचारत नाहीत, जेव्हा गाडीतल्या लोकांची इच्छा होईल तेव्हा टी ब्रेक.

परदेशातून आल्यावर तिथे अगदी पोटातले पाणीही हालत नाही कौतुकाने सांगणारी लोकं हे लक्षात घेत नाहीत कि तिथे ठराविक वेळाची शिफ्ट संपल्यावर ड्रायव्हर गाडी लावून निघून जातो. तीच लोकं इथे आल्यावर मात्र वीकेंडला आम्ही मुंबईवरून तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट वगैरे करून आल्याची प्रौढी मारताना दिसतात.

माझे एक नातेवाईक काका ह्या महामार्गाच्या कामावर engineer होते. त्यांना रात्रदिवस काम करावे लागले होते, इतके की एक महिन्यात त्यांनी एकही सुटी घेतली नव्हती, म्हणजे रविवार सुद्धा नाही सलग ३० दिवस काम, तेही बारा तेरा तास रोजचे.
अति ताणामुळे तब्येत बिघडली आणि bypass करावी लागली.
अर्थात आधी चे आणि इतर सुद्धा घटक असतीलच कारणीभूत.
पण हे stress प्रकरण भयानक आहे.
त्यांनी आता सरळ vrs घेतली आहे, झेपत नाहीये तेवढं काम ह्या वयात आणि ह्या प्रमाणात.

. लोकांना कमीत कमी वेळात, स्वतःला फारशी तोशीस न लागता (सुट्टी इ. ची) सगळे हवे असते.
प्रवास प्लॅन न करणे, रात्री उशिरा पोहोचलेल्या चालकाने सकाळी लवकर अगदी ४-४.३० वाजता परत दुसरी ट्रिप घेणे, हे अगदी सर्रास चालते. ड्रायव्हर जर घरचा नसेल तर लोकं ड्रायव्हरला चहासाठी थांबूया का हे पण>>>>>>>>>>>>
साधारण २००१ ची गोष्ट असावी , कंपनी ने गोव्याला जाण्यायेण्यास लक्झरी बस ची सोय करून दिली होती , बॉस च्या मेव्हण्याची टूर्स कंपनी होती ,ड्राइव्हर इंदोर वरून बस घेवून रात्री ११ वाजता आलेला , आम्ही संध्याकाळी ५ वाजल्या पासून तयार होऊन त्याची वाट बघत होतो, शेवटी सगळे जण निघाले .
शिरवळ च्या आसपास तो लागला डुलक्या मारायला , त्याला झोप येवू नये म्हणून बिडी पेटवून द्यायला एकाची सोय केलेली .तरीही बाबा झपकन गाडी रस्त्याच्या कडेला न्यायचा .
शेवटी एका पेट्रोल पंपावर गाडी थांबवली आणि त्याला दोन तीन तास झोप घ्यायला सांगितले .
फ्रेश झाल्या नंतर मात्र गोव्या पर्यंत स्वारी अगदी झोकात गाडी चालवत होती.
तात्पर्य : ड्राइव्हर लोकांच्या जीवाला मालक लोकं आराम मिळू देत नाही , मग तो तरी प्रवाशांना सुखरूप कसा नेवू शकतो ?
समृद्धी महामार्गावरील ड्रायव्हर ला देखील डबल ड्युटी पडली होती म्हणतात .

https://twitter.com/momentoviral/status/1678096697371533312?s=19
कोणत्या देशातील आहे कोणास ठाऊक !
ही हंसाची जोडी , कोंबड्या , बदक ला रस्ता ओलांडण्यासाठी परदेशातील लोकं गाड्या थांबवतात.
आपल्या इथे आपण अशी अपेक्षा ठेवू शकतो का ?

राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालवण्याकरता ठराविक तासांचे सिम्युलेटर ट्रैनिंग अनिवार्य करावे. परवान्यावर तसा शिक्का मारलेला असावा आणि दर वर्षी त्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक असावे.
केबिन मध्ये cctv बसवलेला असावा म्हणजे चालक काय करत आहे त्याचे रेकॉर्ड राहील. जसे कि पेंग येत होती, मोबाइल हाताळत होता, इत्यादी.
(एक व्हिडीओ पहिला होता त्यात एक ट्राम चालक (बहुदा परदेशातील) मोबाईल हाताळत होती आणि पुढच्या गाडी ला धडकली. वेग कमी होता. cctv असल्यामुळे कळून आले. https://www.youtube.com/watch?v=crxVWr27lUU)

Tailing थांबण्यासाठी काही व्यवस्था असावी. दोन गाड्यांमध्ये कमीत कमी अमुक इतके सुरक्षित अंतर राखलेच पाहिजे हा नियम असावा आणि तो पाळला जातो आहे की नाही ते सख्त नजरेने तपासले जावे. दर नियमभंगामागे एक तिकीट मिळावे आणि असे दोन तीन नवा तीन वेळा झाल्यावर परवाना निदान काही काळासाठी रद्द व्हावा.

आपल्या कडे सर्वात मोठी समस्या आहे कायदा राबविणारी यंत्रणा बिलकुल सक्षम नाही.

कडक कायदे जास्त भ्रष्टाचार ,आणि लुबाडणूक,त्रास.
असे समीकरण आहे.

कडक कायदे नसतील तर ड्रायव्हर नीट वागत नाहीत.
कायदे कडक करावेत तर जी यंत्रणा कायदे राबविते.
ती जास्त भ्रष्टाचार करते .
लोकांना त्रास देते,विनाकारण अडवणूक करते.
असा हा चक्रव्यूह आहे.

जास्तीजास्त Ai च वापर कायद्याची अमलबजावणसाठी केली गेली पाहिजे.
मानवी सहभाग त्या यंत्रणेत कमीत कमी असावा

Pages